'पिकल्या पानाचा...' आणि 'मूल्य विरुद्ध किंमत' हे धागे वाचून आमच्या मनात भलताच प्रश्न निर्माण झाला.. पिवळ्या पानाचे मूल्य जास्त का/की हिरव्या देठाची किंमत?
शेवटी 'का हो' कि 'की हो' करत वर्जिनल गाणं जालावर शोधले तर काय सापडलं बघा....
सरदार जुना हो आयडी मातुर नवं
मध्यान्ह रातीला लावी अक्कल दिवं
जिथेतिथे ह्यो रंग उधळतो, जालामधी *डवा
असल्या प्राण्याला खेटरानी बडवा !
नगं चावल बेतानं छेडा
अनिवासी ह्यो अन त्यात बेवडा
लई दिसाचं करतुय किडा
हिरवी मस्ती उतरवायला
मुखडा असा रंगवा
असल्या प्राण्याला खेटरानी बडवा !
थोडी टाकून धागे पिंकतो
नडता कोणी, लाज सोडतो
जाला शोधून कायदा दावतो
ह्याची समदी हौस किड्याची
आज पुरी जिरवा
असल्या प्राण्याला खेटरानी बडवा !
-केसुरंगा
प्रतिक्रिया
15 Jun 2010 - 3:08 am | केशवसुमार
काय हो केसुरंगाशेठ लै दिसानी दर्षाण दिलं.. ते बी एकदम दणक्यात.. एकदम जंगशान इडंबन.. प्रतिसाद विजुभै.... ची पुन्यांदा आठवण झाली
15 Jun 2010 - 11:04 am | निखिल देशपांडे
केसु सेठ एक मात्र कळत नाही केसुरंया यांनी केलेल्या आठ पैकी सहा कवितांना तुमचाच पहिला प्रतिसाद कसा??? केसुरंगा सेठ तुम्हाला सांगुनच विंडबन टाकतात वाट्ट? ;)
खाली काही दुवे देत आहे.
http://www.misalpav.com/node/2969#comment-40685
http://www.misalpav.com/node/2853#comment-39104
http://www.misalpav.com/node/2892#comment-39527
http://www.misalpav.com/node/2892#comment-39527
http://www.misalpav.com/node/3061#comment-42108
http://www.misalpav.com/node/10597#comment-170892
बाकी विडंबनाला नेहमीची मजा नाही आली हो केसुरंगा सेठ
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
15 Jun 2010 - 1:48 pm | केशवसुमार
बरोबर निखिलशेठ, आता काही लोकं पाठवतात बाबा 'गुर्जी कस काय झालय विडंबन' विचारायला...आवडल तर उत्तर देतो नाही तर ... त्यामुळे पहिला नंबर लागतो खरा..
(पहिला)केशवसुमार
15 Jun 2010 - 4:24 am | डॉ.श्रीराम दिवटे
भलते चिडले भाऊ तुम्ही. उगी उगी. कृपया नसते धागे उसवू नका. अंग असं बाहेर पडतं मग!
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
15 Jun 2010 - 4:35 am | मिसळभोक्ता
छान विडंबन !
आवडले.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Jun 2010 - 4:38 am | शुचि
असहमत. मला नाही आवडलं : ( ...... शिवीगाळ, अर्वाच्यपणा नुसता कडवटपणा.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
15 Jun 2010 - 4:40 am | मिसळभोक्ता
विडंबनाच्या विषयाशी परिचित असल्याने, शिवीगाळ असणे आवश्यकच होते.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Jun 2010 - 7:30 am | शिल्पा ब
आता ज्याचं विडंबन करायचं त्यासाठी वेगळी विशेषणं जमायची नाहीत... भन्नाट विडंबन...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 Jun 2010 - 7:03 am | चतुरंग
पार धोतरालाच हात की हो केसुरंगाशेठ!! एकदम म्हंजे एकदमच टायमानंतर वेंट्री मारली की!! झक्कास विडंबन!!! =D> =D>
चतुरंग
15 Jun 2010 - 7:59 am | सहज
हा हा हा!
मस्त!
15 Jun 2010 - 8:33 am | श्रावण मोडक
च्यायला, विडंबन करण्याची क्षमता मोठी.
पण सालं हे मराठी आंतरजाल काही सुधरायचं नाही.
15 Jun 2010 - 8:45 am | बिपिन कार्यकर्ते
+१
बिपिन कार्यकर्ते
15 Jun 2010 - 8:51 am | सहज
श्रामो सुधारणा नक्की कसल्या?
हे सार्वजनीक चर्चास्थळ (पब्लीक फोरम??) आहे हो. इथे काय मराठी वृत्तपत्र किंवा तत्सम कोणी एक संस्था वाचन, विपणन करत नाही आहे. इथे येणारे सदस्यच लेखन करणार.
त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यातुन आपण मराठी माणसे एकमेकांचे उखाळ्यापाखाळ्या काढण्यात सौख्य प्राप्त करणार.
नक्की काय सुधारायचे आहे? सगळे संत बनणार व मौलीक सुवचने, शोध प्रबंध लिहणार? शिवाय अधुन मधुन सदस्य स्वयंस्फुर्तीने व सहकार्याने काही लेखमाला उदा. फुटबॉलमाला किंवा तसे प्रकल्प (ऑनलाईन- ऑफलाईन) करत असतातच की.
अर्थात जे उत्तम लेखन होते त्याला योग्य तो मान मिळतोच की. विनोदी साहीत्य जे तयार होते त्यात ज्या साहीत्याचा दर्जा छान ते लोक उचलून धरतात (अव्हरेज २ दिवस) मग सुधारतातच की अनलेस कोणि बिघडलेले आले व आग्रह केला आमि बी घडलो तुम्ही बी घडाना.. :-)
असो विडंबन करणार्यांना अरेरे काय तुम्ही! कधी सुधारणार? अशी शेरेबाजी करणार्या श्रामो आजोबांचा निषेध. गांधी सावरकर इ वादात हिरीरीने भाग घेणार्या सदस्यांना सुधारण्याचा सल्ला देणार नाहीत कधी पण माती मउ लागली तिथेच खणणार. चालू द्या तुमचे पालथे धंदे. मराठी आंतरजालावरचे काका-आजोबा कधी सुधारणार कोणास ठावूक.
15 Jun 2010 - 9:01 am | श्रावण मोडक
बरं झालं सहजकाका तुम्हीच बोललात. :)
मराठी माणसे एकमेकांचे उखाळ्यापाखाळ्या काढण्यात सौख्य प्राप्त करणार.
हे आणि हेच. उखाळ्यापाखाळ्यात सौख्य. इथंच मार खातात, म्हणून म्हटलं सुधरणार नाही. :) कोट करताना तुमच्या वाक्यातील आपण हा शब्द मी काढून टाकला आहे याची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी ही नम्र विनंती.
आणि यातही खेटरांनी बडवण्याला उखाळ्या-पाखाळ्या म्हणायचं असेल तर या उच्च दर्जापर्यंत आम्ही काही पोचलो नाहीये अद्याप. म्हणजे, आमच्याच भाषेत बोलायचं तर 'मोठे व्हा' हा सल्ला अवतरणांसह आम्हाला लागू पडला म्हणायचा. गेम यशस्वी आपली. ;)
15 Jun 2010 - 9:17 am | सहज
पुन्हा तेच, जेव्हा इतरत्र खेटरानी पूजा बांधली जाते तेव्हा बरे झाले पासुन मोठे व्हा रे अशी प्रतिक्रिया उमटतेच. वन वर्ड = सापेक्ष.
तुमचे म्हणणे खरच सिरीयली घ्यायचे तर प्रत्येक अश्या धाग्यात निषेध नोंदवत बसले पाहीजे किंवा मसंवर वाचनमात्र.
अगेन वन वर्ड = सापेक्ष.
टेक्निकली करेक्ट, पॉलीटिकली करेक्ट नाही जमत प्रत्येक धाग्यात.
बाकी मिभो कॅन शुअरली टेक इट. मिभोंचे देखील बहुतेक हेच म्हणणे असावे की बी टफ एन्ड टेक इट लाईक अ रियल मॅन / रियल वुमॅन. आंतरजालावर दादागिरी खूपच अती होत असेल तर संपादक आहेतच की. पुन्हा अश्या शेरेबाजीतुन श्रामो, सदस्यांच्या प्रगल्भतेवर अविश्वास तसेच संपादकावर नकळत (जाणून बुजून म्हणत नाही आहे.) रोख दिसतो. कुठली लाईन काटेकोर कशी पाळायची हो?
माझा अनुभव, जिथे अती झाले आहे तिथे संपादकांनी हस्तक्षेप केला आहे. मागे एका प्रतिसादात हेच म्हणालो की संपादकांचा निर्णय मान्य करुन गेम ऑन. संपादकांच्या शिटीला दाद देत नसतील तर यलो कार्ड व रेड कार्ड वापरले पाहीजे.
15 Jun 2010 - 9:24 am | श्रावण मोडक
सारेच सापेक्ष. जसे, एकाची अफेअर, दुसऱ्याची भानगड!!!
15 Jun 2010 - 9:45 am | टारझन
आगायायायाया =)) =)) =)) =))
आजकाल तुम्ही डायरेक्ट चेनसॉ घेऊन फिरताय का हो .. सगळी मोठी मोठी झाडं कापत सुटलेत =))
- रावण मोडक
15 Jun 2010 - 11:57 am | Nile
फक्त वैयक्तीक शिव्या घालण्यास बनवलेल्या एखाद्या आयडीने केलेल्या उखाळ्या-पाखाळ्या आणि एखाद्याने केलेल्या उखाळ्या पाखाळ्या यात फरक असावा.
-Nile
15 Jun 2010 - 12:01 pm | सहज
अश्याच निमित्ताने अचानक सक्रिय होणारे पेश्शल आयडी व नियमीत तारतम्याने लिहणारे सदस्य यांच्यातला फरक व कोणाला कितपत गंभीरपणे घ्यायचे हे वाचक ठरवू शकतील यावर निदान माझा अजुन तरी विश्वास आहे.
जाताजाता - डुप्लीकेट आयडी व्यवस्थापनाने उघडकीस आणावेत का?
15 Jun 2010 - 10:47 pm | मिसळभोक्ता
मिभोंचे देखील बहुतेक हेच म्हणणे असावे की बी टफ एन्ड टेक इट लाईक अ रियल मॅन / रियल वुमॅन.
आमचे एक परिचित म्हणत असत, "मराठी आंतरजालावर टिकायचे, तर गेंड्याची कातडी हवी."
परंतु, हल्ली त्याचा विसर पडलेला पाहून खेद होतो.
असो.
सदस्यांच्या प्रगल्भतेवर असा आडून/लपून अविश्वास व्यक्त करू नये.
जिथे अप्रगल्भता दिसते, तिथे रोखठोकपणे अविश्वास व्यक्त करण्यासाठी, "मोठे होणे" आवश्यक असते.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Jun 2010 - 10:53 pm | प्रियाली
गेंड्याची कातडी मऊ असते ही फ्याक्ट आहे. संकेतस्थळांवरही असे गेंडे मुबलक आहेत.
15 Jun 2010 - 10:55 pm | मिसळभोक्ता
"गेंड्याची कातडी" हा वाक्प्रचार आहे. त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नये, हे आपल्याला मागेही सांगितले होते. मोठ्या व्हा.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Jun 2010 - 10:58 pm | प्रियाली
कितीही मोठी झाले तरी आपल्यापेक्षा लहानच राहणार. तेव्हा मी मोठी झाले तर आपल्याला माझ्यापेक्षा मोठे होणे प्राप्त आहे.
15 Jun 2010 - 11:05 pm | मिसळभोक्ता
"मोठे होणे" हेदेखील सापेक्ष आहे.
(प्रभूमास्तर, ह्यात "तसे" काहीही नाही. जरा सळसळणार्या बोटांना आवर घाला.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Jun 2010 - 11:38 pm | टारझन
सळसळणारे बोट हृदयाला भिडले =)) न रहावुन प्रतिक्रीया :)
असो ... चालु द्या तुमचा "मोठ्या लोकांचा" सुसंवाद :)
- छोटा टारझन
15 Jun 2010 - 9:02 am | अक्षय पुर्णपात्रे
व्यक्तिगत उल्लेख म्हणून आक्षेपार्ह. काही संपादकांनी फेटे उडवणे हे त्याहूनही आक्षेपार्ह. असल्या विडंबनांना मिपावर स्थान नसावे. श्री केसुरंगा व इतरांनी व्यक्तिगत उखाळ्यापाखाळ्या काढण्यासाठी इतरत्र व्यासपीठ शोधावे.
15 Jun 2010 - 9:20 am | टारझन
फालतु. मजा नाही आला. केसुरंग्याची काळजी वाटते.
- (वि)डंबिन भोक्त्यासार्खे
15 Jun 2010 - 10:04 am | शिल्पा ब
फारच सिरीयसली घेत आहात तुम्ही...ज्याच्यावर विडंबन झाले त्यांनी सुद्धा हे हलके घेतले (परतफेड करणार म्हणून का ? असो,) ...मिष्टर गंभीर यांना थोडे दूर ठेवा.
(झाडावरची जागा पटकावलेली) शिल्पा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 Jun 2010 - 10:49 pm | मिसळभोक्ता
शिल्पातै,
विडंबन हा काय लग्नातला अहेर आहे का, की ज्याची परतफेड आवश्यक असते ?
केसुरंगा आमचे जुने स्नेही आहेत.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Jun 2010 - 11:25 pm | शिल्पा ब
आम्हाला हे माहिती नव्हतं...असो.
अवांतर :अगदी निवडून निवडून वाचता बुवा तुम्ही.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 Jun 2010 - 11:54 am | गणपा
केसुरंगाशेठ भारीच मनकवडे बॉ तुम्ही.
अगदी कालच मनात आल होत की साला खुप दिवस झाले केसुरंगाच फक्कड विडंबन काव्य आल नाही. आणि आज ही मेजवानी..
वाह!!!!
15 Jun 2010 - 11:48 am | अवलिया
हा हा हा मस्त....
--अवलिया
15 Jun 2010 - 12:17 pm | चेतन
केसुरंगाशेठ थोडं जास्तच डायरेक्ट झालं
माझा थोडा इनडायरेक्ट प्रयत्न येथे आहे ;)
15 Jun 2010 - 3:51 pm | आंबोळी
जबरदस्त गोलंदाजी
आवडेश....
प्रकटदिन कधी आहे?
आंबोळी