ही धुंद पावसाळी हवा
मंडळी, काव्यातील ओळीचा शेवटच्या शब्दाने पुन्हा नविन ओळ सुरू होणारी हे काव्य आहे. एक नवा प्रयत्न केला आहे. आस्वाद घ्या.
ती: ही धुंद पावसाळी हवा
तो: हवा हवासा गारवा
ती: गारव्यात तनू ही धुंद
तो: धुंदीत रंगला खेळ नवा
दोघे: ही धुंद पावसाळी हवा.... ||धृ||
तो: स्वप्नांच्या वाटेने चालतांना
ती: चालतांना स्पर्शून घेना
तो: घेवून कवेत साजणीला
ती: साजणीचा लाजूनी चुर मरवा
दोघे: ही धुंद पावसाळी हवा....||१||
ती: रात्र अशी ही सुखावणारी
तो: सुखावून मने तृप्त झाली
ती: होवोनी एकरूप मिलनाने
तो: मिलनास साक्षी चांदवा
दोघे: ही धुंद पावसाळी हवा....||२||
दोघे: ही धुंद पावसाळी हवा
दोघे: हवा हवासा गारवा
- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०६/२०१०
प्रतिक्रिया
11 Jun 2010 - 7:26 am | शिल्पा ब
ह्म्म्म...ठिक आहे..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jun 2010 - 12:27 am | शानबा५१२
चांगली वाटली कींवा वाईट वाटली तर प्रतिक्रीया द्यावी.
ठीक आहे,बरी आहे अशा रुपाच्या प्रतिक्रीया बघुन कवीला उत्तेजन नाही मिळत!!
11 Jun 2010 - 5:01 pm | आंबोळी
वा !
पावसाळी कविता पाहून मला एकदम पापडगावकरांची आठवण आली.
आंबोळी
11 Jun 2010 - 5:58 pm | डॉ.श्रीराम दिवटे
आणि तुझा सहवास हवा..
पावसाचे गीत छान जमलेय.
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
11 Jun 2010 - 7:40 pm | पाषाणभेद
>>>आणि तुझा सहवास हवा..
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
व्वा क्या बात है!
बाकी शिल्पा ब, आंबोळी, डॉ.श्रीराम दिवटे अन इतर १०१ वाचकांचे आभार.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
11 Jun 2010 - 9:56 pm | पक्या
छान कविता.
आता ह्या घडीला ११६ झालेत.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
12 Jun 2010 - 12:25 am | शानबा५१२
ती खुप अगाउ दीसते.
आणि लग्न झालेले नसताना अस चंद्राच्या प्रकाशात फाजिल चाळे करण बर नव्हे...............तेव्हा कवीने 'पती-पत्नी संवाद' आहे की नाही ते स्पष्ट करावे.
-दनादन साप्ताहीकाचा संपादक.
12 Jun 2010 - 3:55 am | पाषाणभेद
अहो काही नाही हो. तुमच्या त्या 'मल्मली तारूण्य माझे' मधलीच आहे ती. तिला तुम्ही आगावू म्हणतात काय?
बाकी कविता टाकण्याच्या आधी मी तो अन ती चा सिक्वेन्स बदलून पाहीला होता. मग या नाही तर त्या ओळीत आगावूपणा दिसला असता.
>>> आणि लग्न झालेले नसताना अस चंद्राच्या प्रकाशात फाजिल चाळे करण बर नव्हे...............तेव्हा कवीने 'पती-पत्नी संवाद' आहे की नाही ते स्पष्ट करावे.
हा हा हा...
तुमच्या मनात काय आहे ते सांगा. :-)
>>>> -दनादन साप्ताहीकाचा संपादक.
- मस्त.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
12 Jun 2010 - 12:28 am | शुचि
हा प्रयोग आणि ही कविता फार आवडली.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||