गझल सम्राट सुरेश भट ह्यांची एक अतिसुंदर गझल. ''हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही"
http://sureshbhat.blogspot.com/2007/04/blog-post_6552.html
त्यांच्या स्मृतीस स्मरून व क्षमा मागून थोडा हास्य रस निर्माण करण्याचे ढाडस करतो.
हे तुझे अशावेळी चरणे रे बरे नाही
तोबरा कबाबाने मारणे बरे नाही
जी तुला दिली होती तीच प्लेट रे तुझी
मागून पुन्हा घेणे अन टाकणे बरे नाही
केक तू पुरा सोड, मोह नको चॉक्लेटचा
अशा वयी चॉक्लेटचे चापणे बरे नाही
घेतली कितीदा रे बशीमधे पुरणपोळी
आपुलीच पोळी आपण पिकवणे बरे नाही
आज टोकरे बोल आज रोकते बोल
घेर तुझ्या पोटाचा वाढवणे बरे नाही
कालची तुझी माझी फ़िगर वेगळी होती
हे विजारीत कोंबलेले ढेरके बरे नाही
पंगतीत पाहण्या लावतोस का खाली
हाय... निर्लजा तुझे ढेकरणे बरे नाही
प्रतिक्रिया
31 May 2010 - 12:40 pm | मदनबाण
केक तू पुरा सोड, मोह नको चॉक्लेटचा
अशा वयी चॉक्लेटचे चापणे बरे नाही
हा.हा. हा... :)
(चॉकलेट प्रेमी)
मदनबाण.....
Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower
1 Jun 2010 - 9:20 am | मिसळभोक्ता
फारसे झाले नाही.
धाडस करावयाचे असल्यास असे कुचकुचणे बरे नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Jun 2010 - 10:08 am | अरुण मनोहर
एकीकडे मला वाटत होते की सुरेश भट ह्यांच्या गझलचे विडंबन करणे बरे नाही. दुसरीकडे विडंबनासाठी ईझी बॉल वाटत होता. त्या खेचाखेचीत सिक्सर न लागता एक दोन धावांवरच समाधान मानावे लागणार असे दिसते आहे.
1 Jun 2010 - 10:37 am | मिसळभोक्ता
अरुण शेठ,
एक पण धाव नाही.
रन आऊट झालात.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Jun 2010 - 11:03 am | अरुण मनोहर
आपणासारखे अंपायर असले की दुसरे काय व्हायचे! जाऊ द्या झाले.