सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.
मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तो मेलेलाच बरा असे लोकशाहीवाद्यांचे पुढारी एनिटस आणि मेलिटस यांचे म्हणणे पडले.
उरलेली पुढची हकीकत सर्व जगाला माहीतच आहे. त्याच्या लाडक्या शिष्याने, प्लॅटोने ती हकीकत काव्यापेक्षाही सुंदर अशा गद्यात लिहून ठेवली आहे. आपलं नशीब, जगातील त्या भागातील पहिल्या तत्ववेत्त्याचे बलिदान, त्याने दया मागायला नकार, सुटण्यासाठी लाच द्यायला नकार, हे सर्व प्लॅटोने आपल्यासाठी लिहून ठेवले आहे. लोकशाहीवाद्यांकडे त्याला माफ़ी देण्याची ताकद असताना, त्यांनी सांगितला तसा अर्ज करायला त्याने स्पष्ट नकार दिला. बाहेर त्याच्या मृत्यूची मागणी करणार्या झुंडीच्या घोषणांच्या विरुध्द त्यांच्याच न्यायाधिशांनी त्याला सोडून द्यायची इच्छा व्यक्त केली हा त्याचे सिध्दांत बरोबर होते याचा पुरावाच म्हणावा लागेल. सध्याच्या राजकारणामधे जे चालले आहे त्यात आपले लाचार मंत्री तत्वासाठी आपली खुर्चीही सोडत नाहीत हे बघता सॉक्रेटीसचे मोठेपण आपल्या लक्षात यायला हरकत नाही.
त्याने वीष पिऊन आपली जीवनयात्रा संपवावी असा आदेश लोकशाहीवाद्यांच्या पुढार्यांनी काढला. सॉक्रेएटीसचे सगळे मित्र जे त्याचे विद्यार्थीपण होते, तुरुंगात जमा झाले. त्यांनी आल्याआल्या त्याला असा सल्ला दिला की तो अजूनही येथून सुटू शकतो….. त्यांनी तुरुंगाच्या सगळ्या अधिकार्यांना लाच देऊन फितवले होते. सॉक्रेटीसने या सुचनेला नम्रपणे नकार दिला आणि त्याच्या चिंताग्रस्त मित्रांना म्हणाला “तुम्ही सर्वजण मला आनंदाने निरोप द्या, आणि असे समजा की तुम्ही सॉक्रेटीसचे शरीर पुरत आहात त्याचे विचार मात्र जिवंतच आहेत. असं म्हणून तो…..
(खालील वर्णन प्लॅटोच्या शब्दात…….)
शांतपणे उठला आणि क्रिटोबरोबर स्नानगृहात गेला. क्रिटोने आम्हाल तेथेच थांबण्याची खूण केली आणि आम्ही तेथेच थांबलो. आमच्या मनात आणि ओठावर तीव्र दु:खाशिवाय काहीच नव्हते. सॉक्रेटीस आम्हाला आमच्या वडिलांसारखा होता आणि त्याच्याशिवाय उरलेले आयुष्य काढायचे म्हणजे अनाथांसारखेच जगणे ! सूर्यास्ताच्या खुणा क्षितिजावर दिसायला लागल्यावर तो परत आमच्यात येऊन बसला. कोणीच काहीच बोलत नव्हते. असाच काही वेळ गेल्यावर त्या तुरूंगाचा प्रमुख आला आणि सॉक्रेटीस समोर नम्रपणे हात बांधून उभा राहिला.
“हे सॉक्रेटीस, या तुरूंगात आत्तापर्यंत आलेल्या लोकांमधे तुझ्याइतका सभ्य आणि थोर मनाचा माणूस मी आजवर बघितलेला नाही. माझे कर्तव्य पार पाडताना मी येथे अनेक लोकांना मृत्यू दिलेला आहे, आणि त्यांचे शिव्याशाप पण ऐकलेले आहेत. अर्थात त्यासाठी मी त्यांना दोष देत नाही. पण मला खात्री आहे तुझ्या बाबतीत असले काही घडणार नाही. आता तुझ्या बाबतीत जे काही घडणार आहे त्याबद्दल तू माझ्यावर रागावणार नाहीस अशी मला आशा आहे, कारण जे काही घडणार आहे त्यात माझा काहीच दोष नाही हे तुला चांगलंच माहीत आहे. तुझा या पुढचा प्रवास सुखाचा होवो आणि देव तुला हे सगळे सहन करण्याची शक्ती देवो. या प्रकारात मी फक्त एक निरोप्या आहे याबद्दल तुझ्या मनात काही शंका नसावी.” असे म्हणतानाच त्याच्या मनाचा बांध फुटला. भिंतीचा आधार घेत तो तसाच माघारी जाऊ लागला. त्याच्याकडे बघत सॉक्रेटीस म्हणाला “मी तुझ्या शुभेच्छांचा आनंदाने स्विकार करतो आणि तुलाही शुभेच्छा देतो. तुला जसे सांगितले गेले आहे तसेच तू कर. माझी अजिबात चिंता करू नकोस.”
मग आमच्याकडे वळून सॉक्रेटीस म्हणाला ” बघा हा माणूस किती प्रामाणिक आणि साधा आहे ! मी तुरुंगात असताना तो नेहमी मला भेटायला येत असे आणि त्याला माझ्या मृत्यूचे खरेच दु:ख झालेले दिसतंय ! पण त्या बिचार्याला यातून लवकर सोडवायचे असेल तर त्यांना तो विषाचा प्याला आणायला सांगा. ते वीष तयार नसेल, तर त्यांना ते तयार करायला सांगा.”
ते ऐकून क्रिटो म्हणाला ” एवढी काय घाई आहे ? अजून तर सूर्य मावळला पण नाही आणि येथे येणारा प्रत्येकजण तो प्रसंग पुढे ढकलायचा प्रयत्न करतोच. त्यासाठी काय काय कारणे सांगतात ते. जेवायचे आहे, शेवटचे मद्य प्यायचे आहे………त्यामुळे तुलाच घाई करायचे कारण नाही. अजून बराच वेळ आहे”.
सॉक्रेटीस म्हणाला ” तू ज्यांच्या विषयी बोलत आहेस त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असेलही कदाचित. उशीर झाल्यामुळे त्यांना काय फायदा होतो कोणास ठाऊक; पण तसले काहीही करण्याचा माझा विचार नाही आणि तेच बरोबर आहे असे मला वाटते. ते वीष थोडेसे उशीरा पिण्यामुळे, असलाच तर, कसलाही फायदा करून घ्यायची मला यत्किंचितही इच्छा नाही. जो जीव थोड्यावेळाने जाणारच आहे, त्याला थोड्यावेळ वाचवून काय मिळणार आहे ? मला माझेच हसे करून घ्यायचे नाही. तेव्हा कृपा करून माझे ऐका, नाही म्हणू नका.”
त्याचे ते बोलणे ऐकून क्रिटोने नोकराला खूण केली आणि ते दोघेजण आतल्या खोलीत गेले. बराच वेळ ते बाहेर आले नाहीत. थोड्यावेळाने तुरुंग आधिकार्याबरोबर ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात विषाचा प्याला होता. सॉक्रेटीस त्याला म्हणाला ” माझ्या मित्रा, तुझा असल्या बाबींमधे अनुभव दांडगा आहे. तूच मला हे वीष घेण्याबाबत मार्गदर्शन कर”.
तुरुंग अधिकारी तो पेला सॉक्रेटीसच्या हातात देत म्हणाला ” त्यात अवघड असं काही नाही. हा प्याला प्यायल्यावर तुम्हाला या इथेच थोड्या येरझार्या घालाव्या लागतील. जेव्हा तुमचे पाय जड होतील तेव्हा या बिछान्यावर तुला फक्त पडायचं आहे. बाकीचे काम मग ते वीष करेलच.”
सॉक्रेटीसने तो पेला अगदी सहजपणे पण काळजीपूर्वक त्याच्या हातातून घेतला. त्याच्या चेहर्यावरच्या भावात कसलाही बदल आम्हाला तरी जाणवला नाही. तो शांतपणे त्या अधिकार्याच्या डोळ्यात बघत त्याला म्हणाला “मी या विषाचा देवाला नैवेद्य दाखवू शकतो का ? तुझे काय म्हणणे आहे? मी दाखवू का नको? त्या अधिकार्याच्या चेहर्यावरचे आश्चर्य लपून राहिले नाही.
“आमचे काम जेवढे लागेल तेवढे वीष करायचे. यापेक्षा आधिक काय सांगू मी ?”
“मी तुझे म्हणणे समजू शकतो. पण मला देवाची प्रार्थना केलीच पाहिजे आणि त्या दुसर्या जगाच्या प्रवासासाठी त्याचे आशिर्वाद घेतलेच पाहिजेत.”
“देवा ! आता हीच माझी प्रार्थना आणि नैवेद्य समज !” असे म्हणून सॉक्रेटीसने तो विषाचा प्याला सहजपणे ओठाला लावला आणि त्यातले विष आनंदाने पिऊन टाकले.
आत्तापर्यंत आम्ही आमच्या भावनांवर आणि दु:खावर मोठ्या मुष्किलीने ताबा ठेवला होता, पण त्याला वीष पिताना बघून आमचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला. त्याचे वीष पिऊन संपल्यावर तर आमच्या दु:खाला पारावार राहिला नाही. माझ्यासकट सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वहायला लागले. ते दिसू नयेत म्हणून मी माझा चेहरा माझ्या दोन्ही हातांनी झाकून घेतला आणि त्यांच्या आड मी माझ्याच नशिबावर रडू लागलो, त्या महामानवाच्या नशिबावर नव्हे. असला मित्र व सोबत आता नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय ? ही अवस्था, माझी एकट्याचीच नव्हे तर सर्वांचीच झाली होती. क्रिटोचे दु:ख इतके अनावर झाले की तो तेथून उठून बाजूला झाला. मीही त्याच्यामागे गेलो आणि नेमके त्याच वेळी एपोलोडोरसचे दु:ख अनावर होऊन त्याच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला. तो जोरजोरात रडायला लागला. त्याचे ते रडणे ऐकूनआमच्यासारख्यांच्या जीवाचासुध्दा थरकाप उडाला. सॉक्रेटीस मात्र शांत होता.
“हा विचित्र आवाज कसला ? मी सर्व स्त्रियांना घरी पाठवले त्याचे मुख्य कारण, त्यांच्या रडण्याचा मला त्रास झाला असता. मला वाटतं पुरूषांनी या जगाचा निरोप शांतपणेच घेतला पाहिजे. तेव्हा आता शांत रहा आणि जरा धीर धरा”
हे ऐकल्यावर मात्र आमची आम्हालाच लाज वाटली. आम्ही आमचे अश्रू आवरले. सॉक्रेटीस मात्र चालतच होता. थोड्याच वेळात सांगितल्याप्रमाणे त्याचे पाय जड झाले, मग तो त्या अधिकार्याने सांगितल्याप्रमाणे पाठीवर उताणा झोपला…. ज्या माणसाने त्याला वीष दिले होते त्याने त्याच्या पायाकडे नीट निरखून बघितले. त्या पायावर बोटांनी जोरात दाबून त्याने तेथे स्पर्ष होतो आहे का ते विचारले. सॉक्रेटीसने नाही म्हटल्यावर, मग त्याने हळू हळू वर वर दाबायला चालू केले. त्याची खात्री पटल्यावर त्याने आम्हाला दाखवले त्याचे पाय किती गार आणि निर्जिव होत चालले होते ते. सॉक्रेटीसला पण ते जाणवत होतेच. तो समजुतीच्या स्वरात म्हणाला ” हे वीष माझ्या ह्रदयाच्या जवळ पोहोचले की संपले सगळे”. जेव्हा त्याच्या कंबरेपर्यंत वीष भिनले तेव्हा त्याने त्याच्या तोंडावरची चादर काढली आणि तो म्हणाला “क्रिटो मी एक्लिपीयसला एक कोंबडा देणं लागतो. हे माझे कर्ज फेडायला जमेल का तुला ?”
“ती कर्जफेड होईल ! खात्री बाळग ! क्रिटो तत्परतेने म्हणाला.
“अजून काही आहे का? “क्रिटोने विचारले
या प्रश्नाला काहीच उत्तर मिळाले नाही. पण दोन तीन क्षणातच त्या चादरी खाली एक हालचाल झाली. नोकराने त्याच्या तोंडावरची चादर बाजूला केली आणि त्याच्या डोळ्यांच्या पापण्या हलक्याच मिटवल्या.
आमच्या मित्राची अखेर ही अशी झाली. असा मित्र, जो सर्वात ज्ञानी होता, न्यायी होता. असा माणूस मी तरी या विश्वात बघितला नव्हता.
प्लॅटो.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
30 May 2010 - 3:22 pm | भोचक
क्या बात है. मृत्यूही सहज पचविणार्या सॉक्रेटिसबद्दलचा आदर वाढला. आणि चित्रदर्शी वर्णन करणार्या प्लेटोलाही सलाम.
(भोचक)
जाणे अज मी अजर
30 May 2010 - 4:30 pm | मदनबाण
अप्रतिम लेख... :)
मदनबाण.....
Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower
30 May 2010 - 5:21 pm | ज्ञानेश...
सॉक्रॅटिसच्या धैर्याला आणि ध्येयनिष्ठेला सलाम !
जयंतराव, लेख चांगला झाला असला, तरी आधीचे संदर्भ सर्वांना कळावे म्हणून सॉक्रॅटिसवर, त्याच्या जीवनकार्यावर एक छानसा लेख लिहाल का?
जमल्यास लिहाच, अशी विनंती करतो.
30 May 2010 - 5:45 pm | मुक्तसुनीत
असेच म्हणतो.
उत्तम लिखाण !
30 May 2010 - 7:25 pm | जयंत कुलकर्णी
मी आता सर्व तत्वज्ञानींच्या ( भारतीय सुध्दा ) आयुष्यातल्या महत्वाचे प्रसंग सांगायचा विचार करतो आहे. त्यानंतर मग त्यांचे विचार व त्यावरील टिका. असा प्रवास करायचा विचार आहे.
यात आपल्या सगळ्यांच्या साथीची अपेक्षा आहेच ! आपल्याला कंटाळा येणार नाही व येऊ नये अशी "त्याच्या" पाशी प्रार्थना :-)
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
30 May 2010 - 5:32 pm | टारझन
अप्रतिम व्यक्तिमत्वावरील अप्रतिम लेखन !!
हॅट्स ऑफ !
30 May 2010 - 7:26 pm | जयंत कुलकर्णी
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
30 May 2010 - 6:53 pm | अप्पा जोगळेकर
खूपच छान माहिती. छान लिखाण.
30 May 2010 - 7:06 pm | अविनाशकुलकर्णी
जयंत राव तुमच्या लेखनाचा मी फ्यान आहे..मस्त..प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला
30 May 2010 - 7:15 pm | शानबा५१२
खुप मस्त लिहलय...जरी most touching भाग त्या अनुयायाने लिहला असला तरी आपणही छान लिहल आहे.
आपण असे धागे लिहुन फार चांगल केलत .मला पहील्यांदा कुठला लेख आवडला.........अगदी कोणत्या पाकक्रुतीपेक्षा...........
तुम्ही ह्या बद्दल आणखी खुप लिहा हो.......व त्यात socrates ची वाक्य टाका .वाचायला आवडेल............
एकदम class लेख होता,mobile च्या लहान screen वरही वाचायला मजा आली........
धन्यवाद जयंत कुलकर्णी सर.......अगदी मनापासुन.......
पण पुन्हा ह्याच विषयावर तुम्ही लिहावच अस मला वाटत.तेव्हा तसा त्रास जरुर घ्या.
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
30 May 2010 - 7:28 pm | जयंत कुलकर्णी
मी आता सर्व तत्वज्ञानींच्या ( भारतीय सुध्दा ) आयुष्यातल्या महत्वाचे प्रसंग सांगायचा विचार करतो आहे. त्यानंतर मग त्यांचे विचार व त्यावरील टिका. असा प्रवास करायचा विचार आहे.
यात आपल्या सगळ्यांच्या साथीची अपेक्षा आहेच ! आपल्याला कंटाळा येणार नाही व येऊ नये अशी "त्याच्या" पाशी प्रार्थना
जयंत कुलकर्णी.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
30 May 2010 - 10:48 pm | शानबा५१२
जर कुठले पुस्तक न चाळता अशी वाचनिय माहीती मिळुनही कोणी कंटाळत असेल तर त्याची चिंता तुम्ही न करता आपण असेच लिहत रहा.
खुप छान विषय निवडलात..........पुढच्या लेखांसाठी शुभेच्छा सर!
पण हे असल काही वाचनात आल की गोंधळायला होत...............
There is a general consensus that Socrates—who was the main character in most of Plato's dialogues—was a genuine historical figure. It is also commonly understood that in later dialogues Plato used the character of Socrates to give voice to his own philosophical views. The Socratic problem refers to the difficulty or inability of determining what in Plato's writings is an accurate portrayal of Socrates' thought and what is the thought of Plato with Socrates as a literary device.
for instance, Plato has Socrates constantly denying that he would ever accept money for teaching, while Xenophon's Symposium clearly has Socrates stating that he is paid by students to teach wisdom and this is what he does for a living. Given the apparent evolution of thought in Plato's dialogues from his early years to his middle and later years, it is often believed that the dialogues began to represent less of Socrates and more of Plato as time went on. However, the question of exactly what aspects of Plato's dialogues are representative of Socrates and what are not is far from agreed upon.
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
30 May 2010 - 7:12 pm | पुष्करिणी
अतिशय सुंदर लेख , फार आवडला !
पुष्करिणी
30 May 2010 - 7:47 pm | मनीषा
मी आता सर्व तत्वज्ञानींच्या ( भारतीय सुध्दा ) आयुष्यातल्या महत्वाचे प्रसंग सांगायचा विचार करतो आहे. त्यानंतर मग त्यांचे विचार व त्यावरील टिका. असा प्रवास करायचा विचार आहे.
जरुर लिहा , वाचायला अवडेल
30 May 2010 - 9:30 pm | ज्ञानेश...
हेच म्हणतो.
सवडीने लिहा, सविस्तर लिहा.
30 May 2010 - 9:01 pm | वाचक
अशा 'अनेक सॉक्रेटिसांना' अजूनही 'विषाचे' प्याले प्यावेच लागताहेत हेच आपले दुर्दैव
पण लेख (आणि पुढील लेखमालेचा विचार / उपक्रम) स्तुत्त्य आहे.
30 May 2010 - 10:29 pm | लिखाळ
वा...'सूर्य पाहिलेला माणूस' या नाटकातले संवाद कोठून आले असा प्रश्न पडला होता.. त्याचे उत्तर मिळाले. प्लेटोने स्वतःच सर्व लिहून ठेवले आहे तर..
लेख उत्तम..
आपण योजलेला उपक्रम चांगला आहे. पुढला लेख वाचायला उत्सुक आहे.
-- लिखाळ.
30 May 2010 - 10:59 pm | आशिष सुर्वे
छान.. एक चांगला उपक्रम!
अमृतावानी लेखनाचा कोणाला कंटाळा येईल?
तुम्ही लिहीत रहा.. आम्ही वाचत रहातो..
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
30 May 2010 - 11:06 pm | भडकमकर मास्तर
उत्तम लेख..
मजा आली..
तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा..
पुढील लेखांची वाट पाहत आहे...
31 May 2010 - 12:23 am | बिपिन कार्यकर्ते
उत्तम लेख आणि येणार्या उपक्रमाची वाट बघेन.
सॉक्रेटिसच्या अंतिम क्षणांची माहिती होती. पण असे तपशीलवार वाचायचे होते एकदा. आज आयते मिळाले. धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
31 May 2010 - 9:06 am | सहज
उत्तम लेख. आवडला.
सॉक्रेटिसवर अजुन लिहावे.
31 May 2010 - 9:31 am | प्रभो
उत्तम लेख. आवडला.
31 May 2010 - 11:04 am | Nile
हेच म्हणतो.
-Nile
31 May 2010 - 11:23 pm | धनंजय
भाषांतर छानच झालेले आहे.
प्रास्ताविकात एक-दोन वेळा "लोकशाहीवाद्यांचा विजय, लोकशाहीवाद्यांचे पुढारी" वगैरे उल्लेख वाचून कुतूहल वाटले.
मेलेटसचा आरोप (सॉक्रेटीसच्या शब्दांत) येणेप्रमाणे :
यात लोकशाहीवाद कुठला आहे?
सॉक्रेटीस आरोपांचा सारांश सांगतो :
मूळ ओरोपकर्ते लोकशाहीवादी होते ही बाब सॉक्रेटीसलाच कळू नये? माझ्या मते, असे नव्हे. सॉक्रेटीसने आरोपांचे जे विश्लेषण दिले आहे, ते त्याने भाबड्या मूर्खपणाने दिलेले आहे, असे मानण्यासाठी काहीही पुरावा मला दिसत नाही. उलट त्याचे विश्लेषण स्वीकारार्ह आहे - लोकशाहीवादाचा संबंध नाही - असेच मला वाटते.
- - -
तरी म्हणूया की सॉक्रेटीसच्या विश्लेषणात नाही, पण त्यानंतरच्या इतिहासातून चर्चालेखकाला कळले आहे, की फिर्यादी आणि दंड देणारे लोक लोकशाहीवादी होते, आणि सॉक्रेटीसवरचा गुप्त आरोप लोकशाहीविरोध होता.
मात्र लोकशाहीतच त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलणारे सर्वजण एका मताचे नव्हते. सॉक्रेटीसच्या आरोपाबाबत ज्यूरी निर्णय २८० विरुद्ध २२० होता, अशी नोंद आहे. येथे लोकशाही पद्धतीने मतदान घेतले घेतले, पण "झुंडी"चेही एकमत नव्हते, असेच दिसते.
लोकशाहीवेगळी कुठलीतरी राज्यव्यवस्था असती तर वेगळा कुठला निर्णय झाला असता असे लेखकाला वाटते का? अनेक राजांनी असल्या "लोकांना भडकवणार्यां"ना देहदंड दिलेला आहे. तिथे निर्णय १-० असाच असतो. प्लेटोने सॉक्रेटीसच्या तोंडून वदवलेल्या "रिपब्लिक" पद्धतीमध्ये राज्यकर्त्यांनी लोकांना खोटे सांगून नांदवावे असेच वर्णन आहे. तरुणांना स्वतःहून विचार करायला शिकवणार्याचा पायबंद "रिपब्लिक"मध्ये कसा घातला गेला असता? घातला नसता तर "रिपब्लिक" तरी सांगितले तशा स्वरूपात कसे टिकले असते?
आथेन्सच्या कायदेचौकटीबद्दल सॉक्रेटीसने आदरच सांगितला. कैदेतून निसटून आथेन्स सोडून जायचा कट त्याचे मित्र आखत होते, त्यांचे खंडन करताना सॉक्रेटीसने हे सांगितले.
प्रास्ताविकातील लोकशाहीविरोधी वाक्यांमुळे हा टीकेचा सुर घेतलेला आहे. पुनश्च म्हणतो - भाषांतराचा भाग छानच आहे.
1 Jun 2010 - 10:53 am | जयंत कुलकर्णी
मी लोकशाही विरोधी नाही.
ती प्रास्ताविका्मधील वाक्ये आपण म्हणता त्या प्रमाणे ते लोक लोकशाहीवादी होते म्हणून लिहीली आहेत.
प्लॅटो काय किंवा सॉक्रेटीस काय यांनी त्यांचे तत्वज्ञान हे त्या काळातल्या अनुभवानुसार आणि त्या वेळेच्या जनतेला समोर ठेवून केले आहे.
त्याचा आत्ता relevance आहे का नाही हे मला माहीत नाही.
राज्यकर्ते मात्र लोकांना खोटे सांगूनच नांदवतात व आहेत हे मात्र सत्य आहे.
\\ तरुणांना स्वतःहून विचार करायला शिकवणार्याचा पायबंद "रिपब्लिक"मध्ये कसा घातला गेला असता? घातला नसता तर "रिपब्लिक" तरी सांगितले तशा स्वरूपात कसे टिकले असत\\\\ हे कळले नाही.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
माझा हे व इतर लेख लिहीण्याचा उद्देश हा करमणूक, या विषयात रस निर्माण करणे व थोडी माहीती हाच आहे. सध्या तरी ! त्यामुळे थोडे फार इकडे तिकडे झाले तर क्षमा असावी.
खरे तर आपण या विषयावर अधिक चांगले लिहू शकाल अशी मला खात्री आहे कारण आपले इतर लेखन मी वाचलेले आहे. आपल्याला वेळ असेल तर तत्वज्ञान या विषयावरची लेखमालिका आपण लिहावी ही मी आपल्याला विनंती करतो. त्या साठी असणारी विद्वत्ता व लेखन शैली आपल्याकडे आहे. हे मी अत्यंत मनापासून व सरळ साधेपणाने लिहीत आहे. हे मी निश्चितपणे सांगू शकतो.
जयंत कुलकर्णी.
(त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !) या वाक्यावर काट मारलेली आहे असे समजावे.:-)
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
1 Jun 2010 - 8:37 am | मिसळभोक्ता
जयंता कुलकर्णी हा मानव आहे.
मानव हा मर्त्य आहे.
त्यामुळे, जयंता कुलकर्णी हा मर्त्य आहे.
सॉक्रेटीस कळण्यासाठी एवढे कळले तरी झाले.
काय, जयंता ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Jun 2010 - 1:09 pm | जयंत कुलकर्णी
आपण माझे सगळे लेख वाचत आहात हे बघून आनंद झाला. त्याबद्दल धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
1 Jun 2010 - 11:11 pm | आनंदयात्री
मालक तुम्ही पण आता 'मिसळभोक्त्याचे ट्युरिंग मशिन' असा लेख येउ द्या :)
बाकी जयंतराव, लेख अप्रतिम.
1 Jun 2010 - 11:48 pm | जयंत कुलकर्णी
:-)
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
11 Aug 2017 - 2:55 pm | नया है वह
अतिशय सुंदर लेख , फार आवडला !
11 Aug 2017 - 5:17 pm | arunjoshi123
हा प्लेटो डोके सटकलेला माणूस होता. (मंजे. अक्षरशः). राज्यव्यवस्थेब्बाबत त्याचे विचार इतके विचित्र होते कि विचारू नका. स्टोरी ऑफ फिलोसोफी मधे त्याचं वर्णन आहे