रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! !

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
26 May 2010 - 12:39 pm

रातराणी ? ? ?
अरे बाप रे ! ! !

मोकळ्या केशसंभारांत पाठमोरी उभी ती
मंद चांदण्यांत भासे रातराणी परी ती
वाटे जणू बोलाविते साद देऊन मजला
वाढली धडकन दिलाची पाहुनी एकान्ती तिजला

विचारी मना “ काय आता करावे ” ?
“ मुखचंद्रमा तरी आज पाहून यावे “.
गेलो भेटण्या समीप लोक म्हणतील काय ?
पाहुनी एकांती आम्हा जळतील हाय.

जाऊन समीप हलकेच न्याहाळले,
अन जाहला चंद्र तेजोमय नभीं
s..s..s..s..s..s..s
थरथरली मम काया भीतीने
हाय रे दुर्दैव ! पाठमोरी सासूच् होति उभी

निरंजन वहाळेकर

भयानकहास्यविनोद

प्रतिक्रिया

पक्या's picture

26 May 2010 - 9:02 pm | पक्या

खरं की काय ? तुमची पार फे फे उडाली असेल.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

पांथस्थ's picture

26 May 2010 - 9:26 pm | पांथस्थ

मोकळ्या केशसंभारांत पाठमोती उभी ती

पाठमोती की पाठमोरी ? :?

आणि हो नंतर तुमची अशी काही अवस्था झाली का?

अविचारी मना आता काय करावे?
क्षमायाचना तरी करुन यावे.
गेलो माफी मागण्या लोके म्हणतील काय?
टाकुनी जात्यात आम्हा दळतील काय?

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

निरन्जन वहालेकर's picture

27 May 2010 - 7:12 am | निरन्जन वहालेकर

टाकुनी जात्यात आम्हा दळतील काय? superb ! ! ! Great ! ! ! काय म्हणावे आता ? धन्यवाद !

धमाल मुलगा's picture

26 May 2010 - 10:02 pm | धमाल मुलगा

=)) =))

काय डोळ्याच्या खाचा झाल्यात का काय? मैत्रिण आणी सासूतला फरक कळत नाय? का स्वतःच्या मरणाला ओढवुन घ्यायची एव्हढी घाई? :D
(ह.घ्या. हो निरंजनबुवा. :) )