भारतातील जनता प्रगल्भ आहे. भारतातील लोकशाही तर भलतीच प्रगल्भ आहे. या प्रगल्भ लोकशाहीच्या परंपरेनुसार आज जवळजवळ प्रत्येक ज्येष्ट पुढार्याची कन्या, पुत्र, भाचे, पुतणे भारताच्या सेवेत मग्न आहेत. पण त्यात क्रमवारी लावायची ठरवली तर राहुल गांधी यांचा क्रमांक वरचा आहे. आणि दोन क्रमांक बिटिया प्रियांकाचा आहे हे कुणीच अमान्य करणार नाही.
अशा वेळी राहुलजी : भारताचे महानायक हे चरित्र लायब्ररीत दिसले तर कोण बरे वाचणार नाही?
श्री माणिक लाल आणि नील घोटे ह्या समर्थ लेखकांनी ह्या भारताच्या तारणहाराचे चरित्र लिहिले आहे. ते लवकरच विक्रीस येत आहे. ह्या द्वयीच्या नावाचा समास लालघोटे असा होत असला तरी कुणी उगाच वाटेल ते निष्कर्ष काढू नयेत. हे अत्यंत नि:पक्षपातीपणे लिहिले आहे. उगाच खोटी स्तुती करायची म्हणून नाही. आता आपले राहुलबाबा आहेतच ग्रेट तर काय करणार? असो.
राहुलबाबांचा जन्म, इंदिरा आजीच्या मांडीवर बसून, राजीवजींनी ताट धरले आहे, सोनियाजी चमच्याने घास भरवत आहेत. बाजूला जवाहरलालजी आणि मोतीलालजी ह्यांच्या तसबीरी आहेत, दिवाणखान्यात गांधींचा पुतळा तर आहेच. अशा त्यागमय वातावरणात ह्या थोराने आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली. तिथेच हे नक्की झाले की हाच भारताचा नेता बनणार.
जेमतेम बोलता येऊ लागल्यावर त्यांनी घरातल्या भारताच्या नकाशाकडे बोट दाखवून म्हटले ये मेरा देश है, मै इसपे राज करूंगा! इतक्या लहान वयात इतकी समज?
असो. अजून वाचन चालू आहे. पुढे भर टाकीन.
लवकरच येत आहे, उद्याचे भारताचे नेते रेहान वडरा आणि मिराया वडरा. य
प्रतिक्रिया
23 May 2010 - 10:04 pm | पाषाणभेद
सही रे भिडू. हुप्प्या बेट्या एवढी चांगली बातमी दडवून ठेवतोस! अरे भारताचे तारणहारांचे चरित्र म्हणजे गीतेची रदबदली करून देव्हार्यात ठेवण्याची पोथीच जणू. मला लागलीच ती प्रत उपलब्ध करून दे. अगदी वेडे केले बघ त्या राहूल बाबाने. मागे मुंबईत येवून कितीतरी सामाजीक कामे करून गेला तो. तो गरिबांच्या अन (बाईच्याच) झोपडीत राहतो. जेवतो. अरे मागे त्याने संसदभवन मधील कँन्टीन मध्ये उत्तपा देखील खाल्ला होता. केवढा मोठा त्याग आहे हा देशासाठी! डायरेक संसदभवन मधील कँन्टीन मध्ये उत्तपा खाणे म्हणजे काय चेष्टा आहे काय? बाकी आपले इंग्रजांच्या काळातले स्वातंत्र सैनिक अन आताच्या काळात मराठीच्या आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाणारे मनसैनीक अन गेल्या काळाले शिवसैनिक म्हणजे अगदीच वेडे आहेत ना!
आमच्या गल्लीतील नगरसेवकानेही आत्मचरित्र लिहायला मला सांगितले आहे. मी त्याचे शाळासोडल्याचा एल सी अन इतर कागदपत्रे मागवलेली आहे. लवकरचा आत्मचरित्र तयार होईल. झाले की येथेच परिक्षण टाकतो.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
26 May 2010 - 10:37 am | विशाल कुलकर्णी
नोंदणी कुठे करावी लागेल? आमच्यासाठी पण एक प्रत राखुन ठेवा ~X( ~X( ~X(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 May 2010 - 11:02 pm | टारझन
"गांधीन माशी" चा पोर्या , भादरणीय राहुल गांधींचा ......... #$% असो :)
24 May 2010 - 12:06 am | मी-सौरभ
त्यांच्या अज्ञात लीला सुद्धा यात असतील ना???
-----
सौरभ :)
24 May 2010 - 12:21 am | विकास
यावरून आठवले:
९/११ नंतर राहूल गांधी हे कोलंबियाहून अमेरिकेत आले आणि बॉस्टन विमानतळावर उतरले. तेथे त्यांना युएस इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांनी थांबवले आणि एक तास चौकशी चालली होती. पण मग रालोआ सरकार असले म्हणून काय झाले? अशा वेळेस सगळे राजकारणी एकत्र असतात... काही फोन फिरले आणि सगळे सुरळीत पार पडले.
नंतर कोणी एका प्रेमचंद्र शर्मा नामक माणसाने माहीती हक्क वापरून पाहीला, पण "राज को राज रेहेने दो" अशीच अवस्था... त्यामुळे त्यांच्या त्या प्रसंगातील लीला अज्ञातच राहील्या.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
24 May 2010 - 1:28 am | हुप्प्या
युवराज राहुल एकदा साधेपणाचा प्रचार करायला अगदी साध्या एअर कण्डिशण्ड रेल्वेच्या डब्यातून प्रवास करत होते. ह्या एकाच प्रवासानंतर कोट्यावधी जनतेला साधेपणाचे महत्त्व पटले आणि लगेचच दुसर्याच दिवसापासून राष्ट्रपतींपासून ते गरीब सामान्य माणसापर्यंत सगळे साधेपणाने राहू लागले. देशाचे लाखो कोटी रुपये ह्या एकाच कृत्याने करण्याची किमया ह्या जादूगार राजपुत्राने कशी बरे साधली असेल?
पण ह्या गोओओओओओड कार्यक्रमात कुण्या एका नीच माणसाने व्यत्यय आणलाच. त्याने एक भलामोठा दगड त्या गाडीवर फेकून मारला. देशाचे भाग्य थोर म्हणून हा राजपुत्र सहीसलामत वाचला. नंतर पत्रकारांशी बोलताना हा प्रसंग दुर्दैवी आहे पण मी माझ्या ध्येयापासून हटणार नाही असा दिव्य संदेश त्यांनी दिला. ह्या एकाच कृत्याने महात्मा गांधीचा निर्धार, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांची निर्भयता, नेहरूंचे वक्तृत्व असे अनेक गुण त्यांच्यात असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. अर्थात भावी पंतप्रधान हा असाच असला पाहिजे.
राष्ट्रीय पातळीवरचे स्वच्छ चारित्र्याचे ताठ बाण्याचे आणि कण्याचे श्री रमेश बागवे ह्यांनाही ह्या थोर राजपुत्राचे जोडे उचलावेसे वाटले ह्यातच त्यांचे (म्हणजे राहुलजींचे बागव्यंचे नव्हे) कर्तृत्व दिसून येते. तिथेही मुंबईत लोकल प्रवास करून लोकल लोकप्रिय करण्याचे कर्तृत्व आपल्या लाडक्या प्रिय राहुलजींचेच.
राहुलजी हे एक कुशल नेमबाज आहेत हे फार लोकांना माहीत नसेल. पण त्यांचा निशाणा बरोब्बर पंतप्रधानपदावर लागला की तेही सगळ्यांना कळेल.
24 May 2010 - 9:32 am | आंबोळी
ओ हुप्प्याजी,
भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचे गुण आ. मा. राहुल'जीं ना कुठे लावताय.... ...
फक्त म. गांधी आणि नेहरू येवढेच म्हणा... स्वातंत्र्य चळवळीशी तिसर्या कुणाचाच संबंध नव्हता.
आंबोळी
24 May 2010 - 3:12 pm | आवशीचो घोव्
आ. मा. म्हणजे काय हो?
24 May 2010 - 3:18 pm | llपुण्याचे पेशवेll
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
24 May 2010 - 4:21 pm | आंबोळी
आदरणीय माननीय
आंबोळी
26 May 2010 - 7:20 pm | आवशीचो घोव्
आयला "आ" म्हणजे आदरणीय होय. माझा गैरसमज झाला होता. :D
25 May 2010 - 3:24 am | रामपुरी
आमचा पण असा गैरसमज होता कि सावरकरांनी सुद्धा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. पण एक काँग्रेसी मा.(@#$द) मणिशंकर अय्यरने तो दूर केला.
25 May 2010 - 3:37 am | शिल्पा ब
हेच म्हणेन...गांधी आणि नेहरू याशिवाय कोणच देशकार्य केलेले नाही....सगळीकडे गांधी नेहरू नावे देऊन काँग्रेजी सरकार उतराई होण्याचा क्षीण प्रयत्न करत असते..ते कमी वाटते म्हणून गांधी घराण्याची सत्ता देशावर आणण्यात हातभार लावते...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
21 Dec 2010 - 6:50 pm | गांधीवादी
>>राहुलजी हे एक कुशल नेमबाज आहेत हे फार लोकांना माहीत नसेल. पण त्यांचा निशाणा बरोब्बर पंतप्रधानपदावर लागला की तेही सगळ्यांना कळेल.
बघा त्यांचे निशाने.
साभार : इंडिअनलिक्स
26 May 2010 - 2:43 am | हुप्प्या
नुकतेच आपले पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांनी निर्वाळा दिला की जर वरुन हुकुम आला तर आपण पंतप्रधानपद राहुलबाबासाठी रिकामे करु. म्हणजे बघा ह्या जुन्या खोडाला आयमीन मुरलेल्या, वयोवृद्ध राजकारण्यालादेखील ह्या महानायकाची लायकी कशी पटली आहे ती?
जो महानायक आईच्या पोटात असल्यापासून राजकारणाचे धडे घेतो आहे त्याच्या पुढे असल्या जुन्या खोडांचे काय काम?
राहुलजींनी नुसती नजर "त्या" खुर्चीवर नजर फेकली तरी मनमोहनबिहन मंडळींनी ती खुर्ची साफसूफ करून युवराजांना अर्पण केली पाहिजे. असे आहे ह्या थोराचे कर्तृत्व!
26 May 2010 - 3:05 am | सोम्यागोम्या
रैहान(Raihan) कसली अभारतीय नावे ठेवतात हे लोक. यांना सुद्धा राजकारणाचे असेच धडे मिळाले आहेत. राऊल हे पंतप्रधान आहेत, रैहान यांनी गृहमंत्रीपद तर मिराया यांनी कॅबीनेट पद भूषवले आहे असे भविष्यातील सुखचित्र आताच माझ्या अंगावर आनंदाचे शहारे आणत आहे !! व प्रियांका पक्षाच्या नव्या हायकमांड (कसलं ते !!)(कारण त्या पदावर बाईच पाहिजेत) !
इकडे आदित्य ठाकरे शिवसैनिक गोळाकरुन बोंबाबोंब करतोय ! :D आणि महाराष्ट्रातील जनता रांगेत उभं राहून कॉंग्रेसच्याच नावाची बटणं दाबतेय !
जय हो !
26 May 2010 - 7:17 pm | आवशीचो घोव्
इकडे आदित्य ठाकरे शिवसैनिक गोळाकरुन बोंबाबोंब करतोय !
:lol: :lol: :lol:
26 May 2010 - 11:00 am | विनायक पाचलग
आजुन एक युवा नेता...
चायला ,एखादा साधा तरुण युवा नेता का होत नाही बरे???
सगळे मिळुन चाटुगिरी करतात यात नवल नाही ,हे त्याचे अजुन एक उदाहरण..
जोपर्यंत खोटे हिरवे गांधी बघुन लोक मत देतील तोपर्यंत असे( खान चे गांधी झालेले) लोक निवडून येणार हे नक्की...
27 May 2010 - 12:36 pm | नितिन थत्ते
>>खान चे गांधी झालेले
हे गोबेल्सचे तंत्र सार्यांनीच आत्मसात केलेले दिसते. एकच गोष्ट (खरी अथवा खोटी) पुनःपुन्हा साण्गितली की ती खरी वाटू लागते.
नितिन थत्ते
27 May 2010 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नितिन, गोबेल्स बारावीपर्यंत अभ्यासाला नव्हता! गन्नायकाला कळणार नाही तुम्ही काय म्हणता आहात ते! ;-)
अदिती
27 May 2010 - 1:02 pm | नितिन थत्ते
=))
असो पण त्यांचे वाचन चांगले असावे.
नितिन थत्ते
1 Jun 2010 - 8:40 am | मिसळभोक्ता
आयायटी च्या क्लासला गणणायकाच्या बापाकडून (शंकरराव) यवढे पैशे घ्येवून पन गोबेल शिकवला नाही ?
हा हंत हंत.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
21 Dec 2010 - 6:56 pm | अविनाशकुलकर्णी
रैहान(Raihan) कसली अभारतीय नावे ठेवतात
अहो ते ईसाई आहेत...
27 May 2010 - 10:39 am | Manoj Katwe
मनातील एक सुप्त इच्छा:
एक विमानात कॉंग्रेस, भाजप, सर्व राजकारणी, बसलेले असावेत.
आणि ते विमान दूर कुठेतरी crash व्हावे. सर्व राजकारणी एक क्षणात खतम.
नवा गडी, नवा राज.
1 Jun 2010 - 9:02 am | पंगा
...शंका:
पायलटच्या जागेसाठी बोलावणे येण्याची वाट बघत आहात, की अर्ज नुकताच टाकलेला आहे?
- पंडित गागाभट्ट.
27 May 2010 - 5:11 pm | आवशीचो घोव्
सगळ्यांनी गप्प बसा राहुल बाबांना काम करू द्याल कि नाही? आदिदास चे बूट घातले म्हणून काय झालं? बघा कसे महागडे कपडे मळले तरी काम करतायत ते. उगाच वायफळ बडबड नाही हो.
1 Jun 2010 - 3:34 am | पाषाणभेद
बघा. मी वर म्हणालो नव्हतो? अन आता ही पुढे बाई मागे बाबा. फार फार कणव आहे हो बाई माणसांची. बाकी अजूनही फोटो असतील तर द्या बाबाहो. मला चित्रसंग्रह करायचाय.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
31 May 2010 - 5:57 pm | विसोबा खेचर
मस्त! :)
1 Jun 2010 - 10:04 pm | नावातकायआहे
ह्या आ. मा. रा. च्या ह्याची ही कुट सापडल हुप्प्या भाउ?