न्हाउन ओले केस घेवून
न्हाउन ओले केस घेवून
का सतावीतेस तू मला
ओले ते केस झटकून
हसवणूक बरी जमते तूला ||धृ||
प्रात:समयी दृष्य दिसे
मनावरती फिरते पिसे
हलकेच उडे मनपाखरू
पिसारा फिरता अंगावरून
न्हाउन ओले केस घेवून ||१||
कांता तू ग आहेस सुंदर
समयी असल्या कसला अव्हेर
वेळ कसला कसा जातसे
ओल्या त्या केसात गुरफटून
न्हाउन ओले केस घेवून ||२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०१०
प्रतिक्रिया
23 May 2010 - 8:13 am | संदीप चित्रे
'गुड मॉर्निंग' कविता दिसतीय :)
23 May 2010 - 11:42 am | मनिष
उगाच कशाला दादा कोंडके टाईप कविता पाडता मग?
असो! आमचा दुसरा "अगाध प्रतिभा" युक्त प्रतिसाद इथे वाचता येईल.
23 May 2010 - 12:51 pm | पाषाणभेद
आपने हमकू दादांजैसा बोला, हमकू बोत आनंद हुवा!
बाकी तुमची प्रतिभा पण लईच कडक बुवा! बुवा अशासाठी की तुम्हीही तुमच्या जटा धुवून घ्या आता! रैवार ना आज!
:-)
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
23 May 2010 - 1:06 pm | मनिष
ह. घ्या. हो! :)
23 May 2010 - 5:10 pm | प्रदीप
...
वाचून उगाच 'लंपट ओले वस्त्र होऊनी' आठवले.
24 May 2010 - 8:08 pm | sur_nair
पाभासाहेब, रागावणार नसाल तर एक सांगू इच्छितो. एखाद्या कवितेवर वेळ घालवा. ती जितकी चांगली व पूर्ण करता येईल तेवढी करा. मग प्रकाशित करा. शिवाय विषयही वेगवेगळे सुचतात का ते पहा. तुम्ही दिवसाला एक दोन कविता टाकायला लागलात तर लोकांना त्याचे फारसे काही वाटणार नाही. दहापैकी एक दोनच पण अस्सल भारी कविता टाकल्यात तर आम्ही भरभरून कौतुक करू हा वायदा.
24 May 2010 - 8:38 pm | पाषाणभेद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुमच्यासारखे रसिक आहेत तर काय कमी आहे?
बाकी कवितांवर मेहनत कमी घेतली जातेय हे मान्य. पण प्रसूती वेदना झाल्या झाल्या लागलीच कविता टाकतो. अन तुमचे वाचन हेच माझे कौतूक आहे हो. मी दिवसाला दोन दोन कविता टाकल्या तर मी तरी का अपेक्षा करावी प्रतिक्रीयांची. आपले वाचन ह्याच माझ्या प्रतिक्रिया आहेत हो.
बाकी कवितांनी आपल्याला दोन क्षण जरी आनंद दिला असेल तर मी भरून पावलो. प्रतिक्रिया काय हो येतील अन जातील.
बाकी तुमचा हक्काचा सल्ला मी लक्षात ठेवीनच.
अन राग वैगेरे काही नाही हो. एखाद्या मित्राच्या नात्याने तुम्ही माझी कानउघाडणी केली असे समजतो मी.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही