शाळेतील गमती जमती....
यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत.
तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका.....
यावर एक मेल द्वारे आलेली कविता
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत
जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३
मित्रान्नी बसायचय
प्रतिक्रिया
21 Feb 2008 - 9:07 pm | सृष्टीलावण्या
मी एक टिंब तू एक टिंब,
आपण दोघे टिंब टिंब,
उगवले बघ सूर्यबिंब,
दोघे मिळून लढवूया प्रेमाची खिंड,
पावसात भिजूया ओले चिंब...
21 Feb 2008 - 9:09 pm | सृष्टीलावण्या
मंतरलेले चैत्रबन...
21 Feb 2008 - 9:29 pm | ऋषिकेश
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय
हे लई झ्याक.. ढकलपत्र (फॉरवर्ड) आवडलं :)
-ऋषिकेश
21 Feb 2008 - 9:40 pm | विसोबा खेचर
वा स्वातीताई, अतिशय सुंदर कविता...
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३
मित्रान्नी बसायचय
प्रामाणिकपणे सांगायचं तर कविता वाचून खूप भरून आलं आणि अक्षरश: डोळ्यातनं पाणी आलं!
असो, मी या विषयावर अधिक काही लिहू शकेन असं वाटत नाही! शाळेची आठवण निघाली की मी खूप हळवा होतो! परंतु इतर सभासदांच्या आठवणी मात्र नक्कीच वाचायला आवडतील!
आपला,
(शाळाप्रेमी) तात्या.
21 Feb 2008 - 9:55 pm | प्राजु
मि वाचली आहे ही कविता.. खूप आवडली होती तेव्हाही.
- प्राजु
21 Feb 2008 - 11:07 pm | प्रभाकर पेठकर
वर्गात रसायन शास्त्राचा प्रयोग होता. क्लोरीन वायू तयार करण्यात आला. पोपटी रंग, मिरमिरीत वास इ. इ.
तास संपल्यावर सरांनी मला मदतीला बोलावून घेतले. (केवढा अभिमान वाटायचा अशा वेळी). त्यांनी इतर उपकरणं घेतली आणि मी पोपटी रंगाच्या क्लोरीनने भरलेले वायुपात्र घेतले. सर पुढे निघून गेले. (मलाही तेच हवे होते) मी जाता वायूपात्रावरील झाकण बाजूला करून तो वायू जोरात हुंगला आणि जे हाल झालेत म्हणून सांगू. कसाबसा प्रयोगशाळेत वायुपात्र नेऊन ठेवलं. वर्गात आलो. तर उलटीची भावना होऊ लागली. डोळ्यात पाणी. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मित्राने नवीन आलेल्या शिक्षकांना सागितलं. मला वर्गाबाहेरच्या बाकावर झोपवून रसायन शास्त्राच्या सरांना बोलावून आणलं. त्यांना मी खरं खरं सांगितलं (दूसरा उपायच नव्हता, मला वाटलं आता मी मरणार्) सगळ्यांची धावपळ झाली. क्लोरीन पाण्यात विरघळतो म्हणून पाणी पाजण्यात आलं तर क्लोरीन हा 'जड' वायू असल्यामुळे शिर्षासन करायला सांगा असा उपायही कोणी तरी सुचवला. (नशिबाने तेवढा दूर्धर प्रसंग आला नाही) मोकळ्या हवेत पडून राहिल्यावर किंचित बरं वाटू लागलं. त्यामुळे त्या बाकड्यावर अर्धा-पाऊण तास अंडर ऑब्झर्व्हेशन झोपवून ठेवल्यावर मी उठून बसलो. आणि रसायन शास्त्राच्या सरांच्या चेहर्यावरील ताण दूर झाला.
नंतरचा तास गणिताचा होता त्यामुळे तो बुडविण्यासाठी मी 'नाटक' केलं असा माझ्या काही दुष्ट मित्रांनी (?) प्रचार केला. आता सायन्सच्या उपकरणांना हात लावण्याची आपल्याला मिळणारी मुभा जाणार आणि वर्गात भाव खाता येणार नाही असे मला वाटले परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. लाज वाचली.
20 Dec 2015 - 10:16 am | सौन्दर्य
अगदी असाच प्रसंग दहावीत असताना माझ्यावर ओढवला होता. बाईनी वर्गात टेस्ट ट्यूबमध्ये क्लोरीन वायू तयार केला होता आणि त्याचे गुणधर्म सांगत होत्या. त्यात त्या म्हणाल्या हा पोपटी रंगाचा वायू असतो. मला त्यात टेस्ट ट्यूबमध्ये पोपटी रंग खरंच दिसत नव्हता म्हणून मी म्हणालो, "ह्यात कुठे आहे क्लोरीन वायू ?" त्यावर बाईनी जवळ बोलवून नळी हुंगायला दिली आणि त्यानंतर जो काही घसा सुकला, नाका-डोळ्यांतून पाणी यायला लागले, खोकला येऊ लागला, त्याला काही अंतच नव्हता. अनेक वेगवेगळे उपाय झाले, शेवटी कोणीतरी सुक्या खोबर्याचा तुकडा खायला दिला. घशाची ती खवखव काही दिवसानीच गेली. कित्येक किस्से आहेत, सवडीने सांगत राहीन. चागला विषय दिल्याबद्दल आभार.
20 Dec 2015 - 11:34 am | संदीप डांगे
हे जरा घातक नै...? बाईंवर कारवाई व्हायला पाहीजे...
21 Dec 2015 - 11:44 am | अभ्या..
हा ना. माझी शाळा ह्याएवजी नाझी शाळा असा निबंध व्हायचा.
21 Dec 2015 - 11:51 am | संदीप डांगे
नाझी शाळा... =)) गुड वन!
21 Dec 2015 - 12:50 pm | चांदणे संदीप
हो की!
थरारक विचार! :/
21 Feb 2008 - 11:46 pm | स्वाती राजेश
झाकण उघडून आत काय आहे त्याचा वास घ्यायची अजुनी सवय आहे म्हणायची.:))))
फक्त भांडी बदलली. ते प्रयोगशाळेतील होते आत स्वयंपाक घरातील हो ना?
जस्ट किडिंग...
22 Feb 2008 - 11:25 am | झकासराव
हा एक छान धागा सुरु केलाय स्वाती यानी :)
मी पहिलीत होतो तेव्हाची गोष्ट.
मधली सुट्टी झाली होती. डबा खाल्ला. आणि पुर्ण वॉटर बॅग भरुन पाणी प्यायलो खेळता खेळता मी आणि माझ्या एका वर्गातलयाच मुलाने.
सुट्टी संपत आली आणि मग माझ्या लक्षात आल की अरे आपण "सु" करायला गेलोच नाही. तोवर सुट्टी संपल्याची घंटा वाजली आणि मला जोरात
"सु सु" आली.
आमच्या बाई बाहेर येवुन चला मुलानो वर्गात चला अस म्हणत होत्या (नुसती घंटा ऐकुन पहिलीतली मुल थोडीच वर्गात पळतात लग्गेच. ती अजुन खेळण्याच्याच मुड मध्ये असतात.) आणि मी तिकडे सु करत होतो बराच वेळ :) (मनात भिती बाई आल्या आहेत बोलवायला आणि इकडे तर जोराची "सु सु" )
वर ही कामगिरी घरी जावुन आईला सांगितली होती. :)
आता आठवल तरी खुप हसु येतय.
22 Feb 2008 - 12:45 pm | विजुभाऊ
ओफ्फ तासाला एखद वेळेस शिक्शक वर्गावर वेळेत आले नहित कि आम्हि सगळे रान्ग करून हातात दप्तर घेउन वर्गाबाहेर पडायचो....आणि तसेच सरळ शाळेच्या मेन गेट मधुन रान्गेत बाहेर जायचो..थेट घरि...
रान्ग अस्ल्यामुले कोणि कोठे जाताय असे कधिहि विचारले नाहि. कोणाल तशी शन्का ही कधि आली नाही.
विजुभाऊ
22 Feb 2008 - 4:02 pm | धमाल मुलगा
विजुभाऊ...च्यामारी, एकदम खल्लास आयडिया ! एकदम आवडली.
आमचे उद्योग (टवाळक्या):
१.ऑफ तासाला जमेल तेव्हढ॑ अन् जमेल त्या शिक्षका॑च्या नकला करण॑
२.तळमजल्यावर आमचा वर्ग असताना तब्बल ३ महिन्या॑च्या परिश्रमा॑न॑तर "हॅक-सॉ" ब्लेडने खिडकीचा गज कापण्यात आलेल॑ यश, आणि तो गज हळूच काढून वर्गातून पळून जाणे. (लवकर घरी जायच॑ असेल तर इतर वर्गातली मुल॑पण आमच्याकडे यायची आणि आमचा एक गृहपाठ करून देण्याच्या बोलीवर हा "खुष्कीचा मार्ग" वापरायची)
३.बे॑चच्या फटीत ब्लेड अडकवून "चावणार्या" गुर्जी॑च्या तासाला ते वाजवण॑ (केल्याशिवाय कळायच॑ नाही देवा, काय मजा येते)
४. स्वच्छतागृहात कोपर्यात उदबत्तीच्या खालच्या टोकाला फटाका (शक्यतो सुतळीबॉ॑ब) गु॑डाळून ती उदबत्ती पेटवून ठेवणे. (लय भारी बार निघतो म्हाराजा...समदी शाळा गोळा व्हतीय, काय झाल॑ म्हणून...पण जर का सापडला तर....! )
५. प्राण्या॑ना घाबरणार्या शिक्षका॑च्या तासाला त्या॑च्या टेबलावर सरडा / सापसुरळी / मा॑जराचे पिल्लू / वर्गात नेमबाजीच्या स्पर्धेत कर्कटक फेकून मारलेली पाल इ.इ. आणून ठेवणे.
६.मारकुटे मास्तर टेबलावर जिथे नेहमी हात ठेऊन शिकवतात तिथे अगदी "वस्त्रगाळ" खाजखुयलीची पूड टाकणे..
हुश्श.. एव्हढ्यावरच था॑बतो नाहीतर मिपावाले मला हाकलून देतील 'असल॑ नतद्रष्ट कार्ट इथे नको' म्हणून :)
(हे प्रकार अत्य॑त निष्णात टवाळा॑नी केले असून त्यामागे कित्येक वर्षा॑ची मेहनत असते. कृपया अनुकरण करण्याच्या फ॑दात पडू नये, होणार्या परिणामा॑स आम्ही जबाबदार नाही.)
आपला 'णम्र'
- टवाळ ध मा ल.
21 May 2010 - 5:22 pm | sagarparadkar
समस्त 'नूमविय' कोठे गेले ?
'भावे स्कूल' चा 'हल्ला' होतोय, चला चला, पटापट प्रकट व्हा येथे ...
आपल्याकडे तर कित्येक 'नररत्न' होती ...
गके, सहस्रबुद्धे (लाथा घालून मोकळा करीन ), पोरे, श्रोत्रिय ( ट्ठो sss), 'झिन्झाथ्रोपस' (हे रत्न गळाले बहुतेक), देखणे ...
लेट द शो बिगिन ....
22 Feb 2008 - 10:15 pm | एक
की काय?
आम्ही अस्सच करायचो.
5 Mar 2008 - 11:58 am | llपुण्याचे पेशवेll
पितळे सर्(काळागेंडा), दांडेकार बाई(सिलिंडर), पी.के.कुलकर्णी(पिक्या) हे होते का तुम्हाला?
पुण्याचे पेशवे
6 Mar 2008 - 12:52 am | एक
काळा गेंडा, सिलिंडर, पिक्या आम्हाला होते..
आम्हाला ३ वर्षे मराठी शिकवायला बुट्टी लेडी (श्री. वा.) होते. पण जोक्स अपार्ट अतिशय सुरेख शिक्षक होते ते.. त्यांच्यामुळेच माझं मराठी वाचन वाढलं.
संस्कृत ला चंबू .(खरं नाव विसरलो.. बहुतेक कुलकर्णी) होत्या.
आणि मुख्याध्यापक "कि. भा. बळी" (ज्याचा लाँग फॉर्म .. किड* भाड** बळी असा होता.)
कुठली बॅच तुझी?
मी १९९२ ला १०वी पास आउट.
6 Mar 2008 - 1:31 am | llपुण्याचे पेशवेll
नंतर मी विमलाबाई गरवारे शाळेत गेलो. १० वी पास मी १९९९ साली झालो. बळी सराना मी पाचवीला असताना ज्यु. कॉलेजच्या मुलांनी शाळेत बेदम मारुन मुतारीत नेऊन टाकले होते. ६ वी च्या वेळेला शाळेत गोसावी सर होते मुख्याध्यापक.
पुण्याचे पेशवे
6 Mar 2008 - 2:50 am | एक
म्हणजे आमच्या नंतरची पिढी फारच पुढे गेली होती तर.. आम्ही फक्त त्यांना प्रयोगशाळेत कोंडलं होतं ;-( (सभ्य ठिकाणी लिहितो आहे म्हणून "ते त्यांना" असं म्हणतो आहे.. नाहीतर.. किड* भाड** बळ्याच..)
बाय द वे, मी असं ऐकलं होतं कि तो आधी बारामती च्या शाळेत होता तिथल्या पोरांनी त्याला झाडावरून खाली टाकला होता.
10 Mar 2008 - 3:04 pm | धमाल मुलगा
आम्हाला पण होता बारामतीमध्ये.
एक्या तुझी माहिती बरोबर आहे. एक न॑बरच॑ खत्रुड होत॑ बेण॑....मग लै मारला त्याला.
मी वैयक्तिकरित्या देखील त्याला जबरा छळला होता.
मला ९वीत असताना कॉपी केली म्हणून पकडल॑..आता जरा इकड॑ तिकड॑ करण॑ म्हणजे काय कॉपी झाली का बॉ? पण नाही!
त्या॑च॑ आणि आमच्या तिर्थरुपा॑च॑ एकदम कॅपिटल ३६...मग काय, आम्ही केला त्याचाच इश्यू...जे बो॑ब ठोकली,
मी वैयक्तिक द्वेषाचा बळी....होपलेस आहे बळी!!! पोर॑ पार पेटवली...
वर घरी जाऊन आबा॑ना सा॑गितल॑ (तिखट-मीठ लाऊन) आबा डायरेक्ट खू॑खार झाले...दुसर्या दिवशी शाळेत आबा॑नी बळ्याला जे झाडला, स॑स्थेच्या अध्यक्षा॑कडेच चाललो आत्ताच्या आत्ता म्हणाले.... बळ्या गारगार!!!!!!
पुढ॑ वर्षभर मला काहीच बोलला नाही. पण ईतरा॑ना फार त्रास द्यायचा.
असो, समद्वेषी भेटल्याचा आन॑द झाला.
आपला
-म.ए.सो.चा सह अध्यायी
ध मा ल.
19 Apr 2008 - 2:06 am | एक
"आता जरा इकड॑ तिकड॑ करण॑ म्हणजे काय कॉपी झाली का बॉ? पण नाही!..."
हॅ ही काय कॉपी झाली.. कॉपी क्वालिफिकेशन साठी कमीतकमी पुस्तकाच पान सापडलं पाहिजे..
मला वाटलचं होतं तू म. ए. सो. चाच निघणार..
24 Dec 2013 - 12:40 pm | बरखा
मुख्याध्यापक (विमलाबाई गरवारे)
मला ते मुख्याध्यापक नक्की कोण हे नीटसे आठवत नाही. परन्तु भाषणाच्या वेळेला त्यान्चे एक ठरलेले वाक्य आठवते " माझ्या चिमण्या फुलपाखरानो" ह्या वाक्य शिवाय त्यान्चे भषण पुर्ण होतच न्हवते. हे वाक्य येताच ८, ९, १० ची मुल ईतकी हसायची कि बस्स्स्स.... , फुलपाखरु ह्या शब्दावरुन लगेचच मागुन मुलान्ची कुजबुज सुरु व्हायची. कुणाला आठ्वत असेल तर अजुन गमती सान्गा.
22 Feb 2008 - 2:08 pm | चंबा मुतनाळ
रान्ग अस्ल्यामुले कोणि कोठे जाताय असे कधिहि विचारले नाहि. कोणाल तशी शन्का ही कधि आली नाही.
आयला, मला हि आयडीया सॉल्लिड आवडली. निदान त्या साठीतरी परत शाळेत जाऊन बसायला आवडेल!
22 Feb 2008 - 2:20 pm | तात्या विन्चू
शाळेत आमचा Outstanding Performance होता. कारण ८ पैकी किमान ३-४ तास तरी आम्ही वर्गाबाहेर Standing Out असायचो.
आठवी नववीत तर शिक्शक फळ्यावरती लिहित असताना पाठीमागून कुणाचाही आवाज आला तरी जास्ती चौकशी न करता आम्हा ठरावीक ३-४ मुलाना नियमीतपणे वर्गाबाहेर काढीत असत. नन्तर नन्तर तर आम्हाला वर्गाबाहेर जायची इतकी सवय झालेली की, शिक्शकानी "कोण आवाज करतय?" अस नुसत विचारला तरिही आम्ही ३-४ जण चुप-चाप मान खाली घालून वर्गाबाहेर जाऊन उभे रहात असू. :)
-ओम फट स्वाहा
तात्या विन्चू
22 Feb 2008 - 3:24 pm | मनस्वी
आमचा ग्रूप आणि दुसर्या वर्गातील अजून मैत्रिणी अशा १५-२० जणी मिळून आम्ही शाळा सुटल्यावर बास्केटबॉलच्या ग्राउंडवर विषामृत किंवा जोडीसाखळी खेळत असू.
असेच एकदा आम्ही ग्राउंडवर जमलो. पण दुसर्या वर्गातल्या मैत्रिणी काही आल्या नाहीत. त्यांच्या इंग्रजीच्या (करकरे) बाई एक्स्ट्रॉ तास घेत होत्या. (करकरे बाई एकदम कडक. एंग्रजीतला "t" जर "+" असा काढला तर १/२ मार्क कट! )
तर आमची हरहुन्नरी जया त्या वर्गाच्या खिडकीवर उभी राहून आमच्या त्या वर्गातल्या मैत्रिणींना हळूचकन हाक मारायला लागली. आणि ते करकरे बाईंनी पाहिलं!
झालं! जयाला बाईंनी वर्गात बोलावलं आणि काय करत होतीस विचारलं. जयानी सांगितलं घाबरत घाबरत ही मी अमूक अमूकला बाहेर बोलावत होते.
बाकीच्या मुली फिदीफिदी हसत होत्या म्हणून बाईंना आणखीनच राग आला. जयाच्या तोंडावर मात्र १२ वाजले होते. बाईंनी जयाला तास होईपर्यंत वर्गात भिंतीकडे तोंड करून उभे केले. तास होईपर्यंत जयाचा रुमाल पूर्ण ओला झाला होता.
तेव्हा जयाची टरकली होती. पण नंतर आम्ही हा प्रसंग आठवून खूप हसत असू. तेव्हा पण जयाचा चेहेरा बघण्यासारखा होई.
(जयाच्या आठवणीत रमलेली) मनस्वी, १०वी ब
22 Feb 2008 - 8:40 pm | llपुण्याचे पेशवेll
४. स्वच्छतागृहात कोपर्यात उदबत्तीच्या खालच्या टोकाला फटाका (शक्यतो सुतळीबॉ॑ब) गु॑डाळून ती उदबत्ती पेटवून ठेवणे. (लय भारी बार निघतो म्हाराजा...समदी शाळा गोळा व्हतीय, काय झाल॑ म्हणून...पण जर का सापडला तर....! )
याला आम्ही टाईम बॉम्ब म्हणत असू.
पुण्याचे पेशवे
22 Feb 2008 - 9:32 pm | चतुरंग
फळ्याला तेल लावून ठेवले आणि वर्तमानपत्राच्या तुकड्यांनी पुसून घेतले.
मग काय 'चकचकीत' फळ्यावर खडू उमटेना आणि वर्गात आमची हसू दाबता-दाबता भंबेरी, पार डोळ्यातून पाण्याच्या धारा!
मास्तर वैतागले, एका घरभेद्याने नावे सांगितली - उलट्या मुठीवर डस्टरने जाम मार पडला (साला, काय त्यावेळी मारायचे ना? आता पोरांना मास्तरही हात लावत नाही आणि आई-बापही नाही, सगळी मजा संपली!;)
'सूर्याजी पिसाळ' कोण हे समजताच त्याची आम्ही सर्वांनी अशी धुलाई केली की बास!
यथासावकाश फळ्याला नवीन काळा रंग द्यावा लागला.
--------------------------------------------------------------
बोअर तासाला डस्टर गायब करणे हा तर आमचा नित्याचा प्रकार असे. मग मास्तर किंवा बाई डस्टर शोधायला लागल्या की आपण तयारीत -
"अरे, कोणीतरी कॉमनरुम मधून डस्टर घेऊन या रे", हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत आम्ही वर्गाबाहेर - कारण चक्क तासाला वर्गाबाहेर पडून शाळेत भटकायला मिळण्याची मजा काही औरच. मग इतर वर्गापाशी उभे राहून खिडकीतून कोणाला तरी उचकव त्याला बोलणी बसायला लागली की तिथून पळून जा, असे करत करत निम्मा तास संपल्यावर आम्ही वर्गात डस्टर घेऊन हजर. तो पर्यंत वर्गातच लपवलेले आधीचे डस्टर सापडलेले नसले तर मग हातानेच थोडा फळा पुसून शिकवणे चालू झालेले असे. मग मानभावी पणाने स्वतः पुढे होऊन उरलेला फळा वैगेरे स्वच्छ करुन देणार! (बोलणी खायला नकोत!)
--------------------------------------------------------------
पहिली ते चौथी आम्ही ज्या शाळेत होतो तिथे वर्गात बसण्याची व्यवस्था म्हणजे जाड मोठ्याच्यामोठ्या सतरंज्या असत.
अगदी १२ फूट बाय १२ फूट वैगेरे असतील. मधल्या सुट्टीतला आमचा एक खेळ म्हणजे रोज कोणातरी एका-दोघांना सतरंजीत गुंडाळणे व कोपर्यात नेऊन त्यावर इतर सर्वांनी ढीग रचणे. तो झाला की मग दुसरा.
आता ते आठवून असे वाटते की कोणाचेही हातपाय मोडणे, मूल गुदमरणे वैगेरे प्रकार तेव्हा झाले कसे नाहीत? आणि आम्हाला हे करु नका अन् ते करु नका असंही कोणी सांगितले नाही!
-------------------------------------------------------------
तेव्हाचीच आणखी एक मजा म्हणजे लाकडी पट्यांची मारामारी.
आमच्या शाळेत फळ्यावर खडूने रेघा मारण्यासाठी चार्-साडेचार फुटी लाकडी पट्ट्या ठेवलेल्या असत. दोन वर्गांच्या मधे दुमडले जाणारे लाकडी पार्टिशन होते. सुट्टीच्या आधीच्या तासाला आमची पट्ट्यांची जमवाजमवी सुरु असे आणी वर्गाच्या मागे जाऊन बसणे. पलीकडच्या वर्गात हेच सुरु असे. सुट्टी झाली रे झाली आणि शिक्षक बाहेर पडले की पार्टिशन ढकलून "हर, हर, महादेव" असे ओरडत एकमेकांच्या आंगावर पट्ट्या घेऊन आम्ही तुटून पडत असू. जाम दे दणादण मारामारी. कित्येक वेळा हातावर-बोटांवर फटके बसून सूज येई. पण आम्ही कोणी एकमेकांविरुध्द तक्रारी वैगेरे केलेल्या आठवत नाहीत. शिवाय शाळा सुटली की पुन्हा गळ्यात गळे घालून रमतगमत घरी. ते सगळं तेवढ्यापुरतं असे.
-------------------------------------------------------------
चतुरंग
22 Feb 2008 - 9:42 pm | llपुण्याचे पेशवेll
आमच्या शाळेत फळ्याला तेल वगैरे लावण्यापेक्षा आईने डोक्यावर थापलेले तेल पोरं फळ्यावर डोके घासून उतरवत. मग शाळेने हिरव्या रंगचे काचेचे फळे आणले. मग मुले त्यावर ओल्या खडूने लिहून ठेवत. ओल्या खडूने लिहिले की ते पुसायला मास्तरना फार कष्ट पडत. तासाची पहिली ५-१० मिनीटे तशीच निघून जात. :) :)
पुण्याचे पेशवे
22 Feb 2008 - 10:22 pm | चतुरंग
पण त्यामधे डोक्याला खडूची भुकटी लागून पोरं पिठाच्या गिरणीतून आल्यासारखी दिसत आणि चावटपणा पकडला जाई - त्यामुळे ही नवीन शक्कल लढवावी लागली! :) (आपल्या कामात सतत सुधारणा करा! - हा आजचा कॉर्पोरेट मूलमंत्र आम्ही किती पूर्वीच अमलात आणला होता पहा! द्रष्टेच आम्ही!!::))
चतुरंग
22 Feb 2008 - 9:47 pm | स्वाती राजेश
मी १०वी ला होते तेव्हाची गोष्ट .वर्गात शेवटचा तास अर्थशास्त्राचा होता. आमचे सर पहिले ३० मि. वाचून दाखवायचे आणि म्हणायचे आता तुम्ही वाचा.म्हणजे पहिल्या बाकावरच्या मुलाने उठून वाचायला सुरवात करायची. प्रत्येकाने १० ओळी वाचायच्या असे करत करत शेवटपर्यंत वाचायचे.
तो पर्यंत हे सर समोरच्या टेबलावर हाताची घडी करून मस्त घोरत असायचे.
एक दिवस एक मुलगा वाचत होता. बहुतेक त्याचा आवाज मोठा होता त्यामुळे कि काय? एकदम सर जागे झाले आणि त्याच्या मुस्काटात मारली.
त्याला ५ मिनिटे कळलेच नाही ......का मारले?
बहुतेक सरांची झोपमोड झाली असेल असा आम्ही तर्क लढवत घरी गेलो.
22 Feb 2008 - 10:30 pm | चतुरंग
अहो आम्ही सहावीत असताना आम्हाला मराठीचे एक मास्तर होते - आडनाव काळे बहुधा - शिकवायचे खूप छान.
पण त्यांची एक खोड होती - कोणाचीही पाठ दिसली की ते जोरात धपका घालायचे - कारण माहीत नाही.
त्यामुळे ते बेंचेस मधल्या रांगेतून मागे मागे जाऊ लागले की बेंचवर पुढे झुकून लिहिणारी वाअचणारी सर्व मुले मागे मागे वळत अंग ताठ करून बसत जेणेकरुन त्यांना पाठ दिसू नये!
त्यामुळे पाच मिनिटेच काय पण सहावीचे संपूर्ण वर्ष आम्हाले ते का मारत होते ते कळलं नाही!!
चतुरंग
23 Feb 2008 - 12:07 am | बिपिन कार्यकर्ते
एकदा आमच्या वर्गात कोणीतरी एक शोध लावला. चिंचोका खूप वेळ घासला की खूप गरम होतो. मग काय.... आयडिया तयार. आमच्या एक बाई होत्या. अतिविशाल महिला मंडळाच्या सभासद. त्यांच्यावर हा प्रयोग करायचा कट शिजला. आमच्या वर्गातून बाहेर जायला जो रस्ता होता, तो एक बाक एक्स्ट्रा टाकल्यामुळे जरा अडला गेला होता. तिथे हल्ला (ambush) करायचे ठरले. आणि ह्या कटात सगळा वर्ग सामिल झाला होता... (शिष्ट मुली सुद्धा). दरवाज्या जवळ जे २-३ बाक होते तिथली मुलं १५-२० मिनिटे तो चिंचोका घासत बसली होती. तास संपल्याची बेल झाली... बाई बाहेर जायला निघाल्या... त्या अरूंद जागी त्या थोड्या अडकत असत. तिथे १०-१२ मुलं आणि मुली त्यांच्या भोवती घोळका करून त्यांना काहीतरी विचारायला लागले. आणि..... त्या गर्दीत तो छान गरम झालेला चिंचोका कोणितरी बाईंच्या हाताला लावला.
मग काय मंडळी... पुढे जे काही घडले त्याची आठवण आजही ताजी आहे. वर्गात सगळयांना आमच्या हेडमास्तरांनी मोजून १०-१० छड्या मारल्या होत्या.
बिपिन.
23 Feb 2008 - 2:22 am | llपुण्याचे पेशवेll
कोंबडा करणे, अंगठे धरणे, खुर्ची करणे अशा काही सजा आम्हाला शाळेत असताना होत असत. कधी कधी वैयक्तिक कारणासाठी आणि काही काही वेळेला सार्वजनिक कारणासाठी. एकावेळेला एकापेक्षा अधिक मुले अंगठे धरुन उभी असतील किंवा कोंबडा करुन उभी असतीत
तर एकमेकांना पार्श्वभागाने धक्के मारुन पाडायचा खेळ आम्ही मनमुराद खेळत असू. :)
एकदा तर एका ढिगार्याने इतका जोरात धक्का मारला की बास ओळीने अंगठे धरुन उभे असलेले ५-७ पडले. बाईंना कळले की शिक्षा करुनही मुले काही दंगा करायची बंद झाली नाहीत. :):) मग सर्वाना मैदानावर अंगठे धरुन उभे केले होते. पण काय एन्जॉय केला तो दिवस आम्ही. :)
स्टीलची फूटपट्टी बाकाच्या फटीत घालून वाजवण्याची मजा तर काही औरच. किंवा बाकाच्या वही ठेवायच्या फळीच्या खालच्या फळीवर डोके ठेऊन झोपायची मजा देखील काही औरच. :)
पुण्याचे पेशवे
24 Feb 2008 - 2:00 am | भाग्यश्री
गाडगीळ सरांच्या किंवा पाचकुडवे सरांच्या शिक्षा सांग! :)
माईकवरून यथेच्छ शिव्या न काय काय..
हे आमचे (विमलाबाई गरवारेचे) गाडगीळ सर कायम धोतर न सदरा या वेशात असत.. आणि अतिशय कडक आणि फाटक्या तोंडाचे..
पण, एकदा बँडच्या प्रॅक्टीसला रविवारी बोलवलं होतं, तेव्हा ते चक्क जिन्स न टीशर्ट घालून आले होते!! :) आम्ही इतके हसलो होतो!!
बर्याच गमती जमती आहेत...
5 Mar 2008 - 3:53 am | llपुण्याचे पेशवेll
आम्ही तर गाडगीळ सराना शर्ट आणि पँट मधे पण पाहीले आहे. आणि तेव्हा पण आम्ही फार हसलो होतो.
आणि ते जर कोणाला ओरडत असतील तर त्यांच्या आवडत्या शिव्या म्हणजे "बेवकूफ आहेस, मुसलमान आहेस" :):)
तसेच आमच्या शाळेत शनिवारी शाळा भरायच्या आधी सभा (सर्वानी ग्राऊंडवर येऊन प्रार्थना म्हणायची) असायची . तेव्हा तर फार मजा यायची. गाडगीळ सर पुढे चौथर्यावर उभे राहून कोण कोण काय करत आहे यावर लक्ष ठेवायचे आणि नंतर एकेकाचा पुढे बोलावून सत्कार करायचे.
आमच्या शाळेतले पाचकुडवे सर रोज पितात अशी एक वदंता होती. आणि शनिवारी(इतर वेळेला शाळा दुपारी असे) सकाळी त्यांचे तारवटलेले डोळे बघून ते खरे पण वाटे. :) त्यांचे एक प्रसिध्द वाक्य "बेंच खाली घालून तुडवील".
भूगोलाच्या कानडे सराना आम्ही 'गावठी बच्चन' म्हणत असू. ते दहावीला आम्हाला शिकवताना नेहेमी म्हणत असत की "मला बाहेर हाच विषय शिकवला तर तासाला १००० रु. मिळतील पण तुम्हाला शिकवायला म्हणून मी इकडे येतो."(किती थोर ते उपकार आमच्यावर!)
पुण्याचे पेशवे
5 Mar 2008 - 5:54 am | भाग्यश्री
ते कानडे सर आणि भुगोल? आम्हाला ते ९वी ला मराठी ला होते. तसेही त्यांना काय येत होतं म्हणून ठेवले होते देवालाच माहीत. माझे सगळ्यात नावडते शिक्षक..
पाचकुडवे मला कधीच नव्हते, पण मोठ्या भावाकडून खूप किस्से ऐकले आहेत त्यांचे.
सिरसीकर नावाच्या बाई इंग्लिश शिकवायच्या, खूप छान शिकवायच्या. पण कायम "ठीकेकीनै" असं वाक्य दर ५-१० वाक्यांनंतर ! :)) आमचं ते मोजण्याकडेच जास्त लक्ष.. !
८वी ला सेमी ईंग्लिश सुरू झाले तेव्हा सायन्स शिकवायला लोखंडे मॅडम होत्या.. ( त्या आमच्या शाळेतल्या सगळया मुलांच्या अगदी "आवडत्या" मॅडम होत्या! :) ) त्यांचि शिकवण्याची पद्धत म्हणजे, आम्ही धड्यातले अवघड शब्द लिहून आणायचे, अर्थ न स्पेलींग सकट.. आणि नंतर तो धडा त्या वाचून दाखवणार! एकदा सगळ्यांनी लिहून आणले होते, पण मी एक पण लिहीला नव्हता.. मॅडमनी मला अगदी चिडून पुढे बोलवलं.. आणि म्हणाल्या सगळे शब्द येतायत का तुला.. ? सांग बरं, मिस्लेनिअस चा अर्थ आणि स्पेलिंग.. :) आणि मला तेव्हा जमलं होतं.. बाई म्हणाल्या बर बर ठिक आहे. जा जागेवर! मी एकदम भाव खात जागेवर येऊन बसले होते मग.. :D
( तेव्हा माझे बरे दिवस होते बहुतेक.. कारण त्या सहामाही का तिमाही ला सायन्स मधे मी पहीली आले होते! आयुष्यात मिळालेला पहीला न शेवटचा पहीला नंबर.. नंतर मी अभ्यास करणं सोडलं.. ) :D
आमच्या शाळेत संध्याकाळी शाळा सुटल्यावर रोज प्रार्थना, पसायदान्,ओंकार्,विविध भाषेतील गाणी म्हणणे(उदा. मल्याळी,संस्कृत! ई..) असा कार्यक्रम व्हायचा. असं कुठल्या शाळेत होते की नाही माहीत नाही.. खूप मजा यायची.. खूप टीपी पण चालायचा आमचा.. मल्याळी वगैरे गाणी म्हणण्यामागचा उद्देश मला अजुन कळला नाहीय.. इजगान साठी यल्ल रे, ओ यम्मानिकु.. असं काहीतरी असंबद्ध गाणं होते ते! :) संस्कृत मात्र मस्त होतें.. कृत्वा नवदृढ संकल्पम, वितरन्तो नवसंदेशम वगैरे..
सर्वात शेवटी वंदे मातरम.. ते म्हणताना खूप छान वाटायचे .. शहारे यायचे इतक्या सगळ्या जणांच्या तोंडून ते ऐकताना.. !!
असो.. जरा जास्तच भरकटले.. पण काय मस्त विषय आहे हा.. सगळं जुनं आठवलं !! धन्यवाद हा विषय चालू केल्याबद्दल.. :)
5 Mar 2008 - 12:10 pm | llपुण्याचे पेशवेll
काय सांगू, किती प्रेमाने मारायच्या हो त्या!
मी तर ८वी ला असताना माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कधीच अभ्यास करत नसे म्हणून रोज रोज मार खायचो लोखंडे बाईंचा.
आणि स्पेलिंगसकट अर्थ तर मी कधीच लिहून आणले नव्हते. म्हणून तर रोज मार खायचो. :) :)
इंग्रजीच्या राजलक्ष्मी पाटील बाई तर साक्षात कडकलक्ष्मी होत्या. मी २-३ वेळा सपाटून मार खाल्ला होता. त्यामुळे १०वी ला त्यानी आमच्या वर्गशिक्षिका झाल्यावर मला पहील्या बाकावर बसवले होते. :(
पुण्याचे पेशवे
24 Dec 2013 - 12:07 pm | बरखा
गाडगीळ सर पाचकुड्वे सर कानडे सर कडक्लक्ष्मी बाई ..... जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. अजुन एक माझ्या आठ्वनितिल किस्सा, त्या वेळी मुलिना हस्तकलेचा तास असायचा गोल रिन्ग मधे कापड अडकवुन त्या वर रेशमी धाग्याने वेग वेगळे टाके घालणे आणि ते बरोबर जमलेत की नाही हे बाईना नेउन दाखवायचे असायचे. ज्या ज्या मुलीन्चे काम पुर्ण व्ह्यायचे त्या बाईन जवळ घोळ्का करुन उभ्या रहायच्या. मि हि एकदा त्या घोळ्क्यात नेमकी बाइच्या ( बहुदा जोशी नाव असाव) जवळ उभी होते, एका हातात रिन्ग धरलेली आणि दुस-या हातात सुई-धागा. कुणीतरी मागुन हळुच धक्का मारला त्याच क्षणि हातात धरलेली सुई बाईन्च्या दन्डाला टोचली..... मला हे समजताच घोळक्याचा फायदा घेउन मि पटकन मागे झाले. बाईना सुई जोरात टोचली होती. त्यानी आमच्या बाजुला वळुन बघे पर्यन्त मी मागे झाले होते. त्या मुळे नेमकी कोणाची सुई टोचली ते काही कळाले नाही. माझी सुटका तर झाली होती. पण त्या दिवसानन्तर बाई एक एक करुन आम्हाला पुढ बोलवु लागल्या.
कानडे सरान्चा तर आम्हा खुप मुलिना राग अजुनही आहे. कारण.. वर्गात शिकवताना काही आचरट मुलिन्चि शिक्क्षा विनाकारन आम्हाला हि मिळली होती, ती साधि-सुधि शिक्षा नव्हती. चार मुलीन बरोबर आमच्या पुर्ण ओळिला सरानी नापास करण्याची शिक्षा केली. आम्हि ते मजा म्हणुन त्या कडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा प्रगती पुस्तक हातात आले तेव्हा निकाल बघुन धक्का बसला, माझ्या बरोबर त्या ओळितिल सर्व मुली पण नापस झाल्या होत्या. ती माझी पहीली आणि शेवटची शिक्षा होती.
23 Feb 2008 - 9:52 am | झकासराव
जबरी आहेत एकेक किस्से. :)
हा एक किस्सा अगदीच शाळेतला नाही पण मी कॉलेजात असताना पहिल्याच वर्षीचा.
दिवाळीच्या सुट्टी नंतर कॉलेज सुरु झाले होते नुकतेच.
एक लेक्चर ऑफ होत. मग बरेच पोर पोरी टवाळक्या करायला गेले होते.
वर्गात २-४ पोर उरले होते. त्यात मी एक सज्जन (अजुन कालेजच वार लागल नव्हत हो)
आणि २-३ टारगट पोर आणि २-४ सज्जन आणि शिष्ट मुली.
तर माज म्हणा वळवळणारा किडा म्हणा किंवा अजुन काही म्हणा.
एका पोराने एक सुतळी बाँब वर्गात लावला. आणि तो तिथुन बाहेर पडुन रिकाम्या पॅसेज मध्ये जावुन उभा राहिला.
अर्थात हे वर्गात सगळ्याच उपस्थितानी पाहिले. एक मोठ्ठा आवाज मग काय बरेच जण येवुन पाहु लागले काय झाल म्हणुन.
मग कॉलेजचा एक शिपाई आला. त्याने पाहिले तर त्याला अवशेषांवरुन तर कळालेच की कोणीतरी वर्गात फटाका फोडला.
त्याने येवुन आधी मला विचारले मी बोललो माहित नाही. मी आताच आलो वर्गात.
मग तो मुलींकडे वळाला. तर त्यानी उत्तर दिले की मुलांनी लावले.
तो शिपाई गेला आणि आमच्या वर्गाच रजिस्टर घेवुन आला १० मिनटानी आणि म्हणाला ह्यात "मुलानी" ह्या आडनावाचा कोणीच नाहिये की. :)
असल फिस्स्कन हसु आल होत मला ते ऐकुन.
बाकी काही म्हणा.
बाकीच्या कालेजापेक्षा इन्जिनियरिंग मधल्या पोरा पोरींची डोस्की जरा हटेलेच असतात. :)
4 Mar 2008 - 9:07 am | स्वाती महेश
इन्जिनियरिंग मधल्या पोरा पोरींची डोस्की जरा हटेलेच असतात. :)
का हो? तुमच्या त्या महामुर्ख शिपायाने त्याचा मुर्खपणा दाखवला तर पोरींची डोकी हटेलेच असतात होय? आणि तुम्हाला विचारले कुणी फटाका उडवला तर सांगताना तुमची फॅ फॅ झाली म्हणून दोष मुलिंना देताय होय..तेव्हा कुठं गेली तुमची मर्दानगी? मुलिंची डोकी तुम्हाला हटेली वाटतात म्हणजे तुम्ही जरा मतीमंदच वाटताय! जरा डोळे उघडून त्याच मुलींनी केलेली प्रगती पहा!
4 Mar 2008 - 10:46 am | झकासराव
माफ करा इतके दिवस इथे पाहिलेच नाही मी.
मी फक्त मुलींची डोस्की हटेली असतात अस नाही लिहिलेल.
पोरा पोरींची अस लिहिलय ते वाचा.
आणि माझी फॅ फॅ उडली हे कशावरुन लिहिताय तुम्ही????/
माझ्याच वर्गातील मुलांची नाव मी का म्हणुन सांगेन??????
म्हणुन मी माहित नाही अस सांगितल होत अस लिहिलय मी.
तुम्ही काहितरी एकांगी अर्थ घेवुन मला मतिमंद म्हणताय अस वाटल म्हणुन हे उत्तर लिहिलय मी.
या उप्पर माझ्यावर काही आरोप केले तरी मी उत्तर लिहिनच अस नाही.
21 May 2010 - 6:03 am | नेत्रेश
न्युनगंडातुन आरोप केल्यासारखे वाटतात. झकासरावांनी मुलींना दोष दिलेला दिसत नाही.
23 Feb 2008 - 1:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी मेडियमच्या पोराच्या आठवणी वाचून वाटतंय, आपून सारे एकाच वर्गात होतो की काय ? :)
गणिताच्या मास्तराने पावकीचा पाढा म्हणायला लावल्यावर ( सिलॅबसला नव्हता ) सांगता आला नाही, म्हणुन ठोकुन काढल्यावर,घरचा राग माझ्यावर काढला रे !!! या अविर्भावात दात काढणारे आम्ही !!! तेव्हापासून गणित आयुष्यातून जे निघून गेले ते आतापर्यंत....!!!
दिलीप बिरुटे
नाकात शिल्लक काही राहिले तर नाही ना !!! सतत चाचपून पाहणारा :)
वर्ग ६ वी,तुकडी 'अ '
23 Feb 2008 - 2:33 pm | भडकमकर मास्तर
आम्ही सातवीत असताना मधल्या सुट्टीत क्रिकेट मॅच साठी घरी पळून गेलो आणखी एका मित्राबरोबर.... त्यच्याकडे छान मॅच पाहिली, दिवस्भर धमाल केली...घरी आलो, मला वाटत होते की शाळेत काही कळणार नाही...दुसर्या दिवशी सकाळी क्लासटीचर बाईंनी उभे केले , आणि माझ्याबरोबरच पळालेल्या मित्राने आजारी होतो अशी पालकांची चिठी आणली ( आमच्या काळात डॉक्टर सर्टिफिकेट वगैरे लागत नसे)....मी अवाक्, खरंतर पकडले गेल्यावर काय योजना आखायची हे आमचे आदल्या दिवशी मुळीच ठरले नव्हते, पण त्याने शिताफीने चिठी आणली आणि वाचला...आणि मी छड्या काय खाल्ल्या, अंगठे धरून एक तास वर्गाबाहेर काय उभा राहिलो, मी अगदी शिक्षकांच्या जाण्या येण्याच्या वाटेत उभा होतो तोंड लपवत्..प्रत्येक शिक्षक येऊन विचारत असे, " का रे, आज ही वेळ आली का तुझ्यावर?"..मग सगळ्यांना नाईलाजाने सगळी गोष्ट सांगायला लागत असे...आत जाऊन मित्राला खूप शिव्या घातल्या, "चिठीचं मला का नाही सांगितलस? "म्हणत...( तो मित्र बर्याच वर्षांनी भेटला, त्याला ही आठवण होती... खूप हसलो )
( एकट्यापेक्षा समूहशिक्षा एंजॉय करणारा)स. भडकमकर
23 Feb 2008 - 10:43 pm | सुधीर कांदळकर
संस्कृतला तांबे सर होते. त्यांना अण्णा म्हटले की भडकायचे. आठवीत वर्ग तळमजल्याला होता. कांही मुले त्यांच्या तासाला शाळेबाहेर जाऊन बाहेरच्या बाजूने खिडकीत येत व अण्णाअसे ओरडून पळून जात. खिडकीतील मुलगा मार खाई.
25 Feb 2008 - 12:20 pm | धमाल मुलगा
का॑दळकर शेठ, आमच्या शाळेत पण एक कुलकर्णी सर होते, त्या॑ना अण्णा म्हणाल॑ की भय॑कर राग यायचा.. मुल॑ असली भारी, ते शिकवत असले की "अण्णा" अशी जोरात हाक मारायचे आणि अण्णा पेटले की "कोणितरी खिडकीरून ओरडून पळाला" अस॑ आम्ही सा॑गायचो, त्या "कोणितरी" ला शोधण्यात उरलेला सगळा तास भुर्रर्र... :)१०त असताना शाळेतल्या रात्र-अभ्यास वर्गाला गेलो होतो...च्यामारी एकदाच गेलो आणि कानाला खडा लावला. कोणितरी मेन-स्विच ब॑द केला आणि त्यादिवशी (रात्री) कुलकर्णी सर होते, अ॑धार झाल्यावर पोरा॑नी शाळेच्या मधल्या चौकात येऊन अण्णा च्या नावाने जो काय हैदोस घातला..अगगगग !!! अण्णा॑नी दोन हातात दोन छड्या घेऊनअ॑धारातच मुरारबाजीच्या आवेशात जी काही तलवारबाजी केली...पार सगळी कार्टी फोडून काढली....त्यात जोडीला आई-माईवरून शिव्या...आपलीतर जाम टरकली..परत म्हणून गेलो नाही रात्र-अभ्यासवर्गाला.
19 Apr 2008 - 4:00 pm | भडकमकर मास्तर
मुरार'अण्णां'ची गोष्ट लई झक्कास ....
25 Feb 2008 - 2:59 pm | किशोरी
शाळेत असताना धमाल यायची,शाळा सुट्ल्यावर बाहेर येताना पुढच्याला ढकलायचे आनी मग माग्च्याला 'का ढकललस?' म्हणुन ओरडायचे मग पुढचा आपल्याला काहि म्हनत नाही,आनी मागच्याशीच भांडायला लागायचात्यातच भर म्हनुन जीन्यामधे पुढच्याच्या दप्तराची बटने खोलुन टाकायची मग पुस्तक खाली यायलालागली की पुस्तक भरोस्तोवर जीन्यात ट्राफीक जाम,कधी कधी सॅक चे जे माघे लोंबनारे बेल्ट असतात तेदोघांचे गुपचुप बांघुन टाकायचे मग ते सोडवन्यात अशी धांदल उडायची त्या मुलांची,आम्ही आपली ही सारीकाम करुन पटकन पुढे निघुन जायचोएकदा वर्गामध्ये नवीन सर आले होते,नवीन अस्ल्यामुळे ते थोडेशे घाबरलेले आम्ही प्लास्टीकची कॅरी बॅग फुगवुनती फोडायचो 'फट्!' असा आवाज यायचा पन सरांना कळायचेच नाही की आवाज कुठुन येतो ते,१५ दिवस खूप्त्रास दिला त्याना,गृहपाठ केला नसेल की वही नेहमी घरी असायची(आपन ऐवढे हुश्शार सगळ डोक्यात राहत मग वहीतकशाला लिहायचे असा माझा समज)घरी पाठवलच तर जायचे आनी मस्त तास संपल्यावर परत,सरांनी विचारलच तरघरी कुलुप आहे अशी थाप मारायची.खुप मस्ती केली शाळेत असताना
3 Mar 2008 - 10:59 am | लेले
मि चौथित असेल तेव्हा आम्हाला बाई॑नी ग्रूहपाठ करुन आणयला सा॑गितला होता......
आणि नेहमिप्रमाणे मि काहि केला नव्ह्ता...... न॑तरच्या तासाला मग बाई॑ना कोणितरी सा॑गितला कि मिएका मुलिला
'LOVE LETTER' लिहीला म्हणुन.........
मग काय तेव्हा बाई काहि बोलल्या नाहि पण न॑तर जेव्हा ग्रुहपाठ विचारायला आल्या तेव्हा मला त्या॑नि खुप छड्या मारलेल्या... आणि त्या॑च वेळी त्या म्हणालेल्या....."कि तुम्हि मुला॑ना ग्रुहपाठ करायला वेळ नाहिए आणि इथे मुली॑ ना 'LOVE LETTER' लिहायला मात्र जमत॑य"
पण खर॑च मि कोणालाच कोणतही 'LOVE LETTER' वगैरे काहिही लिहीला न व्हता.
पण शाळा म्ह॑टली कि मला ..........
4 Mar 2008 - 9:11 am | सर्किट (not verified)
चौथ्या वर्गात "प्रिया आज माझी नसे साथ द्याया" हे गाणे म्हटल्याने आमच्या बाईंचा खूप मार खाल्ला होता.
असो.
- सर्किट
4 Mar 2008 - 12:42 pm | विजुभाऊ
आमचे उप शालाप्रमुख ( शाळेनंतर हा शब्द प्रथमच लिहीला) सबनीस सर्..त्याना का कोणास ठाउक सगळे शंभो असे म्हणत
तसे म्हणताना एक्दा मी सापडालो.त्यानी मला वर्गाबाहेर अंगठे धरुन उभे केले.
येणारे जाणारे प्रत्येक सर मॅडम मला का उभे केले आहे असे विचारत.
मी त्याना मी सबनीस सराना शंभो असे म्हणालो म्हणूनउभे केले आहे असे खरे सांगायाला लागलो. त्यावर येणारे जाणारे प्रत्येक सर मॅडम जाताना वर्गात पाहुन हसत जात राहीले...
त्या प्रकाराला कंटाळून मला सबनीस सरानी वर्गात परत बोलावुन घेतले. आणि शि़क्षा संपविली
4 Mar 2008 - 7:23 pm | चतुरंग
त्यांना होणारी शिक्षा त्यांनी लवकरच संपवली हे बरे झाले!!;)))
चतुरंग
5 Mar 2008 - 8:51 pm | विवेकवि
अतिशय ऊत्तम
मिनु जोशी.
8 Apr 2008 - 6:50 pm | अनामिका
कविता खुपच छान आहे.
अगदी मनाला स्पर्श करणारी आणि पुन्हा मनाने शाळेत नेवुन बसवणारी.
मला अजुन आठवतय अश्या काही कविता कुणी केल्या कि आम्ही त्या फळ्यावर लिहायचो.
फळा लिहिणे एक मोठे कार्य असायचे पण मन लावुन (प्रसंगी वेळ काढुपणा करत केवळ तास बुडवायचा म्हणुन)ते करायचो आम्ही.
शाळेच्या इमारतीच्या प्रत्येक कोपर्याशी काहि ना काहि आठवणी निगडीत आहेत. शाळा या विषयावर खुप काहि लिहिता येइल.लिहुन कढायचा मानस देखिल आहे . वेळ मिळाला की लिहिन.
याच कवितेचा उर्वरित भाग
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
सौजन्य -ऑरकुट
अनामिका
19 Apr 2008 - 8:57 am | ॐकार
पावसाळ्यात एकदा अर्थशास्त्राच्या तासाला (हल्ली तासिका वगैरे म्हणतात) आम्ही ४-५ कार्ट्यांनी मिळून तब्बल सव्वादोनशे होड्या बनवल्या होत्या. त्यासाठीचा कच्चा माल आधीच्या हस्तकलेच्या तासाला गोळा केला होता. चालू तासाला होड्या बनवणं मोठ कठीण! आम्ही आपले लाकडी बाकांच्या खणात हात घालून (आणि लक्ष फळ्याकडे देत) होड्या बनवत बसलो होतो.
---
वक्तृत्वस्पर्धेला मी आणि माझा मित्र गूळ खात होतो. हॉल मध्ये खाली बसून जाम कंटाळा आला होता. भाषणं तीच ती. आम्हाला जमिनीवर एक डोंगळा दिसला. तासभर आम्ही त्या डोंगळ्याने गूळ खावा म्हणून त्याला सारखं गुळाच्या खड्याजवळ ढकलत , खेळवत होतो. शेवटी पी.टी. च्या सरांनी आम्हाला उचलला आणि बुकलला.
---
एका बाईंना ( हल्ली मिस् म्हणतात) धडे वाचताना बाकड्यांच्या कडांना टेकून आणि रांगांमधून फिरत फिरत वाचायची सवय होती. आम्ही सगळ्या कडा डस्टर ने रंगवत असू. त्या बाईंना आपोआप काठ पदर पांढरा स्वच्छ होऊन मिळत असे.
---
आमच्या वर्गात एकेमेकांना बापाच्या नावाने हाक मारायची टूम आली होती. बापाचं नाव काढलं की कोणीही भडकायचा. त्यामुळे मग भांडण, मारामार्या, मस्करी इ. चालायचं . वर्गातल्या मुलींना मात्र हा गमतीशीर प्रकार कधी कळला नाही.
---
माझा एक मित्र - त्याला चित्रकलेचा प्रचंड वैताग! त्याचा मोठा भाऊही आमच्याच शाळेत, ३ वर्षांचं अंतर. चित्रकलेला एकच बाई, सॉरी मिस् होत्या! त्यांचा आणि ह्या दोघा भावांचा नेहमीच 'सुसंवाद' चालत असे. एकदा वैतागून त्या माझ्या मित्राला म्हणाल्या होत्या - " तू आणि तुझा भाऊ! किती फरक आहे. तुला चित्रकलेच्या तासाला दरवेळेस बर्गाबाहेर काधावं लागतं. तुझा भाऊ स्वतःहून वर्गाच्या बाहेर जातो."
ह्यानंतर अख्खा वर्ग ५-७ मि. हसत होता.
---
एकदा पी.टी. चे सर आणि इतिहासाच्या बाईंनी शिवाजी - जिजाऊ चा प्रसंग-संवाद त्यांच्या आवाजत ध्वनिमुद्रित केले होते. ते ऐकवायला ते वर्गात टेपरेकॉर्डर/प्लेअर घेऊन आले. पण कॅसेट वाजायच्या ऐवजी ए एम चालू झालं आणि त्यावर "चढ गया उपर रे.. गुटर गुटर" हे गाणं वाजू लागलं. त्यांचे लांब झालेले चेहरे आणि पोरांचं खिदळणं अजूनही लक्षात आहे.
19 Apr 2008 - 11:39 am | नंदन
आमच्या वर्गात एकेमेकांना बापाच्या नावाने हाक मारायची टूम आली होती. बापाचं नाव काढलं की कोणीही भडकायचा. त्यामुळे मग भांडण, मारामार्या, मस्करी इ. चालायचं . वर्गातल्या मुलींना मात्र हा गमतीशीर प्रकार कधी कळला नाही.
-- हेच. आठवी-नववीत याची भयंकर क्रेझ होती :)
दुसरी टूम होती ती पेन-फायटिंगची. रेनॉल्ड्सची बॉलपेन्स घेऊन टिचकीने बेन्चवर असलेलं दुसर्याचं पेन पाडण्याचा हा खेळ शिक्षकांचा डोळा चुकवून खेळताना धमाल यायची.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 May 2010 - 3:47 am | सुबक ठेंगणी
पेन फाईटसाठी मुद्दाम जड जड पेनं विकत घ्यायची, एनफाईट खेळताना ती निरागसपणे "बरोब्बर" एखाद्या बाकाच्या खाली घालायची, मग जाऊन घेऊन यायची...लई मजा केली. :)
19 Apr 2008 - 9:59 am | मदनबाण
शाळेत कारागीर पोरांची काही कमतरता नसते,,,,,बाकड्यावर करटकाने विविध आकाराचे खड्डे पाडायचे कशासाठी तर--बॉलबेअरिंग चा खेळ खेळण्यासाठी,
आमच्यावेळी रामानदं सागरची अलिफ-लैला नावाची मालिका बर्याच पोरांना आवडायची,,,विशेष म्हणजे त्यातील नायका जवळ असलेली तलवारे सुलेमानी..... मग काय प्रत्येक बाकड्यावर त्या तलवारीची प्रतीमा करकटकाने खोदुन तयार.....(अगदी त्यावरील नक्षी सकट.)
वर्गातील विशेष उध्योगः-- कागदाचे विमान तयार करायचे त्याचे टोक तोंडाने चाव चाव चावायचे आणि वर्गाच्या छतावर फेकुन मारायचे.....वर्गभर छताला चिकटलेली विमाने.....
माझ्या वर्गातल्या बारी नावाच्या मुलाला तर मी मजबुत बुकलुन काढल्याचे मला स्मरते.....(मग माझ्या पालकांना घेऊन यावे असे फर्मान शाळेने काढले होते.....) (सावरकर प्रेम बहुधा माझ्या रक्तातच असाव....:))))) )
(ठाण्याच्या मो.ह.विध्यालयातील खट्याळ पोरगा)
मदनबाण
19 Apr 2008 - 12:16 pm | धनश्रीदिनेश
ह्या धकाधकीच्या जीवनात तुझ्या कवितेने, पुर्ण बालपण नजरेसमोरुन गेले, मी तर हे हि विसरलेली शाळेत माझ नाव स्वप्ना होत, माझी आठ् वण मला पड्लेले गणितात मार्क दहावीला असताना फक्त दिड मार्क, मग काय आमचा आणि गणिताचा ३६ चा आकडा, त्या सरांशीसुद्धा ३६ चा आकडा, नेहमिच वाकड, सरांनी सर्वांसमोर जी तारिफ केली वीचारता सोय नाही, ९४ ला आमच्या वर्गात ९४ च मुले एकत्र, तेच नेमके क्लास टिचर , त्यांचि ईच्छा ९४ सालात १०० % रिझल्ट लावायचा पण होता, रीझल्ट १००% च लागला, पण ९३ मुल पास झाले, कारण आमच्यातील एक तारा प्रकाशित होण्याआधिच निखळुन गेला प्रविण देसले हुशार, स्मार्ट, शांत, नेहंमीच सर्वांना मदत करणारा, तो सुद्धा आमच्या सेन्ड - ऑफच्या दिवशी , कॅन्सर झाला होता त्याला,तेव्हा मनात एक विचार येउन गेला आयुष्यात कॅन्सरच्या रोगा विरुध्द लढा द्यायचा, ठरवुन नाही, पण योगायोगाने आयुष्यात्,नर्स बनण्याचा योग आला, आणी पहील्या दिवसापासुन नोकरी लागल्यापासुन ते आजतागायत कॅन्सर युनिट मध्येच काम करतेय, फार फार् आभार देवाचे ज्याने मल एवढी चांगली सन्धी दिली
20 May 2010 - 9:58 pm | धमाल मुलगा
आपली सदस्यसंख्या एवढी प्रचंड आणि शाळेत दंगा केलेले आम्ही फक्त एव्हढेच?
च्छ्या:! कलीयुग संपुन सत्ययुगाला सुरुवात झाली की काय? :D
20 May 2010 - 11:08 pm | निखिल देशपांडे
ओ धमाल राव
आम्ही आहोत की..
एकेकाच्या आठवणी वाचुन मनसोक्त हसलो..
साला शाळेच्या आठवणी निघाल्यावर माणुस हळवा होतोच.
एवढे सगळ्यांनी लिहीले. आहो धोतर घालुन येणार्या मास्तरांच्या पाठीमागे शाईपेनाच्या तलवारी तुम्ही चालवत नव्हता का??? पकडले गेल्यास मार हमखास...
आठवीतला एक प्रसंग... असाच एक ऑफ पिरेड कोणीच मास्तर फिरकले नव्हते आणि खेळायला मैदानात सोडले पण नव्हते. सगळ्यांनी शांत बसुन राहयचे आणि तो मॉनिटर नाव लिहुन घेत होता.. सगळे शांत चालु होते तेवढ्यात माझ्या बाजुला बसलेल्या प्रसादला खुसफुसायची हुक्की आली... तो माझ्या कानात बोलायला लागला तेवढ्यात मॉनिटरने आम्हाला पाहिले आणि आमचे नाव लिहुन घेतले. पाच एक मिनिटाने वर्गात फिरताना आमचा मॉनिटर पडला... झाले सर्व वर्ग हसुन हसुन बेजार.. तेवढ्यात शेजारच्या वर्गातले एक सर आले ते मारकुटे म्हणुन आधिच फेमस होते. त्यांनी मॉनिटरला विचारले "कोण गोंधळ घालत होते???" मॉनिटरने आमचे नाव सांगीतले... झाले आम्हाला समोर बोलवुन दोन दोन कानाखाली देण्यात आल्या... मग सर आम्हाला त्यांचा वर्गात घेउन गेले. आणि भरपुर शिव्या घालणे चालुच होते. शेवटी ते फळ्याकडे वळले... त्यांनी एक गणित तिकडे लिहिले होते. त्याकडे पाहुन परत तोंडाचा पट्टा सुरु झाला... हे गणित सोडवता येतच नसणार.. बाईंनी शिकवले नाही तर पुढचे आपण स्वःता करुन बघावे वैगेरे वैगरे... आम्ही आपले खाली मान घालुन उभे. एक खडुची मिसाईल आमच्या कडे आली आणि पुढच्या क्षणी मला ते गणित सोडवायला सांगीतले. गणित सोडवायला खडु हातात घेउन मी गणित सोडवायला लागलो तरी ह्यांची बडबड सुरुच होती "हा काय सोडवणार???" "ह्यांना नुसता दंगा करायला पाहिजे " मधेच पोर हसायला लागली तेव्हा त्यांनी पाहिले मी गणित सोडवुन खडुचे हात झटकत होतो... एकदम स्टाईल मधे.. सरांचा पारा भडकला जाम धुतले पुढे मला... त्याचा पुढे संरांनी चार वेळा एकच प्रश्न विचारला "एवढे गणित येते तर मग गोंधळ कश्याला करत होता???" मग माझ्यातही टिळक कुठुन संचारले माहीत नाही... "सर मी गोंधळ करत नव्हतो मी फक्त एकदाच ह्याचाशी बोललो तेव्हा मॉनिटरने माझे नाव लिहुन घेतले" परत दोन कानाखाली... शेवटी मॉनिटरला बोलावले खरे खोटे तपासण्यासाठी... खरे कळ्यालावर मॉनिटरला वाकवुन पाठीवर जाम गुंद्दे घातले... शेवटी कसाबसा तास संपला.... आणि आम्ही सुटलो.. त्या मॉनिटरने परत कधी नाव लिहिले नाही राव माझे...
असे बरेच कीस्से आहेत .. मी एकुण सात वेळा शाळा बदलली आहे.. नवीन गाव नवीन शाळा नवीन मित्र मजा असते राव.. ;)
(७ शाळांचा माजी विद्यार्थी)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
21 May 2010 - 3:01 am | धमाल मुलगा
असल्या गुर्जीला आमी बरोब्बर खोड्यात पकडायचो...
डायरेक सहीची निवेदनं मुख्याध्यापकाच्या टेबलावर.. वर निवेदनात शब्दपण भारी.. "अन्याय..आपपरभाव..जातीयवाद..गावात वट नसलेल्या पालकांच्या मुलांवर जबरदस्ती" खंप्लीट विलेक्षानच्या टैमाचं राजकारण. दुसर्या दिवशी मास्तरनं निस्तं खुन्नस देऊ देऊ बघतच बसलं पायजे..आणि आपण त्याच्यापुढुन २२ इंची छाती ४२ इंची करुन फुगवुन तोर्यात चालायचं...
असो..
एके काळी केलेला संप, पाठ्यपुस्तकाचं केलेल कॉमिक्स हे टाकतोच सवडीनं. :)
20 May 2010 - 11:24 pm | मस्त कलंदर
आमच्या कन्या शाळेत एक जोशी आडनावाचे प्रचंड मारकुटे मास्तर होते.. ते म्हणजे एकदम धम्माल होती.. त्यांनी शेंडी राखली होती, आणि म्हणून ते टोपी घालायचे. कधी कधी ती शेंडी बाहेर डोकावे मग आम्हीही खुसुखुसु हसायचो.. हातात नेहमी पोहोची घालायचे.. बोलताना नेहमी तिच्याशी खेळायचे. स्वभावाने अतिशय कडक होते. मुली त्यांच्यासमोर जायला जाम घाबरायच्या..
एकदा ऑफ पिरियड्ला मी त्यांच्याच स्टाईलमध्ये टेबलावर जाऊन बसले. त्यांच्यासारखेच न थांबता एका दमात काहीतरी व्याख्या म्हणून दाखवत होते. नि मी ते शेंडी बाहेर येऊ नये म्हणून टोपी मागून सरकवत तशीच सरकवून त्यांचा टिपिकल शब्द "ध्यान द्या" म्हणायला नि तेच दारात दत्त म्हणून उभे रहायला गाठ पडली. आतापर्यंत खिदळणार्या कार्ट्या गप्प का म्हणून मागे पाहिले, तर लालबुंद डोळ्यांचे जोशी मास्तर समोर!!!!!
मी... एकदम नि:शब्द!!!!
तोवर तेच म्हणाले, "काय नाटकं लावली आहेस गं मके??? चल पळ जागेवर"
हुश्श!!! मी जोरात धूम ठोकली. (त्याचाही खरंतर उपयोग नव्हता.. कारण अस्मादिकांना उंचीप्रमाणे नेहमीच प्रथम बाकावर बसण्याचा मान होता )
अजूनही बरेच किस्से आहेत.. पण टंकाळा आलाय म्हणून इथेच थांबते!! :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
21 May 2010 - 9:40 am | भारद्वाज
आह ....लै भारी टॉपिक आलाय भो........
शाळेत तसा मी हुशार, सभ्य, शांत म्हणूनच प्रसिद्ध होतो. पण संधी आली की मस्ती सुचायची. मारामारी हा प्रकार मात्र नाही केला कधी.
*इयत्ता ६ वी 'अ': मराठीला खिलारे सर होते. गृहपाठ झाला का ते तपासत बसले होते. सगळ्यांनी वह्या तयार ठेवल्या. मी मात्र सपशेल विसरलो होतो गृहपाठ करायला. सर मुलींच्या वह्या तपासत होते. मुलांचा नं. सुरू होईपर्यंत उरकुन टाकू म्हटले आणि घात झाला. त्यांनी मधेच मुलांच्या वह्या घेतल्या.....खल्ल्ल्ल्ल्ल्लास. बेदम मार खाल्ला त्यादिवशी.
*इयत्ता ७ वी 'अ': बेंचवर पेन-फाईट खेळणे हा त्यावेळी वर्गातला जगप्रसिद्ध खेळ होता !!! यात एकमेकांच्या पेनला क्रॅक पडायचे. दर दोन दिवसांनंतर नवीन पेन विकत घ्यावा लागे. Rotomac च्या पेनने खुप दिवस साथ दिली होती. मुलींची मॉनिटर जाम नाटकं करायची. आम्ही खेळायला लागलो की स्टाफरूममधे जावून कोणालाही तासावर बोलवायची. मात्र या गेमची पण खासियत होती. दुसर्याचा पेन पाडताना आपल्या पेनने त्याला इतक्या जोरात शॉट मारायचा की तो पेन बाजूच्याच लाईनीत आवडत्या मुलीच्या बेंचखाली पडला पाहिजे. तेवढाच बोलण्याचा चान्स !!!
सिद्धेश कामतेकरचा पोपटः या सिद्धेशने घरी पोपट पाळला होता. एकदा शाळा भरल्यावर तो वर्गात म्हणाला, "अरे यार, आज माझा पोपट उडाला रे" या अनपेक्षित वाक्याने आमची ह.ह.पु.वा. झाली. त्याला समजलंच नाही. तो तसाच पुढे म्हणत राहिला,"पिंजर्याचं दार उघडंच राहिलं माझ्याकडनं !!!" शाळा सुटेपर्यंत जाम ह.ह.पु.वा. झाली होती. =))
वडलांच्या नावावरून चिडवायची (बेकार)पद्धत आमच्याकडेही होती. त्या कॅटेगरीत 'शिबू' हे नाव जाम फेमस. पुढे या शिबूचं 'शडंबो' झालं (एका शनिवारी टी.व्ही.वर मिस्टर इंडिया लागला आणि मोगँबो चं यमक म्हणून शडंबो)
*इयत्ता १० वी 'अ': आजारी पडलेल्या /(मुद्दामून) पडलेल्या मित्राला घरी सोडून यायची ट्रीक सुरू केली. एकदा स्वप्नील नावाचा मित्र कंटाळा आला म्हणून आजारी पडला. मधल्या सुट्टीत जितू स्वतःच्या वहीचा कागद फाडून स्वतः अर्ज लिहून वानखेडे टिचरांची सही घेऊन आला. गेटवर स्वप्नील ला सोडायला १०-१२ जणांचा घोळका. यात जितू सगळ्यांना मागे लोटतोय. मी डाव साधून स्वप्नीलची बॅग माझ्या हातात घेऊन स्वप्नीलच्याही आधी गेटच्या बाहेर !!! वॉचमनकाकाने बाकी सगळ्यांना परत वर्गाकडे पिटाळले. आईशप्पथ......जितूचे तोंड बघण्यासारखे झाले होते. आम्ही दोघं मग सायकलवर अख्खी सी.बी.डी. पालथी घालून आलो. त्याला घरी सोडून २ तासांनी वर्गात पोहोचलो. जितू धुमसतच होता.... :D
इंग्लिशच्या वानखेडे टिचर आपल्या सर्वांत सर्वांत आवडत्या.
काही शिक्षक व टोपणनावे:
बीजगणिताच्या पाटील टिचर - कोकीजी
कार्यानुभवच्या कासारे टिचर - प्रेमाशालिनी
१० वी चे इतिहासाचे जाधव सर- ढगळ्या
६ वी च्या मराठीच्या पाटील टिचर- चिमणी (यांचा एकच डायलॉग-- ए पोरा,बुलु नको. यांच्या मराठीच्या तासाला तर गुपचुप मागच्या बेंचवर जाउन चोरून डबे खाण्याची बातंच निराळी. शिवाय आम्ही प्लॅस्टीकची २-३ रुपयांची छोटीशी चिमणी आणायचो वर्गात. तिच्यात पाणी भरुन शेपटीकडून वाजवली की अख्ख्या वर्गात शिट्टी 'दुमदुमायची'. )
स्वगतः एक हळवा कोपरा होता माझ्या मनाचा. पण कधीच बोलू शकलो नाही......तिचं लग्न झालं २ वर्षांपूर्वी #o
- भारती विद्यापीठचा माजी
21 May 2010 - 2:49 am | सोम्यागोम्या
मिलिंद बोकील यांचं "शाळा" हे पुस्तक वाचा, लय जबरा आहे. त्यातली शिरोडकर तिच्यातर प्रेमातच पडलोय मी. फावड्या, सु-या, चिमण्या, अंबाबाई एकेक खतरनाक कॅरेक्टर आहेत. मी तर हातात घेतलं आणि संपवल्यावरच खाली ठेवलं ! B)
21 May 2010 - 4:07 am | बेसनलाडू
सॅन-फ्रान्सिस्को ते भारत आणि परत असे एकाच प्रवासात दोनदा सलग वाचले. आता जवळपास पाठही झाले आहे. सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या जवळच्या आणि ओळखीच्या झाल्या आहेत, की आपणा पुन्हा शालेय जीवन जगतोय, असे वाटते.
(शाळकरी)बेसनलाडू
या पुस्तकावरच आधारीत 'गमभन' ही एकांकिका तितकीशी आवडली नाही. बरी वाटली.
(रसिक)बेसनलाडू
21 May 2010 - 2:53 pm | भारद्वाज
'शाळा' वाचून कित्येक दिवस नॉस्टॅल्जीयातून बाहेरच येवू शकलो नव्हतो. पार खल्लास केला बोकीलांनी.
21 May 2010 - 3:15 am | शुचि
मी पोपट, प्रोफेसर आणि गणपती झाले होते नाटकात :)
नेहेमी पहील्या बाकावर बसत असे. कधी दंगा नाही. सर्वात मागे ढ मुली बसत लांब लांब कानातले घालणार्या. होच मुळी आमच्या वर्गात तरी तसच होतं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
21 May 2010 - 7:50 am | संदीप चित्रे
म्हणजे ही कविता :)
21 May 2010 - 11:01 am | चिर्कुट
आमची पण (हजारोंमधील) एक आठवण..
आम्ही साता-याला 'रयत'च्या 'गुरूकुल' प्रकल्पात शिकत होतो. होस्टेल शाळेतच होतं. आमची रात्र अभ्यासिका असायची. या वेळेचा आमचा आवडता खेळ म्हणजे झोपलेल्यांना (खडू मारून) उठवणे.
एकदा अशा अभ्यासिकेच्या वेळी ही मारामारी चालू होती. समोर खुर्चीत सर निवांत झोपले होते आणि अचानक एक खडू सरांना लागला. सर दचकून उठले आणि काय झालं ते कळाल्याबरोबर सगळ्यांचे हात बघत सुटले. एका मित्राला सर काय करत आहेत ते कळून त्याने हात पुसायच्या आधी सर तिथे हजर..
त्याचे खडूने पांढरे झालेले हात बघून आम्ही समजलो की हा गेला आता, पण शेवटी आमचाच मित्र!!! B)
त्याने अतिशय गरीब तोंड करून आधीच सरांना हातातले खडू दाखवले आणि वर म्हणाला, "सर, मलाच कुणीतरी मारलेत!!" :))
काहीही न बोलता सर परत जाउन झोपले आणि आमचे चेकिंग ही वाचले..आजही त्या मित्राला भेटलो की ही आठवण हमखास निघतेच..
अवांतर : आमच्या मनाच्या हळव्या कोप-याचं परवा लगिन आहे..
:(
--चिर्कुट (दहावी 'क')
21 May 2010 - 11:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
परवाच हापिसात या 'रम्य' आठवणी निघाल्या होत्या.
आमच्या वर्गातल्या पोरांनी एकदा पंख्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आणि संस्कृतच्या बाईंना काही यायचं नाही म्हणून त्या शिरल्या शिरल्या पंखा सुरू करून दिला. आता गुलाबाच्या पाकळ्या उडवल्या म्हणून काय शिक्षा करायची का?
वर्गात झोपा काढायची सवय मला ९-१०वीत लागली असेल. अशीच एकदा आराम करत होते तर आवाज आला, "अदिती, काय चाललं आहे?" मी साळसूदपणे काही सुरू नाही असं नाटक केलं, जे लवकरच उघडं पडलं. अर्थात बाई चांगल्या असल्यामुळे पाच मिनीटांच्या लेक्चरवर काम निभावलं.
सगळ्यात हाईट्ट होती ती त्याच संस्कृतच्या बाईंची! त्या नवनीत गाईडमधून सगळं उतरवून द्यायच्या; तर आमच्या वर्गातली एक दोन पोरं गाईडच समोर धरून बसली होती! नेमकं बेंचेसच्या रांगातून फिरताना ते गाईड बाईंना सापड्लं. मग काय महाराजा, गाईडच जप्त! ज्याचं गाईड "पळवलं" होतं तो दोन दिवस शांत होतं; दोन-तीन दिवसांनी पोरांचा दंगा सुरू झाला तर नंतर समजलं. दुसर्या एका पोराला याच बाईंनी त्यांच्या लॉकरमधून काहीतरी आणायला सांगितलं, तर त्याला लॉकरमधे दोन गाईड्स सापडली, एक पोराचं आणि एक बाईंचं! शाळेत गाईडवर बंदी, पण या पठ्ठ्याने दोन्ही गाईड्स उचलून आणली! बाईंनी दोन दिवस शिक्षण-संप पुकारला ... आणि नंतर साळसूदपणे गाईड परत केल्यावर म्हणे, "दहावीच्या मुलांचं नुकसान नको असं मुख्याध्यापकांनी सांगितल्यामुळे मी पुन्हा शिकवायला सुरूवात करत आहे." पोरं जी खोखो हसली होती तेव्हा ...!
माझ्या "कारकीर्दी"तला उच्चांक हा:
आमच्या शाळेत कसलीही स्पर्धा असेल तर लगेच सगळ्यांना ती कंपल्सरी करण्याची वैट्ट सवय! सुंदर चित्र काढणार्यांना सक्तिने विज्ञानाच्या परीक्षा द्यायला लावायच्या, माझ्यासारख्या गद्य लोकांना चित्रं काढायला लावायची वगैरे वगैरे! मला चित्रं काढायचा पूर्वीपासूनच कंटाळा, आता जीवशास्त्रात ठीक होतं, नावं-बिवं देता येतात. असंच एक मोठं वादवजा भांडण घरी केलं आणि एका अशाच सक्तीच्या चित्रकलेच्या परीक्षेसाठी शाळेत गेले. रागबिग आला नव्हता, पण दंगा करायची सवय जुनीच! तर परीक्षेला काय काय विषय होते चित्रांचे, एक होता 'रामायणातील एक प्रसंग'.
माझी तिरकस खोपडी लगेच विचार करायला लागली ... काय करावं. मग चित्रं काढायला घेतलं, एका तासात संपवलं आणि सायकलवरून आख्खं ठाणं (तेव्हा आमचं ठाणं लहान होतं हो!) उंडारायला बाहेर पडले. घरी आले, बाबांना प्रश्न पडला एवढ्यात कसं काय हिचं चित्रं पूर्ण करून झालं! माझं उत्तर तयार, "अहो बाबा, सोप्पंय! मी 'रामायणातला एक प्रसंग' काढला."
बाबा: काय काढला प्रसंग? लहानपणी तुम्हाला दोघांना 'गीत रामायणा'तलं गाणं आहे ना, 'अनुपमेय हो सुरू युद्ध हे ..' त्यातली 'हाणा मारा कापा तोडा' ही ओळ खूप आवडायची.
मी: नाही हो, तसलं काही नाही केलं मी!
बाबा: (चेहेर्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह)
मी: अहो काही नाही! एक झोपडं काढलं, दोन-चार झाडं काढली आणि वर एक लाईन मारली (च्च्च ... जीभ चावत), नाही म्हणजे एक आर्क काढली, तिच्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत असं दाखवलं....
बाबा: आणि मग काय सीता आणि रावण ....
मी: नाही नाही! वर टीप लिहीली. "राम आणि लक्ष्मण हरणाच्या पाठी गेले आहेत आणि सीतेला रावणाने पळवून नेलं आहे, तेव्हाची झोपडी!"
बाबा आणि मी पोट दुखेपर्यंत हसलो.
आख्ख्या वर्गासमोर माझी एकदाच पूजा बांधली गेली होती!
अदिती
21 May 2010 - 2:58 pm | भारद्वाज
=)) =)) =)) =)) =)) =))
एक नंबर.....
17 Dec 2013 - 1:07 pm | प्रमोद देर्देकर
वेळ असला की मी जुने लेख वाचत बसतो. म्हणुन खरडवहीत जुने मी. पा. कार कुठे गेलेत ते लिहले आहे.
गेले दोन तास हा लेख वाचत होतो खुपच नॉस्टॅलजिक झालो. आज्च्या मी.पा. च्या नविन सद्स्यांना हा धागां माहित व्हावा आणि त्यांनी काही तरी आप्ल्या शाळेचे लिहावे म्हाणुन हा धागा वर काढतोय. तुम्ही लिहीपर्यंत मी ही काही तरी खरडतोच.
17 Dec 2013 - 6:51 pm | मी-सौरभ
:)
18 Dec 2013 - 10:31 am | मिनेश
न केलेल्या चुकीसाठी एकदा प्रचंड मार खाल्लाय शाळेत.....बाकीच्या आठवणी एक वेळ विस्मरणात जातील पण ही आठवण नाही....
18 Dec 2013 - 12:23 pm | ज्ञानव
हाताच्या बोटांमध्ये ४ खडू ठेऊन मग शेक हेंड करायचे आणि मुलगा बोम्बलला
की शिकवता शिकवता "ए ओरडतो कशाला?"
हि शिक्षा झालीय का कुणाला ?
18 Dec 2013 - 12:46 pm | मुक्त विहारि
आणि प्रतिसाद....
शाळेतील आठवणींनी हळवा झाल्याने तुर्त इतकेच.
18 Dec 2013 - 7:53 pm | तिरकीट
आमच्या ठाकुर सरांची आठवण झाली....त्यांचा १ डायलॉग होता.......................
"सरपाळे, तु जोपर्यंत दहावी पास होत नाहीस तोपर्यंत मी दाढी करणार नाही (स्वतःची)"
अक्षर लैच भारी होतं राव त्यांचं
19 Dec 2013 - 12:08 pm | मंदार कात्रे
आम्हाला नववी ला मराठी शिकवायला एक म्याडम होत्या . त्यान्ची खासियत म्हणजे धडा किम्वा कविता शिकवताना त्या अगदी बाबामहाराज सातारकरान्प्रमाणे रसाळ प्रवचन करायच्या ! आणि त्या आख्यानात आपल्या घरात घडणार्या घटनान्चा उल्लेख करून भरपुर माल-मसाला टाकलेला असायचा . त्याना आत्मप्रौढी मिरवण्याची भारी हौस! प्रत्येक वर्शी येणार्या विद्यार्थ्याना ''यन्दा आम्ही कार (चारचाकी गाडी ) घेणार'' असे सान्गायच्या . शेवटी वैतागून एका मुलाने त्याना ऊत्तर दिले... बाई ,गेली दहा वर्शे आम्ही ऐकतोय गाडी घेणार म्हणून , साधी बैलगाडी तरी घेणार का या वर्शी? ......मग काय ? तो मुलगा त्या वर्शी मराठीत नापास!!!
याच बाईनी कुत्री पाळली होती , त्या बाई वर्गात तासाला येण्यापूर्वी धावत ती कुत्री यायची आणि टेबलाखाली बसायची .....मग काय? कुत्री दिसली रे दिसली की पोरे कल्ला करायची ..... क्षक्षक्ष बाई आल्या रे !
;)
19 Dec 2013 - 2:25 pm | परिंदा
असेच आम्हाला विज्ञानाला साळसकर सर होते. ते विज्ञान कमी आणि इतर बाताच जास्त मारत बसायचे. कुठल्याही गोष्टीचा संबंध ते आपल्या मित्रांशी लावायचे. माझ्या एका मित्राकडे हे आहे आणि ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी निव्वळ थापाच असायच्या हे देखील सर्वांना माहिती होते. :)
एकदा सौरउर्जेविषयी सांगताना म्हणाले होते, "एकदा मित्राकडे जेवायला गेलो होतो, तेव्हा भात कमी झाला. तिने पटकन सौरकुकर लावला आणि १० मिनीटात भात तयार!" हा १० मिनीटात भात तयार करणारा कुकर खरोखरच सौरकुकर होता की प्रेशरकुकर हे साळसकर सर आणि त्यांचा मित्रच जाणो.
19 Dec 2013 - 2:50 pm | एम.जी.
नूमवि...
भूगोलाच्या भिडे सरांना " मामा" का म्हणायचे माहीत नाही..पण म्हणायचे. अशाच एका ऑफ तासाला मामा भिडे वर्गासमोरून जात असताना एकाने त्यांना " ए मामा " म्हणून हाक मारली. ते आत आले आणि त्या पोराला यथेच्छ झोडपले...
सर वर्गाबाहे निघाले तर दुसर्याने " ए काका " म्हणून हाक मारली. सर पुन्हा वळले आणि त्या पोराला धरले.. त्याला मारण्यासाठी हात उचलणार तेव्हढ्यात तो म्हणाला..." सर..सर.. मी काका म्हणालो..मामा नाही म्हणालो.."
इतक्या प्रामाणिक कन्फेशननंतरही त्याला सरांनी वेडेवाकडे बडवून काढले.
20 Dec 2013 - 1:34 pm | वैशाली माने
अतिशय सुंदर कविता...
24 Dec 2013 - 1:22 pm | देव मासा
शाळेतला सर्वात पुचाट विनोद, आपन पेनातलि शाहि संपल्यावर, मित्राला विचारावे
''ए तुज्ह्या जवळ दोन पेन आहेत ?''
मित्र ''आहे ना
आपन केविलवाणी नजरेणने म्हनावे ''एक दे ना मला....
आपले मित्र '' दोन पेन आहे रे , पण एक घरि ठेवला आहे. ...
आनि मग संधि आणी आपलि वेळ आल्यावर हाच आहेर आपन पुढे करायचा
24 Dec 2013 - 1:26 pm | ज्ञानव
वाचून शिक्षणावरची वासना अकाली का उडाली त्याचे उत्तर सापडते.
पण शाळेतल्या शिक्षकांमध्ये प्रेम आणि आत्मीयता होती म्हणून तेच आठवतात. महाविद्यालयीन "कर्मचारी"(पद्धतीचे शिक्षक)फारसे लक्षात राहत नाहीत.
19 Dec 2015 - 11:19 pm | धडपड्या
हा कसा काय राहिला होता? नंतर देवाकडे टवाळखोरीच्या रसायनाची कमतरता पडली होती का काय?
20 Dec 2015 - 11:43 am | मयुरMK
मला भाषण एइकताना अक्षरशः झोप यायची खास करूँ आमच्या मुख्याध्यापकांचे आत्ता इथेच थांबतो काम आहे परत केव्हा तर संदर्भासहित स्पष्टीकरण.
21 Dec 2015 - 10:25 am | चिनार
http://www.misalpav.com/node/31086
हा दुवा पहावा !
21 Dec 2015 - 11:25 am | गॅरी ट्रुमन
मिपावर पूर्वी असा आणखी एक धागा आला होता. त्यावरील प्रतिक्रिया इथे चोप्य-पस्ते करत आहे.
१. आम्ही दहावीत असताना सगळ्यांना क्रिकेट खेळायचे वेड लागले होते.आमची शाळा दुपारची असे.तेव्हा शाळा भरायच्या आधी तासभर, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर तासभर क्रिकेट खेळणे हा कार्यक्रम असे. त्यासाठी आमच्या वर्गातील गोखले अडनावाचा एक मुलगा बॅट घेऊन येत असे.एकदा आमच्या गणित शिकविणाऱ्या शिक्षिकांनी पोर्शन पुढे न्यायला म्हणून इतर कोणा शिक्षकाकडून तास मागून घेतला.पण तास सुरू होऊन १० मिनिटे होताच त्यांचे गोखल्याकडील बॅटकडे लक्ष गेले.आणि ती बॅट कशाला, कधी खेळता या सगळ्या प्रश्नांची माहिती करून घेऊन तासाचा उरलेला सगळा वेळ ’दहावीच्या वर्षात परीक्षा इतकी जवळ आलेली असताना क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवणे कसे अयोग्य आहे’ यावर त्यांनी लेक्चर दिले.गणिताचा पोर्शन पुढे नेणे बाजूलाच राहिले.
दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या खोलीत आमच्या वर्गातील मुले क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवतात यावर चर्चा झाली.त्यानंतर इंग्रजी शिकविणाऱ्या आपटे बाईंनी ताबडतोब गोखल्याकडील बॅट जप्त केली आणि त्याला सांगितले की मार्चमध्ये परीक्षा संपल्यावर येऊन बॅट घेऊन जा आणि तोपर्यंत बॅट अजिबात मिळणार नाही.
अजून दोन दिवसांनी गणिताचा तास होता. गोखल्याकडे बॅट नाही हे बघून गणिताच्या बाईंना वाटले असावे की आपल्या लेक्चरचा परिणाम म्हणून त्याने बॅट आणली नाही आणि क्रिकेट खेळणे बंद केले. त्यांनी गोखल्याला विचारले,"काय गोखले, आज बॅट कुठे आहे"? आणि त्यावर गोखल्याची इन्स्टन्ट प्रतिक्रिया होती--"आपटे बाईंनी ढापली". यावर सगळ्या वर्गात जोरदार हशा पिकला हे सांगायलाच नको.
२. एकदा मराठी शिकविणाऱ्या बाईंनी ’कलंक मतीचा झडो दुराभिमान सारा गळो’ या ओळी एकाला वाचायला सांगितल्या. त्याने मतीचा ऐवजी ’कलंक मातीचा झडो’ असे म्हटले.बाईंनी परत वाचायला सांगितल्यावरही तो ’कलंक मातीचा झडो’ असेच वाचत होता.त्यावर बाईंनी त्याला विचारले की तुला या ओळी वाचताना काही वेगळे वाटत नाही का? यावर माझ्या मित्राची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती--’त्याच्या मतीचीच माती झाली असल्यामुळे त्याला मतीऐवजी माती असेच दिसत आहे’.