शाळेतील गमती जमती

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in जनातलं, मनातलं
21 Feb 2008 - 8:55 pm

शाळेतील गमती जमती....
यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत.
तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका.....

यावर एक मेल द्वारे आलेली कविता

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत
जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३
मित्रान्नी बसायचय

मौजमजाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

असे आणी शाळा सुटल्याची घंटा झाली रे झाली कि दप्तराचा बंद खांद्यावर अडकवून सुसाट पळत घरी जात असे. एके दिवशी मी त्याच्या दप्तराचे बंद सोडवून बाकाभोवती गुंतवून परत बांधून ठेवले. शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर तो अक्षरशः बाक सोबत ओढुन घेत वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला, मग कुठे त्याला जाणवले की बाक सुद्धा त्याच्याबरोबर येत आहे.

७ वी मध्ये असताना छोट्या डबीमध्ये नीळ आणी लिंबू मिसळून एका कोनाड्यात / कचराकुंडीत लपवून ठेवत असू. नंतर पुर्ण वर्गात दुर्गंधी पसरत असे.