(खांदे दुखले!!!!)

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जे न देखे रवी...
17 May 2010 - 11:26 pm

थकलेल्या जीवावर ओझ्यांची लादणी
विसाव्यासाठी आतुरलेले सारे शरीर अन् कांती
आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||१||

आठवड्यांच्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणुनी "हे घ्या ताई" लागतात ते पाठी
आता संपेल, झाला शेवट, वेडी आशा खोटी
तोवर पाह्ती आणखी दुकाने, या पुन्हा उचकण्यासाठी
आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||२||

व्हावी खरेदी.. चुटकीसरशी!!! अशी स्वप्ने पाहताना
हळूच ठरतो प्लॅन यांचा मला ध्यानीमनी नसताना
आपसूक होते माझी आठवण प्लॅनिंग करता यांना
आणि मग येतो हाती भारा दिवास्वप्न भंगवणारा
आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||३||

भाऊ असता हमाल कशाला हीच भावना यांची
आणि चढवले झाडावर मज गोड बोलून यांनी
खरेदीवर खरेदी करण्याचा झटपट सपाटा यांचा
माझ्या सगळ्या हरकतींवर ओतून घडाभर पाणी
आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||४||

प्रेरणा(ज्यांना कळाली नसेल त्यांच्यासाठी): सनई चौघड्यांमधले कांदे पोहे..
भाऊ आम्हा बहिणींबरोबर खरेदीला यायला नेहमी नाखूष असतो.. काल बर्‍याच दिवसांनी आम्हा तिघी बहिणींनी त्याचा पुन्हा एकदा बकरा केला... तेव्हा सुचलेलं हे विडंबन.. पहिलाच प्रयत्न आहे... त्यामुळे अर्थातच मात्रा वगैरे गोष्टींना योग्य जागी मारण्यात आले आहे!!! :)

हास्यविनोदविडंबन

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

18 May 2010 - 1:12 am | राजेश घासकडवी

कविता छान झालेली आहे.

बायकोसाठी भावाला चांगलं ट्रेनिंग मिळालं आहे - रेझ्युमेवर छान दिसेल. गुलामी, आपलं, नोकरी आधीच लागलेली असेल तर प्रश्नच नाही म्हणा..

सहज's picture

18 May 2010 - 7:08 am | सहज

हा हा हा!

सही आहे.

निखिल देशपांडे's picture

18 May 2010 - 5:51 pm | निखिल देशपांडे

सही आहे विडंबन

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

ऋषिकेश's picture

18 May 2010 - 9:17 am | ऋषिकेश

हा हा हा
बिचारा तिन बाजूला तिघी व समोर दुकानदार असा चहुबाजूनी वेढला गेला असेल.
राजेश म्हणतात त्याप्रमाणे चांगलं ट्रेनिंग चालु आहे ;) (भावाचे आणि मक चेही)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

क्रान्ति's picture

18 May 2010 - 9:30 am | क्रान्ति

झालीय ग खरेदी [अर्थात कविता!]
:)

क्रान्ति
अग्निसखा

श्रावण मोडक's picture

18 May 2010 - 9:33 am | श्रावण मोडक

हाहाहाहा...
बादवे, ऋषी म्हणतोय की तुझंही ट्रेनिंग सुरू आहे. कसलं?

मस्त कलंदर's picture

18 May 2010 - 10:24 am | मस्त कलंदर

ते त्यालाच माहित.. बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते. त्याचे ट्रेनिंग वगैरे काही घ्यावे लागत नाही.. त्याला काम कसे टाळायचे याचे ट्रेनिंग हवे असेल तर ये म्हणावं.. :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

श्रावण मोडक's picture

18 May 2010 - 10:29 am | श्रावण मोडक

बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते.

हुश्श!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 6:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरं बोलते आहे हो ती! भांडी घासण्याचं ट्रेनिंग पोरांनाच द्यावं लागतं!

मके, विडंबन झकास!!

अदिती

सहज's picture

18 May 2010 - 10:29 am | सहज

>बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते.

मग आमचे युयुत्सुराव काही बोलले की गळे काढायला तुम्ही मोकळे :D

दत्ता काळे's picture

18 May 2010 - 10:38 am | दत्ता काळे

विडंबन आवडलं.

राधा१'s picture

18 May 2010 - 10:44 am | राधा१

छान आहे हो विडंबन

भोचक's picture

18 May 2010 - 6:49 pm | भोचक

वाचताना 'कांदेपोहे'च्या गाण्यातल्या ओळी आठवत होत्या, पण खाली वाचत आलो नि खात्री पटली. मस्त जमलंय विडंबन.

बाकी बायकांची खरेदी म्हटली की 'दोन पावलांवर अवघे शरीर तोलून धरणार्‍या पायांची सहनशक्ती' किती आहे याची 'जाणीव' होते.

(भोचक)
जाणे अज मी अजर

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2010 - 6:58 pm | परिकथेतील राजकुमार

वाह वाह मके.

छान केल आहेस हो विडंबन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य