(स्वगतः हल्लीच अमेरिकेत कमावलेले अनेक डॉलर भारताची इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी सत्पात्री, तेही एका हाताचे दुसर्या हातालाही न कळता दान दिले गेल्याची गोड बातमी सगळीकडे मधुर फुलांचा सुगंध जसा पसरल्याशिवाय राहत नाही तशी कर्णोकर्णी पसरली असावी. आणि सगळीकडून प्रेमळ हक्क दाखवणार्या लोकांनी या दानाविषयी माहिती काढून घ्यायला गराडा घातला. हक्काच्या लोकांनी आस्थेने चौकशी केल्याने झालेला आनंद जणू कमी आहे म्हणून की काय, पण आद्य माननीय मालक आणि आणीबाणीकार, तसेच फाटेमार, चपलाकार, आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमातील महिलांचे बंधु आणि तारणहार श्री. तात्या अभ्यंकर यांचे डाव, चमचे, आणि पळ्या असाच सन्मान लवकरच कोणालातरी जाहीर होईल अशी कुणकुण लागली आहे. तात्या सध्या मिसळपावावरून दूर आहेत म्हणून मिपाकरांना चैन पडत नव्हते. विरहाचे अतीव दु:ख होत होते. ते दु:ख दूर करण्यासाठी ही पदवीची कल्पना किती सुरेख आहे. हॉटेलासाठी चमचे, डाव आणि पळ्या यांचे अतूट नाते बघता या पदवी सुचणार्या मस्तकाचे आम्हाला फार कौतुक वाटले, आणि हा सन्मान प्राप्त करून घेण्याची एक प्रकारची ईर्षाही वाढली. अर्थात यासाठी तात्यांचे थोडे गुणवर्णन करावे लागणार. पण ते आम्ही आधीही थोडेफार करून पोर्टफोलिओ तयार केला आहे, पण त्याची याक्षणी मिसळपावकरांना आठवण करून देणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून वरील सन्मानासाठी योग्य ठरू शकेल असे, म्हणजे तात्यांचे आजवर आम्ही गुणवर्णन कसे केले आहे, तात्यांना मिसळपावाला अधिकाधिक आकर्षक करण्यात मदत कशी केली आहे, थोडक्यात चमचे, डाव आणि पळ्या हा सन्मान प्राप्त करण्याची आमचीच कशी लायकी आहे याविषयी आठवण करून देणारे निवेदन देणे भाग आहे.)
तात्यांचे गुणवर्णन कसे करावे? शब्दच सुचत नाहीत. मिसळपावावरील गुणीजनांना एका प्रेमळ धाग्याने बांधून ठेवणार्या या व्यक्तीचे नाव जरी काढले तरी लोकांची मने भरून येतात. पण थोडक्या शब्दांत वर्णन करता आले तर बघावे, म्हणून अगदी अलिकडेच निघालेल्या घासकडवी क्लासेसमधून जी अमूल्य शिकवणी मिळाली, त्याचा तातडीने, म्हणजे अगदी चोवीस एक तासांत वापर करून मध्यंतरी आम्ही एक कवितक काढले.
अलिकडे प्राजुताईंचे पुस्तक प्रसिद्ध केले अगदी तसेच एखादे कवितकांचे पुस्तकही पुढेमागे काढण्याचा विचार करून ठेवला आहे. पण प्राजुताईंचे पुस्तक जसे झाडांच्या थंड सावलीत, उसाच्या रसाचा आस्वाद घेत प्रसिद्ध झाले तसे न करता त्याचा प्रकाशन समारंभ प्राजुताईंपेक्षाही एकदम सरस ठिकाणी करू, जेथे उसाचा रस नाही, तर रक्तवारूणि वाहील. मग त्या आनंदाच्या सेलेब्रेशनसाठी अजून एक रक्तवारूणि आणि यमन, समोर असा अथांग पसरलेला काळाभोर खोल खोल समुद्र आणि जवळ आवडीचा पुरूष. बेबी सिटरची व्यवस्था करावी लागेल, पण हरकत नाही. नंतर कधीतरी जरा लोकांसाठी एखादी पार्टी वगैरे. त्यात यंगेज लोकांसाठी पप्पू कान्ट डान्स साला पासून ते कदाचित जुन्या खोडांना पालवी फुटावी म्हणून जॉय मुखर्जी, प्रदीपकुमार आणि विश्वजीत या तिघांवर चित्रित झालेल्या अफलातून गाण्यांचे सूर मनात शिरतील. किंवा मजरूहच्या दर्दभर्या गाण्यांनी बेचैन होऊ, कोणी सांगावे! पण ते असो.
तर त्या पुस्तकाची इच्छा मनात ठेवून कवितक काढले. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे - कवितक म्हणजे काही आरती नाही. प्रत्येक काव्यप्रकाराची म्हणून स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात. हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. आरती आणि कवितक यांत काही साम्ये आहेत, तर काही फरक. साम्य हे, की कवितक आणि आरती, म्हणजे गुणवर्णनच असते. निदान घासकडवी क्लासेसमध्ये असेच सूचित झाले होते. आठवून पहा - विशेषणे असणे अनिवार्य होते, क्रियापदे नसली तरी चालत होते. विशेषणे म्हणजेच गुणवर्णने नाही का? आणि फरक असे की जसे - आरती करताना देवाचे नाव त्यात घ्यावेच लागते. जसे "जय देव, जय देव, जय श्री शंकरा" प्रमाणे. पण कवितकांमध्ये त्याची गरज नाही. विशेषनाम असण्याची गरज नाही, सामान्य नाम चालते. आणि मग तात्यांचेच गुणवर्णन केले. कयास बरोबर ठरला, मिसळपावावरील काही गुणग्राहक वाचकांनी तात्यांचे केलेले अवगुंठित गुणवर्णन ओळखून सूज्ञपणे अनेक प्रतिसाद देऊन आम्हाला तृप्त केले, पण तरीही सन्मान देण्यासाठी परीक्षण करणार्या गुणग्राहकांची नजर तिथे पडली नसेल, अशा दु:खद भावनेने वावरत होतो, आपल्यात कवितेची ती जनुकेच कशी ती नाहीत याचे दु:ख करीत होतो. पण या नवीन पदवीच्या विचाराने आशा पल्लवित झाली आहे की पुढेमागे असा सन्मान मिळाला की मिसळपावच्या मुखपृष्ठावर आजच्या खादाडी सदराखाली आपलीही छबी दोन्ही हातात एकेक डाव, चमचे आणि पळ्यांसकट त्या दाक्षिणात्य सुंदर्यांच्या फोटोखाली का होईना, झळकू शकेल.
मिसळपावावरच्या मुखपृष्ठाचे कौतुक तर काय सांगावे, महाराजा! अशा अशा सुंदर, काळजाला हात घालणार्या तरूणींनी ते भूषित केले आहे आजवर की इतर लोकांनी त्याला खूप नावाजले, खूप नावाजले. पण सन्मान आणि पारिपोषिकांचे एकच आहे. ते असे नुसतेच नावाजले म्हणून दिले जात नाहीत, त्यासाठी लोकांच्या सातत्याने नजरेत भरावे लागते, परिसंवाद घडवून आणावे लागतात हे आम्ही नीट पाहिले आहे. तसाच एक परिसंवाद आम्हीही घडवून आणला. पण त्याकडेही तज्ञांचे दुर्लक्ष झाले असे आत्तापर्यंत वाटले. पण आता मात्र खरडवह्यांच्या संशोधनाअंती ही पदवी किंवा सन्मान आमच्यापासून फारसे लांब नाहीत अशी एक कुणकूण लागली आहे. शेवटी खर्या गुणग्राहकांचे लक्ष खर्या टॅलंटकडे जातेच! फक्त ते टॅलंट हल्लीच्या काळात जाहिरातबाजी करून अशा गुणग्राहकांपर्यंत आणावे लागते.
डोळे आजवर मिळालेल्या हक्काच्या माणसांनी केलेल्या सन्मानांनी पाणावले आहेत, मन भरून आले आहे, भैरवीचे सूर खुणावू लागले आहेत, आणि बाहेरचा गार वारा, हवेत आलेला ओलसरपणा, आणि नागमोडी चालत जाणारी वाट खुणवायला लागली आहे.
प्रतिक्रिया
14 May 2010 - 4:26 am | मिसळभोक्ता
आता कुठे नांदी सुरू झालीये.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
14 May 2010 - 10:32 am | टारझन
>> डोळे आजवर मिळालेल्या हक्काच्या माणसांनी केलेल्या सन्मानांनी पाणावले आहेत,
हे वाक्य काळजाला भिडले ... आणि डोळे पाणावले ...
बाकी हेड टु टो जबरा टाकलाय लेख =)) =)) =))
साला , आमचा खरडवह्यांचा अभ्यास कमी पडल्याचं कळुनही डोळे पाणावलेत हे वेगळे सांगणे नं लगे ..
The टोलेबाजी is really fantastic .... its very nice start of the day ... begin the day with smile :)
~ फालुदा करे
चला रे माझ्या थकल्या पायांनो ... हाला रे माझ्या हारल्या हातांनो
दमायचे नाही .. बसायचे नाही .. दमायचे नाही .. बसायचे नाही ..
प्राक्तनावरती रुसायचे नाही ...चला रे माझ्या ...
14 May 2010 - 5:30 am | सोम्यागोम्या
>>मिसळपावावरील गुणीजनांना एका प्रेमळ धाग्याने बांधून ठेवणारा
हो पण आता "तो" धागा आपल्यात नाही याचा खेद वाटतो ! =)) =))
14 May 2010 - 5:39 am | सन्जोप राव
काय हा व्यासंग म्हणायचा! केवढा अभ्यास, किती खरडवह्यांचे वाचन, किती संकेतस्थळांच्या इतिहासाचा धांडोळा! हा व्यायाम पाहूनच गदगदल्यासारखे झाले आहे. यावर प्रतिक्रिया लिहायची तर 'शब्द बापुडे केवळ वारा' अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे उसनवारीला पर्याय नाही. आता उसनवारी करायचीच तर ऐर्यागैर्याची कशाला? 'जमिनीवर झोपून अडचण का? खोटे बोलून कमी का?' त्यामुळे उसनवारी ही स्वतः निशापती महाराजांच्या शब्दांची आणि आणखी काही शब्दांची करणे भाग आहे. म्हणून एवढे घडाभर तेल जाळल्यानंतर
महत्वाची सूचना - प्रतिसाद लिहितांना सर्वांनी तारतम्य बाळगावे. मिपाने त्याच्या मुखपृष्ठावर आजपर्यंत अगदी जरूर स्रियांची काही चित्रे झळकवली परंतु सभ्यतेच्या मर्यादा कुठेही सोडल्या नाहीत. त्याच मर्यादा या चर्चेदरम्यानही पाळल्या जाव्यात ही विनंती...
एवढाच प्रतिसाद लिहिणे शक्य आहे....
सन्जोप राव
'मजरुह' लिख रहे हैं वो अहले वफा का नाम
हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह
14 May 2010 - 6:16 am | मुक्तसुनीत
चित्राताई टोले लई भारी.
आद्य माननीय मालक आणि आणीबाणीकार, तसेच फाटेमार, चपलाकार, आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमातील महिलांचे बंधु आणि तारणहार...
याबरोबर एका असाध्य व्याधीविरुद्ध झुंजार वृत्तीने केलेल्या लढाईचे श्रेय विसरलात! ;-)
थोडक्यात चमचे, डाव आणि पळ्या हा सन्मान प्राप्त करण्याची आमचीच कशी लायकी आहे याविषयी आठवण करून देणारे निवेदन देणे भाग आहे.
खुद्द तात्यांचे ज्यांच्याशी नाते "राव या ना मिपावरी , रंग उधळू चला" या जातीचे त्यांचा लेखिकेला विसर पडलेला दिसतो हे दुर्दैव आहे. या नात्याने तात्यासुद्धा त्यांचे चंचे - सॉरी , चमचे का हो ? ;-)
डोळे आजवर मिळालेल्या हक्काच्या माणसांनी केलेल्या सन्मानांनी पाणावले आहेत, मन भरून आले आहे,
हो ना , दूर निघून गेलेली माणसे , बंद पडलेल्या साईट्स ;-) डोळे पाण्यानी नाही तर काय ग्लिसरीन ने भरून येणारेत ! हाय...
14 May 2010 - 10:47 am | सन्जोप राव
याबरोबर एका असाध्य व्याधीविरुद्ध झुंजार वृत्तीने केलेल्या लढाईचे श्रेय विसरलात!
बरोबर! ही व्याधी म्हणजे कुठल्याशा मिपा स्त्री सदस्याचा नक्की बरा होणारा कर्करोग तर नव्हे?
सन्जोप राव
'मजरुह' लिख रहे हैं वो अहले वफा का नाम
हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह
15 May 2010 - 1:59 am | चित्रा
लेखिकेला विसर पडलेला दिसतो हे दुर्दैव आहे.
लेखिकेच्या जनुकांत बाकी काही असेल/नसेल, पण (काही गोष्टींचा) विसर पडण्याचे जनुक तेवढे नाही, हे इतरांचे दुर्दैव!
14 May 2010 - 6:38 am | अक्षय पुर्णपात्रे
'कवतिक ते कवितक: एक प्रवास' असे नावही सूचवावेसे वाटते.
14 May 2010 - 6:49 am | शुचि
सगळ्यांनी आपापल्या खरडी वाचून डिलीट केल्या तर जगातील निम्म्या समस्या अपोआप निवळतील अशी खात्री पटलीये.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 6:50 am | अरुण मनोहर
>>> मन भरून आले आहे, भैरवीचे सूर खुणावू लागले आहेत, <<<
राग मिपा संपला वाटते.
14 May 2010 - 7:10 am | शुचि
चित्राताई स्पष्ट बोलते माफ करा जायचं असेल तर खुशाल जा पण जाता जाता सन्जोप रावांवर खापर फोडून कशाला जाता? एका व्यक्तीच्या ख व त डोकवून तुम्ही तुमचे महत्त्वाचे निर्णय करता का? आपण सूज्ञ वाटता.
मला संपूर्ण चित्र माहीत नाही पण मला वाटतं आपण ख व चं वाचन करून या निर्णयाप्रत आला आहात.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 7:58 am | चित्रा
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, शुचिताई.
माणसे जेव्हा उत्तरे देऊन थकतात तेव्हा सारकॅस्टिक होतात. बाकी मी आजच कुठे चालले नाही, इथेच आहे, काळजी नसावी. आणि गेलेच, तर तुम्हालाही सांगून जाईन.
14 May 2010 - 8:02 am | शुचि
नका जाऊ चित्राताई. अम्हा सर्वांना तुम्ही हव्या आहात :)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 9:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
शुचिताई, "एका व्यक्तीच्या खवमधे डोकावूनच चित्राताईने भैरवीचा निर्णय घेतला आहे" असं तुम्ही म्हणता यावरूनच तुमचा "अभ्यास कमी पडतो आहे" याची खात्री पटली. (माझाही काही फार अभ्यास नाही. पण म्हणून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून झाडलेल्या गोळ्या मला निश्चितच दिसतात. आणि प्रश्न पडतो, या लोकांना करण्यासारखं दुसरं काही नसतं का? लोकांना उद्योग असतील-नसतील, माझा खांदा बंदूक ठेवायला मिळणार नाही.)
चित्राताई, मला जेवढे समजले तेवढे टोले जबरदस्त!
अदिती
14 May 2010 - 10:31 am | Nile
तुमचा आंतरजालीय पुळक्यांचा अभ्यास अंमळ कमी पडतोय का हो दुर्बिटणे बाई? ;)
-Nile
14 May 2010 - 7:23 am | पांथस्थ
बाकी हे मस्तच!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
14 May 2010 - 2:51 pm | बिपिन कार्यकर्ते
शेवटचा परिच्छेद खरा असू नये अशी प्रार्थना.
बिपिन कार्यकर्ते
14 May 2010 - 7:18 pm | तिमा
तुमचे लेखनकौशल्य पाहून धन्य जाहलो. एका दगडांत किती पक्षी मारले हो तुम्ही ? मोजताच येत नाहीत. तुम्ही लोकप्रभेतल्या " फुल्या फुल्या डॉटकॉम" पेक्षाही ताकदीने लिहिले आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
15 May 2010 - 2:41 am | ऋषिकेश
चित्रातै तुम्ही सुद्धा! (बुट्स यु टु च्या चालीवर वाचु नये)
आपणास शि.सा.न.!! स्विकार करावा
काय एकेक फटका आहे.. ह्या चतुरस्त्र फटकेबाजीने भारताचा T20 चा पराभव विसरलो.. :)
त्यातही आवडत्या पुरुषाबरोबरचे प्रकाशन काय, यमन काय, गुणग्राहकांचे टॅलेंटकडचे लक्ष काय हसून दमलो इतकेच सांगतो :)
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.