पान -रंगीत, गुळगुळीत

चित्रा's picture
चित्रा in काथ्याकूट
23 Oct 2009 - 6:40 am
गाभा: 

एक विषय बरेच दिवस मनात घोळत होता, परवा प्रमोद देवांच्या एका चर्चेला लागलेल्या अवांतर वळणांमुळे परत मनात आला. झाले असे की प्रमोद देव यांच्या चर्चेत पुढे कधी मिपाचा दिवाळी अंक निघाल्यास त्यावर एखाद्या चित्ताकर्षक बाईचे चित्र असणार म्हणून संकेतस्थळाच्या संस्थापकांनी जाहीर केले.

खरे तर केवळ व्यावसायिक दृष्टीने पाहिले तर अंकाच्या मुखपृष्ठाची गरज ही ग्राहकाला अंक आकर्षक वाटावा, त्याने तो विकत घ्यावा म्हणून असते. पण त्याचप्रमाणे अंकाच्या आत जो मजकूर असतो, अंकाची म्हणून एक खासियत असते त्याच्याशी तिचे साधर्म्य असावे ही देखील अपेक्षाही ग्राहकाची/संस्थापकांची असते किंवा असावी.

पण मिसळपाव या संकेतस्थळाची खासियत नक्की काय याचा विचार करताना खरे तर शाहरूख खानच्या चित्रपटातील "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी" या गाण्याप्रमाणे मिपाचा स्वभाव आहे असे मला वाटले. त्यामुळे (पुढेमागे कधी काढला तर अशा) अंकावर केवळ स्त्रीचेच चित्र का असावे असा प्रश्न पडला. किंवा मिसळपावावर येणारे स्त्री आणि पुरूष हे अंकावर केवळ चित्ताकर्षक स्त्रीचेच चित्र का पसंत करतील असे संस्थापकांना वाटले असावे? एखाद्या सुरेख चेहर्‍याकडे पाहताना नजरेचेच सुख मिळवायचे असले तर ते सुख सगळ्यांना मिळण्याची समान संधी असावी, नाही का?! मग तो चेहरा पुरूषाचा का नको?! किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रे का नकोत?

बरे सवय आहे म्हणून स्त्रीचा फोटो, तर तसे असावे. पण मग ती कशी असेल/असावी? धनंजय यांनी माझ्या अवांतराला दिलेल्या खेळकर प्रतिसादात नऊवारी साडीतील आणि नथ घातलेल्या स्त्रियांची चित्रे असलेल्या अंकांची आठवण करून दिली होती. पण कितीही सोयीचा असला तरी तो एक साचाच. अशाच एखाद्या साच्यातली स्त्री तुम्हाला आजही मुखपृष्ठांवर बघायला आवडेल का, आणि का आवडेल? का तुम्हाला काही वेगळे अपेक्षित असेल? का आणि काय? तुम्हाला समजा मुखपृष्ठ ठरवायचे आहे, तर तुम्ही काय विचार कराल?

सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही तरी चालतील, आणि उत्तरे गंभीर/हलकी कशीही चालतील.

*चर्चाप्रस्तावकाने आधी आपली उत्तरे द्यावीत असा अलिखित नियम आहे, पण तो सध्यासाठी दूर ठेवत आहे. आमच्या इथे कोंबडे ओरडायला फारसा वेळ राहिलेला नाही. तेव्हा थोडावेळ झाकलेले राहिले तरी हरकत नसेल असे वाटते.

प्रतिक्रिया

लबाड लांडगा's picture

23 Oct 2009 - 10:53 am | लबाड लांडगा

नऊवारी साडी घातलेली,नथ घातलेली कत्रिना कैफ बघायला आवडेल. बिपाशा बसु पण चालेल.आंतर्राष्ट्रीय दर्जा पाहिजे तर पॅरिस हिल्टन नऊवारीत बघायला आवडेल.
लबाड लांडगा

मुक्तसुनीत's picture

26 Oct 2009 - 7:35 pm | मुक्तसुनीत

हा प्रतिसाद लांडगा यांना नाही. या धाग्याशी संबंधित आहे.
------------------------------------------------

भारतीय स्त्री-पुरुषांचे "सौष्ठव" आणि त्या अनुषंगाने चाललेली "जेंडर बायास" (मराठी शब्द ?) इत्यादि विषयांवरची एक चर्चा.

http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=7741&st=0

टारझन's picture

26 Oct 2009 - 7:55 pm | टारझन

कोदांचं बक्षिस स्विकारतानाचं चित्र लावलं तर ? मिपावरचं ट्राफिक थोडं अटोक्यात येऊ शकेल असं वाट्टंय !! :)

निमीत्त मात्र's picture

26 Oct 2009 - 8:07 pm | निमीत्त मात्र

कोदांचं बक्षिस स्विकारतानाचं चित्र लावलं तर ?

उत्तम कल्पना! कोदा आणि मुक्तसुनित दोघेही मिपाचे हिरे आहेत.

प्रभो's picture

26 Oct 2009 - 8:18 pm | प्रभो

सहमत आहे

--प्रभो

निस्का's picture

22 Apr 2010 - 8:04 pm | निस्का

लैंगिक पूर्वग्रह

नि...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2009 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाव या संकेतस्थळाची खासियत नक्की काय याचा विचार करताना खरे तर शाहरूख खानच्या चित्रपटातील "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी" या गाण्याप्रमाणे मिपाचा स्वभाव आहे असे मला वाटले.

स्सही. सहमत आहे. :)

नवीन धागा काढल्याबद्दल धन्यू...:) मिपाचा दिवाळी अंक निघाला तर सुंदर आणि उत्तान स्त्रीचेच चित्र मुखपृष्ठावर असेल. रडका सॉरी जरासा हळवा, हातात दिव्याची ज्योत धरुन आकाशाकडे पाहाणारी सुंदर स्त्री असे काही तरी असेल. अर्थात मुख्य संपादक भारतीय असला तर असे होईल, असे वाटते. पुरुषप्रधान संस्कृतीला काय आवडेल असा भारतीय विचार मिपावर असल्याने [माझी समजूत]पुरुषांची आवड जोपासल्या जाईल, असेही एक मिपाचा रसिक म्हणून वाटते. :)

-दिलीप बिरुटे

निमीत्त मात्र's picture

23 Oct 2009 - 7:16 pm | निमीत्त मात्र

सुंदर आणि उत्तान स्त्रीचेच चित्र मुखपृष्ठावर असेल.

अरे वा प्राध्यापक अंमळ शौकिन दिसतात.

मला वैयक्तिकरित्या सुंदर स्त्री आवडेल पण दिवाळीअंका सारख्या सोज्वळ विशेषांकावर उत्तान स्त्री रुचणार नाही. अर्थात तात्यासाहेबांच्या आवडीनुसार उत्तान स्त्रीच येण्याची शक्यता जास्त आहे ;) पण मिपाचा दिवाळी अंक निघाल्याच्या आनंदात आम्ही ते चालवून घेऊ.

अवांतर : तात्यासाहेब, मंडळी इतकी प्रेमाने विचारपुस करत आहेत तर काढाच की एक फक्कड दिवाळी अंक.

विसोबा खेचर's picture

23 Oct 2009 - 11:12 am | विसोबा खेचर

अंकाची म्हणून एक खासियत असते त्याच्याशी तिचे साधर्म्य असावे ही देखील अपेक्षाही ग्राहकाची/संस्थापकांची असते किंवा असावी.

हम्म! केवळ एखाद्या विषयाला वाहिलेला अंक असल्यास साधर्म्य असावे हे पटते..

पण मिसळपाव या संकेतस्थळाची खासियत नक्की काय याचा विचार करताना खरे तर शाहरूख खानच्या चित्रपटातील "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी" या गाण्याप्रमाणे मिपाचा स्वभाव आहे असे मला वाटले.

क्या केहेने! :)

या गाण्याप्रमाणे मिपाचा स्वभाव आहे असे मला वाटले. त्यामुळे (पुढेमागे कधी काढला तर अशा) अंकावर केवळ स्त्रीचेच चित्र का असावे असा प्रश्न पडला.

हम्म! :)

किंवा मिसळपावावर येणारे स्त्री आणि पुरूष हे अंकावर केवळ चित्ताकर्षक स्त्रीचेच चित्र का पसंत करतील असे संस्थापकांना वाटले असावे?

उत्तर माहीत नाही.. :)

एखाद्या सुरेख चेहर्‍याकडे पाहताना नजरेचेच सुख मिळवायचे असले तर ते सुख सगळ्यांना मिळण्याची समान संधी असावी, नाही का?! मग तो चेहरा पुरूषाचा का नको?!

हम्म! :)

किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रे का नकोत?

छ्या! चित्रातै, तुमचा हा मुद्दा मात्र आम्हाला मान्य नाही! ते अ‍ॅब्स्ट्रॅक्ट वगैरे सगळं उपक्रमासारख्या संस्थळालाच शोभतं. तिथं सगळंच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट! :)

बरे सवय आहे म्हणून स्त्रीचा फोटो, तर तसे असावे.

सवय? बरं बरं! :)

धनंजय यांनी माझ्या अवांतराला दिलेल्या खेळकर प्रतिसादात नऊवारी साडीतील आणि नथ घातलेल्या स्त्रियांची चित्रे असलेल्या अंकांची आठवण करून दिली होती.

वा! चांगली कल्पना आहे! :)

पण कितीही सोयीचा असला तरी तो एक साचाच.

साचा कसा काय? अहो नौवारीतली एखादी बया काय छान दिसते! अगदी जिवंत. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट वगैरे नाही बर्र का! :)

माझ्या संग्रही शिल्पा शेट्टीचा एक नौवारीतला फोटू आहे! ;)

असो, बाकी चर्चा चालू द्या.. :)

या महत्वाच्या चर्चेची भविष्यात मदत होईल असे वाटते..! :)

चित्राताईंचे ह्या धाग्याबद्दल मनापासून आभार...:)

महत्वाची सूचना - प्रतिसाद लिहितांना सर्वांनी तारतम्य बाळगावे. मिपाने त्याच्या मुखपृष्ठावर आजपर्यंत अगदी जरूर स्रियांची काही चित्रे झळकवली परंतु सभ्यतेच्या मर्यादा कुठेही सोडल्या नाहीत. त्याच मर्यादा या चर्चेदरम्यानही पाळल्या जाव्यात ही विनंती...

तात्या.

विसोबा खेचर's picture

23 Oct 2009 - 11:15 am | विसोबा खेचर

बाय द वे, मिपाचा दिवाळी अंक निघालाच तर फक्त मुखपृष्ठाचेच काम आम्ही पाहू. बाकी सर्व जबाबदारी नंद्या आणि त्याच्या टीमची असेल..

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2009 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे, मिपाचा दिवाळी अंक निघालाच तर फक्त मुखपृष्ठाचेच काम आम्ही पाहू.
व्वा ! लै भारी.
बाकी सर्व जबाबदारी नंद्या आणि त्याच्या टीमची असेल..

अजून काय चाल्लंय तात्या, तुमच्याकडे कोण निवडून आले. :)

-दिलीप बिरुटे

निमीत्त मात्र's picture

23 Oct 2009 - 7:20 pm | निमीत्त मात्र

असं काय करता तात्यासाहेब? मुखपृष्ठा व्यतिरिक्त खास तुमच्या शैलीतले संपादकिय आणि किमान २-३ खुसखुशीत लेख तुमच्याकडून आले पाहिजेत. नंद्या टीम वगैरे मुद्रित संशोधन की काय ते करायला ठीक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2009 - 11:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला काय आठवतं:
'फिर भी दिल है हिंदूस्थानी'च्या गाण्याशी सहमत आहे. माझा विचार विचारशील चित्राताई, तर मला सद्यस्थितीतली पठारावरची (हरिद्वारच्या पुढची) गंगा आठवते.

मला (सगळ्यांसाठी उघड असलेल्या) मराठी अंकात पहायला काय आवडेल, अर्थात प्रॅक्टीकल विचारः
महाराष्ट्रातलं सृष्टीवैभव, मराठी बोलणार्‍या लोकांचं कर्तृत्व दाखवणारी छायाचित्रं, भले ते हळदीचं (संदर्भ: रघुनाथ माशेलकर) असेल वा एखाद्या कोपर्‍यात रहाणार्‍या शेतकर्‍याने केलेल्या प्रयोगाबद्दलचं, किंवा राजा केळकर वस्तुसंग्रहालयाचं नाहीतर नागपुरी संत्र्यांच्या किंवा नारायणगावच्या द्राक्षाच्या बागांचं!

पण माझी सद्यमिपापद्धतीची आवड:
अर्थातच

चित्राताई, तुझी मतंही वाचायची उत्सुकता आहे, तेव्हा फारवेळ कोंबडं झाकू नकोस.

अदिती

ता.क. वरचं चित्रं सभ्यतेच्या मर्यादेत बसत असावं. तात्यांचा प्रतिसाद माझा प्रतिसाद प्रसिद्ध झाल्यावर पाहिला म्हणून हे "स्पष्टीकरण"!

मुक्तसुनीत's picture

24 Oct 2009 - 9:25 am | मुक्तसुनीत

डिस्क्लेमर : हा प्रतिसाद अदितीबाईना नव्हे. या धाग्यावरचा आहे.

धागा आणि त्याच्यातले प्रतिसाद रोचक वाटले.

गुळगुळीत पानांवरची स्त्रियांची छायाचित्रे या प्रकारातून आपले छापील दिवाळी अंक काही सुटायला तयार नाहीत. (२००९ चे दिवाळी अंक पाहायचेत. २००८ पर्यंतचे जे आठवतात त्यावरून सांगतो. ) यातून महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक सकाळसुद्धा सुटलेले नाहीत ही गमतीचीच बाब आहे. "बाई छान दिसते. तिच्यात एक आव्हान आहे किंवा ती सोज्वळ आहे " वगैरे वगैरे गंमत म्हणून ठीक आहे. पण एका गुळगुळीत नटीची गुळागुळीत पानावरची गुळगुळीत प्रतिमा हे फारच धोपटमार्गी झाले असे मला वाटते. आणि "इतकी वर्षे स्त्रिया छापल्या ; आता जॉन एब्राहम छापा" हेदेखील गमतीपुरतेच ठीकाय.

काही मुखपृष्ठे मात्र कायमचा ठसा उमटवणारी. "चिन्ह" नावाचा दिवाळी अंक निघतो. त्याच्या वरचीच नव्हे तर आतली चित्रे यांचे वर्णन "मातबर" या एका शब्दात करता येईल. गेल्या वर्षीच्या चिन्हच्या अंकावर प्रभाकर कोलते यांचे चित्र होते. पूर्ण अंकात त्यांची चित्रे होती. (यातली काही लक्षावधी डॉलर्सची.) त्याआधीच्या एकवर्षी पॉल क्ले चे चित्र मुखपृष्ठ होते. मुखपृष्ठाचीच तुलना करायची तर "चिन्हा"च्या आसपास सुद्धा इतर अंक येत नाहीत.

दुसरे नाव अर्थातच मौजेचे. प्रत्येक दिवाळी अंकावर वैशिष्ट्यपूर्ण, नामवंत चित्रकारांची चित्रे. हेच "शब्द"बद्दलही सांगता येईल.

बाकी "अक्षर"दिवाळीचे मुखपृष्ठ हे कलादृष्ट्या कितपत महत्त्वाचे/महत्तेचे आहे ते माहित नाही; परंतु चालू काळाच्या प्रश्नांशी म्हणा, काळाच्या एकंदर नादाशी म्हणा , मेळ घालणारे असते असे मला वाटते.

आणि हो, वसंत सरवट्यांची मुखपृष्ठे फार आनंद देणारी. त्यांनी दिलेल्या आनंदाचे स्वरूप घरगुती आहे; पण वर्षानुवर्षे ते आपली सुरेख अर्कचित्रे देत आलेत. गेली अनेक वर्षे ललितचे मुखपृष्ठ ते करतात. ते पाहिले की दिवाळी आली असे वाटते.

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 11:03 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री मुक्तसुनीत, माहितीपूर्ण प्रतिसाद.

आणि हो, वसंत सरवट्यांची मुखपृष्ठे फार आनंद देणारी.

या वाक्याने श्री विनाकारण रंगकर्मी यांची आठवण झाली. खास करून 'आणि हो' असा शब्दप्रयोग. ते नेहमीच महत्त्वाचे शेवटी विसरतात.

-(कोल्हापूरी) अक्षय

मुक्तसुनीत's picture

24 Oct 2009 - 11:07 am | मुक्तसुनीत

रंगकर्मी म्हणजे कोण ते कळले नाही.

माझ्या एकंदर प्रतिसादात काहीच महत्त्वाचे असण्याची शक्यता नसल्याने "महत्त्वाचे शेवटी विसरण्याची" शक्यताही खुंटते असे मला वाटले. असो.

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 11:08 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री मुक्तसुनीत, शब्दप्रयोग समान वाटला. मोटिवेशन नाही. तुम्ही हळवेच फार.

मुक्तसुनीत's picture

24 Oct 2009 - 11:13 am | मुक्तसुनीत

तुमची कमेंट सरळसरळ व्यक्तिगत स्वरूपाची आणि काँडसेंडींग आहे खरी. असो.

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 11:16 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री मुक्तसुनीत, आपला गैरसमज होणारा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व. व्यक्तिगत काही नाही. माहितीपूर्ण सोडून बाकीचे काढून टाका हवेतर. :)

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 1:40 pm | मिसळभोक्ता

रंगकर्मी म्हणजे कोण ते कळले नाही.

अरे, श्री. पूर्णपात्रे हे मिसळपावावर फक्त ५ दिवस जुने आहेत. त्यामुळे त्यांनी श्री. विनायक गोरे, ह्यांना श्री. विनाकारण रंगकर्मी म्हटले, एवढे सोप्पे तुला कळले नाही होय ?

मिसळपावाला आपलेसे करण्यासाठी श्री. पूर्णपात्रे किती प्रयत्न करताहेत, कळले ना ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 7:55 pm | अक्षय पुर्णपात्रे

अरे, श्री. पूर्णपात्रे हे मिसळपावावर फक्त ५ दिवस जुने आहेत. त्यामुळे त्यांनी श्री. विनायक गोरे, ह्यांना श्री. विनाकारण रंगकर्मी म्हटले, एवढे सोप्पे तुला कळले नाही होय ?

श्री मिसळभोक्ता, श्री रंगकर्मी यांचा हा लेख तुम्ही वाचला नाही का?

मिसळपावाला आपलेसे करण्यासाठी श्री. पूर्णपात्रे किती प्रयत्न करताहेत, कळले ना ?

अजुन गोड पापे घ्यावे लागले नाहीत बॉ.

श्रीयुत संतोष जोशी's picture

23 Oct 2009 - 11:20 am | श्रीयुत संतोष जोशी

चित्रातै
एक लक्षात घ्या की कोणीही पुरुष दिसायला कितिही देखणा असला ना तरी मनोरंजनासाठी असलेल्या दिवाळी अंकावर त्याचं चित्र कोणीही पसंत करणार नाही.
आता स्त्री म्हणजे काय मनोरंजनाचे साधन आहे की काय वगैरे करुन कोणीही प्रश्न काढु नयेत ही विनंती . आमच्या मनात तसे काहीही नाही.

माझं म्हणणं इतकच आहे की हापिसातून घरी आल्यावर त्या शिणलेल्या अवस्थेत जर समोर एखाद्या दिवाळी अंकावर प्रसन्नपणे हसणा-या स्त्री चे चित्र तुम्हाला दिसते तर मी खात्रीने सांगतो की आपल्यालाही प्रसन्न वाटतं
आणि हे सामर्थ्य फक्त स्त्री च्याच चेह-यात आहे.
आणि त्याचे कारण आहे ती स्त्रियांच्या ठायी असलेली ममता आणि करुणा.

आणि त्यामुळे आम्ही पुढेमागे कधी दिवाळी अंक काढला तर मुखपृष्ठांवर प्रसन्नपणे हसणा-या स्त्रीचे च चित्र असेल.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2009 - 11:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दिवाळी अंकावर त्याचं चित्र कोणीही पसंत करणार नाही.

-१!

... प्रसन्नपणे हसणा-या स्त्री चे चित्र तुम्हाला दिसते तर मी खात्रीने सांगतो की आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि हे सामर्थ्य फक्त स्त्री च्याच चेह-यात आहे. आणि त्याचे कारण आहे ती स्त्रियांच्या ठायी असलेली ममता आणि करुणा.

असं का, बरं बरं! चालू द्या!!

अदिती

लवंगी's picture

24 Oct 2009 - 5:08 am | लवंगी

का नाही पसंद करणार.. जरूर करु :)

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2009 - 11:29 am | पिवळा डांबिस

मिसळपावचा दिवाळी अंक जर कधी निघालाच तर त्यावर एकतर "मिसळपावा"चे
किंवा
एकमेकांची अस्सल मराठीत थट्टामस्करी करत बसलेल्या जिवलगांचे (मग त्यांचे पोशाख देशी-विदेशी कसेही असोत!!!) चित्र असावे असे मला उगीचच वाटते....
हल्ली मिपाला प्रगल्भ बनवण्याचे प्रयोग चालले आहेत...
असोत बापडे...
आम्हाला आपला मिपाकट्टाच आवडतो...
प्रगल्भ (पक्षी: संभावित) मिपा आमच्या दृष्टीने असून नसल्यागत!!!!

टुकुल's picture

23 Oct 2009 - 11:40 am | टुकुल

एक नंबर पिडाकाका..

--टुकुल

श्रावण मोडक's picture

23 Oct 2009 - 12:15 pm | श्रावण मोडक

मुखपृष्ठ कशासाठी, त्यावर उत्तर अवलंबून राहील. अंक खपाऊ करायचा असेल तर एखादी नटवीच पहावी. अंकात काय आहे त्याचे दर्शन घडवायचे असेल तर एखादा चित्रकार नेमावा. वेगळंच काही करतोय असं दाखवायचं असेल तर अॅब्स्ट्रॅक्ट करावं. अंक महिला विश्वाचा असेल तर जरूर एखाद्या पुरूषाचे छाया-चित्र वापरावे... वगैरे.
हा केवळ प्रारंभीक प्रतिसाद. इतर प्रतिसाद पाहून यात बदल होतील.

सहज's picture

23 Oct 2009 - 12:20 pm | सहज

मिपाचा दिवाळी अंक व त्यावरचे मुखपृष्ठ हे तर मालकांनी ठरवले आहेच त्यामुळे त्यांच्या मनात आल्याशिवाय दुसरे काही होणे नाही. :-)

वर म्हणालात त्याप्रमाणे मिपाकरांच्या आवडी भिन्न आहेत त्यामुळे फक्त एक स्त्री किंवा पुरुष असण्यापेक्षा मुखपृष्ठावर कोलाज असेल त्यात वेगवेगळे "विषय" हाताळले जातील.

किंवा एखादा पुरुष पहात आहे बाईकडे, बाई बघत आहे अजुन कुठेतरी, मग त्याचित्राच्या फोकस अजुन कुठेतरी वेगळीकडे लिंक अजुन कशाशी .. अशी साखळी व त्यातुन उलगडणारे वेगळे विषय बघायला आवडेल...

अवलिया's picture

23 Oct 2009 - 12:31 pm | अवलिया

अरे पाच सहा बनवा मुखपृष्ठ... आहे काय अन नाही काय?

१) सोज्वळ बाई - नउवारी , नथ, वगैरे
२) सोज्वळ बाप्या - धोतर, टोपी वगैरे
३) वाह्यात बाई - जाणकारांना सांगायलाच हवे का ?
४) वाह्यात बाप्या - यातले मला समजत नाही.. तज्ज्ञ सांगतील
५) निरर्थक अर्थवाही - ४ प्रमाणे
६) प्रभुचित्र - प्रभु नाम ही काफी है...

ज्याला जे आवडते त्याला क्लीक करुन अंक वाचेल. कसे ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

shweta's picture

26 Oct 2009 - 9:03 am | shweta

अगदि बरोबर आहे.

श्रीयुत संतोष जोशी's picture

23 Oct 2009 - 12:35 pm | श्रीयुत संतोष जोशी

हे चालेल का ?

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

प्रमोद देव's picture

23 Oct 2009 - 1:14 pm | प्रमोद देव


अजून काही वेगळी आवड असल्यास कळवावे.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

टारझन's picture

26 Oct 2009 - 7:39 pm | टारझन

=)) =)) =))
हा अंक हातात घेतल्याघेतल्या हात डुलायला लागेल =))

- देवात आनंद

विंजिनेर's picture

23 Oct 2009 - 12:59 pm | विंजिनेर

चित्रा तै, अहो हा प्रश्न काही मिपाच्या (किंवा इतर कुठल्याही) दिवाळी अंकापुरता नाही.
असो. प्रश्नाचं उत्तर टायरच्या किंवा शेविंग क्रिमच्या जाहिरातीत बायका कशाला किंवा डिटर्जंटच्या जाहिरातीत पांढरी शुभ्र साडी नेसलेली स्त्री का (किंवा त्याच डिटर्जंटच्या जाहिरातीत एकही पुरूष कपडे धुताना का नसतो) ह्या आणि अशा प्रश्नांमधे मिळेल.

खवचट ढुढ्ढाचार्य ह्याचे उत्तर "पुरुषप्रधान संस्कृती" असे देतील किंवा संभवित पांढरपेशे "दृष्टी सुख" असे देतील पण खर कारण मात्र असे असावे की बहुतांश समाज स्त्रीला अजून ही उपभोग्य वस्तू मानण्यापलिकडे गेला नाहीये हे आहे.

(तसे बघायला गेले तर तथाकथित स्त्रीमुक्तीवाद्यांनी (!)चालविलेली "प्ले गर्ल" नावाची बिभत्स, तद्दन बाजारू मासिके आहेतच की पण ते दुसरे टोक झाले)
असो. स्त्री/पुरूष चित्रे सोडले तर अनेक विषय मुखपृष्ठासाठी असतात.
विषयानुरूप/धाटणीनुरूप निवड उत्तम.

प्रसन्न केसकर's picture

23 Oct 2009 - 1:00 pm | प्रसन्न केसकर

मिपावर अनुष्कावहिनीं शिवाय दुसरं असणार कोण?

विसोबा खेचर's picture

23 Oct 2009 - 1:21 pm | विसोबा खेचर

लाख मोलाची बात!

अनुष्का किंवा माझी मैत्रीण व अशील दीपशिखा! :)

ही पाहा आमची दीपशिखा -

दीप हल्ली भेटली नाही बर्‍याच दिसात! लौकरच एखादी ट्रीट घ्यायला पायजेल तिच्याकडनं पार्ल्याच्या गजालीत! :)

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2009 - 1:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुद्दामच देवांना उप-प्रतिसाद देत नाही आहे, जेणेकरून हा प्रतिसाद पाहिल्यावर त्यांना स्वतःलाच लगेचच आर्नीचं ओंगळ चित्रं काढून टाकता येईल. तो दुसरा चड्डीवालाही फार काही आकर्षक वगैरे वाटत नाही आहे. असो.

अदिती

श्रावण मोडक's picture

23 Oct 2009 - 1:05 pm | श्रावण मोडक

+१
हा अर्नी पूर्वी 'तसल्या' पटांमध्ये काम करायचा म्हणे. तेव्हाचा फोटो आहे का हा?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2009 - 1:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ प्रतिसाद बदलल्यामुळे वरचे प्रतिसाद उडवायला हरकत नाही.

अदिती

श्रावण मोडक's picture

23 Oct 2009 - 1:23 pm | श्रावण मोडक

अनुमोदन

गणपा's picture

23 Oct 2009 - 1:56 pm | गणपा

स्त्री की पुरष या वादावर आम्ही तोडगा काढलेला है.. ;)
ह्यो फटु कसा वाटतु .

व्यक्तीशः हा फोटु आवडेल..
ह्या पोरीवर आमचा भारी जीव ;)

सुनील's picture

23 Oct 2009 - 2:05 pm | सुनील

आपल्याला तर बॉ एखादा फोटोजेनिक, सुंदर, मोहक चेहरा पहायला आवडेल (उगाच खोटं कशाला बोला बॉ!).

तर तात्या, काढा तुमच्या पोतडीतून काहीतरी नवीन! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

Dhananjay Borgaonkar's picture

23 Oct 2009 - 2:46 pm | Dhananjay Borgaonkar

तात्या परत एकदा विनंती..मुखप्रुष्ठाची कल्पना चांगली आहे पण पुढच्या दिवाळी पर्यंत लांबवु नका..

बाकी त्यावर कोण का असेना काय फरक पडतो. तिचं कौतुक दोन दिवस्...त्यानंतर लगेच दुसर्या मासिकाचं मुखप्रुष्ठ..

पण एक ग्यारंटी आहे..तात्या आपल्या मासिकाचा कंटेंट दुसर्या मासिकापेक्शा लैलैलै भारी असणार...

(आपलं मासिक मराठी तर मग मुखप्रुष्ठावरची कन्या, स्त्री, बाई पण मराठी असली तर जास्त बर होईल)

बाकी चालुद्या चर्चा...

चित्रा's picture

23 Oct 2009 - 6:17 pm | चित्रा

ज्यांनी प्रतिसाद दिले आहेत त्यांचे सर्वांचे आभार.

आज जरा वेळ कमी पडतोय, त्यामुळे जमेल तसा प्रतिसाद थोड्या वेळाने देते. प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Oct 2009 - 7:07 pm | अक्षय पुर्णपात्रे

अशाच एखाद्या साच्यातली स्त्री तुम्हाला आजही मुखपृष्ठांवर बघायला आवडेल का, आणि का आवडेल? का तुम्हाला काही वेगळे अपेक्षित असेल? का आणि काय? तुम्हाला समजा मुखपृष्ठ ठरवायचे आहे, तर तुम्ही काय विचार कराल?

चित्रा, स्त्रियांची चित्रे आजकाल सगळीकडेच दिसतात. मुखपृष्ठावर दिसले तरी काही हरकत नाही. साचाची व्याख्या बदलून सर्वच चित्रे एकाच साच्याची आहेत असे म्हणता येईल. दिवाळी अंकात प्रयत्नपूर्वक वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याने चित्रही थोडेसे अभिनव असावे, अशी अपेक्षा आहे. शेवटच्या प्रश्नाचा विचार करण्यास काही अपरिहार्य कारण नसल्याने पास.

श्री खेचर जरी स्त्रियांच्या चित्रांचे फॅन असले तरी मिपाच्या मुखपृष्ठावर नेहमीच ज्ञानेश्वर आणि तुकाराम असतात, हे नमुद करावेसे वाटते.

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2009 - 10:33 pm | मिसळभोक्ता

मिसळपावाच्या कुठल्याही अंकाच्या मुखपृष्ठावर, फक्त गणपाच्या पाककृतीची चित्रे असावीत.

(फूड पॉर्न)

(आता कुणाला "अमेरिकन पाय" मधला "पाय" चा शीन आठवू नये, म्हणजे झालं.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Oct 2009 - 10:43 pm | अक्षय पुर्णपात्रे

आता कुणाला "अमेरिकन पाय" मधला "पाय" चा शीन आठवू नये, म्हणजे झालं.

इकडे बरेच आत्मलिंगी तुंबलेले बोळे आहेत असे तुम्हाला सुचवायचे आहे काय?

निमीत्त मात्र's picture

23 Oct 2009 - 10:47 pm | निमीत्त मात्र

होय. आणि त्यांच्या बोळ्यांवर विरजण घालणारे दुग्धव्यावसायिकही आहेत.

शेखर's picture

23 Oct 2009 - 10:52 pm | शेखर

छोटी दुरुस्ती:
त्यांच्या बोळ्यांवर विरजण घालणारे दुग्धव्यावसायिकही आहेत.

च्या ऐवजी
त्यांच्या बोळ्यांवर विरजण घालणारे दहीव्यावसायिकही आहेत.

असे चालु शकेल

निमीत्त मात्र's picture

23 Oct 2009 - 10:57 pm | निमीत्त मात्र

दही हा दुग्धजन्य पदार्थ असल्याने दही विक्रेत्याला दुग्धव्यावसायिक म्हणण्यास हरकत नसावी.

सुधीर काळे's picture

23 Oct 2009 - 11:27 pm | सुधीर काळे

कशाला उगीच वाद घालताय? मी आमच्या ८० टनाच्या भट्टीचे वेगवेगळ्या 'अवस्थे'तले १५-२० फोटो पाठवले. आणि या भट्टीइतकी 'सेक्सी' बाई दुसरी कुणी असूच शकत नाहीं. अहो, हीच 'ती' रात्रंदिन माझ्या डोळ्यासमोर असते, तिला जरा कुठं दुखलं-खुपलं तर डोळ्यात पाणी येतं माझ्या. आणि ही रागवली की माझ्यासकट सगळे चळा-चळा कापतात! या उलट ती चांगल्या मुडात असते तेंव्हा तर ती एक कामधेनूच जणू!
तिचे "कमी-जास्ती" पोजमधले फोटो हवे असतील तर देऊ पाठवून. तात्यांनी फक्त हुकूम करावा!
सुधीर
-----------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2009 - 11:32 pm | मिसळभोक्ता

भट्टीइतकी 'सेक्सी' बाई दुसरी कुणी असूच शकत नाहीं

शब्दशः सहमत आहे. फक्त 'भट्टी' निराळी.

पण जोक्स अपार्ट. काळेकाका, तिच्याशी जास्त लगट करू नका हो. गरम असते म्हणतात.

तुम्ही ज्या गोष्टी (शस्त्रक्रियेशिवाय) बदलू शकत नाही, त्या गोष्टी भट्टी सहज करू शकते. ते स्वीकारायची शक्ती हवी.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नंदन's picture

24 Oct 2009 - 12:22 am | नंदन

भट्टी ही तशी काव्यात्म का काय म्हणतात तशीदेखील असावी हो मिभोकाका.

पहा -
ये इश्क नहीं आसाँ, बस इतना समझ लीजे;
इक 'आग का दरिया' है, और डूब के जाना है।

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुधीर काळे's picture

24 Oct 2009 - 7:49 am | सुधीर काळे

नुसतीच गरम नाहीं, तर sizzling hot!
आणि ही सेक्सी बाई 'अंगा'ला हात लावू देत नाहीं बरं का! हाहाहा!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

निमीत्त मात्र's picture

23 Oct 2009 - 11:47 pm | निमीत्त मात्र

मुखपृष्ठाची कल्पना छान!

ही आमची सेक्सी भट्टी ह्यावर आमचा भारी जीव! असे मुखपृष्ठाचे वर्णन पण देत येइल.

अवांतर: मुखपृष्ठा सारखेच मिपाच्या दिवाळीअंकाला मलपृष्ठही असावे का? आंतरजालिय दिवाळीअंकामध्ये ते दिसत नाही. मिपाला त्यातून वेगळेपण दाखवता येईल. तुमचे मत काय?

चित्रा's picture

24 Oct 2009 - 8:03 am | चित्रा

ही चर्चा सुरू करण्याचे कारण एक प्रकारचे टेंपरेचर घ्यायचे होते.
ह्या चर्चेत स्त्रियाही भाग घेतील अशी अपेक्षा होती, पण उत्तरे देणारे बरेचसेजण - अदिती सोडून -पुरूषच आहेत. त्यामुळे एका टोकाला हळवी, देखणी आणि सालस स्त्री तर दुसरीकडे उत्तान आणि आव्हानात्मक भासणारी स्त्री अशा दोन टोकांच्या मधली मते आली यात नवल वाटले नाही. तात्यांचाही प्रतिसाद अपेक्षित होता तसाच आला.

फक्त खरे तर ही चर्चा दिवाळी अंकासाठी दिसत असली तरी खरे तर तेवढीच ती मर्यादित नव्हती. त्यामुळे ज्यांनी खरोखरच मनापासून अंकावर कसले चित्र असावे हे सुचवले त्यांची क्षमा मागते आणि प्रतिसादांबद्दल आभारही मानते. (तरी तात्यांना बहुदा या विद्याचा/डेट्याचा उपयोग होईलच).

आता या चर्चेविषयी -त्यात मी खरे तर मी एक प्रश्न विचारला होता, "अशाच एखाद्या साच्यातली स्त्री तुम्हाला आजही मुखपृष्ठांवर बघायला आवडेल का, आणि का आवडेल?" जरी सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची गरज नव्हती तरी ह्या प्रश्नाचे उत्तर कोणीतरी देईल अशी अपेक्षा होती. पण तो प्रश्न बहुदा फारच अवघड निघाला आणि कोणीच त्याचे उत्तर दिलेले आढळले नाही!

म्हटले तर फक्त तात्यांनी याचे उत्तर त्यांच्या स्वभावाप्रमाणे दिले आहे. प्रा. बिरूटे यांनी दिलेल्या उत्तरात त्यांचे उत्तर असे नाही. श्रावण मोडक यांच्या "वेल" मधून बरेच काही वाचता येऊ शकते पण त्यांनी चेंडू दुसर्‍यांकडेच भिरकावून दिला आहे. पि. डां. यांनी प्रगल्भ/अप्रगल्भतेचा मुद्दा काढून सरळ प्रश्नाला सरळ बगल दिलेली आहे. बाकीच्यांनी उत्तरे न देता भट्टी लावणे, आणि विरजण लावणे अशी कामे करून टाकली आहेत! विंजीनेर यांनी " कारण मात्र असे असावे की बहुतांश समाज स्त्रीला अजून ही उपभोग्य वस्तू मानण्यापलिकडे गेला नाहीये हे आहे." असे म्हटले आहे, पण प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

खरे तर मुद्दा हा दिवाळी अंकाचा नव्हताच. तो स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे का नाही, आणि स्त्रीला इतकी वर्षे उपभोग्य समजल्याबद्दल पुरूषांना आता शिक्षा म्हणून उपभोग्य वस्तू करावे का असा चर्चाविषय म्हणूनही तो माझ्या मनात नव्हता. (जरी आमच्या टॉम ब्रेडीचे फेटा घातलेले चित्र दिवाळी अंकावर चांगले दिसू शकेल असे वाटले तरी!) खरे तर स्त्रीचे लिबरेशन, स्वातंत्र्य जे काही म्हणाल ते याच्या कल्पना खूप बदलत गेल्या आहेत. माझ्या स्वतःच्या त्या बदलल्या आहेत. फक्त एक जाणीव होत असते, की एक व्यक्ती म्हणून पुरूषांना आजवर आयुष्यात ज्या पद्धतीची चढाओढ, ज्या पद्धतीची दगदग सहन करावी लागत आली आहे तशीच ती आता स्त्रीलाही करावी लागते आहे. अपेक्षा - स्वतःकडून आणि इतरांकडून बदललेल्या आहेत. ही सगळी बदलती परिस्थिती आज मिसळपाव वर येणार्‍या स्त्री-पुरूषांच्या नजरेस येतच असणार. त्यामुळे मुद्दा असा होता की आपण (म्हणजे तुम्ही/मी सगळेच) नव्या काळाचे काही भान ठेवून आहोत का नाही? मिसळपावच्या अंकावर नथ घातलेली कट्रिना कैफ किंवा नऊवारीतील शिल्पा शेट्टी मलाही पहायला गोड वाटेल. पण स्त्रीच्या अशा छायाचित्रांप्रमाणेच तरही बरेच काही पहाण्या-बोलण्यासारखे आहे याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. आपल्या खेरीज इतर कोणाच्या इच्छा/अपेक्षांचे भान आपल्याला वैयक्तिक दृष्ट्या किंवा एकत्र समूहाच्या दॄष्टीने आलेले असणेही महत्त्वाचे आहे. ते भान मिसळपाव वरच्या आपल्याला सर्वांना वैयक्तिक आयुष्यात आलेले नाही असे म्हणणार नाही, पण असले तरी ते इथे मान्य करण्यात मात्र कमी पडतो आहोत असे वाटते. काहीसे जैसे थे चालले आहे ते चालू दे अशी ही वृत्ती आहे. किंवा विशिष्ट समूहात असेच बोलायचे असते अशी पण काही भावना असावी की काय अशीही कधीकधी शंका येते.

असो.

आता दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी - मला कुठचेही रंगसंगती सुरेख असलेले, दर्जेदार चित्रे असलेले अंक आवडतात -स्त्रियांची चित्रेही असलेली आवडतात!

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 8:18 am | अक्षय पुर्णपात्रे

चित्रा, आपण साचाची योग्य व्याख्या न दिल्याने प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

त्यामुळे मुद्दा असा होता की आपण (म्हणजे तुम्ही/मी सगळेच) नव्या काळाचे काही भान ठेवून आहोत का नाही?

हा प्रश्न चर्चाप्रस्तावात असता तर त्या दिशेने चर्चा होऊ शकली असती. स्त्रियांनी गुढत्व जपणे हा एक चिरंतन स्थायीभाव असावा का अशी शंका येते.

किंवा विशिष्ट समूहात असेच बोलायचे असते अशी पण काही भावना असावी की काय अशीही कधीकधी शंका येते.

हे योग्य निरिक्षण आहे. काही ठिकाणी बोलायचेच नसते अशीही एक शक्यता दाखवता येईल.

चित्रा's picture

24 Oct 2009 - 8:46 am | चित्रा

स्त्रियांनी गुढत्व जपणे हा एक चिरंतन स्थायीभाव असावा का अशी शंका येते

स्त्रियांना गूढपणा जपता येत नाही असा धर्मराजाचा शाप आहे असे ऐकून आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 8:47 am | अक्षय पुर्णपात्रे

आपण समारोपात गूढ उकलवले असावे काय? :)

चित्रा's picture

24 Oct 2009 - 8:51 am | चित्रा

:)

गूढत्व जपायचे कसे हे शिकायचे असेल तर सहज, मिभो. यांच्याशी संपर्क साधावा.

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 9:01 am | अक्षय पुर्णपात्रे

चित्रा, मी गूढ जपण्याचे तंत्र जाणण्याचा प्रयत्न करत आहे असे आपल्याला का वाटले बरे? श्री सहज हे चांगले मासे वाफवतात व श्री मिभो दुधाचा जालीय व्यवसाय करतात एवढेच माहीत होते. अधिक माहितीबद्दल धन्यवाद.:)

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 9:57 am | मिसळभोक्ता

एवढेच माहीत होते होय ?

खि खि खि !!

(तुझा जुना मित्र)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 10:35 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री मिसळभोक्ता, जुणे धागे उसवले. बरीच माहिती मिळाली.

-(रफुवाला) अक्षय

सुधीर काळे's picture

26 Oct 2009 - 8:45 am | सुधीर काळे

चित्राताई,

माझ्या मतें हा प्रश्न "स्त्री-पुरुष" असा नसून बलवान वि. कमजोर हा आहे. बलवानची व्याख्या संदर्भानुसार बदलते. दोन देशांच्या संदर्भात ती शस्त्रे किंवा सैन्याची संख्या असू शकते, नवरा-बायकोत कुणाच्या हातात तिजोरीची किल्ली ही असू शकते, किंवा 'कॉर्पोरेट' संदर्भात 'बॉस व सबॉर्डिनेट' अशी असू शकते. कंपन्यांचे मालक तर (कांहीं ना कांहीं कारणाने) नोकरांचे शोषण करतच असतात, नाहीं का?

जो पैसे कमावतो तो सर्व गोष्टींचा उपभोग घायचा प्रयत्न करतो. पूर्वी जमीनदारीच्या काळात स्त्रीला वारसा हका नव्हता. "नवरा गेला कीं बाईचं पोतेरं होतं" असं माझी आजी म्हणायची व तशी उदाहरणे मी माझ्या लहानपणी पाहिलीही आहेत. माझ्या आजीच्याच वयाच्या पण बालविधवा असलेल्या एक आजीबाई आमच्या शेजारी आमच्या वाड्यात भाड्याने रहायच्या. तांबडे वस्त्र नेसलेल्या व केशवपन केलेल्या त्या आजीबाईंची मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. ना मूल ना बाळ. त्या गेल्यावर त्यांचे अंत्यविधी नीट होतील कीं नाहीं याचीच त्यांना धास्ती उरली होती व ते आमच्याकडून (काळे मंडळींकडून) व्यवस्थित होतीत अशी त्यांना खात्री होती. या बद्दल त्या माझ्या वडिलांना नेहमी आठवण करून द्यायच्या! माझे वडील कधी बाहेरगावी जायला निघाले तर "बाळू, तुझ्या मित्रांना सांगून जा हो माझं प्रेत नदीवर जाळण्याबद्दल" अशी सूचना करायला विसरायच्या नाहींत.

पण आज वारसाहक्काने बायकांना ही भीती नाहीं व आपल्या लोकशाहीने हे एक मोठे काम केले आहे. आणखी एक चांगली गोष्ट आपल्या लोकशाहीने (मुस्लिमेतर नागरिकांसाठीतरी) केली आहे ती म्हणजे बहुपत्नीकत्व (polygamy) बेकायदेशीर ठरविण्याची.

पूर्वीच्या काळी जमीनदार नसलेल्या कुटुंबातही - अगदी आता-आतापर्यंत - पुरुषच कमावायचे त्यामुळे स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून मानले जाऊ लागले. या उलट परिस्थिती असती तर नक्कीच पुरुष एक उपभोग्य वस्तू झाला असता व नऊवारी साडीतल्या कत्रीनाऐवजी 'हनुमान चड्डी'तला सौष्ठवस्पर्धेत पहिले बक्षिस मिळविलेला एकादा गुलजार तरुण दिवाळी अंकावर दिसला असता. आताशा पाश्चात्य देशांत तर स्त्रिया पुरुषांचे 'स्ट्रिप-टीज डान्स' पहायला गर्दी करतात अशा तर्‍हेच्या बातम्या सर्रास आपल्या वाचण्यात येतात आणि त्याचे मला (व इतर पुरुषांना) तरी वैषम्य वाटण्याचे कारण नाहीं. "कमाओ और उडाओ" ही "नीती" आजवर पुरुष पाळत आले तर आता तेच बायकांनी केले तर त्यात काय गैर?

तीच गोष्ट वेश्याव्यवसायाची. आज कितीतरी पुरुष अशा "सेवां"साठी स्वत:ला उपलब्ध करून देतात असे आपण वाचतोच. माझ्या एका पारशी मित्राचा मित्र एका वृद्ध पारशी बाईचा असा "बॉयफ्रेंड" होता व तिची "तीच" सेवा करायचा.

तेंव्हां स्त्री ही उपभोग्य वस्तू कधीच नव्हती तर ही haves and have-nots मधली one-up-man-ship होती."

तरी स्त्रियांनी या बाबतीत स्वतःच्या जातीला कमी मानू नये! त्या एरवीही बरोबरीच्याच आहेत, पण केवळ पैसे पुरुषाच्या हातात होते म्हणून पुरुषाची अरेरावी होती इतकेच. पण आता परिस्थिती वेगाने बदलत आहे.

परमेश्वर बहुदा पुरुष असावा! कारण त्याने पुरुषाला फटाफट बनविले, पण स्त्रीला घडवताना मात्र खूप वेळ दिला! त्यामुळे पुरुष स्त्रीइतका आकर्षक कधीच दिसू शकणार नाहीं व 'दिसण्याच्या' बाबतीत तरी स्त्रिया केंव्हाही फड जिंकणारच!

तेंव्हां माझी आपल्याला विनंती आहे की केवळ समाजाचा एक कमजोर घटक म्हणून स्त्रीच्या वाट्याला शोषण आले. जमीनदारांनी कुळाला शोषले, बलवान देशांनी आपल्यासारख्या राष्ट्रांना गुलाम बनवून शोषले. तीच गत पूर्वी बाईची झाली. पण आज परिस्थिती सुदैवाने झपाट्यात बदलत आहे.

व दिवाळी अंकावर एकाद्या सुंदर स्त्रीचे चित्र असावे असे जर आज कुणी म्हटले तर ते स्त्री एक उपभोग्य वस्तू म्हणून नव्हे तर पुरुषांत "बघण्यासारखं" फारसं नसतं म्हणून.

सुधीर काळे
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

चित्रा's picture

26 Oct 2009 - 6:57 pm | चित्रा

मी आधीच म्हटल्याप्रमाणे या लेखातून स्त्री उपभोग्य वस्तू नसावी, पुरूषांना शिक्षा म्हणून उपभोग्य वस्तूच्या दर्जाला नेऊन ठेवणे किंवा त्यांचे फोटो मुखपृष्ठावर द्यायला बंदी घालणे, असे काही सहमत व्हावे असे अभिप्रेत नव्हते. प्रश्न एवढाच होता की दरवेळी कोणाही व्यक्तीला एकाच पद्धतीने बघण्याची गरज आहे का? जे आजवरचे साचे आहेत ते तसेच वापरण्याची गरज आहे का याचा विचार करणे. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे ललितचे अंक सुंदर असतात; मौजच्या अंकावर काढलेली स्त्रियांचीच चित्रे लक्षात राहण्यासारखी असतात.

पुरुषच कमावायचे त्यामुळे स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून मानले जाऊ लागले.
हे मान्य नाही. स्त्रिया कमावू लागल्या की त्या पुरूषांना सरसकट उपभोग्य वस्तू मानायला लागल्या असे होत नाही. हे होण्याचे कारण ती नंतरच्या काळात केवळ घरामध्येच सीमित झाली, ह्याच असे नव्हे पण अनेक कारणांनी तिचे अनुभवविश्व मर्यादित झाले, सोबतीच्या स्त्रियाही तिच्याचसारख्या होत्या/असाव्या किंवा असेच बरेच काही. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे.

दिवाळी अंकावर एकाद्या सुंदर स्त्रीचे चित्र असावे असे जर आज कुणी म्हटले तर ते स्त्री एक उपभोग्य वस्तू म्हणून नव्हे तर पुरुषांत "बघण्यासारखं" फारसं नसतं म्हणून.

हेही मान्य नाही! बघण्यालायक पुरूषांची यादीही मोठी आहे.

धनंजय's picture

26 Oct 2009 - 7:46 pm | धनंजय

वाचायला मजा आली.

मला वाटते की पुढील सर्व गोष्टी झाल्या तर मासिकनिर्माते जरूर पुरुषांची चित्रे देतील :
(१) पुरुषांची चित्रे बघून मासिक खरेदी करणार्‍यांच्या हातात पैसे खुळखुळले पाहिजेत
(२) या ग्राहकांची खरेदी कोठे होते, ती गोम प्रकाशकांना कळली पाहिजे

मला वाटते, यात काही ठिकाणी फरक आताच दिसतो. सिनेमांविषयीच्या मासिकांत, व्यायामविषयक मासिकांत मुखपृष्ठावर नटाचे किंवा पिळदार शरीरयष्टीच्या पुरुषाचे रंगीत गुळगुळीत चित्र पुष्कळदा दिसते.

असा फरक दिवाळी अंकांतही कालांतराने होईल असे वाटते. दिवाळी अंक इतके आहेत - प्रत्येक विशिष्ट ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पैकी कुठल्यातरी मासिकात एखाद्या देखण्या पुरुषाचे चित्र येईलही. आणि एकदा का वाचकवर्ग सापडला, तर पुरुषांची चित्रे अधिक-अधिक प्रमाणात येतील.

<<अनेक कारणांनी तिचे अनुभवविश्व मर्यादित झाले, सोबतीच्या स्त्रियाही तिच्याचसारख्या होत्या/असाव्या किंवा असेच बरेच काही. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे>>
सहमत! अनुभवविश्व मर्यादित होणे वगैरेसारख्या गोष्टी स्त्रीवर परिस्थितीने लादल्या. सुरुवातीपासूनच परिस्थिती उलटी असती तर पुरुषाचे अनुभवविश्व मर्यादित झाले असते व स्त्रीने त्याला वापरले असते असे मला वाटते.
खरंच तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे.
<<दिवाळी अंकावर एकाद्या सुंदर स्त्रीचे चित्र असावे असे जर आज कुणी म्हटले तर ते स्त्री एक उपभोग्य वस्तू म्हणून नव्हे तर पुरुषांत "बघण्यासारखं" फारसं नसतं म्हणून.>>
Well, I do stand by my statement! सुंदरता किंवा देखणेपणाच्या बाबतीत पुरूष बायकांच्यापुढे "किस झाडकी पत्ती"!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

चित्रा's picture

27 Oct 2009 - 8:02 am | चित्रा

>पुरूष बायकांच्यापुढे "किस झाडकी पत्ती"!
आता तुम्हीच म्हणताय तर मान्य करते! ;)

असो. चर्चेत भाग घेणार्‍या सर्वांचे आभार.