मी रविवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ११ वाजता चित्तरंजन वाटीकेमध्ये पोहोचलो. "आर्जवे फुलांची " हया प्राजक्ता ( प्राजु ) च्या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ. कार्यक्रमाला सुरवात होऊन जवळपास अर्धा-पाऊण तास झाला होता. विशेष म्हणजे प्रकाशित होणार्या कवितासंग्रहाची कवयित्री - प्राजक्ता - काही कारणामुळे समारंभाला उपस्थित राहू शकली नाही.
कार्यक्रम चित्तरंजन वाटिकेत झाडांच्या दाट सावलीत घेण्यात आला होता. मान्यवर पाहुण्यांसाठी टेबल-खुर्च्या आणि इतर उपस्थितांसाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या. झाडांवर स्पिकर्स लावण्यात आलेले होते. एकूण व्यवस्था अतिशय चांगली झालेली होती. मान्यवरांमध्ये जेष्ठ कवयित्री आसावरी काकडे ( अध्यक्षस्थानी ), श्री. सुधीर गाडगीळ ( प्रमुख पाहुणे ) आणि विशेष निमंत्रीत श्री. लक्ष्मीकांत देशमु़ख, जिल्हाधिकारी, कोल्हापूर हे उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे उसाचा थंड रस देऊन स्वागत करण्यात आले.
मी पोहोचलो त्या सुमारास प्रसिध्द गायिका वीणा जोगळेकरांनी पुस्तकातून निवडलेल्या एकूण कवितांपैकी शेवटची कविता गाऊन झालेली होती. त्यानंतर लगेचच प्राजक्ताला मोबाईल फोनवरुन फोन लावण्यात आला आणि तिचे मनोगत सांगण्यासाठी तिला आईने सांगितले. मोबाईल फोनचा स्पिकर ऑन करून तो माईकजवळ धरण्यात आला होता, त्यामुळे फोनवरचे सर्व बोलणे अगदी स्पष्टपणे सगळ्यांपर्यंत पोहोचत होते. प्राजक्ताने आलेल्या मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून आपले मनोगत अतिशय सुंदर शब्दात सांगितले. स्वतःच्या पहिल्याच पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित न राहू शकल्यामुळे दिलगिरी व्यक्त करताना ती फार हळवी झाली होती.
प्राजक्ताच्या मनोगतानंतर श्री. लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी केलेल्या आपल्या भाषणात- परदेशात राहूनसुध्दा प्राजक्ताने जपलेली मराठी साहित्याची आवड आणि कवितांच्या रुपाने आत्तापर्यंत केलेले थोडे बहुत योगदान- ह्याचे कौतुक केले. पुस्तकातल्या काही कविताही त्यांनी वाचून त्यावर भाष्यही केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. सुधीर गाडगीळ ह्यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत भाषण केले. त्यात त्यांनी कविता संग्रहातल्या आवडलेल्या कविताबद्दल सांगितले. ते पुढे म्हणाले "प्राजक्ताने मनोगत व्यक्त करताना एकही इंग्रजी शब्द उच्चारला नाही ह्याबद्दल मला विशेष कौतुक वाटले. अनेक वर्षे परदेशात राहुनसुध्दा अस्खलीतपणे मराठी बोलणार्या प्राजक्ताचा ' शिष्या' म्हणून अभिमान वाटतो".
श्री. सुधीर गाडगीळांच्यानंतर समारंभाच्या अध्यक्षा कवयित्री आसावरी काकडे ह्यांनी भाषण केले. त्यांनी प्रकाशित झालेल्या ह्या कवितासंग्रहातल्या कविताचे विषय, आशयवार वर्गीकरण करून काही आवडलेल्या ओळी वाचून दाखविल्या आणि आवडण्याचे कारणही सांगितले. त्या आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या कि, " प्राजुची कविता हळुवार, संवेदनाशील आणि गेय आहे. आजकलच्या वास्तववादी आणि मुक्तछंदातल्या कवितांच्या युगात अशी कविता तयार करणे हे कौतुकास्पद आहे".
हा प्रकाशन सोहळा उत्तमप्रकारे पार पडावा ह्यासाठी - प्राजुची आई, प्राजुचे सासरे, श्यामलाताई ह्यांनी बरीच मेहनत घेतल्याचा उल्लेखही मान्यवरांनी आपल्या भाषणामधून केला. त्याचबरोबर प्राजुची कविता सर्वार्थाने समृध्द होण्यामध्ये तिच्या आईने दिलेल्या प्रोत्साहनाचा आणि तिच्यावर केलेल्या संस्काराचा फार मोठा वाटा आहे असे कवयित्री आणि श्री. देशमुख आपल्या भाषणात सांगितले.
शेवटी श्यामलाताई देसाईंनीसुध्दा पुस्तकातल्या एका कवितेचे वाचन केले.
उपस्थितांची संख्या ७५ पर्यंत पोहोचली होती. मिपा परिवारातील माझ्या व्यतिरिक्त बिपिन कार्यकर्ते, चतुरंग, रेवती आणि लालसा हे समारंभाला हजर होते. लालसा तर चाळीसगांवहून आलेले होते.
http://picasaweb.google.com/prajakta.j.patwardhan/PhulanchiAarjave#
इथे फोटो पहाता येतील.
प्रतिक्रिया
13 May 2010 - 6:39 pm | राघव
छान झाला हा छोटेखानी सोहळा. मी पोहोचलो होतो तेथे पण थोडा उशीर झाला.
काही फोटोज काढले होतेत तेव्हा ते येथे दिसतील - http://picasaweb.google.com/rpatankar/New#
प्राजुचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन! :)
राघव
13 May 2010 - 6:47 pm | शुचि
सोहोळ्याचा यथासांग पण आटोपशीर वृत्तांत आवडला.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
13 May 2010 - 7:34 pm | दत्ता काळे
प्र.का.टा.आ.
13 May 2010 - 7:04 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्त.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
13 May 2010 - 8:09 pm | प्राजु
धन्यवाद दत्ता.
वृत्तांत आवडला. छान वाटलं मला. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
13 May 2010 - 8:11 pm | स्वाती२
छान वृत्तांत.
राघव फोटो साठी धन्यवाद!
13 May 2010 - 8:46 pm | क्रान्ति
प्राजु, हार्दिक अभिनंदन! राघव आणि दत्ताजी, शतशः धन्यवाद. :)
क्रान्ति
अग्निसखा
13 May 2010 - 8:52 pm | योगी९००
प्रा़जक्ता,
हार्दिक अभिनंदन...!!!
पिकासावर या समारंभाचे फोटो पाहीले.
खादाडमाऊ
13 May 2010 - 9:24 pm | खादाड_बोका
माझी आई सुद्धा छान कवीता करायची व गायची. पण बिचारी कधीही त्याचे प्रकाशन करु शकली नाही. तिच्या कवीता फार हळव्या असायच्या. पण ती गेल्यावर आम्ही सगळे ते विसरलो होतो. आज आठवण ताजी झाली. तुमच्या कवीता कुठे वाचायला मिळतील...
मला तर स्वप्नातही भुक लागते....
14 May 2010 - 11:09 am | आनंदयात्री
त्या तुम्ही इथे प्रकाशित करा ना. आवडेल वाचायला.
बाकी दत्तासाहेब वृत्तांताबद्दल आभार, आणी प्राजुचे पुन्हा एकदा अभिनंदन :)
14 May 2010 - 2:27 pm | बिपिन कार्यकर्ते
इथे टाका साहेब...
बिपिन कार्यकर्ते
13 May 2010 - 11:11 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
14 May 2010 - 2:02 am | मीनल
वृतांत आणि फोटो पाहून तिथे उपस्थित असल्यासारखे वाटले.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
14 May 2010 - 11:15 am | सहज
अगदी हेच म्हणतो.
काळेसाहेब, राघव धन्यु.
14 May 2010 - 12:57 am | टारझन
प्राजुंचं अभिणंदण !! खुप आणंद झालाच !!
पण तो बॅनर जकार्तातुन डिझाईन केल्यासारखा वाटला , :)
असो
14 May 2010 - 1:12 am | अनामिक
कालंच फोटू पाहिले, आणि आता वृत्तांत... प्राजु तैचे परत एकदा अभिनंदन!
-अनामिक
14 May 2010 - 1:20 am | विकास
वृत्तांत तसे फोटो छानच. प्राजूचे परत एकदा मनःपुर्वक अभिनंदन!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
14 May 2010 - 1:34 am | मनिष
प्राजूतैचे पुन्हा एकदा मनःपुर्वक अभिनंदन! मी पुण्यात नव्हतो, त्यामुळे येता आले नाही, पण तरीही पुण्यात आलीस की पार्टी घेणार!!! :)
14 May 2010 - 1:45 am | शिल्पा ब
अभिनंदन !!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
14 May 2010 - 8:43 am | सुधीर काळे
प्राजू, हार्दिक अभिनंदन!
पुण्यात एक दिवस आहे. वेळ झाला तर तुझे पुस्तक नक्की घेऊन जकार्ताला जाऊन वाचेन.
तुझ्या हातून असेच लिखाण होवो असे शुभाशिर्वाद!
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत !
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
14 May 2010 - 2:26 pm | बिपिन कार्यकर्ते
समारंभ छानच झाला. प्राजुचा आनंद बघून आम्हीही आनंदलो, सगळेच. असेच अजून खूप यश मिळो.
बिपिन कार्यकर्ते
14 May 2010 - 9:26 pm | संदीप चित्रे
असे अनेक संग्रह प्रकाशित होवोत आणि लवकरच गाण्यांचे अल्बम्सही येवोत ह्या शुभेच्छा !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com