काल दि. १२ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत "बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला.
आधी प्रोग्रॅमचा जास्त गाजावाजा न करता तो घेण्याचे ठरवून काल तो यशस्वी झाला.
कार्यक्रमास सर्वश्री " अबब, स्वयंभू , छोटा डॉन तसेच काळोख [ आगामी आकर्षण] " उपस्थीत होते.
या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...
यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. सध्या काही फोटो वगैरे काढले नाहीत पण पुन्हा जेव्हा आम्ही भेटू तेव्हाचे फोटॉ नक्की चढवू ...
प्रतिक्रिया
13 Apr 2008 - 12:02 pm | विसोबा खेचर
"बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला.
वा वा! तुमच्या बेंगलोर मिपा ओसरीकरांचे अभिनंदन रे छोट्या डॉना! :)
बाय द वे, कट्ट्यापेक्षा ओसरी हा शब्द अधिक छान आहे...
या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...
कुठल्या रे? आम्हालाही कळू देत की! :)
यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.
मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत होण्यासाठी आमच्याही मनापासून शुभेच्छा रे छोट्या डॉना! :)
बाय द वे,
तात्या, धमाल मुलगा आणि मदनबाण यांच्याही नुकत्याच मिपाच्या ठाणे ओसरीवर गप्पा झाल्या. त्याचे फोटो आणि वृत्तांत लवकरच! :)
मिपा धर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा!
आपला,
(मिसळधर्मी मिसळपावकर) तात्या.
13 Apr 2008 - 12:25 pm | आनंदयात्री
"मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.
शुभेच्छा, काय हवा असेल नसेल तसा रसदीचा पुरवठा करण्यास आम्ही अमात्यांना फर्मावले आहे, तेव्हा तुम्ही निश्चिंत होउन लढावे, मिपाधर्म वाढवावा!
काळोख [ आगामी आकर्षण]
हे भारिच !!
-
(उजेडातला) आंद्या
13 Apr 2008 - 12:29 pm | स्वाती दिनेश
ओसरीवर छान गप्पा झालेल्या दिसत आहेत. ओसरी कट्ट्यापेक्षा आवडली.
काळोख [ आगामी आकर्षण]
मस्त.. :-)
स्वाती
14 Apr 2008 - 9:39 am | आर्य
छोट्या डॉना!
मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब मजबूत होण्यासाठी आम्हालाही सामिल करुन घ्या
सद्या काही दिवसां पासून आम्ही ही बेंगलोर मुक्कामी आहोत.
काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...कुठल्या आम्हालाही सांगा
आपला
(मराठी - दक्षिण भारतातीय) आर्य
14 Apr 2008 - 12:52 pm | स्वयम्भू (not verified)
फोटो काढले नाहीत कारण थरथरत्या हाताने कॅमेरा धरवत नव्हता. तरीही प्रतत्न केलेच, पण सगळे फोटो ब्लर येत होते. पुढल्या वेळी आधी फोटो काढायचे ठरवून तो नाद सोडला. माझा व्रुत्तांत लवकरच इथे देईन.
आपला,
स्वयम्भू
14 Apr 2008 - 12:54 pm | स्वयंभू (not verified)
ही थरथर मित्रांना भेटल्याच्या आनंदाची होती.
आपला,
स्वयम्भू
14 Apr 2008 - 4:49 pm | प्रशांतकवळे
आता खरा दक्षिण भारतीय म्हणेल " मराठ्याला दिली ओसरी, मराठा हातपाय पसरी"
चालूच राहू द्या, आम्ही कधी बंगलोर ला आलो तर सामील होऊ.
प्रशांत
15 Apr 2008 - 12:01 pm | धमाल मुलगा
वा रे भिडू! शाब्बास.
लेको पण फोटू टाकायची व्यवस्था करायची रे.
आयला, आनंदातिरेकाने तुमचे हात थरथरत असले तरी, तिथली वेटरं काय सगळी लकवा भरलेली होती का काय? घ्यायचे की त्यांच्याकडून फटाफटा फ्लॅश मारुन. :-))
बेष्ट..बेष्ट.
आई भवानीचा आशिर्वाद आहेच पाठीशी. मोठ्या हिकमतीने धर्म वाढवावा, नेटाने कार्य चालवावे, मुळ प्रजेसि तोशिस न पडेल ऐसि बहुत काळजी घेवोन हल्लकल्लोळ माजवावा. मुळ प्रजेसि वाकुडेपण न घेता, गोडीने कार्यभाग साधावा. आपुल्या जिव्हेवरि साखर पेरली आहेच, योग्य तो वापर करोन प्रांति भेद करावा...'वेदिके'च्या आंगणि मिपाधर्माचे रोपटे जपावे. गनिम मोठा कावेबाज आहे, आपण तुर्त थोड्या अडचणित आहा, चिंता न करावी, योग्य काळ साधून कार्य पुढे चालवावे,
आपण सुज्ञ आहाच. आणखी काय सांगावे?
श्री.रा.रा.सकलवज्रमंडित आनंदयात्रीसाहेबे कृपादृष्टी आपल्यावरि आहे. त्यांसि उदास न करणे ही विनंति.
आपला,
सरनौबत धमालराव.
("मराठ्याला दिली ओसरी, मराठा हातपाय पसरी")
15 Apr 2008 - 12:15 pm | आनंदयात्री
मिपा स्वराज्याचा दक्षिणेत विस्तार होणे ही तर 'श्रीं'चीच इच्छा ! बंगळुरदेशी सरदार डानराव यांजकरुन मोठा पराक्रम होणे हे नियतीनेच योजिले आहे, निश्चिंत राहुन कार्यभाग बहुत खुबीने साधावा, काही कमीजास्त असल्यास, काही मते-मतांतरे असल्यात सरनौबत धमालरावांबरोबर खलबते करुन योग्य तो निर्णय घ्यावा, बाकी आई भवानीचा आशिर्वाद आहेच.
आपला,
थोरला आनंदराव पेशवा
("भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी")
16 Apr 2008 - 8:19 pm | विजुभाऊ
"माझे चुकले असे आता वाटते. मी पुणे कट्ट वृतान्त बखर लिहीली. आता हे सगळे सरदार अशा ऐतिहासीक भाषेतच बोलणार" ऐशी खबर खुद आपल्याच गोटातुन येवों लागली.खुद पेशव्यांचे कबील्यात थोरले आनन्द्राव ऐशा नामाने कोण्ही घुसखोरी केली. पेशव्यांस हे नवे नाही. त्या तोतया सदाशिवरावाची काय गत केली ते सर्व जाणताच.
ये देशी पर्माण मर्हाटी ऐशी गर्जना कोण्ही करों नये ऐशी ताकीद खविन्द तात्या साहीब उल उलै मान यांच्या सांगण्यावरोन दीली गेली आहेच्.पण सर्वच सरदार मंडळी जर ऐशा बखरी भाषीतच बोलों लिहों लागली तर आम्हा समान सामान्य रयतेचे हाल.
खुद खविन्दाना ये पर्कर्णी लक्ष देणेचे तसदी न पडों ऐसे करणे.
मूळ बखरनवीस :विजुभाऊ कलमदाने ( सध्या: हैद्राबाद कर)
16 Apr 2008 - 8:53 pm | छोटा डॉन
आप की बातो से ऐसा लगता है की आप पर मुसीबतोंका पहाड टूट पडा है,
आन्दराव जैसे घूसपैठिने आपकी रातोकी निंद हराम की है. उनकी इस जुर्रत का खामीयाजा उनको जरूर भूगतना पडेगा.
चाहिये तो आप हमसे "मदद" की उम्मीद रख सकते है. आपका पैगाम मिलतेही ये बंदा अपनी वफादार, कडवी , जवाँमर्द और बहूत सारे सूरमाँसे दुरुस्त फौज आपकी "खातीरदारी" मे रवाना कर देगा. बडी बडी मैदानेजंग, शेरशहा इस फौज के साथ टकराने से खौफ खाते है.
अगर आपकी रजामंदी रही तो आजही हम आपना वकील उनकी दरबारमे "आपका पैगाम" पोहचाने के लिये और "माफीनामा मुकर्रर" करने के लिये यहासे रवाना करते है ...
आपकी दोस्तानगी के लिया ये बंदा हर वक्त मौजूद रहेगा
शेर-ए-बंगरूळिस्तान
जलालूद्दिन महमंद -ए- छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
17 Apr 2008 - 10:58 am | आनंदयात्री
सरदार डानराव, तुमची हि गुस्ताखी आम्हास अजिबात रुचली नाही, फितुरांची गर्दन मारण्याचा रिवाज आहे स्वराज्यात विसरलात वाटतं ! स्वराज्यात तुमचे स्थान मानाचे, त्यास शोभेल असा पराक्रम करावा. असंगाशी संग प्राणाशी गाठ, गनिमाशी संग धरु नये, हिच विनंती, याउप्पर आपली मर्जी.
-थोरला आनंदराव पेशवा