माझी प्रेरणा - पण एक सांगा, सतत दुसर्या कुणाच्या तरी प्रकाशात राहाण्याचा आरोप मी सहन का करावा? (अशा वेळी साधारणतः 'आम्ही' हे सर्वनाम वापरण्याची प्रथा आहे. परंपरेला तिरकस छेद देऊन एक मूठभर क्रांती घडवण्याचा हा 'माझा' प्रयत्न वाचकांच्या दृष्टीतून सुटू नये.) 'हा चंद्र ना स्वयंभू, रवितेज वाहतो हा, ग्रहणात तारकांचा अभिशाप भोगतो हा' हे अगदी त्या 'चंद्रा' पासून प्रत्येकाला लागू असले तरी असल्या कोणत्याही कुबड्यांचा मी अव्हेर करत आहे त्यामुळे प्रेरणाबिरणा कुछ नही.ही कविता तर नाहीच नाही!
ऐक माझ्या मुला, तू जरा तू जरा
हिस्टरी ब्राऊजिंगची डिलीट करु दे मला
कोवळे रुपडे, नाजुका कोमला
या अशा सायटी, बघू नको तू मुला
च्याट जीमेलवर, फेस्बुकी गुंग तू
काढ यूट्यूबच्या, तू किती नकला
मिड्लाईफ क्रायसिस तुज कळावा कसा
त्यात आईचे तुझ्या, दुख्ते डोके रातीला
गोड वाणी तुझी गं मरंदापरी
मरंद म्हणजे काय ते, नको विचारु मला
हल्कटा वय तुझे, हे काय बघायचे
पाणि आडातले, पोहर्यात पण दिसे मला
ही अशी लक्षणे, पांग फेडाल बरे
फळ हेच तव तपा, हेच सांगा बापाला
साद तू घातली, घाबरे मी कसा
थांब विंडो ही तरी, बंद करु दे मला
प्रतिक्रिया
30 Apr 2010 - 7:27 am | सातबारा
मिड्लाईफ क्रायसिस तुज कळावा कसा
त्यात आईचे तुझ्या, दुख्ते डोके रातीला
सन्जोपजी,
वाईट्ट हसलो =))
---------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
30 Apr 2010 - 10:10 am | श्रावण मोडक
स्वतंत्र संगणकाची सोय होणे गरजेचे आहे!!! ;)
30 Apr 2010 - 10:26 am | बेसनलाडू
(नतमस्तक)बेसनलाडू
30 Apr 2010 - 11:23 am | प्रमोद देव
रावसाहेब, जबरा विडंबन. हल्ली बाकी तुमची प्रतिभा इथेही...काव्य विडंबनाच्या प्रांतातही बहरायला लागलेय. पुलेशु.
30 Apr 2010 - 11:29 am | चेतन
जबराट विडंबन
बाप से बेटा सवाई ;)
30 Apr 2010 - 7:34 pm | शुचि
अॅपल डझ नॉट फॉल फार फ्रॉम ट्री.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
30 Apr 2010 - 11:41 am | टुकुल
खतरा विडंबन, एक नंबर
--टुकुल
30 Apr 2010 - 12:07 pm | राजेश घासकडवी
सापाच्या पोराची पावलं सापालाच दिसत असावीत हे पटलं.
अवातर - ही 'चंद्रा' म्हणजे जिच्या हसण्यातून चांदणं सांडतं ती नर्स तर नव्हे? तसं असल्यास तुम्ही अंथरुणाला खिळून असण्यासाठी काय (किंवा कोण) बरं कारण असावं? नाही, मिडलाईफ क्रायसीसविषयी लिहिलंत म्हणून म्हटलं... ;)
राजेश
1 May 2010 - 5:22 am | सन्जोप राव
'चंद्रा' नव्हे 'चंद्र'....
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
30 Apr 2010 - 12:21 pm | बिपिन कार्यकर्ते
हल्कटा वय तुझे, हे काय बघायचे
पाणि आडातले, पोहर्यात पण दिसे मला
=)) मॅटर फिनिश... विषय संपला.
रावसाहेब... कितीतरी मिडलायफातल्या बापांच्या (आणि काही आयांच्याही बहुधा) व्यथेचा हुंकार तुमच्या कवितेत स्पष्ट दिसतो. त्याबद्दल त्यासर्वांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद. ;)
अवांतर: मी तर ब्वॉ स्वतंत्र संगणकाची सोय करूनच ठेवावी म्हणतो.
बिपिन कार्यकर्ते
30 Apr 2010 - 12:47 pm | नंदन
भन्नाट कविता :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Apr 2010 - 12:50 pm | Pain
=)) हाहाहा =))
आवडली. मस्त आहे.
30 Apr 2010 - 2:23 pm | सातबारा
राजेशजी, सुदैवाने तुम्ही तरूण आहात असे दिसते. कारण 'मुलाच्या आईची रात्रीची डोकेदुखी , हा नवर्याचा मिडलाईफ क्रायसिस तुम्ही थेट मिडवाईफ ( पक्षी नर्स ;) ) क्रायसिस केलात म्हणून म्हटले.
बाकी हा मिड - वाइफ/नाइट/लाइफ क्रायसिस कोणाच्या वाट्यास येवू नये म्हणून शुभेच्छा.
एक समदु:खी :D
---------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
30 Apr 2010 - 2:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खतरनाक!
30 Apr 2010 - 3:45 pm | चतुरंग
एकदम झांटामाटिक!
स्वतंत्रच असू दे संगणक, तुमचा मरंद तुम्हाला आणि मुलाचा मुलाला! ;)
'ऐक माझ्या मुला' हे शीर्षक काल डोक्यात येऊन गेलेले! ;)
चतुरंग
30 Apr 2010 - 3:57 pm | शुचि
>> मिड्लाईफ क्रायसिस तुज कळावा कसा
त्यात आईचे तुझ्या, दुख्ते डोके रातीला >>
क्या बात है!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
30 Apr 2010 - 4:35 pm | ऋषिकेश
रावसाहेब,
__/\__
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
30 Apr 2010 - 7:12 pm | प्रदीप
विडंबन आवडलेच आणि त्याअगोदरचे निवेदनही खुमासदार आहे.
30 Apr 2010 - 7:39 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो. शुक्रवार कारणी लागलासे दिसते आहे ;-)
30 Apr 2010 - 7:38 pm | II विकास II
जबरा. येउ द्या अजुन.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
30 Apr 2010 - 9:37 pm | मिसळभोक्ता
परप्रकाशित लेखन !
पण जबरा !
:-) :-)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
30 Apr 2010 - 10:32 pm | घाटावरचे भट
लै भारी कविता...