ऐक माझ्या फुला..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
29 Apr 2010 - 7:36 pm

ऐक माझ्या फ़ुला, तू जरा, तू जरा
गंधल्या अंतरी, दे मला, आसरा

कोवळे रूपडे , नाजुका कोमला
गौर हा वर्ण गं, साजिरा गोजिरा

आसमानीच गं तू परी लाजरी
सावरी, बावरी .. तू कुणी अप्सरा

गोड वाणी तुझी गं मरंदापरी
तू असे मंजुळा की असे शर्करा!

मी अबोली म्हणू, कि म्हणू सायली
तू निशीगंध की तू असे मोगरा!!

ही निळाई तुझ्या लोचनी दाटली
धुंदला रंग हा, लाजवी सागरा

पल्लवाचे तुझ्या मेघ, गाती जणू
छेडती दादरा त्या खुल्या अंबरा

साद तू घातली, चैत्र हुंकारला
ऐक माझ्या फ़ुला, ऐक ना तू जरा

- प्राजु

गालगा, गालगा, गालगा, गालगा

शृंगारकविता

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

29 Apr 2010 - 10:27 pm | डावखुरा

ताई तुझ्या नवोन्मेशशालिनी प्रतिभेला सलाम!!!

अतिशय सुरेख रचना......अतिशय मनभावन,चपखल,नाजुक......
गंधल्या अंतरी, दे मला, आसरा
------------------------------------------------------------

{गोड वाणी तुझी गं मरंदापरी}प्राजु ईथे मकरंदापरी शब्द आहे का?
------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

बेसनलाडू's picture

30 Apr 2010 - 10:31 am | बेसनलाडू

मकरंद = मरंद
(माहीतगार)बेसनलाडू

डावखुरा's picture

2 Jun 2010 - 12:15 am | डावखुरा

बेसनलाडू धन्यवाद माहीती पुरवल्याबद्दल..
----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

वेताळ's picture

29 Apr 2010 - 10:34 pm | वेताळ

खुपच छान आहे कविता ;;)

वेताळ

मिसळभोक्ता's picture

29 Apr 2010 - 11:01 pm | मिसळभोक्ता

"रंग माझा तुला, गंध माझा तुला, बोल काहीतरी, बोल माझ्या फुला" ह्या गाण्याच्या चालीत फिट्ट बसते. आणि शब्दही त्या चालीच्या स्वभावाला पूरक आहेत.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

29 Apr 2010 - 11:09 pm | चतुरंग

शब्द कुठल्यातरी गाण्यासारखे आहेत एवढं जाणवत होतं पण नेमकं हे गाणं आठवत नव्हतं! धन्स मिभो!!

कविता छान आहे प्राजू! :)

चतुरंग

बेसनलाडू's picture

30 Apr 2010 - 12:18 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

नितिन थत्ते's picture

30 Apr 2010 - 7:16 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

नितिन थत्ते

मीनल's picture

30 Apr 2010 - 1:40 am | मीनल

खरचं की!

त्या चालीत म्हणून पाहिलं .बसत आहे .
पण त्या गाण्याची कॉपी नाही वाटत आहे .

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

मेघवेडा's picture

30 Apr 2010 - 3:39 am | मेघवेडा

मला "ही गुलाबी हवा, वेड लावी जिवा" हे गाणं आठवलं!

असो. प्राजुतै, नेहमीप्रमाणेच एक अतिशय सुरेख रचना!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

डावखुरा's picture

30 Apr 2010 - 10:13 am | डावखुरा

कोणी मला "मरंदापरी" चा अर्थ समजवेल का?

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

दत्ता काळे's picture

30 Apr 2010 - 11:47 am | दत्ता काळे

कविता आवडली

प्राजु's picture

30 Apr 2010 - 7:49 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अविनाशकुलकर्णी's picture

2 Jun 2010 - 5:16 pm | अविनाशकुलकर्णी

(सर्वव्यापी)प्राजक्ता..म्हणजे मी.पा च्या ठोंबरे आहेत