आमची प्रेरणा 'ती' गाढवी आरोळी आणि अर्थातच शांताबाईंचे सुंदर गीत 'रेशमाच्या रेघांनी'
(टीप - आधी प्रकाशित केलेली आवृत्ती सुधारणा करुन पुनःप्रकाशित करतो आहे.)
'रेशमीया' मेल्यानी, गाढवाच्या जोरानी
पुन्हा आहे गळा आज काढीला
खरारा करावा जसा घोडीला!
जुनी सारी गाणी लाखमोलाची
काय सांगू गोडी सूरतालाची
ऐकते मी 'पंचम'दा, 'मदना'च्या जोडीला
खरारा करावा जसा घोडीला!
लावलेला 'किशोर' मी तोर्यात
अवचित आले त्याच्या मार्यात
त्यानं माझ्या कानाचा, मुडदा का पाडीला?
खरारा करावा जसा घोडीला!
भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची'
मुर्वत राखा साता सुरांची
काय म्हणू बाई बाई, गाढवी ह्या खोडीला
खरारा करावा जसा घोडीला!
चतुरंग
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 10:33 pm | ठणठणपाळ
>>ऐके कशी 'किशोर' मी तोर्यात
अवचित आले त्याच्या मार्यात
त्यानं माझ्या कानाचा का, पडदा गं फाडीला?
हात नगा लावू त्याच्या सीडीला!
मस्त.
10 Apr 2008 - 10:44 pm | प्राजु
अगदी मनातलं.....
भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची'
मुरवत राखा सात सुरांची
भेकायाला कोणी नाही, गाढवाच्या जोडीला
हात नगा लावू त्याच्या साडीला!
गाढव कसला...ते ही बरे ओरडत असेल :)))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Apr 2008 - 10:47 pm | बेसनलाडू
विडंबन आवडले.
मुरवत ऐवजी मुर्वत चालले असते असे वाटते.
भेकायाला कोणी नाही च्या ऐवजी भेकायाला नाही कोण असे सुचले.
(सूचक)बेसनलाडू
11 Apr 2008 - 12:00 am | चतुरंग
ठणठणपाळ, प्राजू आणि बेसनलाडू ह्यांचे प्रतिसाद आलेले होते.
त्यामुळे ते थोडे विसंगत वाटतील पण तो दोष माझ्या मूळ काव्याकडे जातो.
क्षमस्व.
चतुरंग
11 Apr 2008 - 9:04 am | विसोबा खेचर
क्या बात है रंगा!
केवळ अप्रतिम विडंबन केलं आहेस. प्रत्येक कडवं रंगतदार झालंय!
भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची'
मुर्वत राखा साता सुरांची
काय म्हणू बाई बाई, गाढवी ह्या खोडीला
खरारा करावा जसा घोडीला!
हे तर मस्तच!
तात्या.
15 Apr 2008 - 1:20 am | चतुरंग
आणि मूळ विडंबनात सुधारणा सुचविणार्या सगळ्यांचे आभार!
चतुरंग
15 Apr 2008 - 11:06 am | विदेश
एक वेळ खरारा केल्यावर घोडीसुध्दा सुसह्य सुस्वरात गळा काढील की हो........