हि कविता मराठी आहे की नाहि याबद्दल वाद असेल, पण मराठी मातीतली मात्र आहे.
मैं अच्छी हूं घबराऊ नको ऎसा खत में लिखो ।
कोणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली रोडापर
अगर तुझको शक है मुझपर नहीं निकलूंगी बाहर
मैं पानी को जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो ।
सौ रुपये का हिसाब माँगे तो मैने घर मे क्या खाई
लाईट को वीस दी पानी के तीस दी पचीस का राशन लाये
दी पचवीस दुधवाले को ऎसा खत मे लिखो ।
पहली बार आए कुछ नही लाये अबकी बार लाना टेप
बेबी बडी हुई ऎकने को ऎसा खत में लिखो
मैं अच्छी हूं घबराऊ नको ऎसा खत में लिखो ।
बाबा को आया बुखार खाँसी प्रायव्हेट मे गयी उसको लेकर
सौ रुपया लिया इंजेक्शन दिया असर नही हुआ बच्चे पर
मैं जे. जे. को जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो ।
आवाजे – निस्वाँ है महिला मंडल जाती मै उस मिटींग को
तेरी बहन को शौहर जब पिटता जाती सब धमकाने को
उसको मदद मैं करू क्या नको ऎसा खत में लिखो ।
जबसे गया तू बिगडा है माहौल फसाद का डर है मुझको
मजहब के नाम पे कैसे ये झगडे अमन से रहना है सब को
ये वस्ती में समजाऊँ क्या नको ऎसा खत में लिखो ।
महाँगाई इतनी, रोजगार भी नही तेरे जैसे जाते दुबई को
घर भी कितने टूट जाते देखो दुख होता मेरे मन को
तू आजा जल्द मिलने को ऎसा खत में लिखो ।
सौदी जाके, दुबई जाके कितने दिन हम टिकेंगे
इसी समाज को हमको बदलना बच्चों के लीए अपने
मैं मोर्चे मे जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो ।
कोणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली रोडापर
मिटींग मे जाती मोर्चे मे जाती सुधरने जिंदगानी को
तू भी आज साथ देने को एसा खत मे लिखो
मैं अच्छी हूं घबराऊ नको ऎसा खत में लिखो ।
- शहनाज शेख - गीता महाजन
प्रतिक्रिया
16 Sep 2007 - 2:32 am | जगन्नाथ
नक्की अर्थ लागत नाही ...
16 Sep 2007 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंकज,
नारायण सुर्वेंची 'पत्रात लिव्हा' नावाची कविता त्यांच्याच तोंडून मी ऐकलेली आहे.
नवरा शिकण्याच्या निमित्ताने बाहेरगावी की परदेशात असतो आणि त्याची बायको त्याला असेच काही तरी प्रश्न विचारते.
ती कविता जर कोणास माहिती असेल तर तिचा दुवा किंवा 'कविता' इथे दिली तर बरे होईल.
17 Sep 2007 - 1:26 pm | पंकज
"पत्रात लिव्हा" हि कविता म्हणजे "ऎसा खत में लिखो" चा नारायण सुर्वे यांनी केलेला स्वैर अनुवाद.
नोकरी निमित्ताने परदेशी असलेल्या नवर्याला लिहिलेले पत्र आहे. ती स्त्री हे पत्र कोणाकडून तरी लिहून घेत आहे, त्यामुळे त्याला उद्देशून "ऎसा खत में लिखो" हे शब्द आलेले आहेत.
17 Sep 2007 - 1:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद ! पंकजसेठ.
मी तेव्हाच म्हणणार होतो,त्या कवितेचा स्वैरअनुवाद तर नाही ना ? पण मुळ कवितेतील शब्द आठवत नव्हते.
आणि इथला कुणी कवितेचा जाणकार 'कष्टमर' मिसळीची तर्री अंगावर पाडेल म्हणून बोललो नाही. ;)
(मुळ कविता तुमच्याकडे असेल तर त्या द्या ना इथे )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Sep 2007 - 2:15 pm | पंकज
काहितरी गडबड होतेय. मुळ कविता वर दिलेली आहे. लवकरच तीचा स्वैरअनुवाद देण्याचा प्रयत्न करतो. "ऎसा खत में लिखो" हि मुळ कविता आहे.
17 Sep 2007 - 2:21 pm | टिकाकार
कविता भयन्कर आहे.
इथे कोपि पेस्त करनारा त्याहून्.....
टिकाकार
17 Sep 2007 - 3:37 pm | आजानुकर्ण
असे लिहिल्याने मराठीची प्रगती कशी काय होईल?
17 Sep 2007 - 7:30 pm | धनंजय
> कविता भयन्कर आहे.
थोडा अधिक आधार द्याल का या टीकेला? कोणाला काय आवडले नाही ते कळून सुद्धा रसास्वाद वाढतो.
17 Sep 2007 - 3:25 pm | विसुनाना
शैनाज श्येक - गीता म्हाजन कोन असंल ती असंल..पर ही कविता लै आवडली राव आपल्याला.
17 Sep 2007 - 3:43 pm | प्रकाश घाटपांडे
पंकज राव, आता म्हराटि स्वैर अनुवाद बी येउं द्या लवकर.
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 7:18 pm | धनंजय
पहिल्यांदा वाचताना गडबडीत नीट वाचली नाही म्हणून कळली नाही.
काही गोष्टी लिही आणि काही गोष्टी लिहू नकोस असे म्हणत असल्याचा भास झाला -
"मैं पानी को जाऊ क्या; नको ऎसा खत में लिखो ।" अशी "नको" ची साईड वाचताना मी चुकवली.
असा चुकीचा ";" घालून मी अर्थाचा अनर्थ केला! त्यामुळे ही बाई बंडखोर खरेच आहे की नाही, की नवर्यापासून बंड लपवते आहे, लपवतच असेल तर काही गोष्टी मुद्दाम का सांगते आहे... वगैरे नुसता मनात गोंधळ.
नीट वाचल्यावर मस्त वाटली. स्वैर अनुवादाची वाट पाहातो आहे.
17 Sep 2007 - 8:33 pm | आजानुकर्ण
हिंदीच्या दक्खनी बोलीभाषेत "नको" हा मराठी शब्द वापरतात असे वाटते.
उदा. हैदराबादी.
वो लाल वाली मर्सिडिझ बेंझ नक्को रे बावा... वो सफेद वाली भिजा दे... मेरे को कामा है बहुत कामा है मेरे को.
17 Sep 2007 - 11:19 pm | पंकज
असं पत्रात लिवा....
तुम्ही सुखात सम्दी र्हावा असं पत्रात लिवा ||
कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर,
संशय माझा आला तुम्हा तर, नाही जाणार बाहेर,
पानी आणायला जाऊ का नको - काय ते...
शंभर रुपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले,
लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले,
दुधवाल्याचे पंचवीस दिले. त्यांना देऊ का नको - काय ते...
पयल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्क्ट झाली खेप,
बेबी झाली मोठी, तीला आवडते गाण्याची ऐकायला टेप,
आमी सगळ्यांनी एकू का नको ? काय ते...
बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले,
शंभर रुपयाचे इंजक्शन मारले पान्यातच पैसे गेले,
त्याला जे.जे. ला नेवू का नको - काय ते...
नारी मुक्तीच्या भरतात सभा, मिटींगला आम्ही जातो,
तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्याजणी धमकावतो,
तिला सोडवायला जाऊ का नको - काय ते....
बेबीला आताशी शाळेला घातलंय, अभ्यास चांगला करते,
आयाबायांनी शिकायला पायजे वस्तीच अख्खी बोलते,
मी बी शिकायला जाऊ का नको - काय ते...
जवापासनं तुमी गेला परदेशी, माजलेत इथं लफंगे,
घडुनमिळून राह्याचं सोडून धर्माच्या नावावर दंगे,
समदया वस्तीला समजावू का नको - काय ते...
कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर,
मिटींगला जाते, मोर्च्याला जाते त्याविना कसं जगणार?
या तुमीबी साथ द्यायला - काय ते पत्रात...
तुम्ही सुखात सम्दी र्हावा असं पत्रात लिवा....||
मुळ : शहनाज शेख व गीता महाजन
स्वैर अनु: नारायण सुर्वे.
17 Sep 2007 - 11:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है ! अरे याच कवितेबद्दल म्हणत होतो.
मला वाटले मुळ कविता नारायण सुर्वेंची आणि त्याचा हिंदी अनुवाद शहनाज शेख व गीता महाजन यांनी केला.
चला ही नवीन माहिती आहे माझ्यासाठी !
धन्यवाद !
31 Oct 2007 - 8:50 am | देवदत्त
मराठीतील कविता जास्त कळली आणि (बहुधा त्यामुळेच) आवडली..
9 Mar 2013 - 12:00 am | शुचि
खूप शोधत होते. ही अनवट कविता वर आणते आहे.
9 Mar 2013 - 11:33 am | नितिन थत्ते
स्त्रीमुक्ती संघटना हे गीत त्यांच्या पथनाट्यांच्या आधी सादर करीत असे. (आणि ते "वर ढगाला लागली कळ, पानी थेंबथेंब गळं" या चालीत).
9 Mar 2013 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रे वाह. छान कविता आणली राव वर..
आवडली कविता पुन्हा.
-दिलीप बिरुटे
27 Oct 2015 - 7:38 pm | असंका
हे एक भारी सापडलं!!
लेखिका/अनुवादकर्ते आणि इथे देणार्यास धन्यवाद!!
27 Oct 2015 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपक्रम या मराठी संकेतस्थळावर या पंकजशी माझं खुप भांडण झालं होतं अजिबात एकमेकांमधुन वारं जात नव्हतं ते भांडण वैचारिक वरुन व्यक्तिगत होत होतं. एकमेकांना लॉग इन दिसल्यावर एकमेकांची चिड यावी इतका द्वेष पण दै.सकाळ मधील सप्तरंग मधील आई-वडीलांना, आजी आजोबांना पत्र लिहा या सदरात माझ्या मुलीनेही पत्र लिहिलं होतं. माझ्या मुलीचं पत्र आवडलं आणि ते मी निवडलं आणि दै सकाळ मधे त्याचं माझं भांडण विसरुन ते पत्र छापून आणलं, सर, हे पत्र मीच सलेक्ट करतो हे व्य नि ने सांगणारा दै सकाळ मधील पंकज कोनाला भेटला तर प्रा डॉच्या लेकीला जो आनंद दिला त्याबद्द्ल पंकज तुमचे आभार प्रा.डॉ.ला मानायचे आहेत म्हणावं........!
आठवण येते रे पंकज......
-दिलीप बिरुटे
27 Oct 2015 - 9:19 pm | जव्हेरगंज
मराठी हिंदी दोन्ही कविता मस्त!!!
27 Oct 2015 - 9:54 pm | राही
मला तर अजूनही वाटतंय की मूळ कविता नारायण सुर्वे यांचीच असावी. अनेकांकडून ती नारायण सुर्वे यांची म्हणूनच ऐकली आहे. खुद्द श्री सुर्वे यांच्या शोकसभेतही ही मराठी कविता आणि तिचा आणखी एका भाषेतला अनुवाद (बहुधा मलयालम)दोन्ही वाचले गेल्याचं आठवतंय. या कवितेचा अनेक भाषांत अनुवाद झालेला आहे असंही तिथे सांगितलं गेलं. आता पुन्हा मूळ स्रोत पाहायला पाहिजे.
कुणाचीही का असेना, कविता छानच आहे. (पण बहुधा श्री सुर्वे यांचीच.)
28 Oct 2015 - 9:25 am | बोका-ए-आझम
ही नारायण सुर्व्यांची कविता म्हणूनच माहित होती पण ती अनुवादित होती हे नव्याने कळलं. अर्थात त्याने काहीही फरक पडत नाही. मास्तरांनी कविता इतकी आपलीशी केली की ती त्यांचीच झाली असं म्हणायला हवं.
28 Oct 2015 - 9:52 am | दमामि
एक सुंदर कविता वर आणल्याबद्दल धन्यवाद!