आज हनुमान जयंती. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थानच नाही तर भक्तीस्थान असलेले आपले शिवाजी महाराज.
आपल्या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांचा इतिहास तोंडपाठ आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक हे त्यांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील प्रमुख नाट्यपूर्ण प्रसंग. पण महाराजांचे मोठेपण ह्या नाट्यमय प्रसंगांपेक्षाही दिसते ते ह्या गोष्टीमुळे की सतत साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत राहून मनाने गुलाम बनलेल्या महाराष्ट्राला त्यांनी जाग्रुत केले. त्यांच्या मनात अस्मिता जागी केली. स्वाभिमान जागा केला.
आणि म्हणूनच त्यांची महती सांगण्यासाठी प्रतिभादेखील त्याच तोलामोलाची हवी - समर्थ रामदास स्वामींसारखी. समर्थांनी महाराजांचे केलेले अत्यंत समर्पक वर्णन म्हणजे त्यांनी महाराजांना कवितेच्या रूपात लिहीलेले हे पत्र.
निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी
परोपकाराचीया राशी | उदंड घडती जयासी
तयाचे गुण महत्वासी | तुळणा कैची
नरपति, हयपति, गजपति | गडपति, भूपति, जळ पति
पुरंदर आणि शक्ती | पृष्टभागी
यशवंत, किर्तीवंत | सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा
आचारशील विचारशील | दानशील धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील | सकळा ठायी
धीर उदार गंभीर | शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर | तुच्छ केले
तीर्थक्षेत्रे मोडिली | ब्राम्हण्स्थाने भ्रष्ट झाली
सकाळ पृथ्वी आंदोळली | धर्म गेला
देव धर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण | प्रेरणा केली
उदंड पंडित पुराणिक | कवीश्वर याज्ञिक वैदिक
धूर्त तार्किक सभानायक | तुमच्या ठायी
या भू मंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही | तुम्हा कारणे
आणिकही धर्मकृत्ये चालती | आश्रित होउन कित्येक राहती
धन्य धन्य तुमची कीर्ती | विश्वी विस्तारली
कित्येक दुष्ट संहारिले | कित्येकासी धाक सुटले
कित्येकासी आश्रय जाहले | शिवकल्याण राजा
तुमचे देशी वास्तव्य केले | परंतु वर्तमान नाही घेतले
ऋणानुबंधे विस्मरण जाहले | काय नेणो
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती | सांगणे काय तुम्हाप्रती
धर्मसंस्थापनेची कीर्ती | सांभाळली पाहिजे
उदंड राजकारण तटले | तेणे चित्त विभागले
प्रसंग नसता लिहीले | क्षमा केली पाहिजे
प्रौढप्रतापपुरंदर, गोब्राम्हणप्रतिपालक, मुघलदल संहारक, भोसलेकुलदीपक, विमलचरीत, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय.
प्रतिक्रिया
31 Mar 2010 - 1:22 am | विसोबा खेचर
दंडवत..!
31 Mar 2010 - 2:02 am | प्रशु
विनम्र आदरांजली
31 Mar 2010 - 5:45 am | पाषाणभेद
महाराष्ट्राच्या आराध्यदैवतास सादर वंदन.
31 Mar 2010 - 2:09 pm | बज्जु
महाराजांची किर्ती पाहुन प्रत्यक्ष सुर्यनारायण देखील त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालेला आहे.
![RAIGAD-1 copy](http://inlinethumb12.webshots.com/46603/2024071370103194589S600x600Q85.jpg)
महाराष्ट्राच्या आराध्यदैवतास सादर वंदन.
गडप्रेमी बज्जु
31 Mar 2010 - 2:22 pm | सुनील
छान
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Mar 2010 - 2:21 pm | मितभाषी
छत्रपती शिवाजीमहाराजांना मानाचा मुजरा.
-----------------------
॥जय जय जय जय जय भवानी ॥
॥ जय जय जय जय जय शिवाजी ॥
31 Mar 2010 - 4:50 pm | महेश हतोळकर
राजांना अभिवादन!
काव्य दिल्याबद्दल तुमचे आभार.