मोहन वाघ, नाट्यक्षेत्रातला एक दिग्गज!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
25 Mar 2010 - 5:05 pm

ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, नेपथ्यकार मोहन वाघ यांना मिपा परिवाराची विनम्र आदरांजली..

तात्या.

नाट्यबातमीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सन्जोप राव's picture

25 Mar 2010 - 5:23 pm | सन्जोप राव

माझीही श्रद्धांजली आणि मा. राज ठाकरे यांना सहवेदना संदेश.
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

नील_गंधार's picture

25 Mar 2010 - 5:33 pm | नील_गंधार

ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री.मोहन वाघ यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

नील.

मी-सौरभ's picture

25 Mar 2010 - 5:35 pm | मी-सौरभ

त्यांनी दिलेलं योगदान महत्वपुर्ण आहे.....

-----
सौरभ :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2010 - 5:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री.मोहन वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2010 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार

विनम्र आदरांजली.

टुकुल's picture

25 Mar 2010 - 6:13 pm | टुकुल

भावपूर्ण श्रद्धांजली

मी_ओंकार's picture

25 Mar 2010 - 6:36 pm | मी_ओंकार

बातमी वाचून धक्का बसला. आणखी काही लिहवत नाही.
- ओंकार.

ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.
वेताळ

त्यांनी त्यांचा छायाचित्रणापासून सुरु झालेला कलेच्या माध्यमातला प्रवास पुढे नेपथ्य आणि नंतर नाट्यनिर्मितीसारख्या अतिशय कष्टाच्या आणि प्रचंड जोखमीच्या व्यवसायापर्यंत यशस्वीपणे पूर्णत्वास नेला.
एका धडाडीच्या व्यक्तिमत्त्वास आदरांजली!
(मागे सावरकर आजोबांवरची लेखमाला लिहीत असताना त्यांच्याकडून ऐकले होते की मोहन वाघ जेव्हा छायाचित्रणाच्या क्षेत्रात उमेदवारी करीत होते त्यावेळी ह्या सावरकरांचीच त्यांना बरीच मदत झाली होती.)

चतुरंग

अरुंधती's picture

25 Mar 2010 - 9:28 pm | अरुंधती

अजून एक प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला!

विनम्र श्रध्दांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास मुक्ती देवो.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रशु's picture

25 Mar 2010 - 10:39 pm | प्रशु

भावपूर्ण श्रद्धांजली

पिंगू's picture

25 Mar 2010 - 10:42 pm | पिंगू

विनम्र श्रद्धांजली!

sur_nair's picture

25 Mar 2010 - 11:07 pm | sur_nair

मराठी नाटकाला वाघांनी एक भव्यता आणली. त्यांच्या मुलाखतीतून नाटकाबद्दल त्यांची ओढ व आत्मीयता प्रकट व्हायची. मासिकातून त्यांची उत्तोमोत्तम छायाचित्रे पाहण्यात खूप आनंद वाटायचा. ऐकून दुखः झाले.

अश्विनीका's picture

25 Mar 2010 - 11:36 pm | अश्विनीका

मोहन वाघांना माझी विनम्र श्रद्धांजली!
-अश्विनी

इंटरनेटस्नेही's picture

26 Mar 2010 - 2:53 am | इंटरनेटस्नेही

मोहन वाघांना माझी विनम्र श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

दिपक's picture

26 Mar 2010 - 9:15 am | दिपक

मोहन वाघांना माझीही विनम्र श्रद्धांजली!

समंजस's picture

26 Mar 2010 - 10:28 am | समंजस

मोहन वाघ यांना विनम्र श्रद्धांजली!

जयवी's picture

26 Mar 2010 - 10:40 am | जयवी

नाट्यक्षेत्राची मोहन वाघ गेल्यामुळे अपरिमित हानी झालीये. "चंद्रलेखा" म्हणजे मराठी नाट्यक्षेत्रातला एक मानाचा तुरा !! आणि मोहन वाघ म्हणजे त्याचे कर्ताधर्ता. त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झालीये.

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो !!

तुतुमैमै's picture

26 Mar 2010 - 10:59 am | तुतुमैमै

भावपूर्ण श्रद्धांजली

अमोल केळकर's picture

26 Mar 2010 - 11:07 am | अमोल केळकर

या महान कलाकारास श्रद्धांजली !!!

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

II विकास II's picture

26 Mar 2010 - 11:48 am | II विकास II

भावपूर्ण श्रद्धांजली
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विदोही संकेतस्थळांना खास सुट.
योग्य बोली सह संपर्क करावा.

"ऑल दी बेस्ट' सारख्या नवख्या मंडळींच्या नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले तरी अजून दोन हजार प्रयोग सहज होतील एवढा प्रतिसाद प्रेक्षक त्या नाटकाला देतात ही मोहन वाघ यांची किमया !

पृथ्वी थिएटरवर देवेंद्र पेम यांच्या या एकांकिकेचा प्रयोग पाहून वाघांनीच त्यांना त्याला पूर्ण नाटकाचे रूप देण्याचा आग्रह केला आणि पुढे जे घडले तो तर इतिहास आहे. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर ही सारी मंडळी आज मराठी चित्रपटसृष्टीत स्टार मंडळी आहेत, पण "ऑल दी बेस्ट' च्या पहिल्या संचात ही सर्व मंडळी होती. व्यावसायिक रंगभूमीवर प्रथितयश निर्माते असलेले मोहन वाघ नवख्या मंडळींना घेऊन नाटक काढतायत म्हणून काहींनी त्यांना वेड्यात काढले होते. पण हे धाडस वाघांमध्ये जन्मजात असावे . शेवटी वाघ च ते . मध्यरात्री नाटकाचे प्रयोग लावण्याचे धाडस दाखवायचे तर त्याला "वाघा'चेच काळीज हवे. इंग्लंडमध्ये शेक्सपियरच्या जन्मगावी स्ट्रेटफर्ड ऍवॉनमध्ये, इतकेच काय थेट "विक्रांत' युद्धनौकेवरदेखील त्यांनी आपल्या "गुलमोहोर' नाटकाचा प्रयोग केला होता. त्यांचे "गरुडझेप' मंचावर आले, तेव्हा एकाच दिवशी शुभारंभाचे चारही प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम वाघांनी नोंदवला होता. अशा या विक्रमवीराची शिस्त, वक्तशीरपणा याचीही नोंद घ्यायलाच हवी. दरवर्षी 31 डिसेंबरला "चंद्रलेखा' चे नवे नाटक कसे येते, त्यामागे अर्थातच ही शिस्त आहे, हे परिश्रम आहेत. सडेतोड बोलण्याबद्दल वाघांची ख्याती होती .

मोहन वाघांना माझीही विनम्र श्रद्धांजली! खुदा त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

~ वाहीदा