लहानपणीच्या कविता - २,३

Manish Mohile's picture
Manish Mohile in जनातलं, मनातलं
19 Mar 2010 - 9:06 pm

आधीच्या लेखनधाग्याच्या सन्दर्भातच आज लिहीतो आहे अजून दोन कवितान्च्या बद्दल.

एक आहे कवयित्री इन्दिरा सन्तान्ची "गवतफुला". खरतर मला ही पूर्ण आठवत नाही पण जेवढी आठवते त्यातून हे निश्चित दिसून येते की इन्दिराबाईनी केवळ एका साध्या फुला वर केवढी सुन्दर कविता लिहीली आहे. एक छोटा मुलगा एक छोटेसे फुल - रानफुल बघतो आणि त्याच्या सुन्दर रूपामुळे हरखून जातो. मात्र इन्दिराबाईनी ईतक्या रेखीव पणे आणि नेमकेपणे वर्णन केले आहे की ते फुल मुर्तिमन्त आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.

गवतफुला - कवयित्री : इन्दिरा सन्त

रन्गरन्गुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सान्ग तुझा रे तुझा लळा ||ध्रु||

मित्रान्सन्गे माळावरती पतन्ग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती झुलता झुलता हसताना
विसरूनी गेलो पतन्ग नभीचा विसरूनी गेलो मित्राना
पाहूनी तुजला हरखून गेलो अशा तुझ्या रे रन्गकळा
हिरवी नाजूक रेशीमपाती दोन बाजूला सळसळती
निळनिळूली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हामध्ये हे रन्ग पाहता भानही हरपून गेले रे ||१||

आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालूनी रन्गीत कपडे फुलपाखरा फसवावे
तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुजला सान्गाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या

रन्गरन्गुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सान्ग तुझा रे तुझा लळा ||ध्रु||

या कडव्यामध्ये अजून दोन ओळी आहेत पण मला त्या आठवत नाहीत. कुणाला आठवत असल्यास जरूर सान्गाव्यात.

दुसरी कविता आहे बालकवी उर्फ त्र्यम्बक बापूजी ठोमरे यान्ची "श्रावणमासी".

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे |
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे ||
वरती बघता इन्द्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे |
मन्गल तोरण काय बान्धिले नभोमण्डपी कुणी भासे ||
झालासा सुर्यास्त वाटतो सान्ज अहाहा तो ईकडे |
तरूशिखरान्वर उन्च ढगान्वर पिवळे पिवळे उन पडे ||
उठती वरती जलदान्वरती अनन्त सन्ध्याराग पाहा |
सर्व नभावर होय रेखिले सुन्दरतेचे रूप महा ||
बलाकमाला उडता भासे कल्पसुमान्ची माळची ते |
उतरूनी येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते ||
सुन्दर परडी घेऊन हाती पुरोपकन्ठी शुद्धमती |
सुन्दर बाला या फुलमाला वन्यफुले पत्री खुडती ||
देवदर्शना निघती ललना हर्ष माईना ह्रुदयात |
वदनी त्यान्च्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत ||

श्रावण आणि कविता म्हटले की बालकवीन्च्या ह्या कवितेला पर्याय नाही ईतके सुन्दर वर्णन त्यानी या कवितेत शब्दबद्ध केलेले आहे. या कवितेशिवाय मला आठवतो तो दुर्गा भागवतान्चा "श्रावण" या नावाचा धडा. श्रावणातल्या सौम्य सुर्याचे आणि त्यामुळे सुखद सौम्य भासणार्या सुर्यप्रकाशाचे सुरेख वर्णन त्या धड्यामध्ये केलेले आहे.

बालकवीनी केवळ १४ ओळीन्मध्ये श्रावणातील सुरेख निसर्ग आपल्यासमोर चितारलेला आहे.

तर अशा ह्या दोन कविता. काळाच्या कसोटी वर उतरणार्या. केवळ त्यान्च्या गेयतेमुळे, यमक साधल्यामुळे, अचूक शब्दयोजनेमुळे, सुरेख विषय माण्डणी मुळे आणि सर्वात महत्वाचे मनाला भावल्यामुळे आणि भिडल्यामुळे त्या विस्मरणात जाऊच शकत नाहीत.

हे ठिकाणआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

19 Mar 2010 - 9:23 pm | शुचि

धन्यवाद मोहीले साहेब. मला श्रावणमासी खूप आवडते.

आपल्याला मिळाली तर - "संध्येच्या खिडकीत येऊनी ही हसरी तारा, हसते, दीपते(?) क्षणात लपते ..... या या कोणाला..... पलीकडचा तो तेजोमय नवपडदा सारून ...." का काहीशी एक छान कविता आहे ती मिळाली तर ती ही द्याल का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

Manish Mohile's picture

19 Mar 2010 - 9:43 pm | Manish Mohile

अहो शुचिताई,

क्रुपया "साहेब" वगैरे टाळा. फक्त मनिष म्हणा चालेल. तुम्ही जी कविता म्हणताय ती मला माहीत नाही. पण मिळवण्याचा जरूर प्रयत्न करीन.

मुम्बईला (डोम्बिवलीला) माझ्या आई वडिलान्कडे "आठवणीतल्या कविता" या सन्ग्रहाचे चार भाग आहेत. त्यात मिळते का ते बघतो.

कवी किन्वा कवयित्री कोण आहे काही सान्गू शकाल का?

लवंगीमिरची's picture

20 Mar 2010 - 3:47 am | लवंगीमिरची

http://ebooks.netbhet.com/2010/03/marathi-kavita-collection.html

या लिंकवर सापडतील.

:)

Manish Mohile's picture

20 Mar 2010 - 10:29 am | Manish Mohile

आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. मला त्यावर गवतफुला मिळाली आणि त्यामधील मी विसरलेले कडवे देखील. ते कडवे खालीलप्रमाणे -

मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे
तुझ्या संगती सदा रहावे विसरूनी शाळा घर सारे

आणि मग -

तुझी गोजिरी शिकून भाषा ..........

अजूनही पुष्कळ कविता दिसताहेत.

प्रिय लवंगीमिरची ,

या अमुल्य दुव्याबद्दल परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद.

इंटरनेटस्नेही's picture

20 Mar 2010 - 3:10 am | इंटरनेटस्नेही

@श्री. एम मोहिले...
श्रावणमासी आपली सर्वात आवडती कविता बरं का!
छान लिहलयं तुम्ही.. कीप इट अप.

दिपक's picture

20 Mar 2010 - 11:37 am | दिपक

ह्या ब्लॉगवर http://sureshshirodkar.blogspot.com/ बालभारतीतल्या बर्‍याचश्या कविता आहेत.

टारझन's picture

20 Mar 2010 - 11:42 am | टारझन

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे |
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे ||

बालकवींची खल्लास कविता आहे ही .. :)

-( बालकविता प्रेमी) जालकवी

मि माझा's picture

11 Apr 2010 - 2:36 am | मि माझा

संध्येच्या खिडकीत येऊनी ही हसरी तारा
हळुच पहते खुणावते हि या या कोणाला
पलिकडचा तो तेजोमय नव पड्दा सारुन
बघते हसते क्शणात लपते हि दुसरी कोण
लाजत लाजत असाच येइल सारा स्वर्लोक
मुग्ध बलिका जमतील गगनि आता नवलाख .
....अशा कहिशा ओळि होत्या

शुचि's picture

11 Apr 2010 - 2:41 am | शुचि

होय होय :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

स्वप्नयोगी's picture

11 Apr 2010 - 12:57 pm | स्वप्नयोगी

पुर्ण कविता ही घ्या

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे !

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे !

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा तो उघडे ;
तरूशिखरांवर उंच घरांवर, पिवळे पिवळे उन पडे !

उठती वरती जलदांवरती ,अनंत संध्याराग पहा !
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाकमाला उडता भासे, कल्पसुमांचीमाळचि ते ,
उतरूनी येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते !

फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ;
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी , गोपहि गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाय तयाचा श्रावणमहीमा एकसुरे !

सुवर्णचम्पक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला !

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या कुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना, हर्ष माईना ह्रुदयात !
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.