कविता - मानवी मनाच्या स्रुजन्शीलतेचा कल्पकतेचा एक कलाविष्कार. अगदी लहानपणापासून आपला या कवितान्शी सम्बन्ध येतो. तान्हे बाळ असताना अन्गाईगीत, बडबड गीते यान्च्याअ रूपानी. एकदा शाळेत जायला लागले की मग काय - बालभारती, कुमारभारती मधुन पद्य विभागच सुरू होतो. यातील काही कविता निव्वळ ताप किन्वा डोकेदुखी वाटतात. पण काही मात्र मनात अगदी घर करून बसतात - त्यातील गेयतेमुळे, सुन्दर शब्दरचनेमुळे, शब्दचित्रान्मुळे , आशयगर्भतेमुळे.
अर्थात हे सगळे बारकावे वयानुसार लक्षात यायला लागतात. पण लहान वयातसुद्धा काही कविता वाचल्याक्षणी आवडून जातात. आपोआप लक्षात राहतात. अगदी मोठे झाल्यावर सुद्धा त्या सम्पूर्ण आठवत राहतात.
अशीच एक कविता ईयत्ता दुसरीतली -
सायन्काळची शोभा - कवि भा. रा. ताम्बे
पिवळे ताम्बूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर
झाडान्नी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
किरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवे गार शेत हे सुन्दर साळीचे
झोके घेती कसे चहूकडे हिरवे गालीचे
सोनेरी मखमली रूपेरी पन्ख कितीकान्चे
रन्ग किती वर तर्हेतर्हेचे इन्द्रधनुष्यान्चे
अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती
साळीवर झोपली जणू की पाळण्यात झुलती
झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी ऊडती
हिरे माणके पाचू फुटुनी पन्खची गरगरती
पाहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा
कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा.
सुर्यास्ताचे हे वर्णन. सुर्यास्त - एक दैनन्दिन घटना - पण दररोज वेगळे दर्शन घडवणारी. निसर्गाची अफलातून किमया दाखवणारी. आपणही अनेक सन्ध्याकाळी निसर्गशोभा बघतो. हरखून जातो. निसर्गाची जादू छयचित्रात पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण कवि आणि त्यातूनही भा. रा. ताम्ब्यान्सारखे कवि केवळ लेखणीतून एवढे सुन्दर शब्दचित्र साकार करतात.
एका शेतातून दिसणारी सायन्काळ मुर्तिमन्त आपल्या समोर ऊभी करतात. वार्यावर डुलणारे हिरवेगार शेत, त्यामध्ये ईकडून तिकडे ऊडणारी लाल, हिरव्या अनेक रन्गान्ची फुलपाखरे, सन्ध्याकाळच्या ऊन्हाने त्यान्च्या पन्खान्वर, झाडान्च्या शेन्ड्याना , ओढ्याच्या पाण्याला चढलेला सोनेरी मुलामा. आजच्या शहरी जीवनात दुर्मिळ असलेले असे हे द्रुश्य आपल्या नजरेसमोर ऊभे राहते.
काव्य या द्रुष्टीने बघतादेखील यात सगळे गुणविशेष बघायला मिळतात. यात भाषेवरची पकड जाणवते - उदा. गोळा हा एकच शब्द एका ओळीत क्रियापद म्हणून आणि दुसर्या ओळीत नाम म्हणून वापरलेलला आहे. यात यमक आहे, गेयता आहे, रेखीवपणा आहे, सोपेपणा आहे, सुन्दर उपमा आहेत. - आणि विशेष प्रयत्न करावे न लागता सहजपणे वाचकान्च्या स्मरणात राहण्यासाठी जे काही लागते ते ही.
ही आहे या कवितेची माझी समज.
आजही ही कविता लख्खपणे मला पूर्ण आठवते. आज मिपा वरील तुम्हा सर्व सुर्हुदान्सह ती आठवण आणि तो आनन्द वाटून घ्यावसा वाटला म्हणून हा प्रपन्च.