मदनगड

बज्जु's picture
बज्जु in कलादालन
8 Mar 2010 - 4:36 pm

मदनगड

या वर्षी थर्टी फस्ट्ला मदनगडावर जाऊया असा नुसता विषय काढ्ला आणि नाक्यावरच्या काही लोकांचे चेहरे सुतकी झाले. थर्टी फस्ट्ला गडावर ? आणि ते सुध्दा मदनगडावर ?? ~X( तिथे काय ठेवलयं ? :''( वेड**च आहेत मस्त एन्जॉय करायचं सोडून शरीराचे हाल करुन घ्यायला चाललेत #:S वगैरे वगैरे चर्चा झाल्या. मन का राजा (म्हणजे आपण आप्ल्याला हवं तेच करायचं) ही आमच्या नाक्यावरची पॉलीसी असल्याने ही अशा प्रकारची बोलणी आम्ही गडप्रेमी मंड्ळींनी अर्थातच मनावर घेतली नाहीत. गडावर दारू प्यायला आमचा कट्टर विरोध असल्याने दारुकाम करणारी ;) आणि निव्वळ मौज मजा (धांगडधिंगा म्हणा हवं तर) करणारी मंड्ळी अर्थातच आमच्या बरोबर येणार नव्हती. आधी ऊत्साहाने आम्ही येतो आम्ही येतो म्हण्णार्‍यांची संख्यासुध्दा थर्टी फस्ट् जवळ जवळ येत गेला तशी गळत गेली. शेवटी ३१ तारखेला पहाटे गिरीष साठेच्या मारुती ओमनीमधुन आमची सहा जणांची स्वारी निघाली.

कसारा, ईगतपुरी, घोटी फाटा असे थांबे घेत घेत आम्ही कळ्सुबाई, अलंग, मदन, कुलंग या डोंगररांगांशी जवळीक साधणार्‍या आंबेवाडी या गावात आलो.
आंबेवाडीच्या वाटेवर
On the way to Ambewadi

आंबेवाडीतुन दिसणारे कळ्सुबाई
Kalsubai - The Everest of Maharashtra - On the left side of the Range

अलंग, मदन, कुलंग रेंज
Alang-Madan-Kulang- Near Ambewadi

महाकाय मदन आंबेवाडीतुन
Beautiful Madan from Ambewadi

Ambewadi Villege

आंबेवाडीतील एका घराजवळ गाडी पार्क केली. चहा प्यायला, पाणी भरुन घेतलं आणि सॅक पाठीला लावल्या. साधारण तास-सव्वा तासाच्या चालीनंतर आम्ही अलंग, मदन, कुलंग यांच्या बेचक्यात आलो.
Base between Madan & Kulang

खरी चढाईला सुरवात ईथुनच होणार होती. त्यातच आमच्या जोडीला सुशील ऊर्फ तात्या ऊर्फ वोल्वोचा ट्र्क (वजन ९८ कि.) याला मदनची उंची बघुन फेफरं यायला लागलं @) . त्याला सांभाळ्त-गोंजारत वरती घेऊन जायच होत. अलंग आणि मदन मधील खिंड म्हणजे भारी काम. सगळा अंगावरचा चढ.

Enroute Cole between Alang & Madan

शेवटी मजलदरमजल करीत, तात्याला सांभाळ्त दीड तास चढुन खिंडीच्या वरच्या अंगाला आलो. ईथुन डावी कडची वाट अलंगला तर उजवी कडची वाट मदनला जाते. येथून भंडारदराचे बॅक वॉटर आणि आजोबा डोंगर फार छान दिसत होते.

Area of Aajoba-Ratangad & Bhandardara back water

लगेचच मदनकडे मोर्चा वळवला. १०-१५ मि. पुढे गेलो आणि मदनच्या पायर्‍यांनी आमच स्वागत केलं.
Steps of Madan

पायर्‍यांहून मागे पहातो तर अलंगची महाकाय भिंत छातीत धड्की भरवत होती.
Wall of Alang

अलंग व मदन यामधील खिंड
Khind between Alang and Madan

येथुन पुढची ५-१० मिनीटाची वाट म्हणजे पाय ठेवायला जेमतेम पाऊलभर जागा, आधाराला डाव्या बाजुच्या कातळातील खोबण्या तर ऊजव्या बाजूला सरळ १,००० फुट खोल दरी अशा स्वरुपाची होती.

Madan Patch - Drop is more than 1000 ft.

या वाटेवरुन पुढे आलो तर समोरच मदनचा प्रसिध्द ४० फुटी रॉक पॅच. रॉक पॅच पाशी आलो. बोल्ट मारलेले दिसत होतेच. आमच्यातला अनुभवी क्लाईंम्बर सुजीत याने रोप फिक्स केला आणि पटापट वरती गेला सुध्दा. तात्याला हे असले प्रकार नवीनच होते. तात्याला रोप फिक्स केला, खास त्याच्यासाठी झुमार सुध्दा आणलेला होता. तो त्याला दिला आणि जा म्ह्ट्ले. दोन पावल गेला, पण ९८ किलो वजनामुळे बॉडी पुलींग जमेना, असला अच्चाट प्रकार कधी केलेला नाही, मागे १,००० फुट फॉल, आणि कुठ्ल्याही क्षणी आपण पडू ही भिती यामुळे रॉक वरचं त्याचे पाय थरथरायला लागले. वेगवेगळ्या प्रकाराने समजावुन झाले पण हा पठ्ठ्या काही वरती सरकायला तयार होईना. त्याच्या या थरथरण्याला आम्ही "हेलनचा डान्स" =)) असे नाव देऊन टाकले.

सुजीत
Thats Sujit - The Climber

तात्याचा हेलनचा डान्स
Sushil (Tatya) finding difficult to climb

शेवटी कसबस तात्याला खेचून वरती घेतलं. रॉक पॅचच्या वरती काही पायर्‍या आणि एक छोटी गुहा होती. या गुहेतून समोर अवाढ्व्य पसरलेला अलंग सुंदर दिसत होता.

Beutiful view of Alang from the small cave after rock patch

अलंगचा पसारा
Another view of Alang - One can see caves on Alang from this spot

या पुढ्ची वाट देखील थोडी घसार्‍याचीच होती. साधारण २०-२५ मिनीटे या वाटेने चढून गेल्यावर भर दुपारच्या चांदण्यात आम्ही मदनच्या गुहेत पोचलो.

Madan Cave

मदनवरील पाण्याची टाकी
Panyachi Taki - Madan

गुहेतच थोडावेळ आराम केला. झट्पट मॅगी खाल्लं. चहा वगैरे झाला, आणि मदनगडाच्या अत्युच्च्य टोकावर जाण्यासाठी निघालो. १५-२० मि.त मदनच्या टॉपवर आलो.

मदन टॉप
Vishnunagar Naka Group on the top of Madan

कुलंग गड - मदनच्या टॉपवरुन
Kulang from the top of Alang

नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येचा सुर्यास्त
Sunset 3

रात्री मस्तपैकी साखरभाताचा बेत केला होता. जेवून गप्पा मारत बसलो. १२.०० वाजता एकमेकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि झोपलो. सकाळी चहा-पोहे खाऊन १०.०० च्या सुमारास ऊतरायला सुरुवात केली. ऊतरताना तात्याने काही त्रास दिला नाही हे विशेष.

Sanket - Rapelling from Madan

दुपारी १.३० च्या सुमारास ऊतरुन पुन्हा अलंग, मदनच्या बेचक्यात आलो. झट्पट मॅगी केलं आणि आंबेवाडीकडे निघालो.

Sujit preparing maggi

कर्ण कर्कश्य संगीत नाही, आजुबाजूला दारूकाम नाही असा या वर्षी चा थर्टी फस्ट् जरा वेगळ्या पध्द्तीने साजरा केला.

गड्प्रेमी बज्जु

प्रवासइतिहासछायाचित्रण

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Mar 2010 - 4:47 pm | विसोबा खेचर

फारच सुंदर छायाचित्र..!

हेवा वाटतो रे तुम्हा लोकांचा! :)

तात्या.

jaypal's picture

8 Mar 2010 - 5:03 pm | jaypal

आम्च्या तात्यांना हेवा वाटण साहजिकच आहे, कारण त्यांना ही असल्या थरारक चढाईची लै आवड.
म्होरल्या टाईंबाला त्यांना बी घिउन जावा संग त्या दरीच्या वाटन बघा कस कोकरावानी तुरुतुरु पळत्याल तुमच्या म्होरं.

सुंदर फोटो आणि जबरदस्त वर्णन, मजा आली त्या गडाव्र पोचायचा हा एकच मार्ग आहे का? दरी वाला पॅच खुप रिस्की आहे आणि सगळ्यांनाच जमेल असा नाही म्हणुन विचारतो आहे

पुढिल भटकंतीस शुभेच्छा आणि हो आम्च्या तात्यांना न्यायाला विसरु नका ;-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बज्जु's picture

8 Mar 2010 - 5:10 pm | बज्जु

मदनगडावर जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे मित्रा. म्होरल्या टाईंबाला तात्यांसंग तुमालाबी घिउन जाऊ. ;)

प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद

हर्षद आनंदी's picture

8 Mar 2010 - 4:52 pm | हर्षद आनंदी

लई भारी.. असेच किल्ले सर करत रहा!!

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

मदनबाण's picture

8 Mar 2010 - 4:55 pm | मदनबाण

सह्ही... या नावाचा गड आहे हे माहित नव्हतं.
फोटो आणि भटकंतीचे वर्णन आवडले. :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

बज्जु's picture

8 Mar 2010 - 5:02 pm | बज्जु

नमस्कार मदनबाण,

तुमच्या नावातील मदन या नावाचा गड आहेच, शिवाय बाण या नावाचा एक सुळ्का देखील आहे रतनगडाजवळ. हा पहा बाण सुळक्याचा फोटो.

Baan

मेघवेडा's picture

8 Mar 2010 - 7:46 pm | मेघवेडा

आयच्यान! एकदम क आणि ड आणि क!!
भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

योगेश२४'s picture

8 Mar 2010 - 4:58 pm | योगेश२४

वर्णन आणि फोटो एक्दम झक्कास !!!!
पुढिल ट्रेकसाठी हार्दिक शुभेच्छा!!!

मेघवेडा's picture

8 Mar 2010 - 5:00 pm | मेघवेडा

जबर्‍या!!

खूप मज्जा आली असेल ना रे बज्जू??

बाय द वे, हेलन डान्स आवडला!!

-- (९८ कि. च्या तात्याचा ताणलेला) मज्जारज्जू

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

झकासराव's picture

8 Mar 2010 - 5:19 pm | झकासराव

मस्तच फोटॉ आणि वर्णन.
अम्मळ अवघड ठिकाण आहे जायला.
(१६१२) झकास..

कपिल रावल's picture

8 Mar 2010 - 5:58 pm | कपिल रावल

नाक्यावरच्या लोकान्चे चेहरे सुतकी का होतात नेहेमी तुम्च्या बरोबर यायला- याचे खरे कारण क्रुपया सान्ग :) :):)

लेख मस्त आहे- थोडा ईतिहास पण सान्ग यार. :)

फ्रॅक्चर बंड्या's picture

8 Mar 2010 - 6:46 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच फोटो अन वर्णन...

binarybandya™

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Mar 2010 - 7:42 pm | बिपिन कार्यकर्ते

वरून बारावा फोटो (कातळातल्या खोबण्या आणि एका बाजूला १००० फूट दरी) बघून हा धागा लगेच बंद केला. आपण नाय येणार ब्वॉ!!!!

पहिलाच ट्रेक केला होता हरिश्चंद्रगडचा. कॉलेजमधे एनसीसीच्या ग्रुप बरोबर. तो पण सगळ्यात अवघड वाटेने. आमचा अंडर ऑफिसर महा खट माणूस. सगळ्यात बेक्कार वाटेनेच नेलं. कसे बसे वर पोचलो आणि वर पोचल्या. दुसर्‍या दिवशी सक्काळी एनसीसीचे सर विचारत होते... काय करवंदं झाली का? ;)

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

8 Mar 2010 - 8:01 pm | प्रभो

मस्त....आवडलं..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

प्राजु's picture

8 Mar 2010 - 10:04 pm | प्राजु

फोटो आणि वर्णन दोन्ही छान.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

बेसनलाडू's picture

9 Mar 2010 - 1:04 am | बेसनलाडू

(ट्रेकिंग/हायकिंग प्रेमी)बेसनलाडू

राजेश घासकडवी's picture

9 Mar 2010 - 3:21 am | राजेश घासकडवी

बसल्या बसल्या तुम्ही टाकलेले फोटो बघून हा चित्तथरारक अनुभव घेणं हे आता मला पुरेसं आहे. कार्यकर्तेंनी म्हटल्याप्रमाणे तो अकरावा फोटो बघूनच धस्स झालं. टाकत जा अजून असेच मस्त फोटो..

राजेश

चतुरंग's picture

9 Mar 2010 - 3:29 am | चतुरंग

इतक्या अडचणीतही हा अकरावा फोटू घेण्याचे ज्या कुणाच्या लक्षात राहिले त्या अट्टल वीराला सलाम!
ढाकच्या बहिरीवर केलेली चढाई (की सरपटाई ;) ) आठवली!
*ट्या कपाळात जाणे म्हणजे काय ते अनुभवण्याच्या अशा काही खास जागा सह्याद्रीने उपलब्ध करुन दिलेल्या आहेत! :D

(कित्येक वर्षात ट्रेकिंग न करु शकलेला)चतुरंग

विमुक्त's picture

9 Mar 2010 - 9:52 am | विमुक्त

एकदम भारी!!!

तुमही थोडेसे पण खायला, पाणी प्यायला,वाटेत बसायला, गड पुर्ण बघायला ,टोर्च लावायला विरोध् करत्ता म्ह्नणुन आम्ही तुम्च्या बरोबर येत नाहि:

तुम्हाला अर्पण कविता : :) :) :) :) :)

'' चला चला ट्रेक ला जाउ- दोन मनुके आणि मावा केक खाउ |
सामान खुप आहे,गडि करु-नको नको दोन गट करु ||
रात्र झाली -भिती वाटायची,,पाय मोडला तरी टॉर्च नाही लावायचि |
तहान लागलि पाणी पिउ, रेशनिन्ग आहे-दोन घोट देउ |
चालुन चालुन भुक लागायची-दोन बिस्किटे पाण्यात बुडवुन मिलयचि |
ट्रेक सम्पला आता तरि जेउ-काय गरज आहे - डायरेक्ट घरी जाउ ||

:) :) :) :) :) :) :) :) :) :) :):) :) :) :) :) :) :) :) :) :) :):) :)

प्रचेतस's picture

9 Mar 2010 - 4:12 pm | प्रचेतस

अलंग, कुलंग, मदन या अवघड दुर्गांवर जायचे भाग्य फारच थोड्या सह्याद्रीप्रेमींना लाभते. आणी यापैकी एक भाग्यवान तुम्ही आहात.

सागररसिक's picture

10 Mar 2010 - 3:49 pm | सागररसिक

मस्त आहेत .