मराठी माणसावरून सुचलेले हे काव्यरत्न. ते प्रो. घासकडवी यांच्या मार्गदर्शनपर लेखाला आलेल्या विविध रसांतील काव्यांत कुठेतरी गहाळ झाले असते, म्हणून इथे टंकणार आहे. अर्थातच देवी सरस्वती आणि प्रो. घासकडवी यांना आदरपूर्वक प्रणिपात करून.
रस अर्थातच भयंकर. हास्य, करूणा, वीर, अद्भुत यांच्या सगळ्यांच्या मिश्रणाने तयार झालेले हे मिश्रण केवळ भयंकरच असू शकते.
तेव्हा सादर आहे आमची काव्याची पाककृती -
क्ष - माणूस
य - मनातला, गाण्यातला, धंद्यातला, वांध्यातला (ही विशेषणेही होऊ शकतात, याने आम्ही कवितकांमध्ये वरच्या लेव्हलला पोचतो का? - हा प्रश्न अर्थातच प्रोफेसरांना)
क - (ह्याची काय गरज? - परत वरची लेव्हल गाठली का आम्ही?)
व - साधाभोळा, नादखुळा, विसरभोळा, पळापळा
****
माणूस कसा मनातला
साधाभोळा रे, साधाभोळा
माणूस कसा गाण्यातला
नादखुळा रे, नादखुळा,
माणूस कसा धंद्यातला
विसरभोळा रे, विसरभोळा
माणूस कसा वांध्यातला
पळापळा रे, इथून पळा
*****
प्रतिक्रिया
4 Mar 2010 - 11:26 pm | धनंजय
हाहा - मस्त!
5 Mar 2010 - 12:07 am | चित्रा
आपल्यासारख्या कविश्रेष्ठांचे असे कौतुकाचे दोन शब्द ऐकून अंगावर मूठभर मांस चढले, त्यामुळे आता ट्रेडमिलवर जाणे भाग पडत आहे.
5 Mar 2010 - 2:47 am | राजेश घासकडवी
माणूस कसा रे 'चित्रा'तला
टवाळा रे टवाळा
(छंदात बसण्यासाठी वा खूप ताणलेला घ्यायचा)
वा वा
राजेश
4 Mar 2010 - 11:35 pm | श्रावण मोडक
भली-भली माणसं 'बि'घडू लागली... ;)
4 Mar 2010 - 11:42 pm | चित्रा
आम्ही भली माणसे आहोत, हाच समज मुळी चुकीचा आहे. इथेच मराठी माणसे मार खातात.
आणि कोणीसे म्हटलेलेच आहे - आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना. त्याचाच आदर्श ठेवून सर्व चालू आहे.
4 Mar 2010 - 11:42 pm | अक्षय पुर्णपात्रे
चित्रातै, वर्गातील अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नास वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद. कविता एकदम प्रणालीशी सुसंगत वाटत आहे. (प्रो की प्रोप्रा) घासकडवी यांनी प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कवितांकडे लक्ष द्यावे. संधी मिळालीच आहे तर मी माझा जुना प्रश्न -क्ष कसा निवडावा?- पुन्हा विचारून घेतो.
4 Mar 2010 - 11:44 pm | चित्रा
+१. असेच म्हणते. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये. ज्यांना प्रतिभा त्यांच्या जीन्समधूनच मिळते त्यांचे काय महत्त्व? आम्ही प्रतिभावान नसलो, म्हणून काय झाले, या कल्पना योग्य पण निरूपयोगी आहेत. इथल्या काही तज्ञांकडून समजते त्याप्रमाणे आमच्या काव्यशक्तीशी संबंधित असलेल्या जनुकीय ठेवणीची निगा राखायला सराव आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे.
5 Mar 2010 - 3:04 am | राजेश घासकडवी
क्ष निवडण्यासाठी तशी काही बंधनं नसतात. ते मौलिक असावेत एवढंच. मौलिकतेचं मूल्यमापन कसं करणार? मी काही क्षंची यादी मूळ लेखात दिलेली आहेच. कोणी त्यानंतर स्वातंत्र्य, माणूस वगैरे निवडले. ते उत्तमच आहेत. अधिक क्ष ची यादी आमच्या कवितक प्रो मध्ये आहेच.
एकंदरीत तुम्हा सर्व विद्य़ार्थ्यांच्या जनुकीय ठेवणीत भरपूर वात्रटपणा आणि प्रयोगशीलता आहे. सर्जनशीलतेत याशिवाय दुसरं काय असतं? चित्रा यांनी व गाळून टाकण्याचा नवीन प्रयोगही केलाच आहे. तेव्हा तुम्ही सर्व योग्य मार्गावरच चाललेला आहात. तुम्हाला मार्गदर्शनापेक्षा वेगवेगळे मार्ग चोखाळून (अनुसरून नाही - कोणीतरी विद्यार्थ्याने यावर मागे वाद घातला होता) पाहाण्याची गरज आहे.
नवीन गृहपाठ सुचवतो : कविता रचनेतून जसं ज्ञान होतं त्याप्रमाणेच भंजनातूनही होतं. एखादी, शक्यतो प्रसिद्ध कविता घ्या व त्यातून कवीने वापरलेले क्ष, य, क, व आणि वेगवेगळ्या युक्त्या (प्रश्निकरण, द्विरुक्ती, क्ष -य मिश्रण इ.) कशा वापरल्या आहेत ते दाखवून द्या.
राजेश
5 Mar 2010 - 4:57 am | चित्रा
"झांजिबार, झांजिबार, झांजिबार,
दुनिया वेड्यांचा बाजार.
झांजिबार.
एका रात्री इथून पसार
दुसर्या रात्री दर्यापार
हुश्शार भाई हुश्शार
झांजिबार, झांजिबार, झांजिबार".
या "पेडगावचे शहाणे" या गाजलेल्या चित्रपटातील गीतात कविवर्य ग. दि. मां. यांनाही हा मोह कसा आवरता आला नाही आहे ते पहा.
क्ष - दुनिया, य - झांजिबार, क - आहे, व - वेड्यांचा बाजार असे आहे.
दुसर्या कडव्यात क्ष - भाई, य -पसार, दर्यापार, हुश्शार, आणि अर्थातच झांजिबार आणि क - वेगळ्या, स्पष्ट क्रियापदाची नेहमी गरज असतेच असे नाही. शिवाय गदिमा नुसत्या द्विरूक्तीवर थांबले नाहीत, झांजिबार तीनवेळा म्हणून वेड्याचा वेडेपणा त्रिवार सिद्ध केला आहे.
भंजन उदा. २. - कवी मंगेश पाडगावकर
आता हेही गाणे पहा -
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले
अर्थ नवा गीतास मिळाला,
छंद नवा अन ताल निराळा
त्यादिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले ..
क्ष - शब्दांच्या, अर्थ
य - पलिकडले, घडले, निराळा, मिळाला, माझे, अवघडले
क - मिळाला, पाहियले, घडले, (इथे कवीची बुद्धिमत्ता दिसते, कारण जी यमके आहेत तीच काही क्रियापदेही आहेत, म्हणजे प्रणाली वापरणे सोपे ना).
व- पलिकडले, नवा, प्रथम, घडू नये ते (हे दोन शब्द विशेषण म्हणून वापरणे म्हणजे तर प्रतिभा आहे).
पाडगावकरांनी प्रणाली नुसतीच वापरली असे नाही, तर तिच्यावर पूर्ण ताबाच मिळवलेला दिसतो.
5 Mar 2010 - 6:02 am | राजेश घासकडवी
तुम्ही तर एकदम जोर मारलाय. तुमचा पयला नंबर.
पाडगावकरांचा ताबा विशेष होता याबद्दल वादच नाही. सुदैवाने त्यांनी ज्या प्रतिभा वगैरे प्रणालीच्या बाहेरच्या गोष्टी आधी वापरल्या त्या त्यांनी नंतर काढून टाकून एकदम पिव्वर प्रणाली बेस्ड कविता पाडल्या. त्यांचा परिणाम 'प्रेम म्हणजे' सारख्या कवितेतून दिसतोच. ती किती पापिलवार झाली बघा! किंबहुना कवितक प्रणालीला स्फूर्ती म्हणून ती कारणीभूत झाली.
थोडा अभ्यास केला तर कळतं की जास्त उच्च दर्जाची कविता लिहिण्यासाठी दोन क्ष घेऊन दोन कविता लिहायच्या आणि त्या मग एकत्र करायच्या असं कवीने केलेलं आहे. म्हणजे पहिली कविता शब्द, अर्थ, छंद हे क्ष घेऊन करायचे. मग दुसरी कविता तू , मी, प्रेम हे क्ष घेऊन करायचे. त्यांची पादपूरकं वेगळी वापरायची. मग त्या बेमालूमपणे मिक्स करायच्या. त्यात 'सूर' घालून दुवा सुंदरपणे सांधून दिला आहे. मग त्यातली एक ही दुसऱ्यासाठी प्रतिमा म्हणून वापरता येते.
कविता १
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
अर्थ नवा गीतास मिळाला,
छंद नवा अन ताल निराळा
कविता २
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले
त्यादिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले ..
हे तंत्र साधलं तर कोणालाच प्रणाली कळत नाही.
चालू ठेवा.
राजेश
4 Mar 2010 - 11:42 pm | टारझन
माणुस कसा विरजणातला
मिसळभोक्ता रे मिसळभोक्ता
:)
4 Mar 2010 - 11:56 pm | चित्रा
हे व्यक्तीगत होते आहे असे नाही वाटत तुम्हाला?
आपल्याकडून याबाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे.
5 Mar 2010 - 12:05 am | टारझन
माझ्याकडुन तरी काही वैयक्तिक नाव्हतं :) तुम्हाला किंवा कोणाला वैयक्तिक वाटलं असेल तर माफी मागतो . तसेच प्रतिसाद उडवुन टाकण्याची विनंती करतो :)
5 Mar 2010 - 12:10 am | अक्षय पुर्णपात्रे
चित्रातै, श्री टारझन यांच्या प्रतिसादात काही वैयक्तिक आढळले नाही. मिसळभोक्ता ही एक मानवी प्रवृत्ती आहे, जी प्रत्येक माणसातून कधी कधी डोके वर काढत असते. श्री टारझन यांनी त्या वृत्तीवर नेमके बोट ठेवले आहे पण यमकात जरा बसत नाही.
5 Mar 2010 - 12:18 am | चित्रा
मला वाटते असे कृष्ण म्हणाला होता, की - सर्व भूतांत जे बीज ते मी जाण सनातन ।
टार्जन यांनी काळजी करू नये. आपण सर्व भूतेच असलो तर कोणी कोणाला बोलायचे?
5 Mar 2010 - 12:00 am | मदनबाण
चालु द्या... ;)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
5 Mar 2010 - 12:14 am | प्रभो
माणूस कसा लेखातला
माज(असलेला) रे, माज
माणूस कसा कवितेतला
लाज(असलेला) रे, लाज
माणूस कसा प्रतिसादातला
खाज(असलेला) रे, खाज
माणूस कसा जालातला
कंपूबाज रे, कंपूबाज
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
5 Mar 2010 - 12:22 am | चित्रा
छान. पण कवितेतला माणूस लाज असलेला नसावा. :)
5 Mar 2010 - 12:29 am | अक्षय पुर्णपात्रे
चित्रातैंकडून क्ष, क, व घेतले. माझ्याकडून य घेतले. आणि मिसळक बनवले. आणि वर 'आमची फी' म्हणतो.
5 Mar 2010 - 12:33 am | प्रभो
आधीच कबूल केल्याप्रमाणे मला फक्त आमची 'ती' या विषयावर कविता सुचतात..बाकिचे असच जोड्या जुळवल्या सारखं...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
5 Mar 2010 - 12:41 am | चित्रा
शिवाय तुम्ही हल्ली मागच्या बेंचवर आहात का हो? कारण तुमचे लक्ष शिकण्यापेक्षा हल्ली जरा खिडकीतून बाहेरच दिसते आहे.
5 Mar 2010 - 12:51 am | प्रभो
मागच्या बेंच जवळच्या खिडकीतून दुसर्या वर्गात जायच्या विचारात आहे.. :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
5 Mar 2010 - 12:55 am | चित्रा
कशी असेल तुमची शाळा? खिडकीतून थेट दुसरा वर्ग गाठता येतो म्हणजे. आमच्या मागच्या बेंचवरून मागे फक्त वडेवाला दिसत असे. आमचे शिक्षक वरच्या टीचर्स रूममधून वडेवाल्याकडे बादली सोडत आणि मग वडे घातलेली बादली वर अलगद ओढली जात असे.
वेगळाच दिसतोय तुमचा हा वर्ग.
5 Mar 2010 - 12:23 am | धनंजय
कौतूक कसे असले पाहिजे?
मूठमूठ मांस चढले पाहिजे.
भुते कशी असली पाहिजे?
सनातन शिते-भोक्ती पाहिजे.
समजूत कशी असली पाहिजे?
आदर्श असून बिघडली पाहिजे.
प्रतिभा कशी असली पाहिजे?
जनुकांना सरावाची निगा पाहिजे.
सहकार्य कसे असले पाहिजे?
व्यक्तिगत अपेक्षा नसलेले पाहिजे.
(क्ष, य, क, व वरील उपप्रतिसादांतून साभार)
5 Mar 2010 - 12:25 am | चित्रा
मस्त!
5 Mar 2010 - 12:31 am | प्राजु
दंडवत हो धनंजय तुम्हाला!!
... :)
: - (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
5 Mar 2010 - 12:40 am | अक्षय पुर्णपात्रे
प्रतिसाद कसे असले पाहीजे?
सकस त्यातून 'उप'जले पाहीजे.
5 Mar 2010 - 12:57 am | चित्रा
कवितेचा टोन जरा समजुतदार झालाय. त्यामुळे यावरच जरा अधिक समजुतीचे एक दोन शब्द ( बहुदा शाळांमधल्या फळ्यावरचे सुविचार म्हणून चालावेत).
मन कसे असले पाहिजे
दुसर्याचे दु:ख कळले पाहिजे
बोलणे कसे असले पाहिजे
खरे, सच्चे असले पाहिजे
इ. इ.
5 Mar 2010 - 2:37 am | राजेश घासकडवी
च्च्यामारी, दोन तीन तास मी काही तरी विधायक कार्य करावं म्हणून बाजूला गेलो तर तुम्ही लोकांनी एवढा मोठा खेळ मांडून सुद्धा ठेवलात. आता पुन्हा सगळे प्रतिसाद वाचून उत्तरं द्यायला लागणार...
पण कवितकमुळे कविताक्षेत्रात नवीन नवीन प्रयोग होताहेत हे पाहून बरं वाटतंय, एवढंच आत्ता म्हणतो.
राजेश
5 Mar 2010 - 3:52 am | रेवती
बापरे! चित्राताई, ही कविता समजून घेण्याआधी तो स्पेश्शल लेख वाचला पाहिजे गं! पण तू कविता केलीस आणि एवढे प्रतिसाद आणि त्यातही धनंजय यांचे एकापेक्षा जास्त प्रतिसाद आलेत म्हणजे भारी काम असणार........
रेवती
5 Mar 2010 - 4:10 am | चित्रा
नक्की वाच. एकदम उपयुक्त, आणि पटकन यश देणारे घासकडवी क्लासेस.
5 Mar 2010 - 5:34 am | Nile
लेख कसे असले पाहिजे?
पन्नास प्रतिसाद खेचले पाहिजे
काव्य कसे असले पाहिजे?
सगळ्यांनी गुणगुणले पाहिजे
प्रोफेसर कसे असले पाहिजे?
सगळ्यांना खुळे केले पाहिजे
टवाळी कशी असली पाहिजे?
धनंजय सुद्धा आले पाहिजे
दिन कसे सरले पाहिजे?
काम सुद्धा केले पाहिजे.
5 Mar 2010 - 6:18 am | राजेश घासकडवी
तुम्ही तर कवितेत क्ष ची समीकरणं देऊन ती सोडवायला सांगताय राव. आपल्याला गणित बिणीत काही जमत नाही, आधीच सांगून ठेवतोय. पण तुमच्या कवितेचा दुर्गमतेकडे प्रवास चालू आहे असं दिसतंय. जनसामान्यात पापिलवार व्हायच्या ऐवजी काही मोजक्या, एकमेकांना इंटुक समजणाऱ्यांत मान्यता मिळवण्याचा तो मार्ग आहे एवढंच सांगू इच्छितो. शिवाय दुर्गम कवितांची विडंबनं होतात याची उदाहरणं पाहिली असतीलच आपण...
जाता जाता...
दिन कसे सरले पाहिजे?
काम सुद्धा केले पाहिजे.
असले विचार आधीसुद्धा एकदोनदा उठून आलेले दिसले. ही कामवासना फारच बळावत चाललेली दिसतेय. मी या नैतिक अध:पतनाचा निषेध करतो. असले फाजील विचार करण्याऐवजी माणसाने मनोभावे पूजा-अर्चा करावी अशा मताचा मी आहे.
राजेश
5 Mar 2010 - 6:54 am | चित्रा
कामावरून बोललात तर खरेच आहे, आज दाम ज्यातून मिळते ते काम फारच कमी झाले. पुढचे कवितक प्रॉडक्टिव्हिटीवरून करावे का काय असा विचार चालू आहे. पण कविता करणे, हे एक कामच आहे. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. आता काव्य करण्याच्या कामाला बहुदा पोटाला पुरेसे दाम मिळत नाही, ते घाम गाळूनच मिळवावे लागते हे मात्र खरे.
त्यामुळे आता म्हणताच आहात तर थांबवते.
तरी एवढे एकच शेवटचे ऐकून जा.
प्रेरणा - सांगायला नकोच. आज डावीकडे पहा म्हणजे कळेलच.
पर्दा नही जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या
जब काव्य किया तो डरना क्या
काव्य किया कोई चोरी नही की
छुपछुप आहें भरना क्या
आज कहेंगे दिल का फ़साना
जान भी लेले चाहे ज़माना
काव्य वोही जो दुनिया देखे
छुप छुप कर यूँ लिखना क्या
जब काव्य किया तो डरना क्या
चला, इत्यलम.
5 Mar 2010 - 8:51 am | अक्षय पुर्णपात्रे
हमाल कसा असला पाहीजे?
गाढवसुद्धा लाजले पाहीजे.
क्ष कसा असला पाहीजे?
य व क पेटले पाहीजे.
5 Mar 2010 - 9:16 am | राजेश घासकडवी
हा कोण इथे ही कवने करतो?
वर्गात बसुनि तक् रारी करतो?||धृ||
स्वातंत्र्याच्या काव्यांमधुनि
आक्षेपांच्या दाव्यांमधुनि
आगकाडीच्या लाव्यांमधुनि
कुणास रागे भरतो?
हा कोण इथे ही कवने करतो?
वर्गात बसुनि तक् रारी करतो?||धृ||
दाम-पद्धती ज्ञान तयाचे
'बाल' ग्यान परी कवीतकाचे
ज्ञान नसे ज्या 'क्ष' वा 'य' चे
अ'क्ष''य' म्हणुनी स्मरतो
हा कोण इथे ही कवने करतो?
वर्गात बसुनि तक् रारी करतो?||धृ||
5 Mar 2010 - 9:48 am | चित्रा
छान कविता.
लै भारी.
5 Mar 2010 - 10:06 am | अक्षय पुर्णपात्रे
ग्यान नाही म्हणूनच या वर्गात आहे ना. शिक्षकानेच थट्टा केल्यावर विद्यार्थ्याने काय करायचे? सर्व अभ्यास प्रामाणिकपणे करूनही मास्तर आमचा राग राग का करतात? या सर्व गोष्टींचा सांकेतिक विरोध म्हणून शिव्यांच्या वर्गात शिकलेली शिवी आम्ही यापुढे या वर्गात वापरणार आहोत. संबंधितांनी नोंद घ्यावी.
5 Mar 2010 - 10:16 am | राजेश घासकडवी
'एकसमयावच्छेदेकरून' आपण दोघेही म्हणू. ज्या निर्बंध काव्यप्रकाराला लागेल त्याला लागू दे!
5 Mar 2010 - 10:29 am | अक्षय पुर्णपात्रे
If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer.
हे तुमच्या प्रिय जीएंच्या पिंगळावेळ पुस्तकाच्या सुरूवातीला (चूभूद्याघ्या) तुम्ही वाचले नाही काय? जर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे कवितक प्रणाली वापरून कविता करता येत नाही तर थट्टा का उडवता? मी तुमच्या शिवीप्रयोगात सामिल होण्यास नकार देत आहे.
5 Mar 2010 - 5:45 pm | मुक्तसुनीत
पिंवे नव्हे, कामा. ;-)
- सुभाषाप्पा पर्चुरेवचट.
5 Mar 2010 - 9:26 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री सुनीत, सर्वप्रथम येथे पिंवे न वापरल्याबद्दल निषेध. पण बरोबर पुस्तक, मुखपृष्ठकार व प्रकाशक यांची नावे सांगितल्याबद्दल धन्यवाद. :)
5 Mar 2010 - 10:28 am | Nile
आम्ही कोण म्हणुन काय पुससी? आम्ही असु टवाळके
देवाचे, दिधले असे आंतरजाल आम्हास खेळावया
विश्वी या 'प्रतिभाबले' हुंडारतो चहुकडे लीलया
संस्थळातुनी आरपार आमची ही पावती द्यावया फुके
5 Mar 2010 - 10:45 am | राजेश घासकडवी
छंदांची नसती अम्हास जाचक कधी ही बंधने कोणती
ओढाताण करू मनस्वी अशी आम्हास पाह्य्जे तेव्हा
कोणाहे लघु कोण गुरु क्रम कसा यांची तमा बाळ्गु ना
मास्तारांसही जाब पुसू कि अमुच्या तोंडास वेंगाडुनी
विद्यार्थ्यांस बघून मूढ मंद अशा मास्तार चक्रावती
जाबाबास फक्त तीन पंक्तिलिहुनी जालावरी फेकिती
राजेश
5 Mar 2010 - 10:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऑबॉबॉबॉ ... चित्राताई, तू पण!
अदिती
5 Mar 2010 - 11:46 am | वाहीदा
चित्राची तर कमालच आहे !!
पर्दा नही जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या
जब काव्य किया तो डरना क्या
काव्य किया कोई चोरी नही की
छुपछुप आहें भरना क्या ~X(
आज कहेंगे दिल का फ़साना
जान भी लेले चाहे ज़माना
काव्य वोही जो दुनिया देखे
छुप छुप कर यूँ लिखना क्या
जब काव्य किया तो डरना क्या
सुंदर ... वाह क्या काव्य है !! =D>
~ वाहीदा
5 Mar 2010 - 12:38 pm | नाद्खुळा
सुन्दर अनि मोजक्या शब्दत बरच काहि...
एक तुम्हाला भेट
माणुस कसा नात्यातला
गोतावळा रे गोतावळा
माणुस कसा पैश्यातला
उतावळा रे उतावळा
5 Mar 2010 - 6:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लगे रहो.... :)
-दिलीप बिरुटे
5 Mar 2010 - 7:26 pm | चित्रा
माझ्या शिकाऊ काव्याला एवढा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार विशेषतः हजेरी लावून गेलेले माननीय कविवर्य, प्रोफेसर, आणि वर्गबंधुंचे. याने मनाचा हुरूप वाढतो, आणि नवीन काही शिकायला आणि लिहायला बळ येते. परत एकदा धन्यवाद.
5 Mar 2010 - 8:03 pm | प्रभो
(दुसर्या वर्गात जाण्याच्या विचारातील)बॅकबेंचर्सची उपेक्षा केल्याबद्दल चित्राताईंचा निषेध!!!
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी