गेल्या वर्षी ऑफिसच्या कामानिमित्त जपानला (ओसाका) जाण्याचा योग आला. ओसाका विमानतळावरून काकोगावा शहरात पोहोचून हॉटेल मध्ये चेक-इन करेपर्यंत दुपारचे बारा वाजले. हाच एक अर्धा दिवस साईट-सीइंगला मिळणार होता त्यामुळे वेळ न दवडता सरळ हिमेजीकडे प्रस्थान ठेवले.
हिमेजी स्टेशन ओसाका पासून साधारण एक तासाच्या अंतरावर आहे आणि तिथून कासल चालत केवळ 20 मिनिटं. सुदैवाने आम्ही ज्यादिवशी तिथे गेलो तो दिवस जपानचा राष्ट्रीय खेळ दिवस (ऑक्टोबरचा दुसरा सोमवार) असूनही कासल पब्लिक व्हुइन्गसाठी ओपन होता.
सोळाव्या शतकात शोगुन हिदेयोशीने बांधलेली ही इमारत आज वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित केली आहे. पायाचा अपवाद वगळता इमारत पूर्णपणे लाकडी आहे. या इमारतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जपानच्या इतर कासल्स प्रमाणे ही इमारत ऐतिहासिक काळात कधीच युद्धात किंवा आगीत नष्ट झाली नाही. अपवाद दुसऱ्या महायुद्धाचा. दुसऱ्या महायुद्धात मात्र या किल्ल्याचा परिसर पूर्णपणे बेचिराख झाला; पण कासलची इमारत मात्र सुदैवाने वाचली आणि त्यामुळे आजही ओरिजिनल वैशिष्ट्यां सकट पहायला मिळते.
कासल मधिल प्रर्थना स्थळ. जाणकारांनी गाभारयातील वस्तू ओळखल्याच असतील! ;)
कासलवरून दिसणारे शहराचे विहंगम दृश्य.
प्रतिक्रिया
14 Feb 2010 - 8:49 pm | योगेश२४
छानच फोटो आणि माहितिसुद्धा!!!
14 Feb 2010 - 9:02 pm | मदनबाण
सर्व फोटो मस्त आहेत...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
15 Feb 2010 - 3:56 am | शुचि
फार सुंदर छायचित्रे आहेत. धन्यवाद.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
15 Feb 2010 - 9:04 am | सुधीर काळे
नंदू-जी,
१९७२ साली हिमेजी कॅसलला भेट दिली होती. आपल्या या चित्रलेखाने मला भूतकाळात नेले.
हिमेजीला "सांयो (Sanyo) स्पेशल स्टील्स" ही बॉलबेअरिंगच्या खास पोलादाचे जगात सर्वात जास्त उत्पादन करणारी कंपनी आहे व तिथे ५ आठवड्याचे प्रशि़क्षण घ्यायचे भाग्य मुकुंद कंपनीच्या आम्हा कांहीं इंजिनियर्सना लाभले होते.
त्यावेळी मी नागोया कॅसलही पाहिला होता. दिसायला कितीही सुंदर असले तरी कां कुणास ठाऊक पण जपानमधले किल्ले हे 'किल्ले' वाटतच नाहींत.
यावेळची एक आठवण जपानी लोकांच्या उत्साहीपणाची व धडपड्या स्वभावाची! साधारणपणे अशा पर्यटनाच्या ठिकाणी रविवारी शाळांच्या सहली असायच्या. गणवेषातील शाळकरी मुलें-मुली तिथे असत व भारतीय चेहरा दिसला कीं आम्हाला गराडा पडे व "Can I practice my English with you?" असा प्रश्न हमखास विचारला जाई! व 'हो' म्हणताच दाही दिशांकडून प्रश्नावळी सुरू व्हायची!
तसेच 'सांयो स्पेशल स्टील'च्या प्रशिक्षण केंद्रात इंग्रजी भाषा शिकवणारी इत्सुयो किनागावा नावाची सुकन्या तिच्या मैत्रिणींच्या ताफ्याबरोबर रोज दुपारच्या जेवणाला आमच्या पंक्तीला असायची. तिचं इंग्रजी किती सुधारलं माहीत नाहीं पण आम्हा सर्वांना तिच्यामुळं बरंच निहोंगो (जपानी भाषेचं त्यांच्या भाषेतलं नांव) यायला लागलं हे मात्र खरं.
जर अजून जपानमध्येच असाल तर क्योतो येथील "शोगुनचा राजवाडा" पहायला विसरू नये.
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
15 Feb 2010 - 9:26 am | विंजिनेर
असेल कदाचित पण ठेवलेत किती जपून ते बघा बरं? महायुद्धात बेचिराख झालेला हा देश. त्या परिस्थितीतसुद्धा ह्या वास्तूंकडे त्यांचे दुर्लक्ष झालं नाही. आपण मात्र पैसे आणि इतर गोष्टी नाहीत म्हणत सुस्कारे टाकत आपल्या देशातल्या किल्ल्यांचे अवशेष होताना बघतो.
हा हा... अजूनही नारा, क्योतो इथल्या देवळां-राजवाड्यांमधे हे दृश्य बघायला मिळतं
क्योतोमधला शोगनचा राजवाडाच काय पण अनेक मंदीरे(किंकाकुजी, क्योमिझु-देरा इ. त्यातल्या त्यात प्रसिद्ध), गिओन (गेयशा डिस्ट्रिक्ट), इतकंच काय पण लाकडी पूलसुद्धा भान हरपवणारे आहेत.
बाकी फटु मस्तच!
15 Feb 2010 - 11:39 am | नंदू
काळेजी आणि विंजिनेर,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
काळेजी हा कासल कदाचित गढी कॅटॅगरीत मोडत असेल पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आजच्या घडीला या कासल कॉम्प्लेक्स मधील केवळ हीच इमरत आज आपल्याला दिसते जी पूर्वी संपूर्ण कॉम्प्लेक्सचा गाभा होती. इन इट्स फुल ग्लोरी, नक्कीच हा किल्ला इम्प्रेसिव्ह असावा. असो. बाकी इन्ग्रजीचा सराव करूपाहणारी मुलं इथेही आढळली. वेळेच्या अभावमुळे इच्छा असूनही इतर काही पाहता आलं नाही. परत कधितरी...
विंजिनेरांशी सहमत. जपान मधील प्रत्येक गोश्ट कितिही छोटीका असेना, भान हरपवणारी असते. विषयांतर होतय पण एक गोष्ट नमूद कराविशी वाटते, इथे ठिकठिकाणी असलेल्या लहान मुलांच्या पुतळ्यांच्यापाशी जपानी लोक चॉकलेट्स अथवा खेळ्णी ठेवतात ही प्रथा मला अतिशय र्हुद्य(?) वाटली.
असो. आपल्या प्रतिक्रियांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
नंदू
27 Feb 2010 - 7:32 pm | स्मृती
अरे वा, नन्दुजी! फोटो आणि वर्णन दोन्ही छान... पण हा काळेजी कासल कुठे आला? हिमेजी जवळच का??
15 Feb 2010 - 10:18 am | सुनील
मस्त फोटो आणि माहिती.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Feb 2010 - 7:22 pm | मॅन्ड्रेक
at and post : Xanadu.
15 Feb 2010 - 10:13 pm | प्राजु
मस्त!! माहिती आणि चित्रे.. दोन्ही छान.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
27 Feb 2010 - 8:20 pm | रेवती
मस्त फोटो व माहिती!
शहराचा फोटो म्हणजे सिमेंटचे जंगल आहे.....आपल्याकडच्यासारखे!
स्वच्छताही आहेच. किल्ल्यावरील लाकडातील कोरीव काम आवडले.
रेवती
27 Feb 2010 - 11:05 pm | विसोबा खेचर
छानच आहेत फोटू! :)
27 Feb 2010 - 11:19 pm | jaypal
फोटो आणि साजेस लेखन. दोन्ही आवडलं
पुढील लिखाणास शुभेच्छा :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
28 Feb 2010 - 3:17 am | राजेश घासकडवी
डौलदार, रेखीव वास्तु, छताच्या किनाऱ्याला सुशोभित करणाऱ्या बारीक नक्षीकामापर्यंत मढलेली, आणि आतमध्ये भव्य, शालीन लाकडाने अवकाश सामावणारी...
त्यात कडक अदबीने फिरणारे हुजरे, मालकांच्या पदरी असणारे लढवय्ये, युद्धाआधी प्रार्थनास्थळासमोर केलेली शेवटची वंदनं अशी खूप चित्रं डोळ्यासमोर उभी राहू शकतात.
तिच्या राजेशाही व्यक्तिमत्वाचं चित्रण करणारे खूप बारकावे टिपले आहेत. जवळचंच कॉंक्रीट जंगल तिने जग बदलताना पाहिल्याचं सांगतं.
राजेश
28 Feb 2010 - 9:14 pm | बिपिन कार्यकर्ते
खूपच छान आहेत सगळे फोटो... मस्त.
बिपिन कार्यकर्ते
1 Mar 2010 - 7:41 am | सुधीर काळे
थोडेसे अवांतर! शोगुनचा राजवाडा पहाताना एक गमतीची गोष्ट लक्षात राहिली व सांगण्यासारखी वाटते. या राजवाड्याभोवती लाकडी व्हरांडा आहे. पण त्याच्या फळ्या अशा बनविल्या आहेत कीं त्यावर चालतांना चिं-चीं-चीं असा आवाज येतो. आमच्या वाटड्याने सांगितले कीं शोगुनवर हळूच पाय न वाजवता येऊन कुणी हल्ला करू नये म्हणून अशा आवाज करणार्या फळ्या मुद्दाम बसविल्या होत्या!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)