आजपासून २० वर्षांपूर्वी!
१३ ऑक्टोबरची १९८७ ची संध्याकाळ! त्याचे वेडे असलेले आम्ही काही मित्र त्याच्या अंतयात्रेला निघालो होतो. त्याची अंतयात्रा जुहू येथील त्याच्या राहत्या घरावरून निघून चेंबूरला आरके स्टोडियोत येणार आहे असे आम्हाला कळले होते. आम्ही आरके स्टुडियोपाशी पोहोचलो. तिथे माणसांचा अक्षरश: महासागर पसरला होता. त्याचे आमच्यासारखेच हाजारो वेडे त्याच्या अंत्यदर्शनाकरता जमले होते! थोड्याच वेळात तो सजवलेला 'ट्रक' आला आणि आरके स्टुडियोत प्रवेशला. तेथे स्वत: शोमॅनने दादामुनींचे सांत्वन केले!
परंतु कुणीच बोलायच्या स्थितीत नव्हते.
तो आला होता, त्याने पाहिलं होतं, आणि त्याने जिंकलं होतं!
आणि आता तो 'हम है राही प्यार के, हमसे कुछ ना बोलीये' असं म्हणत परत निघाला होता! कधीही परतून न येण्यासाठी!!
अफाटच होता तो! धमाल होता!!
त्याच्या गळ्यात जादू होती, दर्द होता, अवखळपणा होता, ओलावा होता, माया होती, ममत्व होते, गोडवा होता!
तो फक्त गात राहिला! त्याच्या अंदाजात, त्याच्या ष्टाईलीत, त्याच्या रुबाबात!
त्याच्या गाण्याने भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकलं! साक्षात गानसरस्वती त्याच्यासोबत दुगल गाणं गायचं म्हणजे किंचित बिचकूनच असत! त्याला मात्र कुठलंही गाणं द्या. आनंदी द्या, दु:खी द्या, थट्टामस्करीचं द्या! तो त्याचं फक्त सोनंच करायचा!!
आणि आता तो परत निघाला होता....
झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा!
आज वीस वर्षांनंतरही त्याची आठवण मनात ताजी आहे. तो अजून हवा होता, खूप खूप हवा होता! पण त्याच्या अत्यंत व्हिम्झिकल स्वाभावाला साजेसं असंच तो वागला आणि
'जिंदगी को बहोत प्यार हमने दिया,
मौतसे भी मोहोब्बत निभायेंगे हम!'
असं म्हणत मैफल अर्धवट सोडून निघून गेला!
त्याला सलाम.....
-- तात्या.
प्रतिक्रिया
14 Oct 2007 - 2:26 pm | धोंडोपंत
आमचेही अभिवादन.
आपला,
(खिन्न) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
14 Oct 2007 - 2:58 pm | नरेंद्र गोळे
तात्यासाहेब नमस्कार,
अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही.
कोणी परत करावे, हरपले दिन |
हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || धृ ||
मनोरथांतील महाल, आणि स्वप्नांतील नगर |
ज्यांच्यासाठी प्यायलो मी, जीवनाचे ते जहर ||
आज मी शोधू कुठे, कुठे गेले ते सारे |
हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || १ ||
ह्या गाण्याला त्याने दिलेले संगीतही अफाट आहेच,
आणि लताने गायलेले हे पुरूषी गाणेही अफलातून आहे.
14 Oct 2007 - 3:08 pm | विसोबा खेचर
तात्यासाहेब नमस्कार,
अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही.
नमस्कार गोळेसाहेब,
तो होताच मुळी.... 'द वन ऍन्ड ओन्ली...'!!
असो, मिसळपाववर आपले सहर्ष स्वागत..
आपला,
(मनोगतीय सुहृद!) तात्या.
4 Apr 2008 - 2:19 am | विसोबा खेचर
मागे कुणीतरी मिपाकराने मला पोष्टकार्ड पाठवून अगदी कळकळीने त्याचा पत्ता विचारला होता. ते पोष्टकार्ड चुकून डिलिट झालं त्यामुळे ही विचारणा कुणी केली होती ते आता आठवत नाही. त्यानंतर बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होतो पण राहून गेलं. आज संध्याकाळी कामधंद्याच्या निमित्ताने अचानक जुहूला जाणं झालं तेव्हा त्याची याद आली म्हणून त्याच्या बंगल्याजवळही थोडावेळ घुटमळलो, मन थोडं उदास झालं!
तो माझा वीक पॉईंट होता! १९८७ सालीच मी त्याच्या घरी गेलो होतो ती आठवणही लवकरच लिहीन मिपावर!
पुन्हा विसरून जायला नको म्हणून आत्ता इथे त्याचा पत्ता देत आहे. बर्याच विलंबाबद्दल मी त्या अज्ञात मिपाकराची माफी मागतो..!
पोस्टल ऍड्रेस माहिती नाही, पण तिथे कसं जायचं ते सांगतो..
समुद्रालगत असलेल्या जहू तारा रस्त्यावर जायचं. जुहू कोळीवाड्याकडे जो फाटा जातो तिथनं जवळच त्याचं घर आहे. रस्त्याच्या एका बाजूला सगळे बंगले आणि काही ऑफीसं आहेत तर दुसर्या बाजूला समांतर जुहू चौपाटी आहे. जुहू तारा या मुख्य रस्त्यालगतच किंचित एका गल्लीवजा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या तोंडापाशीच त्याचा बंगला आहे!
त्या रस्त्याचं नांव - स्वर्गीय किशोरकुमार गांगुली पथ!
पण आता त्या बंगल्याकडे बघवत नाही. त्यातला अवलिया तर तिथून केव्हाच उडून गेला आहे!
तात्या.
4 Apr 2008 - 5:51 am | मदनबाण
माझेही अभिवादन.
(किशोरदां चा चाहता)
मदनबाण
4 Apr 2008 - 8:06 am | प्राजु
१.आचल के तुझे मै लेके चलू इक ऐसे गगन के तले...
जहॉं गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले....
२. फूलों के रंग से दिलकी कलम से....
३. वह शाम कुछ अजिब थी..
कोणकोणती सांगावी आणि कोणती गाळावीत...
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
4 Apr 2008 - 1:43 pm | धमाल मुलगा
त्याच॑ आणि माझ॑ नात॑ खुप खुप जुन॑...
मी बराच लहान होतो, ७-८ वर्षा॑चा असेन नसेन. घरी 'चलती का नाम गाडी' ची कॅसेट आणली होती..तेव्हापासून ह्या कल॑दराच्या जो काही प्रेमात पडलोय तो आजतागायत सावरलेलो नाही!
पहिल्या प्रेमाची हुरहुर त्याच्याच आवाजान॑ 'र॑गीन' झालेली अनुभवली. प्रेमभ॑गाच॑ दु:खही त्याच्या 'दर्दभरे नग्मे' ऐकुन कुरवाळल॑.
आन॑दी झालो की त्याची 'मस्तीभरी' एक से बढकर एक गाणी ऐकुन आन॑द शतगुणित केला, पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. प्रेमभ॑गान॑तर सैरभैर झालेल्या अवस्थेतही 'एक भले मानुस को अमानुष बना के छोडा' म्हणत माझ्याशी सहमत होत गेला.
मित्र-मैत्रिणी॑बरोबर द॑गा-धूडगुस घालताना 'इय्या इय्या इय्या हे:...देखा ना हाय रे..' म्हणत तोच चौखूर उधळायचा!
माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच.
कामाच्या रगाड्यात अडकल्यान॑तर ऑफिसातल्या कटकटी॑ना वैतागून मी चिडचिड केल्यावर 'ये जीवन है...इस जीवन का यही है र॑गरुप' अस॑ समजावून सा॑गणाराही तोच...तोच!
कोण म्हणत॑य तो आपल्यात नाहीय्ये? अरे, मला तर तो रोज भेटतो. सतत माझ्याच तर बरोबर असतो !!!!
-(....) ध मा ल.
4 Apr 2008 - 1:49 pm | विसोबा खेचर
पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता.
अरे पण धमाल्या, ही ओळ तरी रफीसाहेबांनी म्हटली आहे! :)
माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच.
वा! सुंदर लिहिलं आहेस..!
पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...!
आपला,
(त्याचा दिवाना!) तात्या.
4 Apr 2008 - 2:02 pm | धमाल मुलगा
अस॑ झाल॑ काय?
असो, म्हणजे तेव्हा आम्ही ओळखायला चुकलो तर! तर किशोरदेवा, लेकराला माफ कर.
आणि रफीसाहेब तुम्हीही! बाकी रफीसाहेबा॑च्या आवाजतली खुमारीही काही औरच होती नाही?
-(ओशाळलेला) ध मा ल.
==========================
ह॑...जरा तयारी करावी लागेल. प्रतिक्रियेपुरत॑ उर्स्फुतपणे लिहिल॑ गेल॑ खर॑, पण एव्हढ्या मोठ्या माणसाच्या गाण्या॑ना आम्ही हात घालायचा म्हणजे फे..फे उडायची लक्षण॑.
ठीक ठीक, तुमची ही फर्माईश माझ्यावर उधार राहिली!
4 Apr 2008 - 2:06 pm | मनस्वी
छुकर मेरे मन को किया तुने क्या इशारा...
किशोरदांना प्रणाम.