सध्याचे वाचन - २

बट्ट्याबोळ's picture
बट्ट्याबोळ in जनातलं, मनातलं
2 Feb 2010 - 1:46 am

१. कर्णपिशाच्चं:
लेखकः बाळा फोंडके.
लेखन प्रकारः डिटेक्टिव्ह रहस्य कथा.

बाळूने साफ निराशा केली. कथा अतिशय टुच्च्या आहेत. दोन पात्र घेऊन अत्यंत अ-रहस्यमय कथा रचल्या आहेत.
पुस्तकाच्या कव्हर वर काळ्या बॅकग्राउंड वर एका कवटीच चित्र आहे. त्याच प्रयोजन आजूनही समजलेल नाही. मला
पुस्तक हातात घेतल्यावर लय भारी वाटल होत. पण मी चू*त निघालो. २५० रुपयांना चूना !!!

२. आवरण:
लेखक: एस. एल. भैरप्पा. (कन्नड- अनुवादित)
प्रकारः कादंबरी-वैचारीक, ऐतिहासीक .

विस्मरणाने सत्य झाकोळलं जातं. त्याला आवरण म्हणातात. या थीम वर भैरप्पांनी सुंदर कादंबरी रचली आहे.

रझिया-पूर्वीची लक्ष्मी. आमिरशी लग्न करते. अधुनिक विचारांचा तिच्यावर पगडा असतो. त्यामुळे हिंदू काय किंवा
मुसलमान काय- काही फरक पडत नाही, तसेच हिंदू धर्मातील भोंगळपणाचा, जातीव्यवस्थेचा, कर्मठपणाचा तिरस्कार
म्हणून लग्नावेळी मुसलमान होते.

दोघांचा व्यवसाय: माहीतीपट, आर्ट मूव्हीज बनवणे.

तिला सतत प्रश्न पडत असतो की हंपी मधील देवळे भग्न का झाली? कोणी केली ? त्यावर एखादी डॉक्यूमेंटरी बनवता येइल का?

"शैव-वैष्णव युध्दामधे एकमेकांनी ती पाडली", "मुसलमानांना बदनाम करण्यासाठी त्याचे खापर मुसलमानांवर फोडले
जाते" अशा विचारांच्या "आवरणा" खाली वावरणा-या इंटलेक्चुअल ग्रूप मधे ती देखील असते.

नक्की सत्य काय आहे? कोणी पाडली ती देवळं ? मूर्ती कोणी फोडल्या ??

पुढे सांगत नाही. तुम्ही कादंबरीच वाचा. बरीच सरप्राईजेस मिळतील.

साहित्यीक द्रुष्ट्या देखील कादंबरी सशक्त आहे. लक्ष्मी च्या कथेमध्येच - वेगळ्या काखंडातल्या आणखी ३ वेगळ्या कथा गुंफून भैरप्पांनी
बाजी मारली आहे !! अशा पध्दतीने लिहिलेली कादंबरी मी तरी पहिल्यांदाच वाचली. त्यामूळे मजा आली.

कथासमीक्षा

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

2 Feb 2010 - 3:15 am | चिरोटा

कर्णपिशाच्च आपल्याकडेच ठेवा आणि आवरण वाचून झाले की मला द्या.(मी वाचून परत देईन).
भेंडी
P = NP

बट्ट्याबोळ's picture

2 Feb 2010 - 7:31 pm | बट्ट्याबोळ

भेंड्या भाडखाव .. विकत घे की ...

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2010 - 3:54 pm | बिपिन कार्यकर्ते

चांगली ओळख. हा उपक्रम चालू ठेवावा ही विनंती.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2010 - 5:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली ओळख. हा उपक्रम चालू ठेवावा ही विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुचि's picture

2 Feb 2010 - 6:31 pm | शुचि

दोन पात्र घेऊन अत्यंत अ-रहस्यमय कथा रचल्या आहेत. =))
दोन्ही पुस्तकांचा संक्षीप्त परिचय. आवडला.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

अक्षय पुर्णपात्रे's picture

2 Feb 2010 - 8:18 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री बट्ट्याबोळ, संक्षिप्त असला तरी परिचयातून पुस्तकांची थोडीफार कल्पना येते. धन्यवाद. (उपक्रम सुरू ठेवण्याबाबत इतरांनी केलेला आग्रह मीही करत आहे.) यामुळे सहजच भैरप्पांविषयीच्या विकिपानावर फिरकलो. प्रख्यात कन्नड साहित्यिकांतही वादविवाद (अनंतमुर्ती, कर्नाड आणि भैरप्पा) आहे हे पाहून गंमत वाटली. भैरप्पांच्या कादंबर्‍यांचे हिंदी अनुवाद खूपच लोकप्रिय आहेत हेही कळले. आवरण या कादंबरीच्या प्रकाशणपूर्वच सर्व प्रती खपल्या, हे वाचून प्रादेशिक साहित्याबद्दल अजुनही आशादायक चित्र आहे, असे लक्षात आले. ही कादंबरी मिळवून वाचायलाच हवी.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत

खान्देशी's picture

2 Feb 2010 - 8:34 pm | खान्देशी

बंगळूर मध्ये असताना बरीच कानडी मित्र मंडळी जमली. सीमाप्रांतवादा पासून 'मनसे' पर्यंत आमच्या चर्चा होत असत. मी ह्या कंपूला 'जय महाराष्ट्र' म्हणून अभिवादन करत असे आणि ती मंडळी हि मला दुराभिमानी म्हणत...... बाकी आमची मैत्री चांगली मुरली असल्याने मनात राग नसे . अश्यात एके दिवशी एस. एल. भैरप्पा लिखित 'आवरण' माझ्या मित्रांच्या वाचत आले. अर्थात भेटल्यावर चर्चा झाली आणि हीच माझी मित्र मंडळी मनापासून 'जय महाराष्ट्र' बोलल्याचे स्मरते. (प्रचंड भारी वाटलेला!!) का? ते जाणून घेण्यासाठी 'आवरण' नक्की वाचा.

भडकमकर मास्तर's picture

4 Feb 2010 - 11:02 am | भडकमकर मास्तर

आवरणची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...
( टुच्च्या रहस्यकथांचे पुस्तक विकत घेऊन वाचल्याचे वाचून आश्चर्य वाटले.)
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो