'त्यांच्या' लग्नाची पत्रिका आज घरी आली,
गालात हसत आम्ही उरलेल्यांची संख्या मोजली,
संख्या पाहुन आमचा पहिलाच ठोका चुकला,
त्रास नको म्हणुन औषधाचा पेला लगेच भरला,
दोन-चार वर्षं कशी अशीच सरली होती
तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती,
समजवायचं त्याला म्हणुन घरातच बैठक मांडली होती,
त्या दिवशी पिताना त्याला बाटलीच जास्त प्यारी होती,
'Please share our happiness' बघुन डोक्याला शॉट लागला,
वैतागुन आम्ही लगेच उरलेल्यांचा घोळका जमवला,
थोड्याच वेळात टेबलावर बाटल्यांची रांग लावलेली होती,
दिलासा एव्हढाच प्रत्येकाने एक तरी बाटली आणली होती,
विषय बदलुन आम्ही लगेच बॅचलर्स पार्ट्या आठवल्या,
पुढचा नंबर कोणाचा ठरवत बाटल्या मात्र संपवल्या,
दुसर्या दिवशी सकाळी कॅलेंडरावर नोंद होती,
त्यांच्या लग्नाची तुतारी मलाच तर वाजवायची होती...
प्रतिक्रिया
19 Jan 2010 - 11:16 am | आनंदयात्री
हा हा हा .. एक नंबर रे निळ्या !!
19 Jan 2010 - 11:27 am | अमोल केळकर
मस्त.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
19 Jan 2010 - 11:46 am | बिपिन कार्यकर्ते
निळ्या लिहिता झाला.... छान. :)
बिपिन कार्यकर्ते
19 Jan 2010 - 1:48 pm | पाषाणभेद
>>>>>दोन-चार वर्षं कशी अशीच सरली होती
तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती,
समजवायचं त्याला म्हणुन घरातच बैठक मांडली होती,
त्या दिवशी पिताना त्याला बाटलीच जास्त प्यारी होती,
'Please share our happiness' बघुन डोक्याला शॉट लागला,
वैतागुन आम्ही लगेच उरलेल्यांचा घोळका जमवला,
थोड्याच वेळात टेबलावर बाटल्यांची रांग लावलेली होती,
दिलासा एव्हढाच प्रत्येकाने एक तरी बाटली आणली होती, >>>>
काहीच्या काही बोलणे थांबवा! तुम्ही ज्याला समजावले त्या घटनेची तारीखवार द्या आधी. समजावयाचे म्हणून समजावले तर कोणी समजत नाही.
दारू पितांना कोणी असला विचार करत नाही. कवितेत वाचून एखाद्याला वाटेल इंच इंच भरलाय टेबल दारूच्या बाटल्यांनी.
:-)
ह. घ्या अन नेहमी लिहीत रहा.
20 Jan 2010 - 7:41 am | विजुभाऊ
दुसर्या दिवशी सकाळी कॅलेंडरावर नोंद होती,
त्यांच्या लग्नाची तुतारी मलाच तर वाजवायची होती...
लै भारी रे....
आणून द्या मज एक तुतारी फुंकीन मी ती स्वप्राणाने
याच्या नंतर तूच वाजवलीस रे तुतारी ;)
20 Jan 2010 - 8:09 am | सहज
>त्यांच्या लग्नाची तुतारी मलाच तर वाजवायची होती...
पडोसन सिनेमातील मेहमूद आठवला. :-)
पहिल्या काव्याबद्दल अभिनंदन. पु.ले.शु.