(छंद दे)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
14 Jan 2010 - 5:10 pm

प्राजूची सुरेख कविता 'छंद दे' वाचली आणि आमची संक्रांत आलीच! ;)

गर्दकाळा वीग भारी, छान थोडा रुंद दे
जीवघेणी ही निराशा, लपवण्याला गोंद दे..

ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया
केस टकला उगवलेले, पाहण्या आनंद दे..

तेल नुसते भिजवणारे तळपणार्‍या डोसक्या
चार थेंबानी खुलावे, आगळे 'महाभृंग' दे..

बधिर झाल्या भावना मी लोकलज्जा का धरू?
खवट नजरा झेलण्याला, या शिरी वेखंड दे..

रोज जोडूनी तुटावी ही अशी नाडी नको
केस सारे बांधणारा मज इलॅस्टिकऽबंद दे ..

मी न छोटा, मी न मोठा, ना असे मी बावळा
दर्शनाने चिरतरुण मज, तोच 'देवानंद' दे..

स्तोम नाही कंगव्याचे, केशकर्तन मुळिच ना
खाज 'काका'ची खरी, नवयौवनाचा छंद दे!

चतुरंग

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

14 Jan 2010 - 5:38 pm | श्रावण मोडक

=)) =)) =)) =))
सलाम!
बारकाईने सही पाहिली. मला वाटलं तिथंही कंसात टकलू वगैरे काही आहे की काय? फोटोत केस दिसतात हो! तरीही ही खंत का? वहिनी काही बोलल्या का विरळ होत चाललेल्या डोक्यावरून? (आय मीन, केसांवरून)!!! ;)

रेवती's picture

14 Jan 2010 - 7:56 pm | रेवती

वहिनी काही बोलल्या का विरळ होत चाललेल्या डोक्यावरून? (आय मीन, केसांवरून)!!!
नाही हो, फार नाही बोलले!;)
"आजकाल आपल्या पोरानं बेशिस्त वागून अगदी वात आणलाय, तुमचे केस एवढ्यात त्यामुळेच विरळ झालेत कि काय?" असे म्हणाले होते मी!

रेवती

श्रावण मोडक's picture

14 Jan 2010 - 9:21 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... _/\_ !

विनायक प्रभू's picture

14 Jan 2010 - 5:37 pm | विनायक प्रभू

कुर्निसात

सहज's picture

15 Jan 2010 - 7:44 am | सहज

ज ह ब ह री!!!!

मीनल's picture

14 Jan 2010 - 7:28 pm | मीनल

हसू आले.
हे विडंबन आवडले.

मीनल.

अमृतांजन's picture

14 Jan 2010 - 7:41 pm | अमृतांजन

सुपर- डुपर हीट- मस्त.

jaypal's picture

14 Jan 2010 - 7:45 pm | jaypal

शाकाल खुश हुवा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्राजु's picture

14 Jan 2010 - 8:11 pm | प्राजु

___/\____
सलाम!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रभो's picture

14 Jan 2010 - 8:55 pm | प्रभो

एक लंबर

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

अविनाशकुलकर्णी's picture

14 Jan 2010 - 11:37 pm | अविनाशकुलकर्णी

गर्दकाळा वीग भारी, छान थोडा रुंद दे
जीवघेणी ही निराशा, लपवण्याला गोंद दे.
वाचुन मजा आली...........
=)) =)) =))

केशवसुमार's picture

15 Jan 2010 - 9:48 am | केशवसुमार

रंगाशेठ,
मस्त विडंबन.. चालू दे..
(काका)केशवसुमार..

प्रशांत उदय मनोहर's picture

15 Jan 2010 - 1:21 pm | प्रशांत उदय मनोहर

बर्‍याच दिवसांनी दर्जेदार विडंबन आलेलं वाचून आनंद झाला.
आपला,
(चोखंदळ) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्रशांत उदय मनोहर's picture

15 Jan 2010 - 1:21 pm | प्रशांत उदय मनोहर

बर्‍याच दिवसांनी दर्जेदार विडंबन आलेलं वाचून आनंद झाला.
आपला,
(चोखंदळ) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

मदनबाण's picture

15 Jan 2010 - 4:06 pm | मदनबाण

=)) =)) =))

जबराट...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

टुकुल's picture

15 Jan 2010 - 7:33 pm | टुकुल

खी खी खी...
मान गये रंग्यासेठ

--टुकुल

चतुरंग's picture

16 Jan 2010 - 4:55 pm | चतुरंग

देणार्‍या आणि न देणार्‍या सर्व रसिकांचे आभार!! :)

(छांदिष्ट)चतुरंग