क्रांतीताईंची सुरेख कविता 'ती' वाचली आणि ही लगेच डोळ्यांसमोर तरळलीच! ;)
ती समीप माझ्या येते, खेटुन जाते
मी स्तब्ध, बावरा लगेच निसटुन जाते
ती लेउन जाते 'अर्थपूर्ण' कपड्यांना
जागवते हृदयी भलभलत्या स्वप्नांना
ती तिच्या बॉससह गर्दित मिसळुन जाते
ती ओष्ठशलाका रेखुन अलगद रेषा
मस्कारा लावुन नेत्रपल्लवी भाषा
ती टाटा म्हणुनी बोटे हलवुन जाते
मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही
ती समोर येता मुळी बोलवत नाही
ती सहजच राखी हाती बांधुन जाते
ती रसिक, साजिरी सखी कल्पना त्यांची,
ती कविता, आराधना, साधना त्यांची,
'रंग्यास' विडंबन लगेच सुचवुन जाते
चतुरंग
प्रतिक्रिया
5 Jan 2010 - 11:15 pm | jaypal
घरी फेटा नव्हता म्हणुन टावेल ४ वेळा हावेत उडवला.
लै भारी, लै भारी (टाळ्या आणि शिट्या)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
5 Jan 2010 - 11:24 pm | प्रमोद देव
मूळ कविते इतकेच विडंबनही मस्त जमलंय.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
6 Jan 2010 - 12:26 am | टुकुल
नाद करायचा नै !!
इतक्या लवकर कस काय सुचत तुम्हाला विडंबण, भुतकाळातले लै अनुभव असे पटापट बाहेर येतात कि काय?
विडंबण झक्कास झाल हे. वे. सा. न. ला.
--टुकुल
6 Jan 2010 - 2:38 am | गणपा
जबरा रंगाशेठ..
गणपा मामा
6 Jan 2010 - 4:24 am | पाषाणभेद
तरी म्या सांगत व्हतो, की आप्ली घरची मिठभाकरच ग्वाड आस्ती, भायेरच्या इटलीनी प्वाट तर भरतच नाय पन खिसाबी खाली व्हतो.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
6 Jan 2010 - 7:28 am | क्रान्ति
=)) =D> =)) =D> =)) =D> =)) =D> =))
जबरदस्त दर्जेदार विडंबन!
क्रान्ति
अग्निसखा
6 Jan 2010 - 1:30 pm | केशवसुमार
रंगाशेठ,
एकदम फरमास विडंबन.. चालू दे..
केशवसुमार
6 Jan 2010 - 1:36 pm | श्रावण मोडक
पहिल्या तीन कडव्यांमध्ये अगदी मानवी चित्र समोर येते, शेवटाकडे कवीकल्पना ठरते...
6 Jan 2010 - 5:48 pm | फ्रॅक्चर बंड्या
जबरा....
binarybandya™