प्रस्तावना:
Behind every successful man there is a woman.
Behind every unsuccessful man there are her parents.
दुष्ट सासरा नावाचा दुष्टग्रह ज्यांच्या पत्रिकेत लग्नस्थळी ठाण मांडून बसला आहे, अशा तमाम जावयांच्या दु:खाला ही कविता नक्राश्रूपूर्ण नयनांनी समर्पित........
गोरी गोरी पान फुलासारखी छान
सासर्या तुला एक तिरडी आण.
सासर्याला उचलायला दारुड्यांची टोळी
कशीबशी रचलेली लाकडांची मोळी
मसणात बैस आता मांडुनिया ठाण
सासर्या तुला एक तिरडी आण..
सासर्याच्या ताटीवर गुलाल पसरला
घाई आणि गडबडीत कोळसा विसरला
लायटरने पेटवू रे आता तुझा कान
सासर्या तुला एक तिरडी आण..
सासर्याला जाळताना कवटी तडकली
भुतंखेतं घाबरून झाडावर बसली
लिंबाच्या झाडावर आता तुझा मान...
सासर्या तुला एक तिरडी आण...
प्रतिक्रिया
31 Dec 2009 - 11:54 am | jaypal
विडंबनास सादर
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
31 Dec 2009 - 11:57 am | विजुभाऊ
जागोमोहनप्यारेजी तुमचे सासरे नसते तर तुम्हाला सध्या जी पत्नी मिळाली ती मिळाली असती का?
अवांतरः कृपया ही कविता वहीनीना ( आपल्या धर्म पत्नीजीना) वाचायला द्या. पहा कोणाची मोळी होतेय ते.
नअवांतरः कविता अज्याबात आवडली नाही. एकदम होपलेस आहे.
31 Dec 2009 - 12:10 pm | JAGOMOHANPYARE
विजुभाऊ, विडंबन कविता घटकाभर हसून विसरण्यासाठी असते.
आमच्या धर्मपत्नीला यातील पहिल्या अम्तर्याप्र्यन्तचा भाग माहीत आहे... उरलेला भाग आता स्फुरला... तोही सांगेन...
आधीची प्रस्तावना केवळ कवितेला पार्श्वभूमी तयार व्हावी म्हणून आहे... प्रस्तावनेतही आहे...
दुष्ट सासरा नावाचा....
शिवाय यातून तमाम पुरुषजातीला शिकवण दिलेली आहे... आज का जमाईराजा कल का ससुरा होता है. उद्या आपल्याला उद्देशून असं कुणी म्हणू नये , ही काळजी समस्त पुरुषानी घ्यावी, हीच इच्छा ! :)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
31 Dec 2009 - 12:46 pm | मदनबाण
हे इडंबन वाचुन...
सदस्य क्रमांक ५४० ची आठवण आली.
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia