कालच्या मिपाच्या फडात रंगलेला 'आवाहना'चा कलगीतुरा बघून आपनबी थोडी धुळवड खेळावी म्हनून मग हा तमाशाचा बार ऊडवून द्यावा म्हनतोय! प्रेरना? तिला काय कमी मोप हायेत!!;)
कसं काय एडिटर बरं हाय का, अहो बरं हाय का ?
काल काय ऐकलं, ते खरं हाय का ?
अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, 'खोबार'वाले तुम्ही
न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, 'चाल'वाले तुम्ही
सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?
काल म्हनं तुम्ही 'खफ'ला गेला, तमाशा बघून भडकून आला
खरं काय हो एडिटर ?
प्रतिसादा ठायी, हिणकस काही, होतं काय लिवल ते खोडलंय का ?
काल म्हनं तुम्ही 'आवाहन' केलं, खरडीतलं धाग्यांत डकवून दिलं
आरंरं
केली मारामारी, कालच्या पारी, आज काय लिवायच ठरलंय का ?
काल म्हनं तुम्ही मालकांकड गेला, अन् बघता बघता राजिनामा दिला
आगं बया बया
काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, तंगड्यात शेपुट घातलंय का ?
-केसुरंगा
प्रतिक्रिया
23 Dec 2009 - 10:47 am | केशवसुमार
केसुरंगाशेठ,
लाई बारीक लक्ष दिसताय तुमच मिपावरच्या कलगीतुर्यांवर
काय बेक्कार चोपलाय..टाळ्या आणि शिट्या...
(पिठातला)केशवसुमार
माग तुम्ही विजुभै ना धुतला होता त्याची आठवण झाली
(स्मरणशील)केशवसुमार
23 Dec 2009 - 11:30 am | श्रावण मोडक
केसुरंगासेठ, जोरदार. आम्ही डोक्यावरचा फटका उडवला...
23 Dec 2009 - 2:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या डोक्यावर पटका नसल्यामुळे मी फक्त एवढीच दाद देऊ शकते:
=)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
23 Dec 2009 - 1:52 pm | प्रसन्न केसकर
लय भारी लावणी लिव्हली तुमी. चाहता झालो तुमचा. मुजरा घ्यावा.
23 Dec 2009 - 3:05 pm | नाटक्या
वाट लावली.
स्वगतः आता या धाग्यावर पण बंदी येणार.. शिरां पडली ती नाटक्या तुझ्यार, तुका किती येळला सांगला मोट्यान खरे बोलू नकोस म्हनून???
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
23 Dec 2009 - 3:15 pm | प्रकाश घाटपांडे
क्येसुरंगाचे सुडंबन यकदम झकास! हॅहॅहॅ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Dec 2009 - 4:05 pm | धमाल मुलगा
केसुरंगा,
बर्याच काळानं म्यान केलेली लेखणी तळपली की तुमची :)
येऊ द्या अजुनही.
23 Dec 2009 - 6:01 pm | विशाल कुलकर्णी
पटका उडीवला बर्का पावनं आमी.....
नाचनारीन नाय दिसली , नाय तर दौलतजादाबी केला आसता !
लै जबरा, लै जबरा ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 Dec 2009 - 6:13 pm | चतुरंग
एकदम जोर्रात इडंबन हाये!! टिट्या आणि शाळ्या....नाय नाय नाय, शिट्या आणि टाळ्या...!!!! ;)
(पैल्या रांगेतला)चतुरंग
23 Dec 2009 - 7:17 pm | बिपिन कार्यकर्ते
दंडवत...
बिपिन कार्यकर्ते
23 Dec 2009 - 8:07 pm | प्राजु
हम्म!
बरंच लक्ष आहे मिपावर तुमचं.
चालूद्या!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
23 Dec 2009 - 9:10 pm | प्रभो
येक नंबर
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
24 Dec 2009 - 1:17 pm | सौरभ.बोंगाळे
झणझणीत...