दहावीत चुकलो , बारावीत पुकलो .. आता कॉलेजात.
पोपट तिसरा
बॅकलॉग :
नाही म्हंटलं तरी ह्या राघू प्रकरणामुळे माझा मुलींच्या बाबतीत एकदमंच नकारात्मक दृष्टीकोण झाला होता. नको असल्या भानगडी!! कोणी फटाकडी दिसली की .. "व्वा" , "फिगर के व ळ अ प्र ति म " , "सुरेख " ,"केवळ एकच शब्द - खल्लास " , "शब्द संपले " किंवा गेला बाजार "मेलो , वारलो , खपलो , निवर्तलो , चचलो , पंचमहाभुतांत विलीन झालो" ह्यावर काही प्रतिक्रिया उमटत नसे. शीवा ने मार खाल्ल्यावर त्यांचा मॅटर थोडा थंडावला होता. मला हे सगळं बिंग फुटून तमाशा झाल्याचा नाही म्हंटलं तरी एक असुरी आनंद झालाच होता. वर कितीही नाकारलं तरी राघू मला आवडायची. बरेच दिवस तीचे विचार मनात येत. एक दिवस बाप्याने राघू आणि शिवा ला निगडी-मनपा बस मधे पाहिलं.सांगत होता, मस्त गुटुरगु चाल्लं होतं पब्लिकचं ! बाप्यासमोर फक्त "हॅहॅहॅ" केलं,पण आतून तिळपापड झाला होता. बरंच झालं च्यायला, नाही, ती आपली नव्हतीच. उगा स्वप्न पाहून टाईम घालवण्यात अर्थ नाही.
बारावीचा निकाल लागला ! अपेक्षेप्रमाणे पासंही झालो :) बाप्या एम्बीबीएस ला गेला न मी आपला सुमडीत इंजिनियरींग चा फॉर्म भरला. त्यावेळी आय.टी. हॉट होतं. म्हणून प्रायॉरिटी लिस्ट मधे फक्त आय.टी.च ठेऊन वेगवेगळी कॉलेजं सिलेक्ट केली. ३०% त रकाणे भरलेल्या जागांत काही नंबर लागला नाही. पहिल्या राउंड ला संगमनेरच्या अमृतवाहिणी ला नंबर लागला. पुणे कसं सोडू ? दुसर्या राऊंड ला पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनियरींग कॉलेजला अॅडमिशन घेतली. महिनाभर कॉलेज झालं असेल. एक दिवस अॅप-साय -१ चं प्रॅक्टिकल चालू होतं, मॅडम जाम खडूस होती आणि स्ट्रिक्ट होती. सारखी टर्म ग्रँट करणार नाही म्हणून धमकी द्यायची. आणि मी पण येडचाप सारखं टेंशन घ्यायचो. त्या दिवशी नेमकी जरनल आणायला विसरलो. मॅडम ने पुन्हा लेक्चर प्लस धमक्या दिल्या. :) त्याच दिवशी अॅडमिशन्स चा शेवटचा राऊंड होता. मॅडमने लॅब बाहेर काढल्यावर सीओईपी ला आलो आणि डि.वाय. मिळालं .. दुसर्या दिवशी कॉलेज चेंज :) !!
इसवीसन २००२-२००६:
पुर्वी डि.वाय. चा कँपस पिंपरीतंच होता. मॅनेजमेंट, फार्मसी, इंजिनियरींग,ग्रॅज्युएशन सगळीच कॉलेजेस एकत्र आहेत तिथे :) गर्ल्स कॉलेजही सेम कँपस मधे. इथे तर पोरींचा अगदी सुळसुळाटंच होता. नुसतं एखादा कॉर्नर पाहून बसलं की टाईमपास होत असायचा. दर दुसरी पोरगी आवडायची. दर तिसरीच्या प्रेमात पण पडायचो :) मी लेट अॅडमिशन घेतल्यामुळे मला शेवटच्या डिव्हिजन मधे टाकलं होतं. चार पाच हुशार टाळकी सोडली तर सगळेच कॅटॅगरीच्या जोरावर किंवा डोनेशनच्या जोरावर आलेली ४०-४५% वाली पोरं होती. आर्रर. असो ! सगळेच मित्र होते. पण आमच्या वर्गात मोजून ३च पोरी. त्यातली बडे बाप की बेटी. ती आपली लेव्हलच्या पोरांबरोबरंच रहायची. तो गृप कधी माझा झालाच नाही. बाकी दोघींना मतिमंद मुलींच्या कोट्यातून अॅडमिशन मिळाली असावी. =))
तेंव्हा मी एकदम सुक्का बोंबील होतो. कपडे? फॅशन स्ट्रिट झिंदाबाद ! आपला उठला गबाळ्या की निघाला :) बाकी नॉर्थ इंडियन पोरांची ष्टाईल ,बक्कळ पॉकेटमनी पाहिला की खट्टू ही व्हायचो. त्यांच्याकडे बुलेट काय न सिबीझी काय .. इथे आम्ही आमच्या "रेंजर स्विंग" वर येऊन गुपचूप पार्क करून आत पळायचो. ( "रेण्जर स्विंग" ची तुम्हाला ती अॅड आठवते का ? यॉर गर्ल .. नाऊ माय गर्ल .. तब्बल ४००० रुपयांची सायकल त्या काळात माझ्यासाठी फार फार फार मोठी गोष्ट होती. जेंव्हा ही सायकल घेतली तेंव्हा मला झोपही लागत नव्हती. रात्री लाईट चालू करून सायकल पहात बसायचो. फार जीव होता ह्या सायकल मधे. सस्पेंशन असल्यामुळे व्हिली वगैरे मारायला मजा यायची. माझ्या स्टंट्स ची सुरूवात म्हणजे रेंजर स्विंग :) पण काळ पटकन् बदलला, रेंजरस्विंग मागे पडली. आणि सिबीझीची स्वप्न पडायला लागली :) )
पहिलं वर्ष साजरे "डोंगर" दुरूनंच पहाण्यात गेलं. नको, पुन्हा पोपट नको म्हणून कधीच कोणात इनव्हॉल्व्ह झालो नाही. कॉलेजला नविन नविन अभ्यासाचा जाम मुड असे. कॉलेजाच्या रिडिंग रूम मधे भरपूर पोरी यायच्या. दोन तीन वेळा योगायोगाने एक सुंदर तरूणी शेजारी येऊन बसली.लग्गेच आवडली. तिसर्या दिवसापासून फॉलोअप सुरू. बळेच तिच्यासाठी एक दोनदा जागा वगैरे पकडून दिली. मादक स्माईल देऊन ती मला "थँक्स" पण म्हणाली . पण असाच एकदा कँपस मधून जाताना ती एकाच्या सीबीझी वर दिसली. जरा जास्तंच चिटकली होती. मागे तिसरं कोणीतरी बसायला येणार असल्याने जागा सोडली असेल, असा समजदारपणा दाखवून मी पॅडल मारलं.रिडिंग रूम मधे पुन्हा ती दिसली, मी रागातंच सिट चेंज केली. तर च्यायला.तीने फोन करून दुसर्याच कोणीतरी सोंड्याला बोलावलं. पुन्हा दोघेही रिडींग रूम मधे गुटरगु करत होते. जाऊ दे , अभ्यासाचीच चर्चा करत असतील , मी पुन्हा समजदारपणा दाखवला. आणि दुसर्या दिवसापासून रिडींग रूम ला जाणे बंद केलं. दुसर्याच सेमिस्टरला कॉलेज कँपस बदलला , आणि कॉलेज आकुर्डीला शीफ्ट झालं ! झकपक हॉल्स, नव्या कोर्या लॅब्स, एयरकंडिशन्ड् सभागृह इत्यादी आणि भलं मोठं ते कँपस पाहून मी एकदम खुष झालो. इकडे तेंव्हा पुर्ण ओसाड एरिया होता. बरीच डेव्हलपमेंट व्हायची बाकी होती. मी घरापासून कासारवाडी पर्यंत सायकल मारत जायचो :) तिथून पुढे अकुर्डीपर्यंत कॉलेज.
इकडे तिकडे "व्यनी करून लंच ला इन्व्हाईट " करण्याचे ट्राय मी तेंव्हा करायचो.पण पत्ता कट व्हायचा. बहुतेक पैशावाला नसेन म्हणून. कारण जे पब्लिक अंमळ पैशावालं असायचं त्यांच्या गृपला पोरी चिटकलेल्या असायच्या. मग सहाजिकंच आपला "सर्वसामान्य मराठी" क्लासच्या पोरांचा गृप जमला ! निलेश गरुडकर ह्याच्या खांद्यावर नेहमी बॅग असायची.पहाताक्षणी एकच नाव समोर आलं "अशोक सराफ". बास!तो एक दिवस त्याला अजुनही पोरं फक्त "अशोक सराफ" म्हणूनच ओळखतात. निल्या म्हंटलं की कोण? असं होतं. विष्णूचं विषाणू वरून व्हायरस केलं होतं. दिव्येश मिंजरोला चं डिबीएमएस मोटोरोला केलं होतं. विशल्याचा रोलनंबर ५३ होता. प्रेझेंटीच्या वेळेस सगळ्यांनी आपला रोल नंबर सांगून प्रेझेंटी लावायची पद्धत होती.विशल्या ज्या टोन मधे "फपटी त्री " म्हणत असे त्यावरून त्याचं नामकरन "फपटी त्री"च पडलं! सुरजचे पप्पा मास्तर असल्याने त्याला मास्तर नाव पडलं. रोहित हा अगदीच अब्दुल रझाक दिसायचा म्हणून त्याला "रज्जाक" हे नाव पडलं! अजुनही बर्याच जणांची वाट लावली होती. असो. ही माझी मित्रमंडळी. विषयांतराबद्दल क्षमस्व , पण हा कॉलेजातला किस्सा म्हंटल्यावर हे सोडून लिहीनं अशक्यच !
सेकंड इयर ला आम्हाला डिबीएमएस वगैरे टेक्निकल पदार्थ नविन नविन होते. त्यामुळे पोरींवर कमेंट मारायच्या तर टेक्निकल लॅंग्वेज मधेच :) कंप्युटर्स ब्रांचची एक पोरगी. चेहरापट्टी ठिकठाक पण फिगर भारी होती.
तिच्याविषयी चर्चा निघली की मी म्हणायचो... GUI एवढा खास नसला तरी Backend/Database तगडा आहे यार. एकदम ऑरॅकलंच! निम्म्या टाळक्यांना काही झेपायचं नाही. ती नुसती टेनिस कोर्टावर आडव्या सिट्स वर बसलेले लोक जसे बॉलच्या दिशेने लेफ्ट राईट माना वळवतात ना तशी इकडे तिकडे बघायची. कोणी वजनदार पोरगी दिसली की, "ए बघ रे .. तुझी मेनफ्रेम आली". बळेच एखाद्याच्या माथी असा मोठ्या कॅबिनेटचा पिसी मारल्यावर तो मोठा खट्टू होई. कोणी गावभवानी पोरगी, जी कोणत्याही कार्ट्याबरोबर फिरताना दिसे तीला USB नाव ठेवण्यात यायचं. "अर्रे वो तो USB है.. Plug & Play. उसके पिछे मत भाग .. कोई फायदा नही". तर ऑरॅकल मला आवडायची. पीएल्स मधे तसा मी कॉलेजात अभ्यासाला जायचो. ती हॉस्टेलाईड होती. एक दिवस गेलो न काही तरी अभ्यासाचं निमीत्त काढून बोललो. ह्यावेळेस डेयरींग चा ओव्हरडोसंच झाला. फटकन म्हणून गेलो. "मेरेको तुम्हे भोत दिन से ये बात बोलनी थी | तु मेरेको पसंद है ओर मै तेरेको बहोत प्यार करता हू||" . गरमागरम स्वादिष्ट पोहे समोर यावेत ,तोंडात लाळस्त्राव व्हावा आणि पहिल्याच घासाला खवट शेंगदाणा दाताखाली यावा असं तीचं तोंड झालं ..
तीला काय बोलावं ते सुचलंच नाही :) माझं डी-ग्रेड हिंदी ऐकून तीला माझी किव करावी की राग ? हेच समजलं नसावं ! मला म्हणाली "फिलहाल पढाई करो ! एग्झाम्स हो जायेंगे तो हम इस बारेमे सोचेंगे, ओके?" एवढं म्हणून माझ्या उत्तराची वाट न पहाता निघून गेली. पोरींची थेट नाही न म्हणता हाकलायची कला लै भारी असते. मनात म्हंटलं, पुढं जाऊन नक्कीच एच.आर. होणार तू :)
आणखीन एक पोरगी होती. तोंडावर सातताली मग्रुरी असायची. कोणत्या ब्रांचला होती कुणास ठाऊक. पण तीला ई&टीसी च्या पोरींबरोबर पाहिलेलं त्यामुळं ई&टीसी ला असावी असा समज ! इ&टीसी म्हंटलं की सगळे सुंदर पक्षी भरून भरून तिकडेच असायचे. आमच्या वर्गाला आम्ही "रिसायकल बीन" म्हणायचो. सगळीकडून डिलीट केलेला माल आमच्या वर्गात फेकला की काय म्हणून.ही तशी दिसायला ठिक होती. पण लाडला मधल्या श्रीदेवी सारखेच हावभाव.च्यामारी ? एवढा काय भाव खाते ? माझा एक मित्र सिव्हील ला होता. मी त्याच्या गृप मधे असायचो. झालं! एक प्लान बनवला. ती दिसली की आपापसात कुजबुजायचं आणि आपापसातंच खॅखॅखॅ करून हसायचं! नो व्हल्गर कमेंट्स, नो टिझिंग, नो स्टेरिंग, आंगलट करण्याचा तर प्रश्नच (डेरिंग) नाही. तीला काहीही एक्स्प्रेशन्स द्यायचे नाहीत. फक्त दिसली की कुजबुचायचं न हसायचं ! झालं!! रेल्वेस्टेशन ला दिसली की हसं.. कँटिन मधे दिसली की हस .. कँपस मधे दिसली की हस ! तीला ते नोटीस होईल असंच करत होतो. ती अजुन खुनशीने पाहून जायची. आणि आम्ही अजुन वेगवेगळ्या आवाजात हसायचो.शेवटी किती सहन करणार. आली एकदव टॉक्क टॉक्क हिल्स आपटत ..
"यू स्काऊंड्रल्स रास्कल्स स्टूप्प्प्पिड (हा 'प' कितीवेळा लावला होता ते माहित नाही) इडियट.. व्हाट इज धिस ? "
हे अपेक्षितंच होतं , ह्याचा ही प्लान तयारंच होता! एकेकजण "हसण्याचा" एकेक प्रकार दाखवत कटला.जणू ती तिथे नाहीच.शेवटी ती तिथे एकटीच राहीली न आम्ही दुसर्या टोकाला जमा होऊन पुन्हा कुजबुजून मोठ्ठ्याने हसलो. राग पार सातव्या आसमानात पोचला होता. दुसर्यांदाही सेम किस्सा झाला. येउन आम्हाला एकदम हायफाय विंग्रजीत शिव्यावगैरे द्यायची. शेवटी मला एकट्याला पाहून माझ्याकडे आली. ह्यावेळेस तोंडावर कसलीच घमंड नव्हती. एकदम रडवेली झालेली आली आणि चक्क मराठीत म्हणाली ..
"तुम्ही का मला त्रास देत आहात? तुम्हाला मी काही प्रॉब्लेम केलाय का ? "
मी म्हणालो ,, "नाही बॉ" ..
"मग का छळताय अस ? "
काय केलं बॉ आम्ही ? कमेंट पास केली तुझ्यानावाने ? कोणी टच केलाय ? की कोणी कुठं काही लिहून गेलाय? आम्हाला हसण्याची बंदी आहे का ?
आता ती अल्मोस्ट रडकुंडीला आली होती. तेवढ्यात तीला जा म्हणालो .. कोणी पुन्हा त्रास देणार नाही :)
थर्ड इयर ला आलो. तोपर्यंत आमच्या कँपस मधे डिप्लोमा वाले पण आले होते. त्यामुळे वर्दळ वाढली होती. नवनवीन पक्षी दिसायला सुरू झाले होते.की कासारवाडीला चढायचो. लोकलची दुसरी बोगी आणि तिसरा दरवाजा अस्मादिकांसाठी रेल्वेने आंदण म्हणून् दिला होता. पुर्ण लोकल रिकामी असली तरी आम्ही दरवाज्यातच उभे रहायचो. कोणी उपटसुंभ्या तिथे उभा राहिला तर द्याला अलगद आत ढकलून दिले जायचे. ह्या जागेसाठी दोन-तीन वेळा युद्ध पण करावे लागले. पण ते अगदीच एकहाती जिंकण्यात आले होते.धक्का देऊन कोणी जागा सोडली नाही तर बुक्का वर वेळ येत असे. असो! सांगण्याचा मुद्दा असा की पिंपरीच्या स्टॉप वर ती दिसली.तीला एकदाच पाहून आमची विकेट गुल झाली होती. ती मधल्या डब्ब्यात बसायची ! ती मला रोजंच दिसायची. बेचैनी दिन ब दीन वाढत वाढत चाललीये ! एकदम "फिकर नॉट" अॅटिट्यूड वाला मी , एखाद दिवस ती दिसली नाही तर कासाविस व्हायला लागलो. पिंपरीचा प्लॅटफॉर्म आला की डोळे तिचाच शोध घेत असायचे. दिल एकदा पुन्हा फिदा झाले होते. हजारवेळा सांगुनही मन ऐकत नव्हते. पण कधी ती कोणत्या क्लास मधे आहे ? काय करते? कशाचाही पत्ता नव्हता.
कॉलेजात डेज चे वारे वाहू लागले होते. तो साडी-दिन (मराठीत सारी-डे) होता. आम्हाला तशा ही काकुबाया पहाण्यात इंटरेस्ट नव्हता. प्रॅक्टिकल बंक मारून घरी निघालो होतो. माझ्याबरोबर माझा दिल्लीचा मित्र इंद्रजीत होता. हा साला एकदम चालू. इतक्या मैत्रिणी होत्या त्याला. कोणत्यापण पोरीशी जाऊन बोलायचा साला. त्याच्यात नक्की काय स्किल आहे ? ह्याचं मला कुतुहल वाटे. त्यादिवशी ती सकाळी प्लॅटफॉर्म वर काही दिसलीच नव्हती. म्हणून इंद्रजीत च्या बाईकवर मी घरी चाललो होतो. तर ती डायरेक्ट समोर हजर ! Oh my gosh ! Couldn't believe !!!!
ती समोर ! ५'७- ५'८" एवढी उंच तर नक्कीच होती... एकदमच काडी नाही पण थोडीशी हेल्दी .. बॉबकट का काय म्हणतात तो .. माने पर्यंत केस ! अत्तिशय निरागस चेहरा ! मोठ्ठे डोळे .. रेखीव भुवया (हे आयब्रो वगैरे भानगड तेंव्हाच आम्हाला कळली :D) लिप्स्टिक मुळे अजुनच मादक वाटणारे ओठ , हलकासाच मेकप तिचं सौंदर्य कैकपटींनी इंटिग्रेट करत होता. काळ्या रंगाची कसलीशी डिझायनर साडी न चक्क चक्क बॅकलेस ब्लाऊस !! मॅन्न !! काँफिडंटंच झालो मी. मला ती आवडते म्हणून मी इंद्रजीतला बोललो होतो.
तो म्हंटला "चल ना .. जाके बात करते है .. मुझे पता है तु नही जाएगा "
.. "अर्रे नही रे भै .. मेरेको डर लगता है .. साला गुस्सा वुस्सा आया तो ? " मी माझ्या डी-ग्रेड हिंदीत !
"साले कुछ भी कर लेकीन हिंदीमे मत बात कर ! "
मला अलमोस्ट खेचत खेचतंच तो घेऊन गेला... तीला सरळ म्हणाला " Excuse me miss !!"
तीने वळून पाहिलं "Yes !!" मला तीचा आवाज गोड वाटला (हसू नका आता,प्रेमात माणसाला सगळंच गोड वाटतं म्हणतात ..)
"You are looking absolutely fantastic and gorgeous , I think you look the most beautiful amongst all here " - इंद्रजीत साहेब चालू झाले ..
ती त्यावर अगदीव भाव खाऊन खुश वगैरे होऊन हसली " Oh ! Thanks "
मी आपला बॅकग्राऊंड मधे नाचणार्यांसारखा मागून नुसता हो नाही करत होतो .. बोलायचं बरंच होतं . पण जमतंच नव्हतं !
इंद्रजीत साला .. फिल्मी डायलॉग मारत होता .. "आप बहोत सुंदर हो .. लेकीन क्या है ना.. सुंदरता छुपाने मे होती है.. दिखाने मे नही " ... च्यामारी .. माझंच कधीकाळी त्याला ऐकवलेलं तत्वज्ञान (माझं नसलं तरी) तो तिच्यासमोर सरळ सरळ कॉपी पेस्ट करत होता. .. त्यावर ती "हां" इतकंच म्हणाली.. आणि मैत्रिणींबरोबर निघून गेली.. नाही म्हंटलं तरी इंद्रजीतनं आपलेच डायलॉग मारून दाद घ्यावी हे रुतलं होतं .. नेक्स्ट डेच !! लोकलला ती दिसली.
आज बोलायचंच !! अकुर्डीला उतरल्यावर तीच्यासाठी थांबलो. छातीत धडधडतंच होतं .. पण मनाचा पक्का हिय्या केला होता. थांबलो ! तीच्याबरोबर एक मैत्रिण होती ऑफकोर्स रिमोरा !!
मी हाय केलं ! त्यावर तीनं डोळ्यांनीच .. कोण ? म्हणून विचारलं ! हिंदी टाळत सरळ इंग्रजी वर आलो...
"Remember ? yesterday we spoke in da college ? About the SAREE ? remember ? "
"Oh ! ya ! I got it I got it !"
तीचं इंग्लिश माझ्यापेक्षाही फ्ल्युएंट आणि स्पष्ट होतं ! पण मी आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.
" So ! How are you doing ?"
" 'm fine !! "
"May I know your name please ? "
" I'm Richa "
खल्लास !! तिच्या दिसण्यापेक्षाही मी तिच्या बोलण्यानेच प्रभावीत झालो ;)
मी आपसुकच "Me Tarzan" म्हणत शेकहँड साठी हात पुढे केला. तिनेही अगदी साहज शेकहँड केलं ! काय माहीत .. सर्र्कन अंगावर काटाच आला ! मी शहारलो ! तो हात सोडूच नये असं वाटत होतं :) आपल्यात एवढी हिम्मत कुठून आली? ह्याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं ! मी तसाच हात पकडून होतो
"हॅलो..." -- तीने झटका देत म्हंटलं .. मी उगाचंच थोडं अपराध्यासारखं वाटल्यासारखं करत हात सोडला.
स्टेशन ते कॉलेज ह्या वाटेत मी तिची जनरल माहिती विचारून घेतली... ती ई&टीसी डिप्लोमा करत होती. दुसर्या वर्षाला होती. डिप्लोमा कॉलेज ह्या कँपसला शिफ्ट झाल्यामुळे ती इकडे. मधे मधे ती रिमोरा ला ही एंटरटेन करत होती. येतांना माझं ती सोडून कुठेही लक्ष नव्हतं ! पण वर्गात आल्यावर मात्र कळलं की सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच होतं!! पोरांनी आल्याआल्या .. कल्ला केला .. टार्याआआआआआआआ .. एक जण केकाटला ! लेका काँग्रॅट्स .. पार्टी पाहिजे.. म्हंटलं, लेकानो ... "गांव अभी बसा भी नही .. और आ गये लुटौरे , कसली पार्टीबे ? "
"बास्स गा .. बास्स गा !! साल्या सगळ्यात भारी फटाका पटवलायेस " वाक्य तोडंत .. टोंणग्या ... आज कुठे बोललोय .. लगेच माझं बस्तान बसवून मोकळा ? बीसी... त्या दिवशी जो नाही तो येऊन माझ्याशी बोलत होता .. च्यायला .. माझी स्टार व्ह्याल्यूच वाढली होती.
आईस ब्रेक झाला होता. आता जास्त धास्ती वाटत नव्हती. पण ती उत्सुकता ते थ्रील .. काही वेगळंच.गेला आठवडा ती रोजंच भेटत होती. मधेच .. तीने एक दिवशी त्या रिमोरा ला जायला सांगितलं न .. मला किती आनंद झाला .. म्हंटलं टार्या .. भाड्या आज स्वत:लाच पार्टी दे... तुझी साडेसाती दुर झाली बघ ! ही हळूहळू चालायची ! सगळा लोंढा पुढे निघून जायचा न ती न मी मागे राहायचो ! दोन आठवड्यात मी एकदम स्टार झालो होतो. आमच्या गृपच्या बाहेरची पोरं पण येऊन हाय बाय करायला लागले. स्वतःहून बोलू लागले. एक दिवस तिला कँटीन ला घेऊन गेलो . आमचा गृप आलरेडी तिथेच होता. पण त्यांना एवढीशीही ओळख न दाखवता मी तीला कोपर्यातल्या टेबल वर घेऊन गेलो. एरव्ही पॅटिस साठी ही कधीतरीच पैसे काढणारा मी , तिच्यासाठी चिकू शेक काय , व्हेज सँडविच काय .. व्हेज बर्गर काय ? च्यायला ह्या उच्चभ्रु पदार्थांसाठी मी स्वतः खायचं असलं तरी पैसे खर्चं करेल असं वाटलं नव्हतं ! तब्बल ५५ रुपये म्हणजे आठवड्याचं नाष्ट्याचं बजट बोंबललं होतं ! पण ते पैसे पुर्ण वसूल वाटत होते. कारण पलिकडेच बसलेला "हलकटांचा समुदाय " इनो वर इनो पीत होता. त्यादिवशी मी स्वतःला एकदम "स्टड" "हंक" वगैरे बिरूदं लावून घेतली. कॉलेजात पोरगी बरोबर फिरलं की कशी कॉलर ताठ असते ब्यँडी..
एक दिवस मी तिला म्हणालो .. "Do you have some time ? may be an off lecture ?"
"Why is that for now , Don't kid me you want to draw my sketch " इंप्रेशन मारण्याच्या प्रयत्नांत मी तीला माझी चित्रकला दाखवली होती. त्यावर ती चांगलीच इंप्रेस झाली होती. आणि एकदा तिला स्केच काढण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
"Yeah ! I m in mood of kidding .. Are you free ? "
ती हो म्हंटल्याबरोबर उड्या मारतंच वर्गाकडे पळालो .. त्याघाईत गुढग्याला पिलरचा कोपरा लागला न गुढगा चांगलाच हर्ट झाला होता. लगडणे लपवण्याच्या नादात वर्गात आलो. दुपारी लंच ब्रेक नंतर रिडींग रूम मधे गेलो. ती समोर बसली. सरसर ड्रॉईंग करत होतो. ती मुद्दाम नखरे दाखवत कधी नाक मुरड कधी ओठांचा चंबू कर कधी अँगल चेंज कर . असली नाटकं करत होती. तिला म्हंटलं .. "Madam , will you please seat steady ? I don't use eraser, & it's last page! Please don't screw up !" लटकाच राग दाखवत मला तीने जीभ दाखवली ! या खुदा ! असंच .. अशीच ड्रॉ करायचं आहे .. ड्रॉईंग पुर्ण झालं !! अगदीच हुबेहुब ! ती खुष झाली ! हक्काने ते पान तीने फाडून घेतलं ! डोक्यावर एक टपली मारली .. आणि म्हणाली "I liked that " ...
"I loved that " म्हंटली असती तर काय बेंडबाजा आणला असता का लगेच ?
१४ फेब्रुवारी २००४ :
प्रत्येक होतकरू प्रेमवीराचा सर्वात आवडता दिवस. आज मी माझं लक्की शर्ट घातलं होतं .. कालंच कटिंग,शेव्ह वगैरे तयारी करून शक्य तितका स्मार्ट बनून लोकल पकडली !! पिंपरी स्टेशन वर ती दिसली. मी हात केल्यावर तिनंही हात केला, मी रोमांचित झालो. आकुर्डी स्टेशन आज जरा जास्तंच लांब वाटत होतं ! लोकल थांबण्याआधीच उडी मारली. तिला गाठले. ब्रिजच्या दुसर्या साईडने जाऊयात का ? रिमोरा ला म्हंटलो .. तु जा गं !! रिझल्ट लागला होता. २ सब्जेक्ट्स उडाले होते. एग्झाम फी चे १२०० रुपये खिशात होते. :) म्हंटलं .. आज कॉलेजला नको जाऊयात !
ती म्हणाली "का ?" .. मनात म्हंटलं .. "नाऊ ऑर नेव्हर .." ..."आय ... लव्ह यू सो मच .. डू यू ? "
मला वाटलं जर हो असेल तर हो म्हणेल .. आणि नसलं तर रागाने निघून जाईन .. जास्तितजास्त काय ? कान लाल होतील. पण ह्यातलं काहीही झालं नाही .. ती त्यावर इतकं सहज हसली की .. तीला हे माहित होतं ! मी मुर्खासारखं पहातंच राहिलो.
"टारू , Look I like you , and you make me laugh a lot , you will get any girl you want ! you are a nice guy "तीच्या तोंडातून एक एक शब्द निघत होता.. आणि माझा पत्यांच्या बंगल्याचा एक एक पत्ता खाली पडत होता. ... मी म्हणालो "Any girl ? then why not u ?"
ती - " I'm engaged already ! I have a boyfriend!! Or else .. "
तीचं वाक्य तोडत म्हणालो .. इतके दिवस हे काय मग ? मी त्याला कधी पाहिला नाहीये .. तर कळलं की ते इयर डाऊन झालेत .. मी तिला "असो " म्हंटलो आणि त्यानंतर कधीच भेटलो वा बोललो नाही. दिसायची ... पण मी नजर नाही द्यायचो. एकदा तिनी ... कँट वी बी फ्रेंड्स अॅटलिस्ट ? म्हणून जखमेवरची धपली काढली. पण मी चक्क तीला इग्नोर करत निघून गेलो.
हे आमचे बाप्याच्या रूमवरचे दिवस होते. बाप्या न मी दोघेही दिवसरात्र "मेरे नैना .. सावन भादो.... "वगैरे टाईपची गाणी ऐकत घालवायचो. पीएल्स जवळ आल्या .. अभ्यातात डोकं खुपसलं .. सेमिस्टरही निघून गेली. त्यानंतर ती कधीच दिसली नाही. तिच्या वर्गातला एक जण माझ्या मित्राचा कझिन होता. त्याने अलिकडेच एक न्युज दिली की तिचं लग्न झालं , पण बॉयफ्रेंड बरोबर नाही !!
समाप्त
लिहीता लिहीता सगळंच आठवत होतं त्यामुळे लांबी न कळत जास्त झाली आहे. प्लिज बेअर विथ मी!
प्रतिक्रिया
3 Dec 2009 - 1:35 am | घाटावरचे भट
ट्याग बंद केला. पोपट ३ पण भारी...
3 Dec 2009 - 1:39 am | प्रभो
कॉलेज...
काय दिवस होते ते आपल्या कॉलेजचे टार्या......मला तर गानू मॅडमची आठवण आली... एवढी सुंदर मॅडम आणी सिविल शिकवायची..मला आठवतय कॉम्प ला असून थर्ड ईयर पर्यंत आम्ही सिविल चे लेक्चर करायचो ते....उगाच पाणी प्यायला तिसर्या मजल्याच्या एका टोकाच्या कॉम्प लॅब पासून दुसर्या टोकाच्या तळमजल्यावरील सिविल लॅबला जायचो...लै भारी क्रश होता तो..
आणी दुसरा क्रश होता तुझ्या वर्गातील एम पी वर.... :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
3 Dec 2009 - 1:48 am | टारझन
येस्स मॅन... गाणू मॅडम ला कोण विसरेन ? च्यायला ... एम-१ च्या पेपर ला रिकामा होतो .. आणि सुपरव्हिजन ला गाणू मॅम .. पुर्ण तीन तास निरिक्षण चालू होतं .. :) फार म्हणजे फार म्हणजे फार ..... जाऊ दे .. इट्स फार फार अवे नाऊ !!
आमचं लेक्चर तो शहापुरे घ्यायचा ... कोण बसायचं नाही त्याच्या लेक्चरला ... एक दिवशी त्याच्या ऐवजी गाणूमॅम लेक्चरला .. तर साला .. आमच्याच काय .. बाकी डिव्हिजनची पोरं पण लेक्चरला ... बसायला जागा नाही !!
बाकी ती पी.एम. एकदमंच बाळ होतं रे .. काय तुझे पण क्रश एकेक.. काय क्रश करायचा विचार होता काय बे ?
3 Dec 2009 - 4:51 am | चतुरंग
एक जबराट मॅडम होत्या! त्या देखण्या नव्हत्या पण फारच आकर्षक होत्या. त्यांच्या पर्सनॅलिटीत एक वेगळीच जादू होती आणि त्यावेळच्या त्या अर्धवट वयात ते सगळंच भारी वाटायचं!
मुलं आपल्यावर लाईन मारतात हे त्यांनाही चांगलंच ठाऊक होतं. त्याही नटण्याथटण्यात अजिबात कमी करायच्या नाहीत आणि आम्हीही इंग्लिशचं एकही लेक्चर कधी चुकवायचो नाही! सारख्या शंका विचारुन तास संपणार कसा नाही ह्याचा प्रयत्न असे! ;)
(इंग्लिशची आवड असलेला)चतुरंग
3 Dec 2009 - 12:23 pm | विशाल कुलकर्णी
टार्या.... काय रे हे तुझ्या वाट्याचे भोग? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
3 Dec 2009 - 1:52 am | श्रावण मोडक
उत्क्रांतीवादावर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी या लेखमालेचे वाचन करावे!
काय, टारू बरोबर का?
3 Dec 2009 - 2:35 am | पाषाणभेद
वा छान लेखन.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
3 Dec 2009 - 4:10 am | संदीप चित्रे
इथून तिथून थोडेफार सारखेच :)
'दि मोअर यू राईट पर्सनल; दि मोअर इट बिकम्स युनिवर्सल' हेच खरं ('व.पु' झिंदाबाद !!)
3 Dec 2009 - 4:46 am | चतुरंग
आमचे हॉस्टेलचे दिवस आठवायला भाग पाडलेस रे बाबा!!
एकेक लफडी आणि ती निस्तरताना झालेल्या गोच्या!! ;)
(जूना अने जाणीता)चतुरंग
3 Dec 2009 - 7:36 am | शेखर
एकेक लफडी आणि ती निस्तरताना झालेल्या गोच्या!!
येऊ द्या ना एखादी फक्कडसी लेख मालिका त्या लफड्यांवर आणी गोच्यांवर
3 Dec 2009 - 11:11 am | जे.पी.मॉर्गन
कॉलेज डेज ची आठवण करून दिलीस रे बाबा. त्यातून आम्ही तर म्याक्निकलची पोरं... मग काय विचारता? जगातला फालतुपणा केलाय... मित्रांची आणि पोरींना ठेवलेली नावं सुद्धा किती सारखी आहेत ! तुझ्या तिन्ही लेखांमधला हा सर्वांत जास्त आवडला !
3 Dec 2009 - 6:33 am | हर्षद आनंदी
GUI एवढा खास नसला तरी Backend/Database तगडा आहे यार. एकदम ऑरॅकलंच!
=)) =)) =))
कोणी वजनदार पोरगी दिसली की, "ए बघ रे .. तुझी मेनफ्रेम आली".
=)) =)) =)) =))
कोणी गावभवानी पोरगी, जी कोणत्याही कार्ट्याबरोबर फिरताना दिसे तीला USB नाव ठेवण्यात यायचं. "अर्रे वो तो USB है.. Plug & Play. उसके पिछे मत भाग .. कोई फायदा नही"
=)) =)) =)) =)) =)) =))
टार्या सुसाट सुटलाय..
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
3 Dec 2009 - 6:59 am | रेवती
हा कसला तिसरा भाग?
हे तर सगळं पक्षी संग्रहालयच समोर आणून ठेवल्यागत वाटतय!
पण आता एवढा मोठ्ठा भाग लिहिलायस तर 'चांगला झालाय' असं तरी म्हणते.:)
रेवती
3 Dec 2009 - 7:19 am | श्रीयुत संतोष जोशी
लै भारी हो टारुशेठ.
हे असं ब-याच जणांच्या आयुष्यात घडतं.काही जण त्याची आठवण काढत आयुष्यभर कुढत बसतात पण झालं ते झालं असं म्हणून ते शेअर करायचं हेच खरं जिंदादिल असण्याचं लक्षण.
एकदम सही.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
3 Dec 2009 - 7:33 am | सहज
नेहमीसारखाच टारझनस्पेशल लेख.
आता लवकर समझो हो ही गया होउन जाउ दे!
3 Dec 2009 - 8:22 am | चित्रा
बहुतेक सर्व चुकीच्या मुली निवडण्यात तुमचा हातखंडा होता असे दिसते आहे. :)
राघू आणि ही रिचा का कोण तिच्या बाबतीत पोपट झाल्यामुळे खरे तर सुटका झाली असे वाटायला हवे. असो. लेख नेहमीप्रमाणेच पारदर्शक.
3 Dec 2009 - 8:37 am | प्रमोद देव
"माझ्या प्रेमाचे तीन पोपट".... तीनही लेख बारकाईने वाचले....पण शेवटपर्यंत ती टारुशेटची 'प्रेमा' कोण आणि तिचे ते 'तीन पोपट' ह्याचा अजिबात उल्लेख दिसला नाही. :D
त्याबद्दल टारुशेठचा....आपलं पोपटरावांचा जाहीर निषेध.
बाकी हा मुलगा इतकं 'छाण' लिहू शकतोय.....तर मग उगाच दुसर्यांच्या नकला कशाला करतो हा प्रश्न पडलाय. :?
सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)
3 Dec 2009 - 9:17 am | महेश हतोळकर
मस्त लेखमाला. आवडली.
बाकी हा मुलगा इतकं 'छाण' लिहू शकतोय.....तर मग उगाच दुसर्यांच्या नकला कशाला करतो हा प्रश्न पडलाय.
मला पण. टार्या आजून ओरिजीनल येऊदे. (नक्कला असतील तरी चालतील).
3 Dec 2009 - 9:05 am | llपुण्याचे पेशवेll
टार्या धमाल (मुलगा नव्हे)लेख. छाण वाटले. आमचा पोपट झालेला नसला तरी पोरी बघण्याचे दिवस आठवून गेले. आमचे कॉलेज 'गुजराथी केळवणी संघ'(चायला काय पण नाव होतं) यांचे कॉलेज होतं. त्यामुळे ओघानेच गुजराथी मुलींचा (आम्ही पेढे म्हणायचो) भरणा अधिक. आमच्या वेळेला कॉलेजात 'गुजराथी पटाव गरिबी हटाव' असे घोषवाक्य होते. या सर्वांची आठवण झाली.
असेच छान लिहीत रहा.
आणि हो हे सांगायचंच राहीलं. रेंजर स्विंग वर आमचाही फारच जीव. आमची बीएसए एसएलार फोटॉन हिच्यावरही फार जीव होता. तिला गिअर लावून पळवली की कर्वेरोडवर रिक्षालाही मागे टाके. पण तिने आमच्या वाढत्या वजनामुळे जीव टाकला व फ्रेम मोडून आमच्या प्रेमाचा अंत झाला. त्यानंतर ही 'रेंजर स्वींग' माझ्या आयुष्यात आली ती कायमची. ती अजूनही माझ्या धाकट्या चुलत भावाकडे आहे आणि त्याला ती अजूनही साथ देते. या आठवणींमुळे मी अंमळ हळवा झालो. असो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
3 Dec 2009 - 9:14 am | विंजिनेर
अरेरे.. पेशवे पूर्वी हत्तीवरून फिरायचे, अबलख घोड्यावरून अटकेपार स्वारीवर जायचे. हल्ली सायकल वापरावी लागते म्हणजे फारच वाईट.
पूर्वीचं पुणं राहिलं नाहि.. पूर्वीचं पूणं राहिलं नाही :(
ह.च. घ्या..
(अर्धा शहाणा)विंजिनेर
3 Dec 2009 - 9:29 am | विजुभाऊ
टार्या मस्त लिवलयस रे.
भालचम्द्र नेमाड्यांच्या "कोसला" ची आठवण झाली.
लोकांना नवीन नावे देण्यात तू त्या काळापासून प्रगत आहेस. हे नव्याने कळाले.
झ्याक लिहितो आस तू :)
टारुश्री चा फॅण.....
काजूभाऊ चहा
3 Dec 2009 - 10:03 am | निखिल देशपांडे
टारोबा...
तिसरा भाग पण चांगलाच जमला आहे हो...
एकदम कॉलेजच्या वातावरणात घेउन गेलात..
आमचे आणी आमच्या मुळे झालेले मित्रांचे पोपट डोळ्यासमोर आले.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
3 Dec 2009 - 10:42 am | पिवळा डांबिस
लेखनशैली छान आहे...
तीनही भाग चांगले लिहिले आहेत....
पण लेका टार्या, तिच्यायला, हे तुझ्या प्रेमाचे पोपट की तुझ्या वासूगिरीचे पोपट रे?
च्यामारी, दिसली पोरगी की पाघळला, दिसली पोरगी की पाघळला....
उगीच नाही त्या पोरींनी तुला शेंड्या लावल्या....
पोरींना असल्या लोकांचा वास दहा मैलावरूनही येतो....
ये एकदा माझ्याकडे, तुला 'सकळ शहाणा' करून सोडतो!!!!!
:)
3 Dec 2009 - 11:02 am | प्रदीप
बेअर विथ मी?
अहो, फार छान लिहीलंय तुम्ही, अगदी दिलखुलास. तिन्ही भाग आवडले, त्यातील जोश, निरागसता, आणि सर्व टर्मिनॉलॉजीसकट.
3 Dec 2009 - 11:08 am | ज्ञानेश...
मोडक म्हणतात त्याप्रमाणे- 'इव्होलुशन' आहे खरे!
टार्या, अंमळ नॉस्टाल्जिक केलेस हो! झक्कास लेख.
मला व्यक्तिशः पहिला 'पोपट' (खरं तर तो पोपट नाहीच..) जास्त आवडला. बाकीचे दोन क्रश वाटले.
असो.
एकंदर पिंपरीच्या 'ग्रीन' कॅम्पस मधे आपण एकाच वेळी होतो तर! B)
3 Dec 2009 - 11:39 am | बिपिन कार्यकर्ते
स्ट्यांडिंग ओव्हेशन !!!!
हे ओव्हेशन, तुझ्या उद्योगांबद्दल नव्हे रे... ते तर बहुतेक सगळेच करतात. पण तू साधं सरळ आणि ओघवतं लिहिलं आहेस. अर्थात, हे माहित आहेच, पण हे प्रांजळ आत्मकथन ते परत एकदा अधोरेखित करून गेले.
अवांतर: बाकीचे उद्योग कमी करा. (अजिबात बंद नका करू (दॅट्स व्हॉट मेक्स यु टार्या)... पण कमी करा.)
बिपिन कार्यकर्ते
3 Dec 2009 - 11:52 am | ब्रिटिश टिंग्या
आता संपादककाकांनीच गो अहेड दिल्यावर काय चिंता?
सुरु करा धुडगुस! :)
3 Dec 2009 - 1:46 pm | नंदन
बिकाकाकांशी सहमत आहे. आमचेही स्ट्यांडिंग ओव्हेशन!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Dec 2009 - 12:03 pm | सुमीत भातखंडे
तिन्ही पोपट भारी
3 Dec 2009 - 12:11 pm | sneharani
हा भाग देखील छान झालाय.
बाकी कॉलेजला असताना तुझं इंग्लिश अगदी सुपर होतं वाटतं.
3 Dec 2009 - 12:11 pm | समंजस
झक्कास होते तिन्ही पोपट
3 Dec 2009 - 12:52 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त्च.
3 Dec 2009 - 1:27 pm | प्रसन्न केसकर
टार्या. तीन दिवस छान नॉस्टॅल्जिक मूड मधे गेले. धन्यु. माझ्याकडुन तुला एक पार्टी लागु झाली रे. केव्हा हवीये ते फक्त बोल.
3 Dec 2009 - 1:41 pm | अवलिया
छान !
--अवलिया
3 Dec 2009 - 2:14 pm | गणपा
भन्नाट
वरील सर्वांशी सहमत.
असच ओरिजीणल मटेरीयल येउदे ;)
-माझी खादाडी.
3 Dec 2009 - 2:46 pm | jaypal
आपले सगळे आवडले
101% A1
पण खरं सांगतो झालेला पाहुन वाईट ही वाटले. लेखन शैली आवडली.
3 Dec 2009 - 3:43 pm | धमाल मुलगा
आधी आपली भेट झाली असती तर तुला हे सोसावंच लागलं नसतं रे!
येक से येक फॉर्म्युले दिले असते ;)
-(रिटायर्ड कर्नल) ध.
बाकी, तुझ्या लेखाबद्दल काय बोलु? चल तुला एक आख्खी जिवंत कोंबडी सप्रेम भेट :) खा कशी खायची तशी! क्क्काय?
3 Dec 2009 - 6:24 pm | स्वाती२
मस्त लेखन! आमच्या होस्टेलला या रिचाचा नमुना होता. एंगेजमेंट काय लग्नाची तारीखही ठरली होती. त्या बापड्याला काही पत्ता नव्हता. जर्नल्स लिहिण्यापासून सगळी हमाली करायचा वर हॉटेलिंगचा खर्च वेगळा.
3 Dec 2009 - 7:11 pm | क्रान्ति
पोपट [पक्षी लेख ] आवडले रे टारू. समोर बसून किस्से सांगावे इतके सहज लिहिलेस. असाच लिहित रहा. :)
क्रान्ति
अग्निसखा
3 Dec 2009 - 8:09 pm | मीनल
बाकी हा मुलगा इतकं 'छाण' लिहू शकतोय.....तर मग उगाच दुसर्यांच्या नकला कशाला करतो हा प्रश्न पडलाय.
मला ही असच वाटतय.
ही लेखमाला आवडली. प्रामाणिक लेखन आवडल.खूपदा हसू ही आल.
तूला तूझी `ती` जेव्हा मिळेल तेव्हा ही लेखमाला जरूर वाचायला दे .
तीला `ऑल क्लिअर नाऊ` ह्याची खात्री ही होईल आणि `चवथा` होण्याच टळेल.
तूला शुभेच्छा.
मीनल.
3 Dec 2009 - 8:51 pm | टारझन
हॅहॅहॅ .. भेटलीये हो कधीचीच :) पण मी हे भाग लिहायला घेतल्यावर "तिच्या"वर सोडून "त्यांच्यावर" लिहीतोय म्हणून लै इमोसनल अत्याचार सहन करावा लागला आहे :)
हॅहॅहॅ .. बाकी आम्ही पुप्याच्या कॉलेजातलं "गुजराथी पटाव .. गरीबी हटाव" हे तत्व अगदीच पाळलंय :)
असो ! व्यनि तुन बर्याच जणांनी एकंच प्रश्न केला .. हे सगळं खरं आहे की पुड्या सोडल्या आहेस ? तर त्या सर्वांना एकच उत्तर .. "मी लिहीलेलं माझे मित्र वाचत असतात हा ही लेख त्यांनी वाचलाय ह्यात शंका नाही. आणि मी अजुन इमॅजिनरी लिहायला शिकलो नाहीये. "
सर्व रसिक लोकांचे आभार मानतो. क्रम आणि पात्र तीच असली तरी प्रत्येकाचं सेमंच असतं ! ह्या निमीत्ताने एखाद्या रात्री लेख वाचून पब्लिक हळूच गोड हसत स्वप्नरंजन करत इतिहासात हरवलं असेल ह्यातच लेखकाचे यश आणि खुशी आहे. लिहायला सुरूवात केली तेंव्हा पब्लिकला ते एवढं रुचेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं , पण आम्ही स्वांतसुखाय का काय ते .. तसलं लिहीत होतो. लिहीता लिहीता खंडच पडले :) तरीही ते आपण पुर्ण शेवटापर्यंत वाचलेत ( :) )
मोग्यांबो खुश हुवा.
तीसर्या पोपटाच्यावेळेस आमचा "क्राईम मास्टर गोगो" झाला होता. "हाथ को आया मुह ना लगा" म्हणून.
'ण' चा 'न' आणि 'न' चा 'ण' करण्याचा इतिहास फार जुणा आहे, ते होतं ते मधल्या बोटाचं हाड अंमळ मोठं झाल्यामुळेच .
- टारझन
4 Dec 2009 - 11:56 pm | सुहास
हॅहॅहॅ .. भेटलीये हो कधीचीच
अभिनंदन हो टारझनराव..! बाकी लेख सॉल्लिडच आहेत..
क्रम आणि पात्र तीच असली तरी प्रत्येकाचं सेमंच असतं ! ह्या निमीत्ताने एखाद्या रात्री लेख वाचून पब्लिक हळूच गोड हसत स्वप्नरंजन करत इतिहासात हरवलं असेल ह्यातच लेखकाचे यश आणि खुशी आहे.
अगदी बरोबर..! असेच लिहीत जा..!
--सुहास
3 Dec 2009 - 9:30 pm | भोचक
टार्या, तिनही भाग छान जमलेत. अस्सल अनुभव नि तुझी लेखनशैली यामुळे मजा आली. विडंबनाच्या पलीकडे जाऊन कधीतरी 'गंभीरपणे' असे लिखाण कर.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
3 Dec 2009 - 9:43 pm | श्रद्धा.
टारझन खरच सुरेख लिहिले आहेस तु....लिहिण्यातील प्रामाणिकपणा जाणवतोय...
3 Dec 2009 - 11:06 pm | मीनल
१] मुलींवर लाईन टाकणे हा फारसा न बोलला जाणारा विषय. म्हणजे आपापल्या ग्रुपमधे, मित्रांमधे बोलतात. दुस-याच्या बद्दलही बोलतात .पण असे स्वतः बद्दल फार कमी लोक सर्वांसमोर सार्वजनिकपणे बोलतात. ते तू केलेस.
२]ते `असभ्य` गणले जाणारे अश्या खुमासदाररितीने लिहिले आहे की ते जराही तसे वाटले नाही. त्या अपरिपक्व वयात ते स्वाभाविकच आहे अस वाचकाला नक्कीच वाटल असाव. ते ज्या परिपक्वतेने लिहिली आहे तेच या तिन्ही भागाच्या यशाचे कारण असावे.
३]त्या वयातील भाषा, विचार,वागणूक आपण सर्वांनी पाहिलेली,अनुभवलेली आहे म्हणूनच हे लेख आवडले असतील.
४]ते वय उलटून गेल्यावर पुन्हा बारिक सारिक लेखनातून ते वय वाचकासमोर आणण तस अवघड आहे.
तू तूझ्या लेखनाचा दर्जा खूप उंचावला आहेस. आता तूझ्या पुढिल लेखनाबद्दल अश्याच अपेक्षा वाचकाने करणे ही त्यांची चूक नसेल.
तीनदा पोपट होऊनही चवथ्यांदा यशस्वी झालास हे आत्ताच कळले. पण त्यासाठी काय काय आणि कसे कसे केलेस हे वाचायला आवडेल.
`प्यार किया नही जाता, हो जाता है `अस कुठेसे ऐकलेल आठवतय आहे. ;)
मीनल.
3 Dec 2009 - 11:45 pm | मनिष
लै भारी. सगळे भाग आवडले...:)
4 Dec 2009 - 12:02 am | धनंजय
उलट्या क्रमाने पोपटकथा वाचल्या असत्या, तर शेवटी रडायला आले असते. या क्रमाने हसत-हसत तिसरा पोपट उडाला.
4 Dec 2009 - 9:36 pm | अनिल हटेला
तीन्ही भाग एकदम वाचले...
हा भाग जास्त आवडला..
थोड्या फार फरकाने ,सर्वांच्या आयुष्यात असे पोपट बनण्याचे प्रसंग आलेले असतात..आता परयंत वाटायचं की आस्मादीक एकटेच किल्ला लढवत होते,पन तुझे लेख वाचल्यावर जाणवले की सचिन नंतर सेहेवाग देखील आहेच..:-)
असो....
बैलोबा (पोपटराव) चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
4 Dec 2009 - 11:57 pm | भडकमकर मास्तर
मी आपला बॅकग्राऊंड मधे नाचणार्यांसारखा मागून नुसता हो नाही करत होतो .. बोलायचं बरंच होतं . पण जमतंच नव्हतं !
बाप्या न मी दोघेही दिवसरात्र "मेरे नैना .. सावन भादो.... "वगैरे टाईपची गाणी ऐकत घालवायचो.
उत्तम..
5 Dec 2009 - 1:06 am | शेखर
टार्या,
काही काळापुर्वी तु एकदा मिपावर एका मुलीच स्केच डकवल होतस, ती च का ही ?
कुणाचा ही पोपट होणे हे वाईट आहे. तुझा ३ वेळा झाला हे वाचुन तर फारच वाईट वाटले. पण पहिला क्रश हा तुझ्या मनात कायम असेलच कारण पहिला क्रश कोणीच विसरु शकत नाही. मनातल्या कुपीत कुठे तरी कळ अजुनही उठत असते, तुझ्या ही उठतच असेल कारण त्या शिवाय का सगळे डिटेल्स अजुन ही ताजे आहेत.
असो... लेखन शैली बद्दल बोलायचे तर शंबर नंबरी सोने...
(५० वी प्रतिक्रिया :) )
5 Dec 2009 - 7:33 am | अजय भागवत
प्रकाश नारायण संत ह्यांच्या "वनवास" ह्या पुस्तकाची आठवण आली. तुम्हीही वेळ मिळाल्यास आवर्जुन वाचा.
5 Dec 2009 - 9:27 am | विनायक प्रभू
लेख
5 Dec 2009 - 10:04 am | वेताळ
एकदम कॉलेजात घेवुन गेलास.आमचे पण बरेच पोपट झाले आहेत्.त्यामुळे वाचताना वाटत होते ह्या लेकाला माझे कॉलेज लाईफ कसे काय कळाले.... =))
एकदम झक्कास........
कॉलेज लाईफ म्हणजे आयुष्यातील सुवर्ण क्षण असे माझे तरी मत आहे.
वेताळ
5 Dec 2009 - 12:03 pm | ऋषिकेश
पूर्ण पोपटगाथा वाचली..
कॉलेज दिवसांतले पोपट होणे / करणे..... छ्या!!! एक्दम नॉस्टॅल्जिक केलंस यार
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
11 Oct 2024 - 1:11 am | diggi12
नॉस्टॅल्जिक