माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
2 Dec 2009 - 12:20 am

सदर खुलाश्याबद्दल धन्यवाद आमच्या खरडवहीत स्विकारण्यात येतील :
काल रात्री एकाच भागात तीनही पोपट टाकण्याचा विचार होता. पण दहावीचं एकेक असं सरसर आठवत गेलं की तो भाग फारंच मोठा होऊन गेला. तसं तर त्यावर खंड पाडता येऊ शकला असता पण थोडक्यात मजा असते , काय ? असो !

पहिला पोपट हा झाला दहावीत. दुसरा अकरावी-बारावीत.

पोपट दुसरा

पार्श्वभुमी :
दहावीची परिक्षा झाल्यावर आमची बदली झाली. बाबांचं काम भोसरी महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीत असल्याने इकडे बदली झाली. सगळं काही कळायच्या आत बदलत होतं.
"आई .. मला नाही गं जायचं इथून .. बघ ना माझे सगळे मित्र इथे आहेत . ती इथेच आहे .. कसा गं येऊ मी ? मला नाही करमनार तिकडे !! नको ना जाऊया आपण कुठे!"
सगळा सामान टेंपोत भरला. माझी चित्रकलेची वही, त्यावर मी तिचं न् माझं काढलेलं चित्र मी उराशी घेऊन मागून सरसर जाणारं दृष्य पहात होतो. इकडे आता कधीच येणार नव्हतो. लांबूनच तिचं घर दिसलं ; डोळे पानवले , गळा भरून आला आणि मी हंबरडाच फोडला ! बाबांना वाटलं मित्र तुटल्याने मी रडतोय की काय ? ........
इकडच्या निमशहरी वातावरणात रुळायला वेळ लागला. तिकडे आम्हाला सकाळी लवकर उठून रहाटावरून पाणी आणायची सवय होती. आणि इकडे तर चोविस तास पाणी ? अंमळ मौज वाटली. पण तिकडच्या मोठ्या घराच्या तुलनेने हे घर अगदीच अंगावर येणारं होतं .. तिकडे तर मी घरात सायकल चालवायचो. भला मोठ्ठा हॉल होता. आई घरी नसली की पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट करायचो ! इकडे काहीच नाही... ती सद्धा :(
नकळत प्रत्येक बाबतीत मन तुलना करत होतं :)

मी रिझल्ट आणायला गेलो तेंव्हा ती परत दिसेल ह्या आशेने! पण साला तिथे रिझल्ट घ्यायला तिचा राक्षस भाऊ हजर होता. मी आपला मुलांच्या घोळक्यात होतो. कोणत्याही रिझल्टला दोन प्रकारचे सिन्स हमखास पहायला भेटतात. पहिला म्हणजे टॉप रँकने पास होणारे किंवा शुवरशॉट दणकून नापास होणारे .. ह्यांना रिझल्टचं काडीमात्र टेंशन नसतं! आधीच माहित असतो ना ? दुसरा गृप म्हनजे अनपेक्षित निकाल वाल्यांचा .. ह्या गॄपमधल्यांच्या प्रतिक्रिया एकदम टोकाच्या असतात. अनपेक्षित पास झाला तर आनंद गगनात मावत नाही,, अनपेक्षित नापास झाला तर रडू आवरत नाही. मी पहिल्या प्रकारातला ! बोर्डावर टॉप ५ विद्यार्थ्यांची नावं होती .. त्यात सर्वांत खाली "टारझन" लिहीलेलं दिसलं आणि सुखावलो. शिवज्या अनपेक्षित पणे पास झाला होता. ९वी पर्यंत गटांगळ्या खाल्लेला .. १०वीत एका दमात पास ! स्वारी खुष होती. मध्या मात्र इंग्रजीत आटकला होता. कोणाशीही काही न बोलता तो निघून गेला. वर्षा मराठीसकट ४ विषयांत नापास झाली होती. फक्त संस्कृत/हिंदी आणि इतिहास्/भुगोल क्लियर केला होता. पण तिला त्याचं सोयरसुतक नव्हतं .. अशीच फिदीफिदी हसत ती निघून गेली. "ती" मात्र आलीच नव्हती.
"फर्स्टक्लास मधे आली" एवढाच समाचार मिळाला.निराश होऊन घरी आलो.

इसवीसन २०००-२००१ :
आता ११वी अ‍ॅडमिशनचे वेध लागले होते. लोंढ्यात सर्वांत हुशार मुले सायन्स ला अ‍ॅडमिशन घेतात तशी मी ही घेऊन टाकली. ११वी चा पहिला दिवस अजुनही आठवतो. पावसाळ्याच्या दिवसांत ज्यु. कॉलेजातला पहिला दिवस. कॉलेजात जाणार म्हणून प्रचंड उत्साह ! तेंव्हा शाहिद कपूर असलेला एक कोणता तरी अल्बम रिलीज झाला होता "पहेला दिन है कॉलेज का .. डर लगता है " .. आता हे गाण किती ही बकवास असलं तरी ते त्यावेळी लै भारी वाटून गेलं! मी तर खेड्यातुन आलेल्या घाटी होतो एकदम. बाकी पोरं - पोरी एकदम मॉडर्न वाटणारे कपडे घालून आले होते. मी मात्र आमच्या "त्रिमुर्ती टेलर्स" ने शिवलेला फेंट पिवळा शर्ट आणि निळी पँट घालून बुजगावण्या सारखा वाटत होतो. प्रचंड काँप्लेक्स आला होता. वर्गात सगळे नविनच पोरं पाहुन भेदरलो होतो. पोरी तर काय जिन्स - टिशर्ट वाल्या !! आईईईल्ला ! मी नुसता आ वासून पहात होतो. इकडे पाहु की तिकडे ? असं झालं होतं. माझ्या क्लास मधे माझ्या पेक्षा ही उंच पोरं होती .. काही बुटलर होती .. काही स्मार्ट होती.. काही तर माझ्यापेक्षा १० पट रदाळही होती. ज्यु.कॉलेजला शाळा अटॅच असल्याने पुष्कळ मुलं इथलीच होती, पण माझ्या सारखे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले ही बरेच नग होते. ह्या सगळ्या नविन वातावरणात मी बावरलो होतो पण असं होणारा मी एकटाच नव्हतो.
पहिल्याच दिवशी तीचं असं दर्शन होऊन मी असा तीच्या प्रेमात पडेल असं वाटलंच नव्हतं ! बर्‍याच पोरी सुंदर वाटल्या तरी कोणाकडे आकर्षित वगैरे झालो नव्हतो. तीनं मस्त आकाशी कलरचा पंजाबी घातला होता. तीच्या गोर्‍यापान त्वचेवर तो सुटही करत होता. लांबसरळ नाक , मंद डोळे आणि गालावर पडणारी खळी पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडला नाही तर नवलंच.. तिचे दात तर अगदी पांढरेशुभ्र आणि एकसरळ होते.. इतके छान की पेप्सोडेंटच्या जाहिरातीत सहज काम मिळावं ! केस अगदीच लांब नसले तरी शॉर्ट ही नव्हते. त्यात तीचं ते चालताना माने ला झटका दिला की तालात केसांचं उजवी-डावीकडे उडनं अगदीच मनमोहक होतं! त्या दिवशी वर्गात एंट्री करताना ती मला धडकलीच! मागे पहात पुढे चालली होती आणि माझं लक्षं घड्याळात होतं ! नजरानजर झाली. ती स्वत:हूनच हसली. आणि मी एकदम बाजुला होऊन निर्विकार पणे सॉरी बोललो. पुन्हा अशीच नजरानजर व्हायची ! ती हलकेच हसून पुढे निघून जायची. पण थेट जाऊन बोलण्यात आम्ही अजुनही यथातथाच होतो. माझा आणि तिचा बेंच बरोबर लाईनीत होता. थोडी मान मागे वळवली की तिचा हसरा आणि टवटवीत चेहरा दिसत असे. तीच्या लांब नाकामुळे तिला पोरांनी "राघू" (पोपटाच्या चोचे सारखं नाक आहे म्हणून) चिडवायला सुरूवात केली होती. अर्थात मला त्या पोरांचा फार राग येत असे.

नविन वातावरणात सगळंच मागे पडलं ! इथे पुर्ण सेट झालो. माझी ष्टोरी अजुन नजरा-नजर करण्यापलिकडे काही जातंच नव्हती. काही दिवसांत तिच्या बरोबर एक काळपट (माझ्या पेक्षाही काळी हो) पोरगी तीची मैत्रिण झाली. त्या दोघी बरोबर राहू लागल्या ! ( ज्युनियर कॉलेज काय नी शाळा काय , एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते , ती म्हणजे एखाद्या चिकण्या पोरीबरोबर एखादी सर्वसामान्य जिच्यात कोण्णीही इंटरेस्टेड नसतो , अशी पोरगी चिकटलेली असते. ते शार्क माशाच्या फिन्स च्या बाजु ला नाही का एक छोटा परजीवी मासा चिटकून राहात असतो .. तसा ! मी काढलेलं अनुमान असं की , चिकण्या दिसणार्‍या मुलींना आपल्या बरोबर एक सामान्य पोरगी असल्याने तुलनेत जास्त भाव भेटतो म्हणून तिच्याशी त्या सलगी करत असाव्यात. आणि सर्वसामान्य पोरीला एकटं राहिलं तर कोण कुत्रं ही भाव देणार नाही म्हणून ती चिकण्या पोरीबरोबर राहून खोटा खोटा का होईना भाव खाऊन घेत असते. असो) ! एक नंबरची थर्ड क्लास पोरगी ! त्यावेळी आम्ही "शक्तिमान" ह्या सिरियल चे फार मोठे फॅन होतो. त्यात एक
"शैतानी बिल्ली" नावाचं कॅरेक्टर होतं ! लागलीच हीचं नामकरन करून टाकलं! "शैतानी बिल्ली" म्हणून तिला प्रसिद्ध करायला काही कष्ट करावे लागलेच नाहीत. राघू आणि शैतानी बिल्लीची एकदम घट्ट मैत्री होती. शैतानी बिल्लीच फक्त एक काम असावं ! मी राघू कडे चोरून वगैरे पाहिलं .. की तीला रिपोर्ट करने .. :)

अनलाईक आमची शाळा, इथे ज्यु.कॉलेजात माझ्यासारखी(/पेक्षा) दंगा करणारी पोरं फार होती. आमच्या कॉलेजाची ट्रिप काढायचं ठरलं होतं .. पाषाण जवळ कुठेसं कसलं वैज्ञानिक संमेलन भरलं होतं तिथे घेऊन जाणार होते. "प्रकाश जगताप" उर्फ "पक्या" हा महा कार्टून प्राणी माझ्या मागच्याच बेंच वर बसत असे. साला .. हा सुद्धा राघू वर लाईन मारत असे .. म्हणून माझ्या तो डोक्यात जायचा. तर झगडे सरांनी ट्रिप साठी नावं लिहायला सुरूवात केली. पक्या बोंबलला .. "सर.. मी येणार नाही !!" .. सगळीकडेच शांतता झाली ! झगडे सर म्हणारे " येस .. जगताप ? का येणार नाहीयेस ?" झगडे सर असले की वर्गात पिन ड्रॉप सायलेंस असे. पक्या बोलला ..." सर .. अडचण आहे ...." बोलून पुर्ण होत नाही तेवढ्यात मला एकदम मोठ्याने हसू आलं ! पक्या काय बोलून गेला हे पोरांना दुसर्‍या सेकंदाला कळालं ! एकंच मोठी हास्याची लाट पोरांच्या साईडने तयार झाली ! तिसर्‍या सेकंदाला पोरींनाही कळलं ! वर्गात हसण्याचा अगदी "रेझोनंस" तयार झाला ! नेहमीच खडूस दिसणार्‍या झगडे सरांनाही हसू फुटलं ! राघू अगदी मनमोकळं हसायची ! माझ्या प्रतिक्रियांना तीचा खाली +१, आणि हास्यपताका ठरलेलीच असायची. आजही ती इतकं मोकळ्ं हसत होती की पुर्ण वर्ग तसाच हसत रहावा.. न मी तीचं जाऊन एक चुंबण घ्यावं असं मनात आलं ! पण हे सगळंच मनात.. झगडे सरांनी "सायलेंस प्लिज !!" म्हंटल्यावर वर्ग क्षणभर शांत झाला ! पण पुन्हा एकसाथ सगळे हसले ! सरंही हसले! तो दिवस पुर्ण पणे हसण्यातंच गेला ! पुर्ण ११वी-१२वी पक्याला पोरं येता जाता विचारायचे .. "काय पका.. आज अडचण आहे का?" पक्या आपला ओशाळून जायचा ! माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या धाग्याचा खरडफळा झाल्या सारखा आनंद मला होत असे. :) ती सहलीला येणार, पण साला ती शैतानी बिल्ली काय तिला एकटं सोडत नाही. आणि राघू कडे पाहिलं की ही माझ्याकडे अशी नजरेला नजर भिडवूनच पहात असे. ते मला फार अनकंफर्टेबल वाटायचं ! साला का ही आपल्याच राशीला आलीये ? म्हणून मी शैतानी बिल्लीला जाम शिव्या घालायचो ! सहलीच्या दिवशी मी एकदम रेक्सोना डिओड्रंट वगैरे मारून हजर होतो. तीने ब्लॅक पंजाबी घातला होता. ती इतकीही मोहक दिसू शकते ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.. कानात नव्या इयर रिंग्ज , मोकळे सोडलेले केस .. आणि नेहमी प्रमाणे ते इकडून तिकडे झुलवत ती जेंव्हा आली तेंव्हा एखाद्या हिरॉइनने एंट्री मारावी असा भास झाला. मी आ वासून नुसताच पहात होतो. माझ्यात कुठून बळ आलं .. आणि मी तिला डायरेक्ट जाऊन म्हणालो .. "ओह्ह!! तू ज्याम सुंदर दिसते आहेस आज !!" त्यावर तीने नुसत्याच भुवया हालवल्या... माझ्या मागून कुठून ती शैतानी बिल्ली आली आणि तीला घेऊन गेली ! मी बिल्लीचा पुन्हा एकदा मनभरून उद्धार केला ! विज्ञान प्रदर्शन पहाताना तीही डोळे वाकडे करून माझ्याकडे पहात्ये असं मला जाणवत होतं ! मग च्यायला मी का मागे राहिलोय ? "लढ बापू" म्हणून तिच्याकडे जायचो .. आणि ती बिल्ली समोरून अशी रोखून बघे की माझी हिम्मत निम्म्यापर्यंत खल्लास होत असे. न मी टर्न मारून दुसरीकडेच निघून जायचो. त्या दोघी मागे फिदीफिदी हसल्याचं मला कळायचंही ! पण काय करू शकत होतो मी?

हा हा म्हणता ११वी संपली .. आणि १२वी साठीचे एक्स्ट्रा लेक्चर्स सुरू झाले. रुपाली आमच्याच क्लास मधली. ह्याच शाळेतून कॉलेजात आलेली असल्यानं तीची सगळ्या मास्तरांशी चांगलीच ओळख होती. पोरं म्हणायची ,शाळेत अगदीच शेंबडी होती रे .. आता अचानक फॉर्म ला आलीये :) आता फॉर्म ला येण्याचं काही वेगळं कारण सांगने जरूरी आहे का ? रुपाली जो पाहीन त्याला लाईन देत असे. आणि एवढी आव्हानात्मक पोरगी आपल्याला लाईन देते म्हंटल्यावर पोरं बाकी जाम खुश होत. टवाळ पोरी ती लंच ब्रेक मधे पाणी प्यायला टँक कडे जायला लागली की जिन्यातून "ए ...एएएए.. आली फॉर्म ला .. आली फॉर्म ला ! " असल्या कमेंट पास करत .. मला तीच्यासाठी फार वाईट वाटायचं ! पण च्यायला .. ही तर एकदमंच खुश व्हायची ! मला जाम आश्चर्य वाटायचं ! तर एकदा असंच कॉलेज संपल्यावर पोरांनी मला चढवायला सुरूवात केली. रुपाली आमच्या थोडी पुढेच चालली होती. पक्या म्हणाला .. तू तिला आवाज टाक .. उद्या तुला २ वडापाव देतो. (११वी-१२वी ला वडापाव ही आमची करंसी होती. आपल्या व्यवहारात जसा डॉलरला भाव असतो आणि तो कुठेही एक्सचेंज करून भेटतो तसं त्यावेळी वडापाव होता.) माझ्यात कुठून डेयरिंग आलं कुणास ठाउक.. मी जोर्रात आवाज टाकला .. "ए रूप्पाआआ .........!!" रुपा गिरकी घेऊन मागे पहाणार .. इतक्यात सगळी पोरं माझ्या पासून लांब .. एकटा पक्या मी , आब्या अन बोरक्या.. चौघेच सापडलो. दुसर्‍या दिवशी सकाळी वर्गात थोडा लेटंच पोचलो. झगडे सर आणि रुपाली काहीतरी बोलत होते. काळजात धस्स्स झालं ! मला चढवून देणार्‍यांमधे पक्या आणि आब्याच होते. सरांनी बाप्याला छडी आणायला सांगितली ! हा मुर्ख त्याऐवजी कसलासा मोठा लाकडी स्केवर बार घेऊन आला. ते सरांचा हातात अगदी गदा दिल्यासारखं दिसत होतं .. मला हसू आवरलं नाही .. न हे सरांच्या तावडीतून काही सुटलं नाही. "चला २६ नंबर मधे !' -सर ( २६ नंबर म्हणजे बायो लॅब , इथे डांबीस पोरांना नेऊन छान बडवण्यात येत असे अशी दंतकथा प्रचलीत होती) २६ नंबर म्हंटल्याबरोबर आमची तंतरली .. पक्या म्हणाला ... "सर मी काय नाय केलं ओ.. ह्या टार्‍यानेच आवाज टाकला होता.. विचारा .. रुपाला विचारा " पक्या ज्या टोन मधे बोलला त्यावर पुर्ण वर्ग हसला ! मी आपला निलाजर्‍या सारखा वर गेलो .. कसलं ही अर्ग्युमेंट केलं नाही. जेवढा मार भेटला तेवढा गुपचूप खाल्ला. बोरक्या ने विनाकारन मार खाल्ला होता. त्यामुळे बोरक्या मला पुढचा महिनाभर रोज शिव्या घालायचा. सगळे स्वतःला डिफेंड करत होते. पण सरांना २६ नंबरची प्रतिष्ठा राखण्यासाठी आमची कणिक तिंबवणे जरूरीच होतं !
असो .. तर ह्या प्रकरणात माझं नाव आल्याने मी काही काळ राघू शी नजरानजरही टाळू लागलो.

पुन्हा सगळं नॉर्मल झालं ! माझा एक वर्गमित्र होता. तो न मी येतांना बर्‍याचदा बरोबर असायचो. गरब्याच्या वेळेस मी राघू च्या घराजवळ दांडिया पहायला जायचो. ती असायची! राघू फारंच सुंदर दांडिया खेळायची ! मी तिच्यासाठी गरब्याला येतो हे तिला न कळण्याइतकी ती मुर्ख नक्कीच नव्हती ! सुंदरसं स्मित देऊन मी जणू माझं स्वागत करायची ! ह्या सगळ्या मला विनाकारण पॉझिटिव्ह साईन्स वाटत होत्या! कॉलेज ३ किलोमिटर लांब होतं ! परताना आम्ही सगळे गृप- गृपने यायचो.

त्या दिवशी राघू आणि शैतानी बिल्लीचं काही तरी शिजत होतं .. दोघी माझ्याकडे पाहून काहीतरी हसत होत्या. मला काहीच उलगडा होत नव्हता ! पण मला तिच्याकडे एक गुलाबी कार्ड दिसलं होतं ! मी उगाच काहीतरी वेगळं असेल म्हणून इग्नोर केलं. त्या दिवशी कॉलेजातून परत येत होतो.राघू आणि शैतानी बिल्ली पुढेच होत्या. मी आणि तो एका अरुंद वाटेतून चाललो होतो. अचानक शैतानी बिल्ली थांबली. माझ्या रोखाने ती चालत आली. मला अगदीच कससं झालं ! मी घाबरलो होतो. तेवढ्यात तिनी माझ्या हातात एक पाकिट टेकवलं !! आणि म्हणाली , "हे त्याच्या साठी आहे .. तीने दिलंय !" कानाखाली प्रचंड जाळ निघाल्या सारखं झालं !! झांझेचे कर्णकर्कश्य सुरू ऐकू येत आहेत असं वाटलं ! डो़यासमोर क्षणभर अंधारी आली. तोंडातून शब्दंच फूटेना.. मला काही सुधरत नव्हतं ! मी फक्त एखाद्या रोबॉट ने आज्ञा पाळावी तसं ते पाकिट घेतलं ! त्या ने ते उघडलं , मला जे अपेक्षित ते तेच होतं ! तिने स्वत: ... हो .. तिने स्वतः त्या ला प्रपोज केलं होतं ! जिला मी इतके दिवस साधी-सरळ पोरगी समजत होतो.. तीने स्वत:हून दुसर्‍याच कोणाला प्रपोज करावं ... हे फारंच क्लेशदायक होतं ! डोळे ओलावले नसले तरी रडू मात्र येत होतं ! त्याला बहुतेक ह्याची कल्पना असावी ! त्याने ते लेटर घेऊन त्याचं एक चुंबन घेऊन तिच्याकडे हात केला. मी विखुरला गेलो होतो. आत कोणीतरी फटाक्यांनी माळ लावली होती काय ? माझी कानशीलं प्रचंड तापली होती. सगळं घडायला एक मिनीट ही लागला नव्हता ! पण माझ्या डोळ्यांसमोरून पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत .. सगळं एकामागून एक धावत गेलं ! मी बधीर सारखा उभाच होतो.

एका क्षणात प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती. मला तिचं नाव काढलं तरी प्रचंड राग येत असे. आठवडा गेला .. मी ना तिच्याकडे पहायचो .. ना त्याच्याशी बोलायचो. जागा ही बदलून घेतली होती. सगळीच पोरं माझ्यावर हसायची . मला "दिलजले" हे नाव मिळालं होतं ... वर्गातलं छटाक पोरगं पण येऊन चिडवून जायचं .. मी दु:खी झालो होतो.

आणि एक दिवस,आमच्या बॅचचं फिजिक्स चं प्रॅक्टिकल चालू होतं !! लॅबच्या बाहेरून शैतानी बील्लीने मला आवाज दिला .. मागे राघू उभी होतीच. पुन्हा हातात काही तरी होतं ! माझा स्वाभिमान अचानक जागा झाला होता. जाऊन काही तरी बोलूच म्हंटलं ! सगळी पोरं खिडकी पाशी जमा झाली ! बिल्ली म्हणाली तीला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मी शहारलो. मला वाटलं तीला पश्चाताप झाला असेन.' चल तुला माफ केलं ' असं मनाशीच म्हणत तीच्याकडे गेलो. ती हसली ! हात पुढे कर म्हणाली ... मी हात पुढे केला. तीने तो बॉक्स ओपन केला .. आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी बांधली ! लॅबमधून हसण्याचा मोठ्ठा आवाज आला .. प्रत्येक जण वेगवेगळ्या सुर-तालात हसत होता. कोणी तरी .. "एएएए दिलजले" ओरडला . मला मनात हिरण्यकश्यपुचा वध करणारा नरसिन्हाचा अवतार आठवला ! घ्यावी हीला आणि त्या बिल्ली ला आणि दोघींचे कोथळेच बाहेर काढावेत ! मग त्या पोरांचे ..सगळीकडे रक्तंच रक्त !
भानावर आल्यावर ती राखी तोडून टाकली आणि माझी बॅग उचलून घरी निघून गेलो. कोणाशीही बोलणे टाळतंच होतो.

त्या दिवशी फ्रेंडशीप डे होता. शैतानी बिल्ली एकटीच होती. मी वर्गात गेलो.. बॅग ठेऊन बाहेर येत होतो. मुलांचा घोळका कॉरिडोर मधे उभा होता. शैतानी बिल्ली आली आणि मला हाक मारली ! माझ्या भुवया उंच झाल्या ! .. मी तिच्याकडे वळलो .. तिने कुठूनसा रेड रोझ काढला .. आणि मला दिला ! एक डोळा ही मारला ! माझ्या नसा पुन्हा टाईट झाल्या ... सगळे जण माझा तमाशा पुन्हा पहात होते. मी स्मित करतंच तो गुलाब घेतला ! पोरांकडे पाहून हलकाच हसलो ! मग तो गुलाब असा फट्टकन जमिनीवर आदळला ! त्याला बुटाने पार कुचकारला ! आणि तीला मोठ्याने म्हणालो ! ... "तुझ्या आवशीचा घो............." एखाद्या पोरीला आयुष्यात पहिल्यांदाच असा अपशब्द वापरला होता, पण त्यचं गिल्ट कुठेही नव्हतं ना पश्चाताप होता. पोरांनी एकंच हुर्रेर्रेर्रे केला ! त्यानंतर मला कोणी चिडवलं नाही !

पण त्या अरुंद गल्लीत झालेला माझा पोपट .. केवळ अविस्मरनीय !!!

(त्याला राघू च्या भावांनी आणि त्याच्या गॅंगने मिळून एच.एस.सी. च्या एका पेपरला भरपूर तुडवला .. शिवाचे पुर्ण कपडे मळालेले होते. डोळे काळे निळे झाले होते. त्यादिवशी मी म्हणालो .. "च्यायला ! वाचलो !!!" )

<<< पोपट पहिला
पोपट तिसरा>>>

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

2 Dec 2009 - 12:32 am | घाटावरचे भट

है शाब्बास!!

शब्देय's picture

2 Dec 2009 - 12:36 am | शब्देय

आई घरी नसली की पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट करायचो !
लै भारी!!

अवांतरः : जावू दे रे..तसेही "राघू - पोपट" हे जोडीचे नाव शोभून दिसले नसते :)

प्रभो's picture

2 Dec 2009 - 12:38 am | प्रभो

सुंदर....
माझाही बारावीतला किस्सा आठवला.... :)

काय लिहू हेच समजत नाहिये...
ब्रम्हचर्य, गृहस्थ हे आश्रम करून वानप्रस्थाला निघालेल्या माणसासारखा वाटतोय टारू.......त्याच्या अनेकविध (क्षणात हसू क्षणात आसू) स्टाईलने लिहिण्याच्या हातोटीला सलाम.

बाय द वे..तिसरा पोपट लिहून संन्यास घेउ नकोस... :)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

टारझन's picture

2 Dec 2009 - 12:48 am | टारझन

बाय द वे..तिसरा पोपट लिहून संन्यास घेउ नकोस...

तुला हे आत्ताच बोलायची काही गरज होती का ? तुला काही सांगणंच पाप आहे मेल्या !!!

- टारझन

विशाल कुलकर्णी's picture

2 Dec 2009 - 11:05 am | विशाल कुलकर्णी

बाय द वे..तिसरा पोपट लिहून संन्यास घेउ नकोस...>>>

काय अडलं होतं आत्ताच हे बोलायचं? टार्‍या, तु नको 'वरी' करू....
हिमालयात नाही तर गेलाबाजार आसारामबापुंच्या आश्रमात जागा बुक करून ठेवूच तुझ्यासाठी ! ;-)

अवांतर : अरे देवा, काय प्रॉमीस करुन बसलो. वाचवा रे कुणीतरी.....
आसारामबापुंना ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

स्वप्निल..'s picture

2 Dec 2009 - 12:46 am | स्वप्निल..

जबरदस्त!! :)

हरकाम्या's picture

2 Dec 2009 - 1:57 am | हरकाम्या

शार्क माशाच्या फिनच्या बाजुला एक परजीवी मासा चिकटलेला असतो
उपमा एकदम "झकास "

स्वाती२'s picture

2 Dec 2009 - 2:11 am | स्वाती२

मस्त झालाय हा भागही. माझा मित्र करायचा पाँड्स वालं स्केटिंग.

गणपा's picture

2 Dec 2009 - 2:22 am | गणपा

पहिला म्हणजे टॉप रँकने पास होणारे किंवा शुवरशॉट दणकून नापास होणारे .. ह्यांना रिझल्टचं काडीमात्र टेंशन नसतं! आधीच माहित असतो ना ? दुसरा गृप म्हनजे अनपेक्षित निकाल वाल्यांचा .

मस्त लिहितोयस रे...आवडेश.

>>"हे शिवा साठी आहे .. तीने दिलंय !"
हंम्म्म्म हा खरा पोपट म्हणायचा. =))

>> आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी
आरारारारारारा
वरच कंमेंट परत घेतो..
हा खरा पोपट म्हणायचा. =)) =))

>>मग तो गुलाब असा फट्टकन जमिनीवर आदळला ! त्याला बुटाने पार कुचकारला

बिचरी. ती पण आज कुठल्याश्या फोरमवर आसच लेख लिहित असेल ;)

-माझी खादाडी.

पाषाणभेद's picture

2 Dec 2009 - 3:43 am | पाषाणभेद

झकास. मस्त अनूभव कथन.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

पाषाणभेद's picture

2 Dec 2009 - 4:00 am | पाषाणभेद

होतकरूंसाठी एक सल्ला:

तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते.

(येथील महिला मंडळानेही त्यांचे 'ट्रेड सिक्रेट' ओपन करायला हरकत नाही. तेवढीच समोरच्या पार्टीला मदत मिळेल.)

टारेश, अजूनही 'ऑर्पॉर्च्यूनिटी' असेल तर हा सल्ला अंमलात आणायला हरकत नाही.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

गणपा's picture

2 Dec 2009 - 4:26 am | गणपा

>> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते.

सहमत..
उदाहरण साक्षात समोर आहे......
शैतानी बिल्लीला वाटल असाव की टारु राघूला पटवायच नाटक करतोय.. आणि म्हणुन ती शैतानी बिल्लीच त्याला पटली..
पण टार्‍याला ते पटल नाही हा भाग वेगळा =)) =))

-माझी खादाडी.

संग्राम's picture

2 Dec 2009 - 7:36 am | संग्राम

मस्तच रे भौ ....

>> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते.
-- हे मात्र खरं....

['पोपट' समुदायाचा सभासद.... संग्राम]

निखिल देशपांडे's picture

2 Dec 2009 - 9:46 am | निखिल देशपांडे

>> तुम्हाला समजा एक पोरगी पटवायची आहे तर तुम्ही तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक करा. मुळ पोरगी पटते.
-- हे मात्र खरं....

नाही हो... असे दर वेळेस खरे होईल असे काही नाहीच...

['पोपट' समुदायाचा सभासद.... संग्राम]

अवांतर:- संग्राम आता पटापट लिहि बरे तु तुझे पोपट...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

संग्राम's picture

2 Dec 2009 - 10:20 am | संग्राम

आम्ही अस केलं नाही म्हणून तर ....
जर तिच्या शेजारी असणारी पोरगी पटवायची नाटक केला असत तर.... जुने जाउ द्या भौ ...
कुठला तरी एक डायलॉग ...
बस, ट्रेन, लड्की ...

सहज's picture

2 Dec 2009 - 7:09 am | सहज

>पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट..

:-) घरोघरी पाँडसच्या पावडरी

>शार्क माशाच्या फिन्स च्या बाजु ला नाही का एक छोटा परजीवी मासा रेमोरा :-)

मस्त लिहलेयस रे!

हर्षद आनंदी's picture

2 Dec 2009 - 7:14 am | हर्षद आनंदी

ती हसली ! @) @) @) @) @)

हात पुढे कर म्हणाली ... :SS :SS :SS :SS

तीने तो बॉक्स ओपन केला .. :? :? :? :?

आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी बांधली ! :O :O :O :O

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

(देवाचे आभार मान, त्या पोरीला दुर्बुध्दी झाली!! नाही तर... तुझा हनुमान झाला असता)

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

रेवती's picture

2 Dec 2009 - 7:44 am | रेवती

दुसरा पोपटही छान झालाय. राघूचं वर्णन चांगलं केलयस.

रेवती

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 12:09 pm | श्रावण मोडक

हेच, असेच!

अमृतांजन's picture

2 Dec 2009 - 8:04 am | अमृतांजन

टार्‍या, खिळवून ठेवलंस अगदी. तुझा दर वर्षी एकच पोपट झालेला आहे हे कळल्यामुळेही आश्च्र्य वाटलं.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Dec 2009 - 8:21 am | llपुण्याचे पेशवेll

छाण. हाही भाग छाण. असेच येऊद्या.
सुंदर पोरींबरबर फिरणार्‍या सुमार मुली हा विषयही आपण खुबीने हाताळला आहे. जसे आंतरजालावरच्या प्रसिद्ध लेखकाना कायम +१ चे प्रतिसाद देणारे आणि त्याना खरडी करणारे असतात तसे. असो.

प्रत्येक पोपटातून शिकक शिकत शेवटी आत्ताचं टारझन नावाचे रसायन तयार झाले तर. असो.

असेच लिहीत रहा.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पाषाणभेद's picture

2 Dec 2009 - 8:51 am | पाषाणभेद

"सुंदर पोरींबरबर फिरणार्‍या सुमार मुली हा विषयही आपण खुबीने हाताळला आहे. जसे आंतरजालावरच्या प्रसिद्ध लेखकाना कायम +१ चे प्रतिसाद देणारे आणि त्याना खरडी करणारे असतात तसे. "

नाही हो पुपे, टारझनने एका बाणात दोन शिकारी केल्यात एक पोरींची व दुसरी +१ प्रतिसाद देणार्‍यांची.

म्हणजे आता +१ प्रतिसाद देणारे कसे आहेत ते समजेल.

------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Dec 2009 - 9:14 am | llपुण्याचे पेशवेll

खुलाशाबद्द्ल धन्यवाद श्री पाषाणभेद. ही गोम आमच्या लक्षात आलीच नव्हती. योग्य बदल पुढच्या वेळेला केल्या जाईल.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

शाहरुख's picture

2 Dec 2009 - 8:28 am | शाहरुख

>>.. आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी बांधली !
मित्रा, कुठे गेला तुझा स्वाभिमाणी बाना ?? समस्त पुरुष जमातीकडून तुझा जाहीर निषेध..

बाकी येऊ देत अजून पोपट..बसलोय आम्ही जाळं लावून.

श्रीयुत संतोष जोशी's picture

2 Dec 2009 - 9:30 am | श्रीयुत संतोष जोशी

तिस-याची वाट बघतोय.
प्रतिक्रिया नंतर एकदम.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

निखिल देशपांडे's picture

2 Dec 2009 - 9:43 am | निखिल देशपांडे

टारोबा...
अरे लै भारी लिहिला आहे हा पण पोपट....
एक एक उपमा तर सहीच आलेल्या आहेत.. "शार्क माशाच्या फिनच्या बाजुला एक परजीवी मासा चिकटलेला असतो"
पुढचा भाग टाक लवकरच...

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

आता तिस-या पोपटा कडुन खुप आपेक्षा वाढल्या आहेत. आम्चा पोपट करु नकोस.

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Dec 2009 - 10:13 am | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2009 - 11:52 am | बिपिन कार्यकर्ते

;)

टार्‍या, परत एकदा सांगतो, बाकीचे उद्योग कमी कर. कळ्ळं? :D

खुद के साथ बातां: 'त्वचा', 'मोहक' ... हा टार्‍या काय मराठी जाहिरातींचा कॉपीरायटर म्हणून काम करतो का काय? हे शब्द फक्त हिंदीवरून कशातरी भाषांतरित केलेल्या मराठी जाहिरातींमधूनच दिसतात.

बिपिन कार्यकर्ते

संग्राम's picture

2 Dec 2009 - 10:19 am | संग्राम

प्र का टा आ

फ्रॅक्चर बंड्या's picture

2 Dec 2009 - 11:24 am | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच लिहलय..
"दिलजले" भारी नाव आहे...

binarybandya™

शक्तिमान's picture

2 Dec 2009 - 11:36 am | शक्तिमान

आयला.. जबरा स्टोरी!
ह्या सगळे अनुभव एकत्र केले तर एक भारी पुस्तक तयार होईल!

"ते पोपटी दिवस" =)) =)) :P

sneharani's picture

2 Dec 2009 - 11:55 am | sneharani

=)) =)) =))
मस्तच.... पुढचा भाग लिही.

sneharani's picture

2 Dec 2009 - 11:58 am | sneharani

=)) =)) =))
मस्तच.... पुढचा भाग लिही.

शार्दुल's picture

2 Dec 2009 - 11:59 am | शार्दुल

पोपट बाकी मस्तच

नेहा

नेहमी आनंदी's picture

2 Dec 2009 - 12:56 pm | नेहमी आनंदी

हा ही पोपट चांगलाच हिरवा होता...
लिखाण एकदम भन्नाट...
स्वतः तिथे असल्या सारखा भास होत होता...

सुमीत भातखंडे's picture

2 Dec 2009 - 1:25 pm | सुमीत भातखंडे

सही लिहिलय एकदम.
आता पुढचा भाग.

अवलिया's picture

2 Dec 2009 - 1:27 pm | अवलिया

छान !

--अवलिया

विनायक प्रभू's picture

2 Dec 2009 - 2:15 pm | विनायक प्रभू

बांधली राखी
ठेवले नाही
काहीही बाकी

मेघवेडा's picture

2 Dec 2009 - 2:55 pm | मेघवेडा

अपेक्षाभंग नाही केलास टार्‍या! मस्तच जमलंय! एकापेक्षा एक उपमा!!

" सर .. अडचण आहे ...."

:) :) लै भारी!! दर्जा! वरचा क्लास!!

बाकी लेखाच्या क्वालिटी वगैरे वर मी पामर आणखी काय बोलणार!! येऊ द्या फक्त..!!

--

"आणि सलग दुसर्‍या वर्षी 'पोपट ऑफ द ईयर' पुरस्काराचे मानकरी आहेत .. टारोबा लाईनमारकर!"

भडकमकर मास्तर's picture

2 Dec 2009 - 3:20 pm | भडकमकर मास्तर

टार्‍या, लै लै उच्च लेख..
वाचताना बर्‍याच वाक्यांना हसलो..
त्या सुंदर मुलींबरोबरच्या परजीवी मुलींबद्दलचं निरीक्षण भन्नाट....
..
येउद्या..
वाचतोय...

श्रद्धा.'s picture

2 Dec 2009 - 3:23 pm | श्रद्धा.

अरे व्वा दुसरा भाग पण छानच झालाय....तिसरा येउ दे आता....

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2009 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रतीम लिखाण रे टार्‍या. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे केलेस.

बाकी आत्ताचा टार्‍या आणी लायसन्सच्या फोटोवरचा टार्‍या आठवुन बेक्कार हसायला आले =))

पुलेशु

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रसन्न केसकर's picture

2 Dec 2009 - 4:46 pm | प्रसन्न केसकर

मस्त लिहिलस. असच लिहित रहा. प्रत्येक लेखमालेकरता माझ्याकडुन तुला पुनममधे एक पार्टी.
(तुला पार्टी देणं पण स्वस्त पडेल एव्हढी मजा येतीये तुझं लिखाण वाचुन.)

चित्रा's picture

2 Dec 2009 - 7:34 pm | चित्रा

अकृत्रिम लिखाणाबद्दल मनापासून अभिनंदन.

अनामिक's picture

2 Dec 2009 - 7:51 pm | अनामिक

टारू... हा भाग पण मस्तं लिहिला आहेस... फक्त त्या शैतानी बिल्लीचा केलेला अपमान नाही आवडला... तिला सर्वांदेखत अशाप्रकारे नकार द्यायला नको होता असे वाटले!

-अनामिक

भोचक's picture

2 Dec 2009 - 8:59 pm | भोचक

हा खरा पोपट. पण गंमत असली तरी वाईटही वाटलं.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

भाग्यश्री कुलकर्णी's picture

2 Dec 2009 - 9:45 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच रे.तिथंच असल्यासारखं वाटलं

चतुरंग's picture

3 Dec 2009 - 4:42 am | चतुरंग

अरे काय रे टार्‍या जबराच पोपट की रे!!

अरे तुझा दिलजले एवढा भिडला मणाला की उत्स्फूर्त काव्यच निर्माण झालं बघ -
टार्‍या बनवायला गेला सखी
अन राघूनं बांधली फक्कड राखी! ;)

बाकी मुख्य मुलीसोबत असलेल्या जळाऊ लाकडांबद्दलचे (हा आमचा इंजिनिअरिंगच्या वेळचा शब्द) निरीक्षण एकदम फिट्ट! ;)

(आमच्या सेकंड इअरला मिन्हास म्हणून एक भन्नाट पंजाबी पोरगी होती. आम्ही काँप्यूटरच्या प्रॅक्टिकलला सगळे पीसी वायरी काढून बंद करुन ठेवायचो आणि फक्त आमच्या शेजारचा पीसी चालू राहील आणि तो मुलींचा ग्रुप तिथेच बसेल अशी व्यवस्था करायचो. आपली प्रॅक्टिकल्स सोडून तिच्या असाईनमेंट्स लवकर कशा पूर्ण होणार नाहीत ह्याचे प्रयत्न चालायचे! लईच्च मागं घेऊन गेलास रे भावा!! ;) )

('सी' प्रोग्रॅमर) चतुरंग

शेखर's picture

3 Dec 2009 - 7:09 am | शेखर

एखाद्या पोरीला आयुष्यात पहिल्यांदाच असा अपशब्द वापरला होता, पण त्यचं गिल्ट कुठेही नव्हतं ना पश्चाताप होता. पोरांनी एकंच हुर्रेर्रेर्रे केला ! त्यानंतर मला कोणी चिडवलं नाही !

हे मात्र भारी केलस. मला तर वाटतय त्या बिल्लीनेच तुझा पत्ता कट केला असावा...

हा ही भाग सुंदर ( पण पोपट झालेला भाग वगळता)

अवांतर : ५० वा प्रतिसाद ... तुझ्या सुपीक डोक्यातील किड्याच्या लिस्ट मध्ये जाण्यास मदत
शेखर

पर्नल नेने मराठे's picture

3 Dec 2009 - 11:02 am | पर्नल नेने मराठे

आम्हीहि अशिच नावे ठेवली होती. चद्दर (शर्ट चादरीच्या डिझाइनचे असायचे), गुमु (गुजराथी मुलगा होता नाव माहित नव्हते), बैल (हेअर स्टाइल मुळे शिन्गावाला बैल वाटे) आणी त्याच्याच गर्ल्फ्रेन्दला गाय =))
चुचु

दिपक's picture

3 Dec 2009 - 2:33 pm | दिपक

अनुभवकथन लय भारी :)

मीनल's picture

3 Dec 2009 - 7:29 pm | मीनल

हा टारझन ,
:D
`ण च्या ठिकाणी `न लिहितो. अविस्मरनीय,करमनार,नामकरन,विनाकारन,डोळे पानवले
आणि `न` च्या ठिकाणी `ण`. णमस्कार्स ,णमस्कार,णविण,चुंबण.
काय भानगड?? :?

ते शार्क ,परजीवी मासा .तसेच चिकणी मुलगी आणि सामान्य पोरगी हे हे खास

दिलजले, शैतानी बिल्ली,राघू ही नाव त्या ठिकाणी आणि त्या व्यक्तींना समर्पक वाटली.

मीनल.

मी-सौरभ's picture

20 Dec 2009 - 11:06 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)