जयश्रीताईंचा असला कचकचीत हाफवॉली पडल्यावर आमच्यातल्या विडंबकाने काय करावं असं अपेक्षित आहे? ;)
ग्लेन्फिडिच बरसे सखा डॉलर पाऊस
माज लेऊन हिरवा, येतो डॉलर पाऊस
तिची प्रतिक्षा ग्लासात अन सख्याही फितूर
गालागालात तोबरा, पिंकेपिंकेआड धूर
पापड्-फर्साण चखणा तिथे पुरवतो सखा
खुळावली मैफल माज घेऊन अनोखा
मिरविते नवी नोट रंग कंच हो हिरवा
पिंकसरीत भिजूनी लाल रंग गाली नवा
नोटा उडती बाहेरी आटे खिसा धाकधुक
दोस्त हलके उठती, घेती कलटी नाजुक
बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून
मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!!
चतुरंग
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 10:51 pm | प्रभो
हाहा...मस्तच
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 11:00 pm | श्रावण मोडक
तुम्हीसुद्धा!!!
झक्कास.
26 Nov 2009 - 10:07 am | llपुण्याचे पेशवेll
+१ हेच म्हणतो.
आद्य विडंबक बिल्ला २ श्रीश्रीश्री रंगाशेठ यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
25 Nov 2009 - 11:01 pm | jaypal
हाणल कि वो तेच्या आयला. कस्ल, कस्ल ते एकेक ओळ, स्टेडीयमच्या बहीरच बघा एकदम.
"बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून
मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!!"
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Nov 2009 - 11:03 pm | टारझन
अगदी मनातलं बोललात सर !!
अल्टिमेट आणि बेष्ट विडंबण ... कच्च्या माल हा तर रेडिमेड वाटला :)
- ("जिरवा खाज" हे विडंबण मनातल्या मनात मर्डर करून टाकलेला) टारझन
25 Nov 2009 - 11:06 pm | बिपिन कार्यकर्ते
रंगा, रंगा, रंगा... लेका काय अचाट रे... झबर्डस्ट!!!!!!!!!!!!!!!
नोटा उडती बाहेरी आटे खिसा धाकधुक
दोस्त हलके उठती, घेती कलटी नाजुक
हे तर भयानक भिडलं काळजाला... प्रेमाचा सल्ला - मित्र बदला.
बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून
मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!!
मदत लागली तर सांगा. मागच्या वेळी तुम्हीच हिरवा माज दाखवला होता, त्याला जागावेच लागेल आम्हाला. ;)
बिपिन कार्यकर्ते
26 Nov 2009 - 11:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खराय!
रंगराव, विडंबन चोक्कस एकदम! पण मंदीचा परिणाम म्हणून हे असं भांडी घासणं का? काही मदत हवी असेल तर सांगा, आम्ही आहोत सगळे तुमच्या पाठी (पाय लावून पळायला!) ;-)
अदिती
26 Nov 2009 - 2:04 am | गणपा
तरी म्हटल अजुन रंगाशेठ ने या वाहात्या गंगेत हात कसे नाही घातले ;)
मान गये उस्ताद..
वाह रे हिरवा माज
-(माजलेला )गण्या.
26 Nov 2009 - 9:58 am | विशाल कुलकर्णी
क्या बात है, रंगाभौ .... जबरा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
26 Nov 2009 - 10:00 am | घाटावरचे भट
रंगा येई वो ये.... ;)
26 Nov 2009 - 10:04 am | अमृतांजन
ग्लेनफिडीच ची आठवण नॉस्टाल्जिक करुन गेली.
तिची प्रतिक्षा ग्लासात अन सख्याही फितूर
गालागालात तोबरा, पिंकेपिंकेआड धूर
हे खेळकर!
26 Nov 2009 - 10:10 am | अमृतांजन
हा नगरी काका एकदम खंगरी लिहितो राव!
26 Nov 2009 - 10:06 am | निखिल देशपांडे
लै भारी रंगाकाका
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
26 Nov 2009 - 10:52 am | अवलिया
रंगाशेटचा जाहिर निषेध !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
26 Nov 2009 - 10:55 am | अमोल केळकर
बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून
मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!!
हा हा हा . मस्तच :)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
26 Nov 2009 - 11:26 am | कपिल काळे
मिरविते नवी नोट रंग कंच हो हिरवा
पिंकसरीत भिजूनी लाल रंग गाली नवा
आयला, हिरव्या नोटेवर कोण पिंक मारेल बुवा?
26 Nov 2009 - 12:09 pm | चेतन
प्रत्येक प्रतिसाद्कर्त्याला एक हरी पत्ती देना रंगासेठ ;)
चेतन