अहो पाहुणे हळुहळू होवू द्या
अहो पाहुणे हळुहळू होवू द्या
घाई करू नका, असं लाजू नका || धृ ||
लई दिसानं आलेत आज
जेवण केलयं पुरणपोळीचा थाट
स्वस्थ होवूद्या काय लागलं तर मागून घ्या
जेवण निवांत होवूद्या ||१||
घाई करू नका, आसं लाजू नका || धृ ||
पुढ्यात ठेवलीय वाटी आन ताट
त्याखाली दिलाय चंदनी पाट
वरणभात कालवूनी करा सुरूवात
आजच्या दिवस रहा जा हो उद्या ||२||
घाई करू नका, आसं लाजू नका || धृ ||
कुरडई पापड भजी अन पुरी
ओरपा की जरा सार, गुळवणी
तुप लावूनी घ्या एकदा पुरणपोळी
पोटभर जेवा हात मारा आडवा |||३||
घाई करू नका, आसं लाजू नका || धृ ||
भरीत झालय झकास आज
तुमच्या वहिनीन केलय खास
ठेचा मिरचीचा लावा तोंडी
ठसका जाईल तर लावा तांब्या ओठी
तोंडी लावायला हाताशी आहे कांदा ||४||
घाई करू नका, आसं लाजू नका || धृ ||
सोयरे धायरे आपन जिवाभावाचे
काय वेगळे नाही मानायचे
असेच वरचेवर भेट द्यायला
सच्याच्या घरी जरूर यायचे बरका ||५||
परत जायची घाई करू नका, आसं लाजू नका || धृ ||
२५/११/२००९
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 5:00 am | शाहरुख
असली पंगत मांडलीय व्हय..आमाला वाटलं हॅ हॅ हॅ !!
खास विडंबकांना खाद्य म्हणून तर नाही हे काव्य रचले ? ;-)
25 Nov 2009 - 5:06 am | उमराणी सरकार
सुरूवात खतरा. कल्पनाशक्तीला चांगला वाव आहे.
चालू ठेवा. पुढचा एपिसोड कधी येतोय?
उमराणी सरकार
25 Nov 2009 - 5:58 am | sujay
श्री भेद,
खालील ओळी सर्वांगाला भिडल्या .
ठसका जाईल तर लावा तांब्या ओठी
तोंडी लावायला हाताशी आहे कांदा
चड्डीतछेद
25 Nov 2009 - 8:53 am | विसोबा खेचर
मस्त! :)
25 Nov 2009 - 12:04 pm | jaypal
"कारभारी दमान".......या लावणी ची आठवण झाली.
असो स्नेह (प्रिती) भोजन आवडलं
बतावणि बाज जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Nov 2009 - 4:23 pm | सूहास (not verified)
वेगळीच चुल ..आपल हे पगंत ..
सू हा स...
25 Nov 2009 - 5:30 pm | महेश हतोळकर
=P~
डोळ्यासमोर
आलं.
25 Nov 2009 - 6:25 pm | समंजस
छान!! :)