नार्सिसस....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
16 Nov 2009 - 3:27 pm

"जिनियस माणसं कधी-कधी माथे फिरल्यासारखी वागतात त्याचं कारण काय असेल?"

प्रा. बिरुटे, अवलियाला विचारत होते. प्रो. देसाई सुटीवर असल्यामुळे प्रा.बिरुटे अवलियांना घेऊन तळ्याकाठी बसले. एकेक भाजलेला शेंगदाणा टाइमपास म्हणून खातांना असा अचानक प्रश्न विचारल्याने अवलिया नेहमीप्रमाणे भांबावल्या सारखा झाला.

"अवलियासेठ तुला सांगतो. मराठी माणसं एकत्र आली म्हणजे फ्लॅट घेतला का ? पोरीच्या लग्नाचं जमलं का ? कार्यालयातले बॉस काय म्हणताहेत ? काय म्हणतं राजकारण ? असे काही सामान्य प्रश्न विचारतात. "

"हो तर ! जगरहाटीत अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मागे हात धुवून लागलेले असतात. कुणीही माणूस भेटल्यावर एकमेकांच्या जीवा भावाच्या गोष्टी करतात. आणि तसं केलं म्हणजे कसं हलकं हलकं वाटतं. इतकंच काय आजकाल वेळेवर घरी पोहोचले का? रस्त्यात दगड बिगड लागला नाही ना? घरी लाईट होते का? जेवुनच झोपला ना ? हे पण महत्वाचे प्रश्न झालेले आहेत. पण सर, तुम्ही कोणत्या माणसाच्या माथेफिरुपणाबद्दल बोलत आहात ?"

अवलियानं सहज पण मुख्य प्रश्न प्रा.बिरुटेंना विचारला. तसा बिरुटेंनी एक खोल आणि दिर्घ श्वास घेतला. बोलावे की न बोलावे म्हणून मागे पहात रस्त्यावरील वाहतुकीच्या वर्दळीकडे नजर फिरवली. हातातले काही शेंगदाणे तळ्यातील माशांना टाकले. गोळा झालेल्या माशांकडे पाहात प्रा. बिरुटे म्हणाले "कसं आहे, काहींना माणसाचा तिटकारा येतो. पण माणसांशिवाय होत नाही "

"म्हणजे कसं ? " अवलियाला नेहमीप्रमाणे अधिक स्पष्टीकरण हवं होतं.

"म्हणजे असं की, काही माणसं आपल्या वैयक्तीक जगण्यातील ताण-तणावांनी गुदमरुन जातात. आणि हे गुदमरून जाणं बाहेर यायला हवं. आणि जेव्हा ते व्यक्त होतं त्याला 'भावनेचं विरेचन' असे म्हणतात. अशा अवस्थेतून बाहेर येण्यासाठी कोणी मद्याच्या आहारी जाऊन याला त्याला शिव्या घालतो किंवा कोणी चिंतन,मंथन,वाचन करुन प्रयत्नपूर्वक त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. "

"पण त्याचा माणसाच्या तिटकाराशी काय संबंध?" अवलियाची उत्सूकता ताणली गेली.

"आपल्या व्यथा, आपली तगमग, कोणाला तरी सांगितली म्हणजे तिथेच ती कुलुपबंद झाली पाहिजेत असे अशा माणसांना वाटते. पण असा विश्वासू माणूस कोणता याचे त्याला उत्तर मिळत नसते. विश्वासू सर्वच असतात पण विश्वास कोणावर टाकावा. अशा भांबावलेल्या अवस्थेत तो सर्वांना शिव्या घालत फिरतो. सर्वच त्याच्या दृष्टीने अविश्वासू असतात. "

"हम्म ! खरं आहे. याला नार्सिसस्टीक पर्सनालिटी डिसऑर्डर असे काहीसे म्हणतात असं ऐकलं होतं कधीतरी ..." अवलियानं हलकेच बोलायला सुरुवात केली.

"नार्सि... काय काय म्हणालास ?" मराठी व्यतिरिक्त शब्दांना प्रा बिरुटे अडखळलेच.

"नार्सिसस्टीक.. नार्सिसस नावाच्या माणसावरुन ते नाव.. "

"कोण होता तो?"

"जुनी ग्रीक कथा आहे. कुणी नार्सिसस नावाचा देखणा राजपुत्र होता. आजुबाजुच्या सगळ्या स्त्रिया त्याला पाहुनच प्रेमात पडत असत. त्याने स्वतः कधीही स्वतःला पाहिले नव्हते. एक दिवस अचानक एका तळ्यात त्याने स्वतःचा चेहरा पाहिला आणि स्वतःच्याच प्रेमात पडला. इतका की झुरुन झुरुन मरुन गेला. त्यावरुन एका रोगाला हे नाव दिले." अवलियानं कथा संपवली.

"काय आहे हा रोग?" आता प्रा.बिरुटेंची उत्सूकता ताणल्या गेली.

"या रोगात माणुस स्वतःवरच फार प्रेम करतो. कुठल्यातरी स्वतःच्याच भावविश्वात रममाण असतो. सतत कुणीतरी आपल्याला चांगलंच म्हणावं अस सतत त्याला वाटत असत. आपल्याशी इतर कुणाचीही तुलना करु नये असं वाटतं. सतत अमर्यादित यश, सत्ता, बुद्धी, प्रेम यांचीच स्वप्न पहात असतो. तो कुणीतरी विशेष असुन त्याला सतत कुणीतरी तसंच वागवावं असच वाटत असतं. स्तुती सुद्धा खूप करावी असं वाटतं. समोरच्यानी याला आपोआप समजून घ्यावं, याच्या मागण्या पुरवाव्या आणि विशेष वर्तणूक द्यावी असं वाटतं. हा दुस-याचा फायदा घेण्यात तरबेज असतो. दुस-याच्या भावनांचा आणि गरजांचा सहानुभुतीपुर्वक विचार करत नाही. उद्धट आणि उद्दाम वर्तणुकीने समोरच्याशी वागतो वगैरे वगैरे बरेच गुणविशेष या रोग्यांमधे दिसून येतात."

"अरे बापरे ! मग यावर उपचार ?" प्रा.बिरुटे जरा टरकून म्हणाले.

"बरेच उपचार आहेत. पण यात रोग्याने स्वतःहून मी रोगी आहे हे मानणं हे महत्वाचं आहे. असो. यातला काही मी तज्ज्ञ नाही म्हणुन जास्त सांगु शकत नाही.

प्रा.बिरुटे चर्चेचा समारोप करत म्हणाले. "हम्म ! हीच तर मुख्य अडचण आहे. एक तर जिनियस असल्यामुळे कोणाशी बोललो तर आपण कमकुवत आहोत असा संदेश मित्रांमधे जाईल. त्या पेक्षा सर्वांनाचा टाळणे हा मार्ग उत्तम असे त्यांना वाटत असते. यांचा विषाद घालवायचा असेल तर..कृष्णासारखा समुपदेशक मिळावा लागतो. आणि दुर्दैवाने असा माणूस अशा व्यक्तींना शोधूनही मिळत नाही "

"चला ! बराच वेळ झाला. चलायचे का ? "

"हम्म... चला ! "

प्रा. बिरुटे उठले. अंग झटकून तळ्याच्या दिशेने थोडे गेले. अवलिया उठला आणि नेहमीप्रमाणे सिगारेट काढून तोंडात ठेवून पेटवली. बिरुटे तळ्यात डोकावले आणि अगदी आनंदाने अवलियाला म्हणाले
" अरे इकडे ये ! किती नितळ पाणी आहे. काय छान दिसते आहे बघ प्रतिबिंब ! "

नकारार्थी मान हलवून धूर सोडत अवलिया म्हणाला "नको ! मला डॉक्टरांनी स्वतःचे प्रतिबिंब तळ्यात पहायला मनाई केली आहे ! "

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

16 Nov 2009 - 4:10 pm | श्रावण मोडक

हं...

टारझन's picture

16 Nov 2009 - 4:12 pm | टारझन

जियो !! अंमळ छान लेख :)
बाकी नर्सिसस एका पुरुषाच्या (स्वतःच्या ) प्रेमात पडला ? काय गे वगैरे होता की काय? नाही फक्त स्त्रीया आणि तो .. एवढेच त्याच्या प्रेमात पडले म्हणून विचारलं बाकी काही नाही :)

- प्रा.डॉ.कुलूप लावूदे

विनायक प्रभू's picture

16 Nov 2009 - 4:13 pm | विनायक प्रभू

शॉलेट्ट शेवट

अमृतांजन's picture

16 Nov 2009 - 4:15 pm | अमृतांजन

मी ह्या संकेतस्थळावर नवीनच त्यामुळे हे शालजोडीतील कोणासाठी आहेत ह्याचा बोध झाला नाही. तरीही ज्यांच्यासाठी ही कथा आहे त्यांना ते खूपच हळूवार चिमटे घेतील ह्यात शंकाच नाही!

अनवधनाने नार्सिसिस्टीक व नार्सिसिझम ह्या ऐवजी जे शब्द वापरले गेले आहेत त्या ने ह्या कथेची गोडी मुळीच कमी होत नाही.

बिरुटे सरांची लेखन शैली मोहक आहे व मला व्यक्तिश आवडते. त्यांनी ह्या कथेसाठी अवलियाचीच निवड चरीत्र अभिनेता म्हणून का केली असावी हे ही न उलगडलेले कोडे. कदाचित ती त्यांच्या लेखन शैलीचीच एक खास अशी किनार असावी असे वाटऊन गेले.

सर, आपण फारच कमी लिहिता अशी एक गोड तक्रार करुन माझा प्रतिसाद संपवतो.

सहज's picture

16 Nov 2009 - 4:18 pm | सहज

काय बे तलावात काय कोणी पाहीले का बे?

;-)

विजुभाऊ's picture

16 Nov 2009 - 5:36 pm | विजुभाऊ

उद्धट आणि उद्दाम वर्तणुकीने समोरच्याशी वागतो वगैरे वगैरे बरेच गुणविशेष या रोग्यांमधे दिसून येतात."

या गुणांमध्ये लोकांच्या आनन्दाला विरजण लावायचे या गुणाचाही समावेश करा की गुर्जी.


जय महाराष्ट्र.....

अवलिया's picture

16 Nov 2009 - 6:42 pm | अवलिया

:)

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

प्रो. देसायाचा नातु पण सुट्टीवर गेला आहे काय?

वेताळ

प्रभो's picture

16 Nov 2009 - 9:07 pm | प्रभो

ह्म्म...
चालू द्या...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

संजय अभ्यंकर's picture

16 Nov 2009 - 10:26 pm | संजय अभ्यंकर

प्रा. साहेबांचा लेख बर्‍याच दिवसांनी मि.पावर आला.
फूल्टू!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मदनबाण's picture

16 Nov 2009 - 10:36 pm | मदनबाण

सर, लेख आवडला. :)

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

अवलिया's picture

18 Nov 2009 - 6:54 pm | अवलिया

सदर लेख वाचुन अनेक मान्यवर सदस्यांनी माझ्याकडे हा लेख माझ्यावर आहे का ? अशी चौकशी केली. प्राध्यापक साहेबांशी झालेल्या चर्चेनुसार आणि माझ्या आकलनानुसार सदर लेखात माझा कथानायक म्हणुन वापर केला असला तरी हा लेख मला उद्देशुन नाही.

हा लेख कुणावर आहे हे वाचकांनी आपापल्या बुद्धीनुसार संदर्भ लावुन ओळखावे. कृपया मला या संदर्भात खरड वा व्यनी करु नये. कारण ज्या सदस्यावर हा लेख बेतला आहे, लिहीला आहे, तो.... मी नव्हेच !

खुलासा संपला.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

छोटा डॉन's picture

18 Nov 2009 - 6:56 pm | छोटा डॉन

हा लेख कुणावर आहे हे वाचकांनी आपापल्या बुद्धीनुसार संदर्भ लावुन ओळखावे. कृपया मला या संदर्भात खरड वा व्यनी करु नये. कारण ज्या सदस्यावर हा लेख बेतला आहे, लिहीला आहे, तो.... मी नव्हेच !

खुलाश्यासाठी धन्यवाद !
=)) =))

------
थां. बॉ. चपला घालुदे.
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Nov 2009 - 11:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवादासाठी डान्रावांचे आभार!

सर, तुम्हीपण हल्ली तळ्यावर जाता वाट्टं! एकदा आम्हा गरीबांच्या विहीरीवर पण या की अंमळ!!

अदिती

श्रावण मोडक's picture

19 Nov 2009 - 12:07 am | श्रावण मोडक

बरं... बरं...! कळलं... ते काही तरी म्हण असायची पूर्वी - मी मारल्यासारखं... वगैरे. ही नवी - मी खरडल्यासारखं लिहितो... तू कळल्यासारखा प्रतिसाद दे!

निमीत्त मात्र's picture

19 Nov 2009 - 7:30 am | निमीत्त मात्र

खल्लास!!

धमाल मुलगा's picture

19 Nov 2009 - 3:30 pm | धमाल मुलगा

(च्यायला! चक्क निमाशी मी '+२' :D असो!)

आम्हीपण खल्लास मोडक!
आता लागा तयारीला..२ बांबू, ७ कामट्या, छटाक सुतळी, एक मडकं, डोक्याला फडकं...................

अवांतरः बिरुटे गुर्जी, लेख बाकी फक्कड जमलांय हों!
अतिअवांतरः त्या नानाच्या नादी कशाला लागताय? बिघडवतील तुम्हाला...त्यात पुन्हा त्यांना भेटायला जाताय कुठे तर तळ्याकाठी! च्छ्या:!
:D
-(कै. डोमकावळा) ध.

मनीषा's picture

18 Nov 2009 - 8:17 pm | मनीषा

लेख चांगला आहे .
प्रत्येकाला डोकावण्यासठी स्वतंत्र तळं असतं का ? (.. काही तळ्यात खूपच शेवाळं असतं, कुणालाच काही दिसत नाही )
पुण्याच्या केळकर संग्रहालयात काही आरसे आहेत , प्रत्येक आरशात एकाच व्यक्तीची वेगवेगळी प्रतिबिंब दिसतात .

विकास's picture

18 Nov 2009 - 8:33 pm | विकास

लेख वाचल्यावर एकदम गुलाम अलीच्या गझलच्या ओळी आठवल्या: (आठवणीतून असल्याने चु.भू. दे.घे. :) )
...
अपनी लहर मैं अपना लो
दरिया हूँ और प्यासा हूँ

आती रुत मुझे रोएगी
जाती रुत का झोका हूँ
...
अपनी धुन मे रहता हूँ
मै भी तेरे जैसा हूँ

सूहास's picture

18 Nov 2009 - 8:46 pm | सूहास (not verified)

छान लेख...

जात जाता :: आनंद बर्वेंच्या "तळ्यात मळ्यात" कवितासंग्रहाची आठवण झाली

सू हा स...

भानस's picture

19 Nov 2009 - 7:31 am | भानस

डॉ. बिरुटे लेखाचा मतितार्थ विचार करायला लावणारा आहे. शेवट मस्त.:)
विजुभाऊ फडणीस सरांची चित्रे अप्रतिमच. संग्रही अजून एकाची भर, आभार.

हर्षद आनंदी's picture

19 Nov 2009 - 8:21 am | हर्षद आनंदी

क्षणभर विसावा..

एखादा तसा असावा असा आपलाच आपण विचार करुन, इतरांच्या गुणदोषा(?) बद्दल जाहीर मत, आणि त्यात मी किती ज्ञानी आहे असे दाखवणे... हे तुमच्या कडुन अपेक्षित नव्हते. असो.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

shweta's picture

19 Nov 2009 - 9:14 am | shweta

डॉ बिरुटे सर,
छान लेख आहे. विचार करायला लावणारा. ज्या लोकांसाठि हा लेख लिहिला आहे त्यांनी न कळल्या सारख केलं तरी बाण बरोबर लागला आहे. सगळे च स्वतः ला मालक म्हणवुन घेतात. खरा मालक कोण हे जग ठरवतं हेच खरं.
(समझने वाले समझ गये !)

विसुनाना's picture

19 Nov 2009 - 10:56 am | विसुनाना

स्फुट म्हणता येईल असा हा लेख मिपावरील संदर्भांविना स्वतंत्रपणे वाचला तरीही चांगलाच आहे. अर्थ पोचला.
प्रत्येकजण कुठेना कुठे, कधीना कधी नार्सिसस असतो. तो मानवी मनाचा एक पैलू आहे.
प्रोफेश्वरांची सुलभ लेखनशैली आवडली.

अमृतांजन's picture

19 Nov 2009 - 11:07 am | अमृतांजन

डॉकटरांचा हा मोनोलॉग आहे का? एकाही प्रतिसादाला त्यांनी प्रतिप्रतिसाद दिलेला नाही हे वाचून त्यांनी आणखी कोड्यात टाकले. त्यांच्या एका मोठ्या डावपेचाचाच हा एक भाग आहे का?, ते नेहमीच असे करतात का?, असे अनेक प्रश्न घेऊन बसलेली- अमृतांजन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2009 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉकटरांचा हा मोनोलॉग आहे का? एकाही प्रतिसादाला त्यांनी प्रतिप्रतिसाद दिलेला नाही हे वाचून त्यांनी आणखी कोड्यात टाकले. त्यांच्या एका मोठ्या डावपेचाचाच हा एक भाग आहे का?
हा हा हा, कसला मोनोलॉग. :)

प्रत्येकाच्या प्रतिसादाला आभाराचा उपप्रतिसाद देण्यापेक्षा, प्रतिसाद वाचून मनोमन आनंद घ्यायचा असे धोरण होते. म्हणून उपप्रतिसाद टाकला नाही.तेव्हा त्यात काही कोडे किंवा डावपेच नाही, याची नोंद घ्यावी. :)

आपले दोन्हीही प्रतिसाद आवडले. मनःपुर्वक आभार...!!!

-दिलीप बिरुटे

मिसळभोक्ता's picture

19 Nov 2009 - 3:03 pm | मिसळभोक्ता

कसला डॉक्टर ?

मराठीचा ना ?

मग पूर्ण सूट दिली.. लिहा.. लिहा.. काहीही आगा पिछा नाही, तरी लिहा..

इथे आहेतच, वा वा करणारे.. पूर्ण फायदा उठवा..

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज's picture

19 Nov 2009 - 6:50 pm | सहज

हा हा हा! स्पोकन लाईक अ ट्रु अंडरएप्रिशिएटेड, अंडरपेड सुपर हिरो!! ;-)

असो, (वैयक्तिक हल्ले, सूट व) खुलाशाबद्दल धन्यवाद

:-)