प्रसन्ना जीके यांची गुलमोहोर वाचुन सुचलं :&
काय सांगु ती स्वाइन फ्लु ची साथ
ऑगस्टपासुनच आहे त्याच्या हातात मात
शाळेत जाताना रस्त्या रस्त्यावर त्याचे अधिष्ठान
हिरव्या पांढर्या मास्कमधुन हळुच डोकावते नाक अन् कान
ताप येता हुरहुर लागतसे जीवा
सर्दीपडश्या मागे स्वाईन नसेल ना हा घोर जीवा
सर्दीच्या सोबतीने श्वास फुलतसे बडा
कुंद वारे वाहताना समोर व्हेन्टीलेटर खडा
हिरव्या कापडांच्या भीतीने थिजले माझे मन
इथे तरी स्वाइन नसावा आस मनी धरुन
पुर्ण व्हावी याचना असे वाट्तसे मनोमनी
काय दुर्भाग्य माझे सापडला स्वाइन रिपोर्टमधुनी
जातानाही स्वाईनला सांगा साथ माझी करशील
सरणावरती माझ्याबरोबर तु सुध्दा संपशील
(चेतनअन्ना पीके)
प्रतिक्रिया
31 Oct 2009 - 4:06 pm | अमोल केळकर
मस्त
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
1 Nov 2009 - 12:09 pm | चेतन
धन्यवाद अमोल
चेतन