काय सांगु त्या गुलमोहोराची साथ
बालपणापासुन आहे त्याच्या हातात हात
शाळेत जाताना अर्ध्या रस्त्यावर त्याचे अधिष्ठान
लाल गोजिऱ्या फुलांमधुन हळुच डोकावे हिरवे पान
वयात येता हुरहुर लावतसे जीवा
टपोऱ्या फुलांच्या खाली असे थोडा गारवा
वाऱ्या सोबतीने पडतसे फुलांचा सडा
धुंद वारे वाहताना सोबती गुलमोहोर खडा
हिरव्या पानांच्या मखमालीने फुलले माझे मन
त्या घरी ही गुलमोहोर असावा आस मनी धरुन
पुर्ण व्हावी कामना असे वाट्तसे माहेरी
काय सौभाग्य माझे दिसला गुलमोहोर दारी
जातानाही गुलमोहोराला सांगा साथ माझी करशील
सरणावरती लाल फुलांची रांगोळी तू रेखशील
प्रसन्ना जीके
प्रतिक्रिया
31 Oct 2009 - 12:31 pm | चेतन
कविता ठीक वाटली
पु. ले शु
चेतन
अवांतरः दुसरा प्रतिसाद इथे आहेच्