आली माझ्या घरी ही दिवाळी

प्रभो's picture
प्रभो in कलादालन
25 Oct 2009 - 3:23 pm

दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी.
ही रांगोळी आईने काढली. यात आधी बहिणीने मग नंतर तिचा हात दुखायला लागल्यावर मी रंग भरला.

लक्ष्मीपूजन १

लक्ष्मीपूजन २

दिवाळीसाठी मी आईला घेतलेल्या बनारसी साडीचा पदर दाखवायची पोज घेतलेले आई-बाबा
दोघे सारखे कशाकशावरून वाद करत असतात पण तेवढेच खेळकर आणी हसमूख ही आहेत.
माझे मित्र घरी आल्यावर बाबाही आमच्यातलेच एक होऊन जातात.(ते त्यावेळी घरी असले तर)

पाडव्याच्या दिवशीची रांगोळी

याचे सर्वाधिकार आईकडे. तिनेच काढली आणी रंग भरला.

कलासंस्कृतीछायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

25 Oct 2009 - 3:28 pm | प्रसन्न केसकर

मस्तच रे! गोपद्म, लक्ष्मीची पाउले सगळं आल्यानं छान फील येतोय. पण फराळा-बिराळाचं काय केलंस की नाही रे?

अवलिया's picture

25 Oct 2009 - 3:31 pm | अवलिया

वा ! वा ! वा ! छान छान.. !

खरं तर आता असल्या धाग्यांचा कंटाळा आला आहे..
पण तु आपला कंपुतला म्हणुन प्रतिसाद दिला.
:)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

25 Oct 2009 - 3:35 pm | प्रभो

=))
कंपू जिंदाबाद...

म्हणून मी दिवाळी नंतर एक आठवड्याने धागा टाकला आणी फराळाचे फोटो नाही टाकले.

(नवा कंपूबाज)प्रभो

अवलिया's picture

25 Oct 2009 - 3:39 pm | अवलिया

शाबास ! तु अजुन सहा महिन्यांनी टाकले असतेस तरी प्रतिसाद दिला असताच.

कबुल केल्याप्रमाणे दोन प्रतिसाद दिले. नोंद करुन ठेवणे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

25 Oct 2009 - 5:28 pm | दशानन

>> अजुन सहा महिन्यांनी टाकले असतेस तरी प्रतिसाद दिला असताच.

असेच म्हणतो.

कबुल केल्याप्रमाणे दहा प्रतिसाद देईन. दोन आले नोंद करुन ठेवणे. आम्हाला दहा प्रतिसाद कधी मग ?

प्रभो's picture

25 Oct 2009 - 8:05 pm | प्रभो

कबूल केल्याप्रमाणे मात्र रात्रीच्या दहाव्या भागाला... =))

(आणी बाकिच्या धाग्यांना नऊ-नऊ)
--प्रभो

गणपा's picture

26 Oct 2009 - 2:37 am | गणपा

घ्ये मापला पन एक परतिसाद...

कंपुबाजी जिंदाबाद ;)

टारझन's picture

25 Oct 2009 - 3:45 pm | टारझन

प्रभ्या ... तुझा धागा म्हणून प्रतिसाद ... नाही तर लै दिवाळ्या झाल्या .. आता बोर झालंय ... अजुन कोणता धागा सेम विषयावर आला तर गोंधळ करायचा !!
बोला कंपु..झिंदाबाद !!!

-- दिवालिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

दशानन's picture

25 Oct 2009 - 3:32 pm | दशानन

मस्त रे !

छान दिवाळी फोटो !

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

पर्नल नेने मराठे's picture

25 Oct 2009 - 3:33 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख रान्गोळी व साडी सुद्धा......
चुचु

shweta's picture

26 Oct 2009 - 9:20 am | shweta

खरच
साडिचा पदर किती छान आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Oct 2009 - 10:02 am | ब्रिटिश टिंग्या

छान छायाचित्रे!

अवांतर : तसा आपला काही फारसा संवाद नाही. परंतु कंपुबाजीच्या नियमावलीला स्मरुन हा प्रतिसाद!

विशाल कुलकर्णी's picture

26 Oct 2009 - 1:03 pm | विशाल कुलकर्णी

छान फोटो !

आमचेही लक्ष्मीपुजन...

यावर्षीचा आकाशदिवा

लक्ष्मीपुजनादिवशी काढलेल्या रांगोळीसह आमची गृहलक्ष्मी

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विसोबा खेचर's picture

26 Oct 2009 - 1:07 pm | विसोबा खेचर

दिवाळीसाठी मी आईला घेतलेल्या बनारसी साडीचा पदर दाखवायची पोज घेतलेले आई-बाबा

आमचा नमस्कार कळवा! :)

तात्या.

प्रभो's picture

26 Oct 2009 - 1:13 pm | प्रभो

नक्कीच
--प्रभो

स्वाती२'s picture

26 Oct 2009 - 5:54 pm | स्वाती२

साडी झकास! मस्त वाटलं तुमच्या आईबाबांचा फोटो पाहून.

मीनल's picture

26 Oct 2009 - 5:58 pm | मीनल

पूजा ,रांगोळी ,साडी ,फोटो सर्व आवडले. अगदी भारतात घरी गेल्यासारख वाटल.हॅपी हॅपी!!!!

मीनल.

मीनल's picture

26 Oct 2009 - 6:03 pm | मीनल

इथे घराबाहेर रांगोळी काढताना हात गोठतात.
छोटीशी काढावी कशी तरी म्हटल तर काढतानाच वा-याने ऊडते आणि विस्कटून जाते.
मी तर चक्क घरात फायर प्लेस च्या समोरच्या मार्बल वर रांगोळी काढली.
तिथेच पणत्या लावल्या.
फोटो घ्यायला विसरले.
मीनल.

श्रद्धा.'s picture

22 Nov 2009 - 11:45 am | श्रद्धा.

व्वा मस्तच रे प्रभो....

jaypal's picture

22 Nov 2009 - 3:34 pm | jaypal

प्रभो
फोटो आणि साडी दोन्ही मस्तचरे गड्या.लै भारी! लै भारी!
(येवढ कौतुक करायच कारण म्हणजे पुजा झाल्याचे दिसते आहे तेंव्हा लक्ष्मीला आमच्या कडे पण पाठवा.)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/