डार्विनच्या अनुयायींनो ह्या प्रश्नांची उत्तरे द्या

अमृतांजन's picture
अमृतांजन in जनातलं, मनातलं
19 Oct 2009 - 7:07 pm

आधीच सांगते की, डार्विनचा सिद्धांत मला पटलेला नाही व दिशाभूल करणारा आहे.

माणूस जर माकडापासून उत्क्रांत झाला आहे तर हे असे कसे?-

१. माकडात आणि मानवाच्या गुणसुत्रांमधे फक्त २ टक्क्यांचाच फरक आहे असे तुम्ही म्हणता. म्हणजे मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल तर प्राणी उत्क्रांत होतांना तो निसर्गाच्या जवळ न राहता दूर कसा जाईल?
- माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते
- माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो? माकडाला पोलिओ का होत नाही?
- माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत?
- प्रत्येक माकड सारखेच दिसते; माणूस नाही.
- प्रत्येक माकडाचा (ज्यातून मानव उत्क्रांत झाला) रंग काळाच असतो; मानवाचा नाही
- मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत?

२. माकड जसे उत्क्रांत झाले तसे इतर मासे, चतुष्पाद प्राणी व पक्षी का उत्क्रांत झाले नाहीत? त्यांच्यातूनही एखादा वेगळाच प्राणी पृथ्वीवर का निर्माण झाला नाही?

३. माकड व इतर सजीवांना भूकंप वगैरेची जाणीव होते तशी ती मानवाला का होत नाही? माकडातील जे गुणसुत्र-ज्ञान साठवले गेले आहे ते मानवात संक्रमित व्हावयास पाहिजे होते तसे न झाल्यामुळे तो निसर्गापासुन दुरावला गेला आहे हे स्पष्ट दिसते- ह्याला "उत्क्रांती" कसे म्हणता येईल?

असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला हेच दिसते की, डार्विनची थेअरी खोटी आहे. धूळफेक आहे.
माझ्यासारख्या प्रगल्भ मराठी आधुनिक माणसांना तुझी थेअरी पटणे अशक्य आहे रे डार्विना!
तुझ्या अनुयायींनी हे वाचावे व आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणावे अशी स्पष्ट सुचनाच मी मांडते व माझे दोन शब्द संपवते.

धोरणविचार

प्रतिक्रिया

दशानन's picture

19 Oct 2009 - 7:10 pm | दशानन

टाळ्या !!!!

=D>

जगाचे उध्दारकर्ते (एकमेव) श्री १००००००८ अमृतांजनबांबाचा विजय असो.... !!!!!

****
टिप :-

ज्यांना देणगी देणे आहे त्यांनी फक्त मलाच व्यनी करा, पुर्ण माहीती दिली जाईल.

धन्यवाद.

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

श्रावण मोडक's picture

19 Oct 2009 - 7:17 pm | श्रावण मोडक

अमृतांजनबाबा? कैच्या कैच राव... या साध्वी/मां वगैरे आहेत. पुरावा हवाय -
असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला हेच दिसते...
तुझ्या अनुयायींनी...अशी स्पष्ट सुचनाच मी मांडते व माझे दोन शब्द संपवते.
पुरावा मुद्दाम देतोय. माझा डार्वीन नको व्हायला!!!
बाकी हा प्रस्ताव वाचल्यावर डार्वीन किती थोर होता हे मात्र पुन्हा अधोरेखीत झाले...

दशानन's picture

19 Oct 2009 - 7:19 pm | दशानन

=))

=))

च्यामायला हा तर जेनेटिक लोच्या झाला राव =))

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 7:20 pm | अमृतांजन

राजे, राजे, राजे,
तुम्ही नीट पहा, विचार करा; टाळ्या वाजवायची घाई करु नका. तुम्हालाही पटेल!!!

चिरोटा's picture

19 Oct 2009 - 7:20 pm | चिरोटा

अमृतांजनबांबाचा विजय असो....

मूळ लेखात-
असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते
माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते
-
चपलेशिवाय माणूस चालु शकतो.

माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो?

हे सगळे पाश्चिमात्य रोग आहेत. जुन्या संस्क्रूतींच्या देशांत माणसाना फक्त साधा ताप येतो.
माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत?

सगळेच माकडाचे गूणधर्म आले तर मग उत्क्रांती कसली म्हणायची?
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

दशानन's picture

19 Oct 2009 - 7:25 pm | दशानन

>>सगळेच माकडाचे गूणधर्म आले तर मग उत्क्रांती कसली म्हणायची?

=))

लै भारी जबरा वाक्य !!!

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 7:37 pm | अमृतांजन

..तर मग उत्क्रांती कसली म्हणायची?

माझाही मुद्दा तोच आहे राजे!

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 7:31 pm | अमृतांजन

माझा मुद्दा असा आहे की, उत्क्रांत प्राणी निसर्गापासून दूर कसा जाईल?
माकडाला चष्मा लागत नाही. माणसाला लागतो कारण डोळ्यांचे विकार- हे कसले उत्क्रांतीचे लक्षण?

दशानन's picture

19 Oct 2009 - 7:35 pm | दशानन

माकडं मिपा वाचत नाहीत... आय मीन्...माकडे टिव्ही.. संगणक असल्या वस्तू बघत नाहीत ;)

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 7:40 pm | अमृतांजन

म्हणूनच मी म्हणते की, मानव हा माकडापासून उत्क्रांत झालाच नाहि मुळी. तो एकतर परग्रहावरुन आलाय किंवा इथेच तयार झाला जसे इतर सजीव निर्माण झाले.- वेगवेगळे.
मानवच एखाद्या दुसर्क्ष्या प्राण्यासासून तयार झाला असे का मानावे? तसे दुसरे प्राणी निसर्गात का नाही?

दशानन's picture

19 Oct 2009 - 7:45 pm | दशानन

अरे वा ह !

म्हणजे तुम्ही पण माझ्याप्रमाणे युफओवादी आहात तर....

च्यामायला मी जेव्हा जेव्हा लोकांना म्हणतो की युफओ असतो तेव्हा ते मला म्हणतात जास्त पीऊ नका रात्री... व निवांत झोपा...

परवा रात्री टेलीस्कोप मधून बघताना पण युफओ दिसला होता मला.. मी मिपावर लेख टाकणार होतोच.. पण नंतर कळाले ते काही तरी चिकटले होते माझ्या टेलीस्कोपच्या काचेवर ;)

त्यामुळे मिपावर एका महान लेखाला मुकले... !

बाय द वे,

तुम्ही युफओ बघीतला आहे काय ?

माझ्या मानलेल्या भावाच्या मानलेल्या मामाच्या मानेसर मधील फॉर्म हाऊस वर या कधीतरी तुम्हाला पाजू... व आपण युफओ शोधू बसून ...

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 7:54 pm | अमृतांजन

नाही मी युएफोवादी नाही. तो निष्कर्ष काढण्याचे काम मी तुमच्यावर सोडते.

दशानन's picture

19 Oct 2009 - 7:55 pm | दशानन

>>मी तुमच्यावर सोडते

आधी तुम्ही ती आहात काय तू आहात ते स्पष्ट करा !
मग मुद्दे व गुद्दे काढता येतील ;)

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 7:56 pm | अमृतांजन

शी! कुठे चालली आहे ही चर्चा!

दशानन's picture

19 Oct 2009 - 7:59 pm | दशानन

हे बघा... काही गोष्टी क्लियर करणे चांगले असते.. !

त्यामुळे नंतर होणारा दाहि दिशेने हल्ला मी थोपवू शकेन ;)

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अवांतर :--- माझ्या खव मधेअख्खा इडियो आहे त्यांचा...
बघा किती मोजता येतात तुम्हाला ते !!! ;)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

प्रकाश घाटपांडे's picture

19 Oct 2009 - 7:49 pm | प्रकाश घाटपांडे

मान्साच ड्वॉक दुखल्यावर ते अमृतांजन लावतय ; माकड काय करत काय कळानी ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 7:53 pm | अमृतांजन

माझ्या ह्या जबर्दस्त धाग्याचे व विचारांचे अशा चिंध्या उडाल्यामुळे मन एकदम विदिर्ण झाले. काय हे!

दशानन's picture

19 Oct 2009 - 7:54 pm | दशानन

होतं असं कधी कधी ;)

माकडाचे काही गुण राहिले आहेत माणसात =))

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Oct 2009 - 8:04 pm | llपुण्याचे पेशवेll

अमृतांजनरावांचे/बाईंचे मुद्दे विचार करण्याजोगे आहेत खरे.
क्षमतेचा र्‍हास हे देखील एक कोडेच आहे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

दशानन's picture

19 Oct 2009 - 8:05 pm | दशानन

>>>क्षमतेचा र्‍हास हे देखील एक कोडेच आहे.

हा मुद्दा विसरला होता, धन्यु पुपे तुमच्यामुळे एका नष्ट होत असलेला मुद्दा लक्ष्यात आला... ;)

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

आनंद घारे's picture

19 Oct 2009 - 8:08 pm | आनंद घारे

निदान बुद्धिमत्तेच्या बाबतीत झालेली नसावी असे वाटायला लागले आहे
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 8:11 pm | अमृतांजन

:-) काय बोलणार?

दशानन's picture

19 Oct 2009 - 8:11 pm | दशानन

+ १

मला पण असेच वाटत आहे... !

दोनचार बुध्दीवादी माणसं बोलवा चर्चा होऊन जाऊ दे.

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

देवदत्त's picture

19 Oct 2009 - 8:33 pm | देवदत्त

मी डार्विनचा अनुयायी नाही पण तुमचे प्रश्न पटले नाहीत म्हणून लिहित आहे.
तुम्हीही तुमच्या वाक्यांचे स्त्रोत/किंवा पुरावेही द्यावेत.
माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते
माणूस विना चप्पल चालू शकतो. त्याने त्याची गरज निर्माण केली असेही म्हणता येईल पण खरं तर त्याने पायांकरीता एक संरक्षण निर्माण केले.

माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो? माकडाला पोलिओ का होत नाही?
होत असेलही, त्याबाबत शास्त्रीय/वैद्यकीय पुरावे शोधावे लागतील.

माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत?
काहींना असतात.

मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत?
ह्यावरून तुम्हाला सहमती असे नाही परंतु काही वेगळे शास्त्रीय/वैद्यकीय प्रयोग आठवले.
अंतराळात प्रयोगाकरीता माकडाला पाठवण्यात आले होते.
शाळा/महाविद्यालयांत बेडूक आणि माणसांच्या शरीरातील साधर्म्य शिकवितात.
तसेच भरपूर औषधांच्या चाचण्यांकरीता गिनीपिग नावाचे प्राणी वापरतात.

बाकी मुद्यांना जमल्यास/काही मिळाल्यास उत्तरे देईन. :)

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 9:29 pm | अमृतांजन

तुम्हीही तुमच्या वाक्यांचे स्त्रोत/किंवा पुरावेही द्यावेत.

तसे पुरावे नाहीत. मला जे वाटले ते मी येथे मांडले.

माणूस विना चप्पल चालू शकतो. त्याने त्याची गरज निर्माण केली असेही म्हणता येईल पण खरं तर त्याने पायांकरीता एक संरक्षण निर्माण केले.

शोध ही गरजेतून निर्माण होतो असे मानले तर ती गरज का निर्माण झाली? काही निश्चित कारणासाठी चपला, पादुका, बूट वापरले जातात- ते कारण का निर्माण झाले.
आपण अशाही काही वस्त् आज वापरत नाही की ज्या बनवायची गरजच निर्माण झाली नाही.

माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत?
काहींना असतात

हाच माझा मुद्दा आहे. माकडांच्या बाबतीत हे होत नाही. तसेच इतरही कोणत्याही प्रण्याच्या बाबतीत असे होत नाही. ते सारखेच दिसतात- वर्षानुवर्ष.

ह्यावरून तुम्हाला सहमती असे नाही परंतु काही वेगळे शास्त्रीय/वैद्यकीय प्रयोग आठवले.
अंतराळात प्रयोगाकरीता माकडाला पाठवण्यात आले होते.
शाळा/महाविद्यालयांत बेडूक आणि माणसांच्या शरीरातील साधर्म्य शिकवितात.
तसेच भरपूर औषधांच्या चाचण्यांकरीता गिनीपिग नावाचे प्राणी वापरतात

हेच तर मला म्हणायचे आहे. माकडातून माणूस निर्माण झाला असेल तर त्याला इतर प्राण्यांवर प्रयोग करायची गरजच निर्माण झाली नसती. सगळे प्रयोग माकडावर करुन हवे तसे संशोधन करता आले असते.

Nile's picture

19 Oct 2009 - 9:57 pm | Nile

बघा तुम्हाला यात उत्तर सापडते का ते.
It is even harder for the average ape to believe that he has descended from man.- H. L. Mencken

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 10:17 pm | अमृतांजन

मेन्केनलाही माझ्यासारखेच प्रश्न पडले असणार!
धन्यु

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 10:26 pm | अमृतांजन

आणखी एक महत्वाचा प्रश्न-

माकडापासून उत्क्रांत होतांना माकड आणि माकडीण असे दोन्ही एकाच वेळी कसे उत्क्रांत झाले? की जे मानवी स्त्री आंणि पुरुषात बदलले गेले?

डार्विनची थेअरी बंडल आहे.

> मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल

असे कोणाचे म्हणणे असेल, तर असेल - ते लोक तुम्हाला उत्तरे देतीलच. परंतु असे डार्विनचे मत नसावे, असे त्याच्या पुस्तकावरून वाटते.
हल्लीची माकडे (त्यांच्या शेकडो जाती एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत हे विसरता कामा नये) आणि हल्लीचे मानव हे सर्व एका पूर्वजातीतून विविध वंशांत उत्क्रांत झालेले आहेत.

ते वंश प्रत्येक त्यांच्या-त्यांच्या जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी अधिकाधिक सोयिस्कर अंगे असलेले होत गेले आहेत.

मानवाच्या लिखित इतिहासात अशी बदललेली जनावरे अर्थातच पाळीव आणि शेतकीतली जनावरे आहेत.

आल्सेशिय कुत्रा आणि डाक्स्हुंड कुत्रा हे दोघे जुन्या गावठी कुत्र्यांचे (माणसाळलेल्या लांडग्यांचा एक प्रकार) वंशज आहेत. त्यांची चित्रे (विकिपेडियावरून):
आल्सेशियन - (डोंगराळ प्रदेशात मेंढ्या हाकण्यासाठी याची निपज केली गेली)

डाक्स्हुंड - (बिळात राहाणार्‍या प्राण्यांची शिकार करण्यासाठी याची निपज केली गेली)

पैकी कुठलाही एक दुसर्‍याची सुधारित आवृत्ती आहे, असे म्हणणे कठिण आहे. आल्सेशियन बिळातल्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी ठीक नाही, तर डाक्स्हुंड मेंढ्या हाकण्यासाठी ठीक नाही. पैकी कुठलाही जंगलात सोडला तर पूर्वीच्या गावठी लांडगा-कुत्र्यांइतका टिकणार नाही. त्यामुळे "सुधारणा" म्हणजे "कुठल्या विशिष्ट जीवनपद्धतीसाठी सोय," इतकेच.

असा विचार करता वरील चर्चाप्रस्तावातले बहुतेक प्रश्न डार्विनच्या सिद्धांताशी फारसे संबंधित नाहीत, असे वाटते.

उदाहरणार्थ : प्रश्न १च्या बाबतीत : मनुष्य-स्त्री आणि मनुष्य-पुरुष यांच्यात थोडाच जनुकीय फरक असतो. परंतु त्यांच्या अंगांमध्ये बराच काही फरक असतो. आल्सेशियन आणि डाक्स्हुंड यांच्यात फारच थोडा जनुकीय फरक असतो १ टक्क्यापेक्षा खूप-खूप कमी. पण वर चित्रे बघितली तर शरिरात पुष्कळ फरक दिसतो. म्हणजे अंग बरेच वेगळे असण्यासाठी फारसा "टक्के" जनुकीय फरक लागत नाही. त्या-त्या अंगावर प्रभाव करणार्‍या जनुकाचा अत्यंत छोटासा भाग वेगळा असला तरी पुरे. २% म्हणजे म्हटल्यास खूपच फरक आहे.

२. मासे, पक्षी, वगैरे हे सर्व उत्क्रांत आहेत. (डार्विनच्या प्रथम पुस्तकातील एक सुरुवातीचे उदाहरण कबूतरांचे आहे. "फींच"च्या विविध जातीच्या पक्ष्याच्या उत्क्रांतीबद्दल डार्विनचे निरीक्षण प्रसिद्ध असल्यामुळे, काही जातींना "डार्विन्स फिंचेस" असे नाव पक्षी-अभ्यासक वापरतात.) पिसे असलेल्या एका पूर्वीच्या पूर्वज-जीवजंतूपासून वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती उत्क्रांत झाल्या. पण कोंबडीपासून मोर उत्क्रांत झाला नाही, आणि मोरापासून कोंबडी उत्क्रांत झाली नाही. घोडे, झेब्रा हे दोन्ही एकच खुर असलेल्या एका पूर्वज जनावरापासून उत्क्रांत झालेत. पण घोडा झेब्र्यापासून उत्क्रांत झाला नाही, की झेब्रा घोड्यापासून उत्क्रांत झाला नाही.

३. भूकंप जाणीव, निसर्गापासून दुरावणे, वगैरे - डार्विनच्या सिद्धांताशी संबंध ठाऊक नाही.

मला वाटते, तुमचा वाद डार्विनशी किंवा त्याच्या अनुयायांशी नसून दुसर्‍याच कोणाशी आहे. पण डार्विनचे नाव बघून ते लेख वाचणार नाहीत, आणि तुम्हाला उत्तर द्यायला येणार नाहीत. आणि तुमच्या लेखात डार्विनच्या सिद्धांताचा संबंध फारसा दिसत नसल्यामुळे डार्विन-अनुयायी उत्क्रांतीचे अभ्यासकही फारसे उत्तर देणार नाहीत.

मला वाटते, चर्चा फलदायी व्हावी तर चर्चाप्रस्ताव आमूलाग्र बदलून लिहिला पाहिजे. अर्थात मजामजेसाठी प्रतिसाद येतच राहातील. त्यातही गंमत आहे. तसे हवे असल्यास अर्थातच चर्चाप्रस्तावात काही फरक करायची गरज नाही.

Nile's picture

19 Oct 2009 - 10:50 pm | Nile

अमृतांजन यांचे चर्चाप्रस्ताव पाहता मला तर दाट शंका आहे की हा आय डी अमृतांजन बाम बनवण्यार्‍या कंपनीने 'बाम' चा खप वाढवण्याकरीता बनवला आहे. ;)

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 11:22 pm | अमृतांजन

बिसलेरी म्हणजे बॉटल्ड वॉटर असा जो संबंध तयात झाला आहे तसाच अमृतांजन म्हणजेच बाम असा झाला आहे. त्या-त्या ब्रान्ड वाल्यांचे अभिनंदन.

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 11:19 pm | अमृतांजन

श्री. धनंजय, उत्तम प्रतिसाद. माझी काही संक्षिप्त उत्तरे-
१. ते वंश प्रत्येक त्यांच्या-त्यांच्या जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी अधिकाधिक सोयिस्कर अंगे असलेले होत गेले आहेत

न्याचरल सिलेक्षन- मानवाच्या बोलण्याच्या आणि विचार करण्याच्या जाणीवा त्याला निवडाव्याशा वाटल्या हे त्याने कसे ठरवले? असे त्याला काय वाटले की जे इतर कोणत्याच उत्क्रांत प्राण्याला वाटले नाही व ते नुसते नैसर्गिक वातावरणात जगणे त्यांनी निवडले? ते जर नैसर्गिक वातावरणात जगू शकतात तर मानवाल असे का वाटले की ते अशा वातावरणात जगू शकणार नाहीत त्यामुळे त्यांना कपडे पाहिजेत, घर पाहीजे? मुळातच ह्या गरजा निर्माण झाल्या कारण मानवाला कळून चुकले की, पृथ्वीवर त्याला अशा वातावरणा पेक्षा जास्त सुरक्क्षित पाहिजे. थंडीत राहणार्या एस्किमोला अंगभर पांढरे केस का नाहीत तेथील अस्वला सारख??

२. परंतु असे डार्विनचे मत नसावे, असे त्याच्या पुस्तकावरून वाटते.

हा मुद्दा थोडा पटला कारण असे म्हणले जाते की, त्याने ह्याबद्दल (मानवाच्या उत्क्रांती बद्दल) लिहिणे टाळ्ले. असे मी आताच वाचले. पण मला आजपर्यंत मानवाच्या उत्क्रांतीबद्दलच्या लिखाणात नेहमीच डार्विनचा उल्लेख दिसला व माझा त्याबाबत समज तसा होण्यास तेच कारणीभूत आहे.

३. मासे, पक्षी, वगैरे हे सर्व उत्क्रांत आहेत. (डार्विनच्या प्रथम पुस्तकातील एक सुरुवातीचे उदाहरण कबूतरांचे आहे. "फींच"च्या विविध जातीच्या पक्ष्याच्या उत्क्रांतीबद्दल डार्विनचे निरीक्षण प्रसिद्ध असल्यामुळे, .....

त्या-त्या जातींमधे जे ईंन्सटंन्सेस निर्माण होतात ते एकासारखेच दिसतात. दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो. माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते. (ऑन लायटर साईड- त्यांच्या जन्मवेळेनुसार ते बदलते).

४. ३. भूकंप जाणीव, निसर्गापासून दुरावणे, वगैरे - डार्विनच्या सिद्धांताशी संबंध ठाऊक नाही.

न्याचरल सिलेक्षन मधे ह्या जाणीवा मानवाने टाळल्या असे म्हणता येईल का?

५. मला वाटते, तुमचा वाद डार्विनशी किंवा त्याच्या अनुयायांशी नसून दुसर्‍याच कोणाशी आहे. ..... अभ्यासकही फारसे उत्तर देणार नाहीत.

उत्क्रांती ह्या विषयावर ज्यांनी-ज्यांनी लिखाण-संशोधन केले त्या सर्वांशी ह्याचा संबंध आहे. खरे आहे की, फक्त डार्विनशी नाही.

काही बाबतीत त्यामुळे प्रश्न समजले नाहीत.

असे त्याला काय वाटले की जे इतर कोणत्याच उत्क्रांत प्राण्याला वाटले नाही व ते नुसते नैसर्गिक वातावरणात जगणे त्यांनी निवडले?

काही जीवजंतू एकलकोंडे असतात, आणि काही सामाजिक असतात. सामाजिक जीवजंतू स्वतःसाठी वेगळी स्थिती निर्माण करतात. काही मुंग्या वारुळातच राहातात, बाहेर क्वचित येतात. मधमाशांचे पोळेसुद्धा वातानुकुलित असते. असे सगळे नसल्यास हे जीवजंतू लवकर मरण पावतात. त्यामुळे नैसर्गिक/कृत्रिम वातावरण काय आहे, हे मला नीट कळलेले नाही.
"हर्मिट क्रॅब" हा संरक्षणासाठी मेलेल्या सागरी गोगलगायींचे शिंपले अंगावर घेऊन फिरतात. (काही मनुष्य मेलेल्या अस्वलांचे कातडे संरक्षणासाठी घालतात.) काही का असेना - या सगळ्या उदाहरणांचा उत्क्रांतीशी "जीववैविध्य आहे" असा संबंध आहे.

नॅचरल सिलेक्शनचा अर्थ तुम्ही म्हणता त्यापेक्षा वेगळा वापरला जातो. अंगामध्ये आजूबाजूच्या वातावरणात तगण्यासाठी सोयी तसेच गैरसोयी असलेली अपत्ये, दोन्ही जन्माला येतात. आपोआप जन्मलेल्या अपत्यांत हे जे वैविध्य दिसते, त्यांच्यापैकी सोयी असलेल्या अपत्याचेच जीवन 'नैसर्गिकपणे' वंशवाढीपर्यंत चालू राहायची शक्यता जास्त. जर वैविध्यामुळे त्याच्या अंगात गैरसोयी असल्यात, तर ते अपत्य बहुधा वंशवृद्धी होण्याआधीच 'नैसर्गिकरीत्या' मरते. अशा प्रकारे 'नैसर्गिक'पणे वंशवृद्धीच्या वयाच्या आधी त्यातल्या-त्यात सोयीस्कर अपत्यांची 'निवड' होते. या घटनाक्रमाला "नैसर्गिक निवड" म्हणतात.

त्याने (डार्विनने) ह्याबद्दल (मानवाच्या उत्क्रांती बद्दल) लिहिणे टाळ्ले.

टाळले नाही. "डिसेंट ऑफ मॅन" हे पुस्तक मानवाच्या उत्क्रांतीबद्दल आहे.

दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो.

असे वाटण्यात यात कदाचित दुर्लक्षाचा वाटा असावा. चालायचेच - माझेही बहुतेक जनावरांकडे फारसे लक्ष नसते. ज्या जनावरांकडे अधिक लक्ष असते - यात पाळीव प्राणी अधिक - यांच्यात पुष्कळ फरक दिसतो. ("सगळे चिनी लोक अगदी एकमेकांसारखे दिसतात", असे अधूनमधून कोणाकडूनतरी ऐकायला मिळते. चिनी लोकांना मात्र एकमेक अगदी वेगळे दिसतात.)

माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते.

वर जे दोन कुत्रे दाखवले आहेत, तेवढी तफावत माणसात क्वचितच दिसते! (अर्थात पाळीव प्राणी म्हणून लक्षात येते. माकडांमध्ये विविध प्रकार असतात, पण तुमच्या चर्चेत "सर्व माकडांची तोंडे काळी असतात" असा काही उल्लेख आहे. फारशी पाळीव माकडे नसल्यामुळे तुमचे त्यांच्या वैविध्याकडे दुर्लक्ष होत असावे.) कपिला, कृष्णा, धवला, ठिपक्यांची गाय... गायीच्या रंगांत किती फरक असतात, शिंगांच्या किती तर्‍हा, उंच गायी, बुटक्या गायी... गायीच्या आरोग्यांत फारसा फरक नसता तर गुरांच्या डॉक्टरांना कोण विचारणार? मला वाटते, थोडा विचार करून, गावाकडील स्मृती आठवल्यास, तुमचे वरील वाक्य तुम्हीच अयोग्य मानाल.

न्याचरल सिलेक्षन मधे ह्या जाणीवा मानवाने टाळल्या असे म्हणता येईल का?

नॅचरल सिलेक्शनचे वर्णन वर बघावे - "जी अपत्ये अंगांच्या कमी-अधिक फरकाने 'नैसर्गिकपणे' जन्मतात, ती अपत्येच वंशवृद्धीच्या वयापर्यंत तगलीत, तर निसर्गाने त्यांची 'निवड' केल्याचा आभास" = नॅचरल सिलेक्शन. येथे "टाळणे" कल्पनेचा संदर्भ लागत नाही. गायीच्या कुठल्याही अपत्याला लांब नाके उपजली असतीत, तर लहान नाकाच्या गायींपेक्षा ती आधिक्याने तगली नाहीत. यालाच "गायींनी सोंड हे इंद्रिय टाळले" असे तुम्ही म्हणता का? हे गमतीदार आणि वैचित्र्यपूर्ण वाक्य आहे. पण त्याबाबत विचार फारसा पुढे नाही. आणि उत्क्रांतीच्या मुद्द्यापासून हा विचार फारच दूर गेलेला आहे.

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 2:53 am | अमृतांजन

काही जीवजंतू एकलकोंडे असतात, आणि काही सामाजिक असतात. सामाजिक जीवजंतू स्वतःसाठी वेगळी स्थिती निर्माण करतात. काही मुंग्या वारुळातच राहातात, बाहेर क्वचित येतात. मधमाशांचे पोळेसुद्धा वातानुकुलित असते. असे सगळे नसल्यास हे जीवजंतू लवकर मरण पावतात. त्यामुळे नैसर्गिक/कृत्रिम वातावरण काय आहे, हे मला नीट कळलेले नाही.

उन्हात तासभर उभे राहिले तर लहान मुले चक्कर येऊन पडतात. काहींना उष्माघात होतो. त्यामुळे मानव उन्हात काम करायचे असेल तर डोक्यावर वस्त्रावरण ठेवतो. हे झाले कृत्रिम वातावरण.

जनावरे कधीच टोपी घालत नाहीत. व त्यांना उन्हाचा त्रास होत नाही. अर्थात ते सावलीत बसायला जातात हे ही तितकेच खरे. हे झाले त्याच्या नैसर्गिक वातवरणात तग धरुन राहण्याच्या क्षमतेचे उदाहरण.

तासभर पावसात भिजले की, मानवाला छानपैकी सर्दी-खोकला होतो तसा प्राण्याना होत नाही.

"हर्मिट क्रॅब" हा संरक्षणासाठी मेलेल्या सागरी गोगलगायींचे शिंपले अंगावर घेऊन फिरतात.

छान मुद्दा दिलात.
प्राणी बहुतेक वेळा असे जीव वाचवण्यासाठी- भक्ष होऊ नये म्हणून- करतात. कोणी रंग बदलतो, कोणी काळा रंग सोडतो, कोणी चावा घेतो व विष सोडतो. मानवाकडे असे काय स्वसंरक्षणाचे साधन आहे?

>>त्या-त्या जातींमधे जे ईंन्सटंन्सेस निर्माण होतात ते एकासारखेच दिसतात. दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो. माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते. (ऑन लायटर साईड- त्यांच्या जन्मवेळेनुसार ते बदलते).
<<
हे खरे नाही. प्रत्येक प्राणी हा अद्वितीय असतो. अगदी माणसाप्रमाणे. प्रत्येक झेब्र्याचे, वाघाचे पट्टे वेगळे असतात. ह्या वैशिष्ट्याचा प्राण्यांची शिरगणती करताना उपयोग केला जातो. शिवाय गंध, आवाज ह्या बाबतीतही प्राणी एकमेवाद्वितीय असतात. पण आपली इंद्रिये तितकी विकसित नसल्यामुळे आपल्याला हे फरक काही वेळा कळत नाहीत. त्या त्या प्राण्यांना ते ते फरक कळतात.
जाता जाता: मला चिनी व जपानी लोकांतला (दिसणे) फरक कळत नाही. किंवा चिनी व कोरियनही. पण हे चिनी लोकांना अगदीच चमत्कारिक वाटते. त्यांना हा फरक लगेच कळतो. तसे काहीसे होत असावे.

प्राण्यांना भूकंपाची जाणीव होणे हे इतके शास्त्रशुद्ध रित्या सिद्ध झालेले आहे का?
मला वाटत नाही. असल्यास त्यांना कसे कळते हे सांगावे. माणसाला भूप्रस्तराचा अभ्यास, उपग्रहांनी पाठवलेल्या विविध प्रतिमांचा अभ्यास केल्यावर ह्या विषयात इतकी अफाट माहिती झाली आहे की त्या तुलनेत ही उपजत जाणीव किरकोळ वाटेल.
उत्क्रांती ही अत्यंत मंद चालणारी प्रक्रिया आहे. एखादा जीव जाणीवपूर्वक उत्क्रांत होत नाही. तर जशी परिस्थिती असेल तिला पुरून उरणारा गुण ज्या वंशात असतो ते वंश टिकतात उरलेले नाही. उदा. वेगात पळू शकणारी हरणे (ते जर त्यांना खाणार्‍या श्वापदांच्या संगतीत रहात असतील तर) आणि त्याचा वंश टिकणार. ज्यांना जमत नाही ते नष्ट होणार. अशी ही थियरी आहे.
ह्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसली तरी काहींची नक्कीच मिळतात.
प्राण्यांप्रमाणे ह्या थियर्‍याही काळाच्या कसोटीवर घासल्या जातात आणि त्यातले हिणकस नष्ट होते आणि सकस ते उरते. कदाचित उद्या आणखी नवी थियरी मांडली जाईल ज्यात डार्विनची थियरी हा एक छोटा भाग असेल. आणि ती जास्त पटणारी असेल.

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 2:33 am | अमृतांजन

श्री. धनंजय आणि श्री. हुप्प्या,

तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद खूपच पटण्यासारखे आहेत. काही प्रश्नांची उत्तरे पटली काहिंची धुसर आहेत. अधिक माहिती मी गोळा करत राहिनच.

मला पटलेले विचार असे आहेत-
१. इतर सजीवातही वैविध्य असते; काही ज्ञात आहे तर काही अज्ञात (अंदाजने म्हणता येते). तरीही मी जेव्हा फुलपाखरांकडे पाहते तेव्हा मला त्यांच्या जाती-जातीत वैविध्य दिसते पण एका ठराविक जातीच्या फुलपाखराच्या पंखावरील रंग व संगत तेच असते असे वाटते- त्यात जराही बदल नसतो- असा माझा समज आहे.
२. उत्क्रांती ही स्लो प्रोसेस आहे.
३. न्याचरल सिलेक्षनचा माझा घोळ कळला.

आता पुढचे मुद्दे-

खालील चित्रातील डोळा पहा- तो इतका जबरद्स्त इंजनिअर्ड आहे की, अशी इंजनिएरिंग "सहजतेने" नैसर्गिकतेने तयार होत असावी ह्यावर माझा अजिबात विश्वास नाही. लेन्स, फोकल लेंग्थ, डोळ्यांवर पाणी मरणाऱ्या ग्रंथी, ते पाणी सर्व डोळ्यावर पसरवण्यासाठी पापणी अधून-मधून मिटवण्याचा प्रोग्रॅम, अंधार-उजेडात रेटीनात होणारा बदल, जवळचे-लांबचे पाहतांना बुब्बुळाची होणारी मागे-पुढे हालचाल, हे नैसर्गिकपणे डेव्हलप होत असेल?

कदाचित असे असावे-

मंथली रिव्ह्यु मिटींगमधे, कुठेतरी लांब-

"मागे आपण डोळा बसवला होता त्यातून मिळणारा डाटा अनलिसिस सांगते की, ...."
"मग त्यात सुधारणा कर आणि सुधारीत मॉडेल पुढच्या पिढीत टाक"
"ओ. के. सर"

"तो मासा खोल पाण्यात गेल्यावर त्याला काहिच दिसत नाही"
"ठिक आहे, त्याला वीज निर्माण करण्याची ग्रंथी बसवून टाका"

"त्या नव्या पोरांचे ओरिएंटेशन पुढच्या महिन्यात आहे. त्यांच्या साठी काय नवा केला प्रोजेक्ट आहे?"
"सर, पानांचे आकार कापुन झाल्यावर तयार होणाऱ्या वेस्टेज मधून काही करता येईल का पाहत आहे"
"चांगला विचार आहे, आगे बढो"

"सर मला प्रमोशन पाहिजे"
"हे बघ बाळा, आधी तो पक्षी तू तयार करायला घेतलायस, तो ऊडाला की, माझ्याकडे ये"

मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.

असा "वेल एंजिनिअर्ड" डोळा जेव्हा नेत्रदानात एका शरीरातून दुसर्‍या शरीरात बसवला जातो तेव्हा तो त्या नवीन शरीराचा भाग म्हणून व्यवस्थित काम करायला लागतो आणि ही शस्त्रक्रिया माणसेच करतात! :)

अवांतर - "ते" प्रयोगशाळा म्हणून पृथ्वीचा वापर करताहेत! हे एका झकास विज्ञानकथेचे कथाबीज होऊ शकते!

चतुरंग

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 3:05 am | अमृतांजन

असा "वेल एंजिनिअर्ड" डोळा जे.....
अगदी खरे!

अवांतर - "ते" प्रयोगशाळा म्हणून पृथ्वीचा वापर करताहेत! हे एका झकास विज्ञानकथेचे कथाबीज होऊ शकते!

कथा तयार आहे! एक चांगला हॉलिवूड चित्रपट काढू....

रामपुरी's picture

20 Oct 2009 - 3:47 am | रामपुरी

या संकल्पनेवर आधारीत एक छोटेखानी कादंबरी जयंत नारळीकरांनी लिहीली आहे. नाव - अभयारण्य

सुवर्णा's picture

27 Nov 2009 - 4:12 pm | सुवर्णा

मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.
हे हे.. मजा आली हे वाचून.. तुम्हाला काय म्हणायचय हे कळतंय मला.. माणसाचं design खरंच खूप वेल-एंजिनियर्ड आहे!! तुमच्यासारखेच प्रश्न मलाही पड्तात. :)

सुवर्णा
http://www.suvarnam.blogspot.com/

अमृतांजन's picture

27 Nov 2009 - 4:53 pm | अमृतांजन

आभारी आहे सुवर्णा.

डिव्हाईन नंबर १.६ वगैरे लॉजिकही मन थक्क करतं.
[डिव्हाईन नंबर= In mathematics and the arts, two quantities are in the golden ratio if the ratio of the sum of the quantities to the larger quantity is equal to (=) the ratio of the larger quantity to the smaller one. The golden ratio is an irrational mathematical constant, approximately 1.6180339887.]

हे पहा डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो चा वापर कुठे-कुठे झाला आहे-


माणसाचाच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूत, जीवात तुम्हाला गणिताचा पूर्ण वापर दिसेल. तुम्ही साधा झाडांच्या पानाचा विचार केला तर त्यात तुम्हाला ऑब्जेक्ट ओरीयंटेशन दिसेल.
हे पहा त्याचे ईंटर्नल स्ट्रक्चर कसे असते-

ह्या लेखानंतर (मिपावरील चर्चे नंतर) दोन लिडींग न्युजपेपरच्या वीकएंड पुरवण्यांमधे ह्या विषयीचे लेख आले.

अमृतांजन's picture

27 Nov 2009 - 5:04 pm | अमृतांजन

तुमच्या ब्लॉगस्पॉटवरील हे सुभाषित आवडले-

उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥
अर्थ - प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार करावीच लागते).

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 9:42 am | अमृतांजन

प्राण्यांप्रमाणे ह्या थियर्‍याही काळाच्या कसोटीवर घासल्या जातात आणि त्यातले हिणकस नष्ट होते आणि सकस ते उरते. कदाचित उद्या आणखी नवी थियरी मांडली जाईल ज्यात डार्विनची थियरी हा एक छोटा भाग असेल. आणि ती जास्त पटणारी असेल.

आणि अशा रितीने तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला आहात!

ज्ञानेश...'s picture

20 Oct 2009 - 10:22 am | ज्ञानेश...

मला दोन सरदारजी वेगवेगळे ओळखता येत नाहीत! :(

"Great Power Comes With Great Responsibilities"

अवलिया's picture

19 Oct 2009 - 10:27 pm | अवलिया

बरं ते जावु द्या ...मला सांगा डार्विन कोण आहे... :?

मागे काही तरी कुणीतरी कविता केली होती ब्वा ! ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Oct 2009 - 10:44 am | ब्रिटिश टिंग्या

बॅलन्स्ड, संतुलित प्रतिसाद!

महेश हतोळकर's picture

20 Oct 2009 - 2:07 pm | महेश हतोळकर

मला सांगा डार्विन कोण आहे

प्राजुतैना माहित असेल कदाचित.

मिसळभोक्ता's picture

19 Oct 2009 - 10:35 pm | मिसळभोक्ता

माकड मराठी संकेतस्थळांवर आले असते, तर चपलांची निकड भासली असती.

त्यामुळे हा प्रश्न पास !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अमृतांजन's picture

19 Oct 2009 - 11:20 pm | अमृतांजन

तुमचे प्रतिसाद नेहमीच विचारास प्रवृत्त करणारे असतात.

Nile's picture

20 Oct 2009 - 1:42 am | Nile

अमृतांजन यांना विनंती आहे की त्यांचा उद्देश जर वैचारीक चर्चा असेल तर प्रश्न बांधणी जरा सुसंगत करावी, जर मौजमजा असा असेल तर त्या सदराचा उल्लेख करावा. अन्यथा (माझ्यासारख्या ;) ) लोकांचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

पिवळा डांबिस's picture

20 Oct 2009 - 2:04 am | पिवळा डांबिस

उत्तम आणि मनोरंजक वाद चालला आहे....
त्यात भर टाकावी इतके उत्क्रांत आम्ही अजून झालेलो नाही...:)
फक्त एकच सुधारणा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.....

मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत?
चुकीची माहिती....
मानवी आरोग्यसेवेत सुधारणा करण्यासाठी माकडांवर सर्रास प्रयोग केले जातात....
सिन्मोल्गस जातीच्या माकडांवर आणि कधीकधी चिंपांझीजवरही.....
किंबहुना माकडांवरच्या प्रयोगांचा डेटा उपलब्ध केल्याशिवाय माणसांवर प्रयोग करायला अन्न आणि औषध प्रशासनालय बहुदा परवानगी देत नाही.....
बाकी तुमचं चालू द्या...
:)

सध्या माणसांवर प्रयोग करण्यात गुंतलेला,
डॉ. पिवळा डांबिस

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 2:26 am | अमृतांजन

किंबहुना माकडांवरच्या प्रयोगांचा डेटा उपलब्ध केल्याशिवाय माणसांवर प्रयोग करायला अन्न आणि औषध प्रशासनालय बहुदा परवानगी देत नाही....

चांगली माहिती दिलीत.

त्यांचाही अर्थातच उत्क्रांतीवादावर विश्वास असणार.

पिवळा डांबिस's picture

20 Oct 2009 - 2:31 am | पिवळा डांबिस

त्यांचाही अर्थातच उत्क्रांतीवादावर विश्वास असणार.
कुणाचा?
माकडांचा की अन्न आणि औषधवाल्यांचा?
अर्थात ते दोन्ही एकच आहेत म्हणा.....
:)
एफडीएने बेजार केलेला,
पिडां

लवंगीमिरची's picture

20 Oct 2009 - 2:58 am | लवंगीमिरची

तुमचे २ शब्द वाचून

“Sometimes I think the surest sign that intelligent life exists elsewhere in the universe is that none of it has tried to contact us.”
( calvin and hobbes )

असेच म्हनावेसे वाटते...

ह.घ्या.

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 3:01 am | अमृतांजन

पृथ्वीचा वापर प्रयोगशाळेसारखा चाललाय- हा वरील पर्तिसाद वाचावा. अशी विनंती.

ते सतत कॉन्ट्याक्टमधे आहेत! डाटा जातोय.

विकास's picture

20 Oct 2009 - 3:04 am | विकास

हा विषय आपल्याला महत्वाचा नक्कीच वाटला असावा हे लेखनाच्या गंभीर आणि अभ्यासू शैलीतून समजते....त्यामुळे जर माकडांचा संबंध मनुष्यजातीशी नाही हे सिद्ध झाले तर समस्त माकडांना हुश्श होईल. (मग गाढवे मागे लागतील की माणसं "गाढवपणा" करतात असे वाक्प्रयोग बंद करा म्हणून).

मात्र असा विषय चर्चेस आणताना "धोरण" सदराखाली का आणला या बाबत उत्सुकता आहे. ह्या विषयाचा आणि मिपाधोरणाचा काही संबंध असल्याची ही नवीनच माहीती आहे...

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 3:10 am | अमृतांजन

त्यामुळे जर माकडांचा संबंध मनुष्यजातीशी नाही हे सिद्ध झाले तर समस्त माकडांना हुश्श होईल.

द्याट मेड माय डे! :-)

(मग गाढवे मागे लागतील की माणसं "गाढवपणा" करतात असे वाक्प्रयोग बंद करा म्हणून)

ह्म्म्म - हा विषय मी हाताळणार नाहीये हे मात्र नक्की.

मात्र असा विषय चर्चेस आणताना "धोरण" सदराखाली का आणला या बाबत उत्सुकता आहे.

सरळ उत्तर- माझा पवित्रा असा आहे की, माझा उतक्रांतीवादावर विश्वास नाही म्हणून ते माझे धोरण आहे.

उत्क्रांतीमुळे प्राण्यात काय काय बदल होतील बर ??? :?
पण genetic disorder मुळे ही वेगळीच गम्मत पहायला मात्र मिळते.
http://www.youtube.com/watch?v=3zqESjVkohw

अधिक माहिती इथे :--- http://en.wikipedia.org/wiki/Fainting_goat

बाकी आपल्या काही चांगल्या सवयी माकडांनी सुद्धा घेतल्या आहेत बरं :--- http://www.youtube.com/watch?v=oZfgdM79cYo&feature=related

बाकी चालु ध्या... ;)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

भिंगरि's picture

20 Oct 2009 - 7:07 am | भिंगरि

<<<<<<<<"मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.
">>>>>>>>>>>>

कुठल्याहि प्रकारच्या परिणामांचि पर्वा न करता असा धाडसि सिधधांत मांडल्याबद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन. गॅलिलिओ सरखे काळाच्या कितितरि पुढे असणारे एक व्यक्तिमत्व ज्या मिपा वर येते त्याचि मी हि सदस्य आहे ह्या जाणिवेने उर अभिमानाने भरुन आला. आपल्या ह्या सिध्धांताचि पुष्टि करणारे पुरावे इथे ताबडतोब सादर करावेत हि कळकळिचि विनंति, म्हणजे डार्विन सारख्या खुळ्या माणसावर विश्वास ठेवणार्या लाखोंच्या मानसिक उत्क्रांतिसाठि प्रयत्न करण्यास सुरुवात करिन!

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 8:20 am | अमृतांजन

भिंगरी ताई,

काय असते की, अनेकदा आपल्याला पुरावे देता येत नाहीत. जे माझ्या मनाला सिक्स्थ सेंन्स्ला पटले ते मी येथे मांडले. ह्या विधानाची चिकित्सा करण्याचे काम मी अभ्यासू मंडळींवर सोडत आहे.

हे विधान धाडसी नसून लॉजिकल आहे. आपल्या शरीरातील अनेक करामती जर तुम्ही बारकाईने पाहिल्या तर तुम्हाला असे दिसून येईल की, हे सगळे नैसर्गिकपणे तयार होते असे मानणे म्हणजे जरा अतिच होते.

उदा. तुम्ही एखाद्या मेडीसीन केलेल्या डॉक्टरला विचारा की, शरीरात प्रोटीन्स कशी वाहून नेली जातात? अवयवांना कसे कळते की जे येते आहे ते प्रोटीन आहे की, इतर काही?- थक्क व्हाल ते समजून घेऊन.

त्यामुळेच वाटते की, उत्क्रांती-बित्क्रांती सब झूट! स्वत्।ची पुस्तके खपवायला मांडलेला तो सिद्धांत आहे.

सुबक ठेंगणी's picture

20 Oct 2009 - 11:06 am | सुबक ठेंगणी

ह्या विधानाची चिकित्सा करण्याचे काम मी अभ्यासू मंडळींवर सोडत आहे.
बाकी कुठल्याही सिद्धान्ताला दुसरी बाजू ही असणारच.
पण डार्विनने आपला सिद्धान्त असा दुस-यांवर सोडून दिला नाही ह्यातच त्याचे मोठेपण आले.
त्यामुळेच वाटते की, उत्क्रांती-बित्क्रांती सब झूट! स्वत्।ची पुस्तके खपवायला मांडलेला तो सिद्धांत आहे.
मग तुम्हीही मांडा की सिद्धान्त, लिहा आणि खपवा की पुस्तक! नाही कोण म्हणतंय?

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 11:28 am | अमृतांजन

>>मग तुम्हीही मांडा की सिद्धान्त, लिहा आणि खपवा की पुस्तक! नाही कोण म्हणतंय?

मी एक-एक पाऊल टाकून नेमक्या दिशेने जातेय. एकदम सिद्धांत कसा काय मांडता येईल? आधी माझ्या ६ व्या सेन्सला काय वाटते ते मी चर्चेला येथे ठेवले.

सुबक ठेंगणी's picture

20 Oct 2009 - 1:15 pm | सुबक ठेंगणी

माझ्यासारख्या प्रगल्भ मराठी आधुनिक माणसांना तुझी थेअरी पटणे अशक्य आहे रे डार्विना!
जर तुम्ही ह्या विषयीचा सखोल अभ्यास इतरांवर सोडून देत असाल तर मग स्वतः डार्विनपेक्षाही प्रगल्भ वगैरे असल्याचा दावा कशाला??

आधी माझ्या ६ व्या सेन्सला काय वाटते ते मी चर्चेला येथे ठेवले.
म्हणजे आपण जे काही लिहिले आहे ते फक्त आपल्याच मनाचे खेळ आहेत असं आम्ही समजायचं का? तसं तर तसं...

अवांतरः न्यूटनचं एक वाक्य आठवलं
"If I have seen further it is by standing on the shoulders of Giants"

8|
बाम शोधायला हवा

ज्ञानेश...'s picture

20 Oct 2009 - 10:35 am | ज्ञानेश...

तुम्ही बहुधा "पृथ्वीवर माणूस उपराच" हे नारळीकरांचे पुस्तक वाचले आहे, होय ना? :?

"Great Power Comes With Great Responsibilities"

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 10:50 am | अमृतांजन

का हो सामान्य मध्यमवर्गी माणसाने असे विचार स्वतंत्रपणे करु नये असा काही नियम आहे का?

ज्ञानेश...'s picture

20 Oct 2009 - 11:05 am | ज्ञानेश...

सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या डोक्यात असे विचार कुठून येतात, ते शोधत होतो.

चुक भूल देणे घेणे.

"Great Power Comes With Great Responsibilities"

चतुरंग's picture

20 Oct 2009 - 8:18 pm | चतुरंग

एरिक व्हॉन डॅनिकेन ह्यानं लिहिलेल्या पुस्तकाचा डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केलेला अनुवाद आहे "पृथ्वीवर माणूस उपराच". (डॉ. नारळीकरांचा संबंध नाही.)

मनोगतावर मागे ह्याबाबत रंजक चर्चा झाली होती.

चतुरंग

ज्ञानेश...'s picture

20 Oct 2009 - 10:39 am | ज्ञानेश...

...

विजुभाऊ's picture

20 Oct 2009 - 11:39 am | विजुभाऊ

माकडापासून मानव निर्माण झाला असे डार्वीन म्हणाला नाही. त्याचे म्हणणे होते की दोघांचा पूर्वज एकच होता.
एखाद्या कुटुंबातील एकजण काही कारणास्तव अफ्रीकेत गेला त्याने तेथेच संसार थाटला. दुसरा यूरोपात गेला त्याने तेथे संसार थाटला. तिसरा चीन मध्ये गेला त्याने तेथे संसार थाटला.
चार पिढ्यानन्तर हे कुटुंबीय पुन्हा एकत्र भेटले. त्या पाचव्या पिढीतले लोक एकमेकांपासून फारच वेगळे दिसत होते.
स्थल काल सवयी आहार तसेच जनुकीय सरमिसळ यामुळे त्यांच्यात हे वेगळेपण निर्माण झाले.
तुमच्या प्रश्नाना हे स्पष्टीकरण पुरेसे ठरेल असे वाटते.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 12:06 pm | अमृतांजन

माकडापासून मानव निर्माण झाला असे डार्वीन म्हणाला नाही. त्याचे म्हणणे होते की दोघांचा पूर्वज एकच होता.

प्रश्नातील एक सर्व-साधारण आशय असाही आहे की, ते जर एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले तर त्यांच्या क्षमता एव्हढ्या भिन्न का? मानवच ह्या जगात विचार करु शकतो एव्हढा फरक का?
आपल्याशी मुकपणे संवाद साधणारे अनेक पाळीव प्राणी आहेत पण ते तेव्हढेच. उत्क्रांती अशी सेकंड स्टयांडर्ड का वापरते?

डोळ्याचे उदाहरण देऊन काही चर्चा नंतरच्या प्रतिसादात मांडली आहे. ती ही कृपया पहावी.

भिंगरि's picture

20 Oct 2009 - 12:20 pm | भिंगरि

कस आहे ना अमृताबाइ, ज्या विषयाचि आपल्याला पुरेशि माहिति नाहि, त्यावर मत बनवणे आणि ते आपण सिध्ध करु शकत नाहि हे माहिति असताना चार चौघात दामटवणे ह्यालाच आमच्यात धाडस म्हणतात :). असो तुमच्या माहिति साठि म्हणुन सांगते प्रोटिन्स चि वाहतुक अवयव नाहि तर पेशि पातळिवर होते अस आमच्या अभ्यासक्रमात आम्हाला शिकवण्यात आले.

बाकि खुप प्रय्त्न करुनहि तुमचे लॉजिक काहि कळले नाहि बुवा, तुमच्या मते पृथ्वि हि प्रयोगशाळा आहे म्हणता अतिप्रगत जीवांचि तर मग त्यांनि 'मानव निर्मिति नंतर बाकिचे अप्रगत जीव का म्हणुन शिल्लक ठेवलेत? इतक्या कॉम्पेक्स यंत्रणेकडुन हवा तो डेटा मिळत असताना आधिच्या (तुलनेने) कमि कॉम्प्लेक्स यंत्रणा कशाला वापरायच्या काहि कळत नाहि. हे म्हणजे घरात हव असलेले पीठ थोड जात्यावर आणि थोड ग्राइंडर मध्ये दळल्यासारख वाटतय.

सुधीर काळे's picture

20 Oct 2009 - 2:03 pm | सुधीर काळे

खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या लेखावरून जेवढे आठवत आहे त्या आधारावर हे लिहितोय!
"माया" नावाची जी संस्कृती लॅटिन अमेरिकेत होती (आहे?) त्यांच्या कुठल्याशा आधारे असे म्हटले जाते कीं मानव हा प्राणी अक्षरशः परलोकातून आला व इथे वसला. कदाचित गूगल केल्यास याबद्दल जास्त माहिती मिळेल.
अमृतांजनताई, तुमचे बरेच प्रश्न अगदी तर्कशास्त्राला धरून आहेत. आज-काल बरेच लोक डार्विनच्या सिद्धांताला मानत नाहींत असेही मी वाचले आहे, पण या विषयात थेट अशी रुची नसल्यामुळे मी कांहीं असले लेख फार लक्षपूर्वक वाचले नाहींत.
पण आपण काहीं "भलतंच" लिहलंय असं वाटून घेऊ नका. आपल्या मुद्द्याला उचलून धरणारे लेखन झालेले आहे. माया संस्कृतीवर आधारलेला लेख पुन्हा वाचायला मला आवडेल.
एक गोष्ट लक्षात असू द्या कीं Old testament नुसार अ‍ॅडम-ईव्ह हे "उक्ते" या पृथ्वीतळावर आले व ईव्हने सफरचंद खाऊन ही मानवजात निर्माण केली असा उल्लेख आहेच.
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 2:26 pm | अमृतांजन

हुश्श! काय बरे वाटले तुमचा प्रतिसाद पाहून काळेसाहेब. एकदम गार पाण्याचा शिडकावा झाल्यासारखे वाटले.
धन्यु!!!

खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या लेखावरून जेवढे आठवत आहे त्या आधारावर हे लिहितोय!
"माया" नावाची जी संस्कृती लॅटिन अमेरिकेत होती (आहे?) त्यांच्या कुठल्याशा आधारे असे म्हटले जाते कीं मानव हा प्राणी अक्षरशः परलोकातून आला व इथे वसला. कदाचित गूगल केल्यास याबद्दल जास्त माहिती मिळेल.
अमृतांजनताई, तुमचे बरेच प्रश्न अगदी तर्कशास्त्राला धरून आहेत. आज-काल बरेच लोक डार्विनच्या सिद्धांताला मानत नाहींत असेही मी वाचले आहे, पण या विषयात थेट अशी रुची नसल्यामुळे मी कांहीं असले लेख फार लक्षपूर्वक वाचले नाहींत.
पण आपण काहीं "भलतंच" लिहलंय असं वाटून घेऊ नका. आपल्या मुद्द्याला उचलून धरणारे लेखन झालेले आहे. माया संस्कृतीवर आधारलेला लेख पुन्हा वाचायला मला आवडेल.
एक गोष्ट लक्षात असू द्या कीं Old Testament नुसार अ‍ॅडम-ईव्ह हे "उक्ते" या पृथ्वीतळावर आले व त्यांनी ही मानवजात निर्माण केली असा उल्लेख आहेच.
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

पर्नल नेने मराठे's picture

20 Oct 2009 - 2:21 pm | पर्नल नेने मराठे


आता झोपा सगळे

चुचु

खालील लिंक उघडा आणि वाचा.....!
http://tinyurl.com/ygbx8mu
One of the most baffling archaeological questions is, how did an advanced human civilization virtually spring up out of nowhere about 3000 BC?. One truly satisfying theory has come from the mind of renowned scholar Zecharia Sitchin.
.
Sitchin (among his other accomplishments) wrote a series of books that, collectively, are called " The Earth Chronicles ". One of the books in The Earth Chronicles is entitled "The 12th Planet", Avon Books -1978 (1st Avon printing).
In " The12th Planet " Sitchin presents unexplained, previously misinterpreted or generally ignored archaeological evidence that Man's evolution was helped along by extraterrestrial visitors. The superior extraterrestrial intelligences, eventually called "Gods" by the ancients, played a part in Man's evolution about 5000 years ago.
Extraterrestrial intervention certainly seems to be a theory that approaches the outer fringes of the wholly egocentric
( we're here, God made us in his image, everything rotates around us and we are the only sentient life in the entire universe ) western paradigm but, after a complete analysis of Man's 5 million year old evolutionary patterns you cannot ignore the fact that there is a very wild evolutionary "blip" that took place about 5000 year ago. It would be similar to observing your 5 year old child making mud pies one day and the next week he or she was starting to decode the Rosetta Stone.
.
IF (but a continually shrinking "if") The Great Pyramid was constructed by "outside" intervention then I think that I know who may have built The Great Pyramid because the builders "signed" and "dated" their masterpiece. An additional chart provides the clues. The chart is reproduced immediately below (2 views).
.
The chart was created using (once again) Pi. ( 3.141592654 ) converted (this time) to degrees / minutes / seconds of arc. Pi = 3 degrees 8 minutes 29 .73 seconds of arc. I transposed the result (interpreted the result) to "mean" 3 months - 8 days in the year 2973 BC .
I created a chart using the 3/8/2973 BC date and the resulting chart seemed unremarkable.
On to the 'intuitive leap'..... The natural starting place of the zodiac is at the Spring Equinox (March21st)....so I added
(the Pi Factor) 3 months and 8 days to March 21st and arrived at June 29th. I then created an ancient astrological map for June 29th 2973 BC for the longitude and latitude of The Great Pyramid (reproduced below)! Another "capstone" configuration which is (once again) also the shape of the Reticulum Constellation.
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

फ्रॅक्चर बंड्या's picture

20 Oct 2009 - 6:46 pm | फ्रॅक्चर बंड्या

"मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.

एक आइडिया....
त्यांना जातोय तो डाटा चुकीचा पाठवायचा का ???
म्हणजे तुम्हीच पाठवा....

तुम्ही उत्क्रांत व्हायच्या ऐवजी डिक्रांत (उत्क्रांत च्या उलटे ) व्हा...

हो तुम्ही त्यांचे प्रयोग बिघडवु शकता.....

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 6:51 pm | अमृतांजन

हे करणे अशक्य नाही. त्यासाठी मला सगळ्यांचे सहकार्य लागेल व एकच अट आहे तिचे पालन करावे लागेल- कुणीही खोटं बोलायचे नाही. एक जण जरी खोटं बोलला/ली की प्रयोग फसलाच म्हणून समजा.

मेघवेडा's picture

27 Nov 2009 - 4:50 pm | मेघवेडा

अवांतरः

प्रत्येक माकड सारखेच दिसते; माणूस नाही.

या वाक्यावरून एक मजेशीर प्रसंग आठवला. एकदा माझ्या एका चीनी मैत्रिणीला "तुम्ही सर्व चीनी लोक अगदी एकसारखे दिसता" असे मी सांगितल्यावर ती मला म्हणाली, "यात काही वेगळे नाही, आम्हाला तुम्ही भारतीय लोक सगळे एकसारखे दिसता!!"

मला तर हसू का रडू झाले होते! मग वाटलं असेलही कदाचित ती म्हणते त्यात तथ्य. आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत या बाबतीत सुद्धा खरा ठरत असेल कदाचित!!

मेघवेडा's picture

27 Nov 2009 - 4:52 pm | मेघवेडा

अवांतरः

प्रत्येक माकड सारखेच दिसते; माणूस नाही.

या वाक्यावरून एक मजेशीर प्रसंग आठवला. एकदा माझ्या एका चीनी मैत्रिणीला "तुम्ही सर्व चीनी लोक अगदी एकसारखे दिसता" असे मी सांगितल्यावर ती मला म्हणाली, "यात काही वेगळे नाही, आम्हाला तुम्ही भारतीय लोक सगळे एकसारखे दिसता!!"

मला तर हसू का रडू झाले होते! मग वाटलं असेलही कदाचित ती म्हणते त्यात तथ्य. आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत या बाबतीत सुद्धा खरा ठरत असेल कदाचित!!