डार्विनच्या अनुयायींनो ह्या प्रश्नांची उत्तरे द्या
लेखनप्रकार
आधीच सांगते की, डार्विनचा सिद्धांत मला पटलेला नाही व दिशाभूल करणारा आहे.
माणूस जर माकडापासून उत्क्रांत झाला आहे तर हे असे कसे?-
१. माकडात आणि मानवाच्या गुणसुत्रांमधे फक्त २ टक्क्यांचाच फरक आहे असे तुम्ही म्हणता. म्हणजे मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल तर प्राणी उत्क्रांत होतांना तो निसर्गाच्या जवळ न राहता दूर कसा जाईल?
- माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते
- माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो? माकडाला पोलिओ का होत नाही?
- माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत?
- प्रत्येक माकड सारखेच दिसते; माणूस नाही.
- प्रत्येक माकडाचा (ज्यातून मानव उत्क्रांत झाला) रंग काळाच असतो; मानवाचा नाही
- मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत?
२. माकड जसे उत्क्रांत झाले तसे इतर मासे, चतुष्पाद प्राणी व पक्षी का उत्क्रांत झाले नाहीत? त्यांच्यातूनही एखादा वेगळाच प्राणी पृथ्वीवर का निर्माण झाला नाही?
३. माकड व इतर सजीवांना भूकंप वगैरेची जाणीव होते तशी ती मानवाला का होत नाही? माकडातील जे गुणसुत्र-ज्ञान साठवले गेले आहे ते मानवात संक्रमित व्हावयास पाहिजे होते तसे न झाल्यामुळे तो निसर्गापासुन दुरावला गेला आहे हे स्पष्ट दिसते- ह्याला "उत्क्रांती" कसे म्हणता येईल?
असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला हेच दिसते की, डार्विनची थेअरी खोटी आहे. धूळफेक आहे.
माझ्यासारख्या प्रगल्भ मराठी आधुनिक माणसांना तुझी थेअरी पटणे अशक्य आहे रे डार्विना!
तुझ्या अनुयायींनी हे वाचावे व आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणावे अशी स्पष्ट सुचनाच मी मांडते व माझे दोन शब्द संपवते.
वाचन
20559
प्रतिक्रिया
0