उर्दू (देवनागरीत) किंवा हिंदी लिहितांना चंद्रानुस्वार वारंवार लागतात. मिपावरील गमभन सॉफ्टवेअर वापरताना 'उ'कार सोडून 'आँटी', 'कँटीन'सारखे शब्द लिहिता आले, पण हूं, यूं घूं येईनात. 'बराहा'मध्ये ते कसे लिहायचे ते माहीत होते पण 'गमभन'मध्ये लिहिता येई ना.
म्हणून मी कांहीं निवडक लोकांना "'ऊ'कारावर चंद्रानुस्वार कसा द्यायचा हे कुणी सांगू शकेल काय?" हा प्रश्न विचारला उदा: "घूंघट"मधला घूं , "यूं तो हमने"मधील यूं, "मैं नशेमें हूं"मधील हूं वगैरे
बर्याच लोकांनी त्यांनाही माहीत नाही असे कळवले, पण 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले. पाठोपाठ पाषाणभेद व शेवटी 'मस्त कलंदर' यांनीही या प्रश्नाला उत्तर दिले.
बर्याच लोकांना ही अक्षरे कशी लिहायची हे माहीत नसावे असे वाटल्यावरून मी ती युक्ती सर्वांना सांगण्याच्या उद्देशाने इथे देत आहे. आभार मानायचे असल्यास वरील तीघांचे मानावे!
H+shift+E+shift+M+shift+U=हूँ
Y+shift+E+shift+M+shift+U=यूँ
GH+shift+E+shift+M+shift+U=घूँ
Enjoy this addition to your knowledge!
मला गमभन लिहिताना एकाद्या ठिकाणी मागे जाऊन लिहितांना एक 'भुताटकी'चा अनुभव येतो. अचानकपणे आधी छान लिहिलेला शब्द नव्या शब्दाबरोबर मारामारी करतो व भलतंच काहींतरी लिहिलं जातं. बरहा किंवा लोकसत्ता-फ्रीडम वापरताना अशी भुताटकी भेटली नाहीं कधी.
याबद्दल मी 'गमभन'च्या वेबसाईटवर जाऊन तिथे मिळालेल्या गृहस्थाना उदाहरणासह लिहिले, पण अद्याप उत्तर आलेले नाहीं.
आता काय केल्याने ते होत नाहीं हे कळले आहे, पण का होते ते कळलेले नाहीं. त्यामुळे जर चुकून काळजी घेतली नाहीं तर पुन्हा भलतंच लिहिलं जातं. तरी इथे कुणाला माहीत असल्यास सांगावे.
सुधीर
प्रतिक्रिया
18 Oct 2009 - 1:31 pm | दशानन
>> 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले. पाठोपाठ पाषाणभेद व शेवटी 'मस्त कलंदर' यांनीही या प्रश्नाला उत्तर दिले.
:)
तिन्ही ही अक्षर विदुषीचे अभिनंदन ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
19 Oct 2009 - 8:29 am | सुधीर काळे
पाषाणभेद हे "बाप्पैगडी" आहेत कीं विदूषी? (त्यांच्या प्रोफाईलवर कांहींच उल्लेख नाही!)
खरंच "Profile" या आंग्ल शब्दाला मराठीत छान, "फिट्ट" (ओढून-ताणून नको!) प्रतिशब्द आहे का? असल्यास कृपया कळवावा. शब्दकोषात end-view या अर्थाचाच शब्द मिळाला.
तसेच आपण जे संदेश इथे लिहितो (ज्याला आंग्ल भाषेत post म्हटले जाते) त्यालही झकास प्रतिशब्द आहे का? संदेश, निरोप वगैरे मला भावत नाहीत (अपुरे वाटतात).
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
20 Oct 2009 - 8:00 am | पाषाणभेद
"पाषाणभेद हे बाप्पैगडी आहेत कीं विदूषी?"
मी काळेप्रणाली वापरतो आहे. :=|)
आता:
Profile =सार्वजनीक प्रतिमा
post= डकव, posted=डकवले किंवा डाकावले करा हवे तर
28 Oct 2009 - 2:52 pm | विसुनाना
प्रकाटा
28 Oct 2009 - 3:18 pm | आंबोळी
18 Oct 2009 - 3:19 pm | सहज
सर्व संबधीतांना धन्यु!
19 Oct 2009 - 2:12 am | बिपिन कार्यकर्ते
अरे वा!!! छानच की माहिती आणि किती उपयुक्तही !!! सर्व संबंधिताना धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
19 Oct 2009 - 2:23 am | टारझन
अगदी !! मागे एकदा कोदांनी एक नितांत सुंदर लेख टाकला होता. ज्यात त्यांनी आज चॅटींग मुळे जग किती फास्ट झालंय वगैरे आषयाचा.. हा लेखही तेवढाच उपयुक्त आणि लै भारी आहे. सर्व संबंधितांचं अभिनंदन
टिप : बिपीन आणि सहज यांना टारझन मित्र मंडळातर्फे खास "शाल जोडी" भेट.
झोपुन बडबडकर्ते
19 Oct 2009 - 9:14 am | अवलिया
हेच म्हणतो
--उगाच प्रतिसादकर्ते
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
20 Oct 2009 - 10:54 am | निखिल देशपांडे
हेच म्हणतो...
-- आवाज बंदकर्ते
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
18 Oct 2009 - 5:32 pm | स्वाती२
धन्यवाद!
18 Oct 2009 - 5:38 pm | पाषाणभेद
मुलांनो,एक काम करा,
आधी 'ह' लिहा , नंतर खाली सांगितले तसे तसे लिहीत चला,
ह + shift e + shift m + u
बास.
लिहीता आले का?
हे पहा , मी लिहीले आहे:
मैं यूँ घूँघट हूँ !
(मी हा असला पदर आहे!!)
काही शंका असेल तर विचारा, लाजू नका.
घरून हे १०० वेळा वहीत लिहून आणा.
वडीलांना क्लासची फी वेळेवर द्यायला सांगा.
चला निघा आता घरी.
18 Oct 2009 - 5:49 pm | पाषाणभेद
"याबद्दल मी 'गमभन'च्या वेबसाईटवर जाऊन तिथे मिळालेल्या गृहस्थाना उदाहरणासह लिहिले"
तेच विचारले ' (उदाहरणासह) काही शंका असेल तर विचारा, लाजू नका. '
19 Oct 2009 - 6:58 pm | धनंजय
हूँ - हे चांगले लिहिता येते, खरे. धन्यवाद.
पण "हां", "खां" वगैरे हिंदी शब्दांमध्ये चंद्रबिंदू गमभनमध्ये कसा काढायचा?
हँअ हँआ :-(
काळेसाहेबांचा तिरपा ठसा बंद करा हो कोणीतरी. शक्यतोवर त्यांनीच सहीमधील ट्याग बंद करावा.
19 Oct 2009 - 8:35 am | पारंबीचा भापू
मिळालेली विद्या सर्वाना दिल्याबद्दल सुधीरभाऊंचे मनापासून आभार!
भापू
19 Oct 2009 - 8:40 am | प्रमोद देव
हाँ=h+Shift O+ Shift M
खाँ=kh+Shift O + Shift M
19 Oct 2009 - 6:49 pm | धनंजय
हे बरे केले - आता खाली आनंद घारे यांनी दिलेली सर्व अक्षरे कशी टंकावीत हा प्रश्न आहे :-)
19 Oct 2009 - 8:50 am | आनंद घारे
युनिकोडचा वापर केलात तर ही सगळी अक्षरे सहज काढता येतील आणि त्यांचा उपयोग वर्ड, एक्सेल, पेंट आदि प्रोग्रॅममध्येसुध्दा करता येईल.
अँ आँ इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ
कँ काँ किँ कीँ कुँ कूँ केँ कैँ कोँ कौँ
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
19 Oct 2009 - 6:56 pm | धनंजय
युनिकोड तर वापरतो आहेच. (मिसळपावावर आपण सर्वच युनिकोड वापरतो आहोत.)
पण इंग्रजी कळफलकावरून युनिकोड देवनागरी टंकण्यासाठी मी कित्येकदा गमभन वापरतो. (कळफलकच बदलायचे सोयीचे नाही.)त्यामुळे ही सर्व अक्षरे (अँ आँ इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ कँ काँ किँ कीँ कुँ कूँ केँ कैँ कोँ कौँ) कशी टंकावीत हा प्रश्न पडला होता.
युनिकोडसाठी 'गमभन'ऐवजी मी 'बरह'सुद्धा वापरतो. (कधीकधी 'आय-ट्रान्स्लेटर'.) तेवढ्या आँ, ऊँ साठी बरह उघडावे लागत होते. पण बरहमध्ये "र्" असा अर्धरकार काढला तर तो येथे नीट उमटत नाही. अशी गडबड. म्हणून गमभनमध्येच काय युक्त्या आहेत, असे कुतूहल होते.
19 Oct 2009 - 9:27 pm | Nile
पहिले टॅग बंद करतो! :)
आँ साठी (shift)O+M
इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ खरच कुठल्या मराठी शब्दांत आहे का? :)
19 Oct 2009 - 10:42 pm | धनंजय
संस्कृत उच्चारणाबद्दल मराठीत लेख लिहीत होतो. म्हणून सर्व अनुनासिक स्वरांची गरज होती...
19 Oct 2009 - 10:45 pm | Nile
खरं तर मी मराठी अशी पृच्छा केली, पण मला हे स्वर नक्की लिहीण्यात वापरतात का असेच विचारयचे होते. आता कारण कळले. धन्यवाद. तुमचा लेख वाचायला आवडेल, लिंक नक्की द्या. :)
20 Oct 2009 - 10:49 am | सुधीर काळे
धन्यवाद, नाईल-भाऊ.
म्या जंग-जंग पछाडले, इथल्या "जूना अने जाणीता" लोकांनाही विचारले, पण मला कांही हा टॅग बंद करता आला नाहीं. तुम्ही केलात त्याबद्दल धन्यवाद.
आता ही विद्या मलाही शिकवा म्हणजे पुन्हा चूक झाल्यास मी दुरुस्त करू शकेन!
पुनश्च धन्यवाद.
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
27 Oct 2009 - 7:45 pm | आनंद घारे
मी कंट्रोल पॅनेलमधून माझा संगणकच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)करून घेतला आहे. विंडोज एक्सपी आणि व्हिस्टामध्ये ती सोय दिलेली आहे. त्यानंतर बरहा किंवा गमभन वगैरेची आवश्यकता पडत नाही. वर्ड, एक्सेल, पेंट आदि बहुतेक अप्लिकेशन्स मी मराठी भाषेत वापरू शकतो आणि माझ्या कोणत्याही फाईल्सचे टायटल देखील मी मराठीमध्ये देऊ शकतो.
बरेच दिवस मी बाहेरगावी गेलो असल्यामुळे आणि हा धागा उघडून पाहिला नसल्यामुळे उत्तर द्यायला विलंब झाला
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
28 Oct 2009 - 1:43 pm | Nile
अरे वा! सुरेख पर्याय! मराठी लगेच इन्स्टॉल केली. धन्यवाद!
एक छोटासा प्रश्न: तुम्ही मराठी भाषेसाठी की बोर्ड सेट करुन वापरा का? तसे असेल तर मग हा मराठी की बोर्ड शिकावा लागणार की दुसरा उपाय आहे? (म्हणजे गमभन प्रमाणे त=T या नुसार?)
29 Oct 2009 - 8:17 am | आनंद घारे
आल्ट ,कंट्रोल आणि शिफ्ट या कळांच्या विशिष्ट काँबिनेशनमध्ये दाबल्यावर लिपी बदलता येते. या प्रणालीत ट्रान्स्लिटरेशन नसल्यामुळे इंग्रजी अक्षर लिहिलेल्या कळीचा देवनागरी अर्थ लक्षात ठेवावा लागतो. सुरुवातीला मी त्याचे चित्र डोळ्यासमोर ठेवत होतो, आता सगळी अक्षरे पाठ झाली आहेत. त्यामुळे मी थेट मजकूर टंकू शकतो.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
29 Oct 2009 - 8:20 am | Nile
Got it, thanks. :)
29 Oct 2009 - 1:14 pm | विंजिनेर
ट्रान्सलिटरेटशन साठी मायक्रोसॉफ्टचीच प्रणाली येथे उपलब्ध आहे.
एकदा IME कीबोर्ड इन्स्टॉल केला की मग टंकलेखन अधिक सुखकर होईल (गमभन सारखेच फक्त किंचित फरक आहेत)
शिवाय ते संकेतस्थळ मायक्रोसॉफ्टचे अधिकॄत (भारतीय भाषीकरण)संकेतस्थळ आहे त्यामुळे ट्रोजन्/व्हायरस इ. ची चिंता नाही.
बाकी सगळे आनंद घारेंनी सांगितल्याप्रमाणेच.
30 Oct 2009 - 4:19 am | Nile
ये हुई ना बात! थँक्स अ लॉट विंजिनेर साहेब! :)
20 Oct 2009 - 4:05 pm | विजुभाऊ
तिरपा टॅग असा बंद करायचा.
तुम्ही दिलेला प्रतिसाद्/लेख एडीट करताना शेवटच्या शब्दाला /em असे < या प्रकारच्या > त्रिकोणी कंसात लिहावे टॅग बंद होईल असेल
बघा झाला की नाही बंद टॅग
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
29 Oct 2009 - 8:32 am | सुधीर काळे
मी या शनिवारी-रविवारी प्रयत्न करून पाहीन.
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
29 Oct 2009 - 11:24 am | टारझन
हो प्लिज ...
आणि त्यानंतर "टॅग कसा बंद करावा?" म्हणून एक धागाही टाका हो काका.
बर्याच जणांना फायदेशीर ठरेल . त्यानिमित्ताने तुमचं आणि संबंधित विजुभौंचं आगाऊ अभिंदन करून ठेवतो.
30 Oct 2009 - 11:02 am | सुधीर काळे
मला वाटतं एकदा माझी चूक झाली, पण आता तर होत नाहीय. मग हा तगादा कशासाठी?
शनिवारी-रविवारी मी घारेसाहेबांची कल्पनेबद्दल प्रयत्न करणार होतो.
टॅग बंद करणे माझ्या बौद्धिक कुवतीच्या पलीकडचे आहे! मी दोन-तीनदा प्रयत्न केले, पण नाहीं जमले. इथे कुणा सभासदाला कमी IQ असलेल्या माणसाला समजेल अशा भाषेत लिहिता येत असेल तर लिहा. मी पुन्हा एकदा प्रयत्न करायला तयार आहे!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)