निम्मा पैसा तुझा
दारुत उडुन गेला
अन उरला सुरला
टॅक्ससाठी मान्ड्ला गेला
का असा तु मंद
मित्र घेवुन जातात
फेसाळत्या उत्साहात
स्वर्गभास अन्धारलेल्या
बारच्या कामीनींवर
पैसा उडवण्यासाठी
***
कडुकारल्यासारखा रस पिउन फुलता
अन शरीरे ताबा जाउनी झुलती
का असा तु मंद
मित्र कधिच घेत नाहित
त्यांच्या बिलाचा फास
अन वेटर घेवुन जातो
क्रेडीट कार्ड तु स्वॅप रोज
चोळामोळा झालेल्या अर्थव्यवस्थेच्या
रान्गेत असलेल्या बॅन्ककरप्सीसाठी
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 2:03 pm | विसोबा खेचर
कविताही मंदच वाटली...
13 Oct 2009 - 3:06 pm | पर्नल नेने मराठे
तात्या ;;) तुम्हाला कविता कशिहि वाटो ... पण तुमचा एक कटा़क्श आम्च्या कवितेवर पडला न आम्ही अमंळ धन्य झालो सदगदित झालो आणी बरेच काही काही झालो.
'अमंळ' शब्द मिपावरुनच चोरला आहे :S
आपली फेथफुल्ल्यी ,
चुचु
13 Oct 2009 - 2:03 pm | सखाराम_गटणे™
जबर्दस्त
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
13 Oct 2009 - 2:04 pm | दशानन
अरे चुचु चा आयडी चोरीला गेला की काय ??
हि येवढं शुध्द कसे लिहित आहे ;)
13 Oct 2009 - 2:10 pm | Dhananjay Borgaonkar
नेने - मराठे...माफी असावी पण खरच कविता काहीच नाही कळली..
13 Oct 2009 - 2:13 pm | पर्नल नेने मराठे
बोरगावकर मोठे झालात कि कळेल 8|
चुचु
13 Oct 2009 - 2:12 pm | ज्ञानेश...
कविता आवडली चुचुतै.
(चपळ)
ज्ञानेश.
"Great Power Comes With Great Responsibilities"
13 Oct 2009 - 3:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्याला स्वाईप म्हणायचं असावा बहुदा! रोज श्रीमंताच्या कार्डाबरोबर माझं कार्ड स्वॅप (स्वॉप खरंतर) होत असेल तर मला तर फार्फार आनंद होईल.
असो. कविता आहे का ही? शेवट अजून चांगला करता आला असता.
अदिती
13 Oct 2009 - 4:28 pm | पर्नल नेने मराठे
होहो स्वाईप म्हणायचं होत मला ... थान्कु ह ;;) नाहि हो हा निभन्द आहे 8|
चुचु
13 Oct 2009 - 4:01 pm | अवलिया
हा हा हा
मस्त.... :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Oct 2009 - 9:25 pm | प्रभो
हा हा हा
मस्त.... :)
--प्रभो
13 Oct 2009 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते
अंमळ बरी वाटली हो कविता...
इतके अचूक डिटेल्स कसे काय माहित आपल्याला? :D
बिपिन कार्यकर्ते
14 Oct 2009 - 1:46 pm | धमाल मुलगा
मीही हेच विचारणार होतो पण पुणे ते आखातपेक्षा आखातातल्या आखातात अंतर जवळ असल्यानं आपण अंमळ बाजी मारली. ;)
बाकी, चुचुकाकू, ट्रान्स्फॉर्मेशन एकदम जोरात झालंय हां तुमचं :)
कविता काय लेख काय ते ही 'नॉन-चुचुवाणी'मध्ये :)
आता कवितेबद्दल बोलायचं तर वरवर सरळ दिसत असलेल्या वाक्यांमध्ये बराच ज्वलंत आणि गर्भित अर्थ दडलेला जाणवतो. दोन क्षणांच्या झिंगेकरता, मित्रांच्या आग्रहाकरता स्वतःचं नुकसान करवून घेणार्याला त्याच्या जवळच्या व्यक्तीनं पोटतिडकीनं पुढच्या धोक्यांची ठळक जाणिव करुन देणं हे लख्ख दिसते.
चुचु, फार छान. अश्या सामाजिक प्रगल्भतेच्या गर्भातून लखलखणार्या काळजीच्या भावदर्शी कवितेला अत्यंत साध्या शब्दात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणार्या भाषेत नटवून सर्वांपुढे मांडलेस त्याबद्दल बोलावे तितके थोडेच. :)
(हुश्श! काय काय लिवलंय रं मी?)
13 Oct 2009 - 6:42 pm | Dhananjay Borgaonkar
ओह्...मोठ्यांसाठी लहानांनी लिहिलेली कविता आहे होय..
चालुदे चालुदे.
13 Oct 2009 - 6:54 pm | लवंगी
:)
13 Oct 2009 - 7:01 pm | पर्नल नेने मराठे
चला..एकिला का होइना कविता कळली :)
चुचु
13 Oct 2009 - 6:55 pm | भाग्यश्री कुलकर्णी
अरे वा चुचु कविता पण करते.छान छान.
13 Oct 2009 - 8:35 pm | बाकरवडी
:>
वा वा क्या बात है..........
मनाला भिडणारी कविता (?).......
पुढील कवितांची वाट बघत आहे..... =D> =D> =D> =D> =D>
(चुचु आजींच्या कवितांचा(?) पंखा)
--बाकरवडी :B
ता.क.- चुचुआजी, जरा आमच्यासारख्या नातवंडासाठीपण एखादी कविता लिहा ना !
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी