(प्रेरणा: मिभोकाकांनी दिलेली सुपारी)
तू सांगितलंस तेव्हा
पट्टीची सुगरण कशी समजून घेताना
मोदकांसाठी सामान लिहू लागले तेव्हा
तेव्हा म्हणालास ...
"नारळ, पिठी, गूळ, आणि मीठाच्या
भानगडीत पडतेस कशाला?
मोदक दोघांसाठीच आहे,
अन पाककला इतरांसाठी.
मोदकाची जात एकच - उकडीची"
तेव्हा तुझे हेच शब्द आधार वाटले
पण जोशींचं दुकान बंद दिसलं
माझा आधारच काढून घेणारं
***
गेल्या अंगारकी चतुर्थीला
आपण सावरलो होतो
पुन्हा पंचांग पहायचं राहिलं
आता मोजून खरेदी करायचं आहे
वाढू लागलेलं वजन कमी करण्याचा
खटाटोप तरी करावा लागेलच कारण
जुन्या कपड्यात मावण्याचं स्वप्न त्यातलंच!
तू हादडू शकशील! मनसोक्त, नेहेमीसारखंच
मीपण केले मोदक! स्वप्नात, मनसोक्त
बिघडणार्या पारीची भीती मनातच ठेवत!
वाढत्या वजनाला मात्रा
आता मला शोधायची आहे
जवळच्या जिमची फी
यावर्षी किती असेल?
(डिस्क्लेमरः खायचे मोदक आणि मूळ कवी मोडक यांचा संबंध लावू नये.)
रचनाकाल: मूळ कविता व्याकरण पाहिल्यापासून हा धागा प्रकाशित करेपर्यंत कधीतरी
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 9:52 am | मिसळभोक्ता
मोदकाची जात एकच - उकडीची
हळवा झालो....
(मनातः ह्या मोदकांना - सॉरी मोडकांना - त्यांच्या नितांत सुंदर कवितेची किती मोडतोड बघावी लागणार कोण जाणे ! त्यापेक्षा सरळ गुलजारला मोडला असता तर..)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 9:56 am | सहज
मिभोपार्टीत वरिष्ठ महीला नेत्या म्हणुन स्थान पक्के बै तुमचे!
विडंबन छान!
13 Oct 2009 - 10:01 am | विसोबा खेचर
खल्लास...
मिपावरील सर्व प्रतिभावानांचा मला अभिमान वाटतो!
अदिती, जियो बेटा!
तात्या.
13 Oct 2009 - 10:11 am | निखिल देशपांडे
अदिती लै भारी विडंबन गं..
ह्या मोदकांना हे आपले मोडकांना किती विडंबन बघायचे आहेत काय माहीती.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
13 Oct 2009 - 10:11 am | विनायक प्रभू
जियो बेटी
13 Oct 2009 - 10:14 am | श्रावण मोडक
शिकरण, प्रकरण, विरजण, सुगरण... अबाबाबा... काय पण हा स्केल आहे? :)
13 Oct 2009 - 10:27 am | अवलिया
अगागागागागा
मोडक मोडक.... आपलं ...मोदक ...मोदक
मोदकावर आपला भारी जीव :)
अदिती जबरा !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Oct 2009 - 9:32 pm | प्रभो
अगागागागागा
मोडक मोडक.... आपलं ...मोदक ...मोदक
मोदकावर आपला भारी जीव :)
वि. अ. बाई जबरा हो एकदम!
-प्रभो
13 Oct 2009 - 10:41 am | बेसनलाडू
(मोदकप्रेमी)बेसनलाडू
13 Oct 2009 - 11:41 am | मनीषा
"नारळ, पिठी, गूळ, आणि मीठाच्या
भानगडीत पडतेस कशाला?
मोदक दोघांसाठीच आहे,
अन पाककला इतरांसाठी.
मोदकाची जात एकच - उकडीची"
मस्तच ...
मी केलेल्या मोदकांची आठवण आली .
13 Oct 2009 - 1:45 pm | दशानन
>>>नारळ, पिठी, गूळ, आणि मीठाच्या
=))
=))
माझे मोदकाचे प्रयोग आठवला ;)
13 Oct 2009 - 2:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लोळू नको राजे, मोदकाच्या पारीत खरोखर अंमळ मीठ घालतात.
अदिती
13 Oct 2009 - 3:05 pm | दशानन
हॅ हॅ हॅ
वेडी... माझ्यासारखा मोठा कुक कोण आहे का मिपावर ??
मी थेट सारणामध्ये मीठ घातले होते.. ;)
13 Oct 2009 - 6:42 pm | लवंगी
अरारारा... =)) =)) =)) =))
अदितीबाई जबरा विडंबन
13 Oct 2009 - 3:10 pm | श्रावण मोडक
तेही एक प्रकारे विरजणासारखेच काम करते... :)
13 Oct 2009 - 2:59 pm | अमृतांजन
विडंबन आवडले!
13 Oct 2009 - 6:51 pm | चित्रा
विडंबन झकास.
13 Oct 2009 - 7:07 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता अंमळ छान वाटली. जरी कवयित्रीने ती विडंबन या प्रकारात ठेवली असली तरी, कुठेतरी आत खोलवर जाणवणार्या वेदनेचा स्पष्ट हुंकार प्रत्येक ओळीत जाणवतो आहे. जीवनाच्या मूळ गाभ्याशी कुठेतरी अनाम प्रेरणेने (चुकलेल्या सारणाशी जसे दात टक्कर घेतात, तसे) टक्कर घेत असताना स्फुरलेली कविता असे या कवितेचे वर्णन केले तर चूक ठरू नये. कवयित्रीने, दुसर्या कवितेत तर तमाम खवयांचे अदिम दु:खच मांडले आहे. खाणार्याने खात जायचे व्रत पाळले तर दर तीन महिन्यांनी नवीन कपडे घ्यायची वेळ येते... हा सनातन अन्याय कधीतरी संपेल काय? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.
बिपिन कार्यकर्ते
13 Oct 2009 - 8:11 pm | सहज
प्रतिसाद वाचून तात्यांच्या लिखाळभावजींची आठवण झाली.
:-)
13 Oct 2009 - 7:32 pm | चतुरंग
विलंबित ख्याल असतो तसा तुमचा विडंबित मोदक आवडला! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, आपल्या कवितेची इतकी भुते पाहून श्रामो पुन्हा कविता मिपावर टाकायला धजावतील असं वाटतंय तुला? मग, काय समजलास काय? बघंच आता पुढची कविता टाकतील की नाही लग्गेच! :P )
चतुरंग
13 Oct 2009 - 7:49 pm | स्वाती२
मस्त विडंबन!