(प्रेरणा: सांगायलाच हवी काय?)
तू बोलावलंस म्हणून
प्रतिसादांच्या दूधदुभत्याने प्रसन्न जाऊन
लेखांमागून लेख पाडू लागलो तेव्हा...
तेव्हा म्हणालास,
‘’क्या बात है, +१, असेच म्हणतो
या खेळात पडतोसच कशाला?
दूधदुभतं स्वतःसाठी असतं,
अन् विरजण मिसळ्भोक्त्यांसाठी.
तात्याची जात एकच - (म्हातार्याचा) नातू हीच"
ताक पिण्याची वेळ आली
तेव्हा हेच विरजण तुझा आधार ठरले
कारण त्या मडक्यात दही तयारच होतं
लेखनाचा उत्साहच काढून घेणारं!
***
गेल्या त्या काळी मनोगतावर
आपण वावरलो होतो
आता ह्या काळी मिपा झालंय...
आता आवरून घ्यायचं आहे
रद्द केलेले सदस्यत्त्व विसरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
मालकाला शिव्या देण्याचं एक स्वप्न त्यातलंच!
तू दिल्या असशीलच! मनसोक्त, नेहमीसारख्याच
मीही हात धुवून घेतले!! वाहत्या गंगेत, मनसोक्त
माजी-सदस्यांची हुरहूर छातीत साठवून घेत!
या मिपाची जखम मात्र
आता मला शोधायची आहे
मीठ चोळण्याच्या तुझ्या सवयीला
मदत करायलाच हवी ना ?
रचनाकाल: केव्हातरी, २००७-२००९
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 4:28 am | चतुरंग
श्रामोंच्या कवितेच्या निरश्या दुधाला इतकं जुनं विरजण लावलं जाईल असं वाटलं नव्हतं! ;)
(लोणीचाप्या)चतुरंग
13 Oct 2009 - 5:44 am | सुवर्णमयी
धन्य!
13 Oct 2009 - 6:05 am | विकास
मस्त! एकदम चक्काच झालाय!
13 Oct 2009 - 6:39 am | सहज
ऐतिहासीक फ्रोजन योगर्ट!
शोधा म्हणजे सापडेल. :)
13 Oct 2009 - 6:47 am | अवलिया
हा हा हा
लै भारी... चकाचक.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Oct 2009 - 7:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विरजण लै भारी झालं :)
एकदम टेष्टी.
-दिलीप बिरुटे
13 Oct 2009 - 7:54 am | सुधीर काळे
नवा सभासद असल्याने (व म्हणून इतिहासाच्या अज्ञानामुळे) ही कविता पूर्णपणे डोक्यावरून गेली!
पण इतर अभिप्रायांवरून कांहीं लोकांना तरी कळली असावी असे वाटते. असो, तात्यांना नव्हेंबरमधे भेटेन तेंव्हा समजवून घेईन.....!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
13 Oct 2009 - 9:04 am | मिसळभोक्ता
असो, तात्यांना नव्हेंबरमधे भेटेन तेंव्हा समजवून घेईन.....!
त्यापेक्षा चिरंजीवांकडे फ्रीमाँटात येताय, तेव्हा भेटा. संदर्भासह स्पष्टीकरण मिळेल :-)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 8:09 am | विसोबा खेचर
जबरा...
(एकेकाळी मनोगताचं टिआरपी कायच्या काय वर नेणारा!)
वेलच्याप्रेमी तात्या.
13 Oct 2009 - 9:02 am | मिसळभोक्ता
सर्व व्यक्त आणि अव्यक्त प्रतिसादकांना धन्यवाद !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 9:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मिभोकाका, बेस्टच. पण चतुरंग म्हणतात तसं विरजण अंमळ जुनं झालं आहे. वाचन कमी पडतंय का काय? ;-)
अदिती
13 Oct 2009 - 9:16 am | मिसळभोक्ता
अंमळ वाचन कमी पडतंय, हे नक्कीच. (हल्ली डोळे पण पूर्वीसारखे चालत नैत) पण त्यासाठीच तर तुम्ही नव्या रक्ताचे लोक (म्हणजे टारूबाळ, तू, रंग्या, यशो, नाना, परा, मास्तर, मोडक, पेशवे, शरदिनीतै, क्रांति, गुजुभाऊ, सामंत, प्रभो, पाचलग, आणखी माझ्या कंपूतले कुणी विसरले असतील तर स्वारी बरं का!) आहात. तुम्हा सर्वांकडे आम्ही मोठ्या आशेने पाहतो आहोत.
लिहा लेको ! काहीतरी नवीन रक्त दाखवा ! नाहीतर आम्हाला (गोळे, मिभो, तात्या, बिरुटे, नंदन, प्राजू, मनोहर, वगैरे जुनी खोडे) जुन्या खपल्यांतून रक्त काढावे लागेल !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>काहीतरी नवीन रक्त दाखवा ! नाहीतर आम्हाला जुन्या खपल्यांतून रक्त काढावे लागेल !
सहमत आहे, मला रावसाहेबांची आणि आजानुकर्णाची खूप आठवण येत आहे. :)
-दिलीप बिरुटे
13 Oct 2009 - 9:26 am | मिसळभोक्ता
मला रावसाहेबांची आणि आजानुकर्णाची खूप आठवण येत आहे.
आठवण ? तिकडे कायम पडीक असता. तिकडे तुमची खूप सालटी निघतात जीएंच्या मानसपुत्राकडून आणि मानसनातवाकडून. मग आठवण कशी येते बॉ ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तिकडे तुमची खूप सालटी निघतात जीएंच्या मानसपुत्राकडून
हो ना ! तीकडे आमची जखम भळभळतेच. आमच्याशिवाय त्यांनाही होत नाही, म्हणून तर म्हणालो त्यांची आठवण येते. जखम भरणारे काय तरी लिहिले पाहिजे असे वाटते.
>>मानसनातवाकडून
मानसनातव सध्या जरा कुल आहे. पण, तेही काही कमी नाही.
एकटा पडलोय रे तिकडे.... म्हणून तुम्हाला आमची सालटी निघाल्यासारखी वाटतात.
(देता का साथ आता पळता भुई थोडी करु)
-दिलीप बिरुटे
13 Oct 2009 - 9:43 am | मिसळभोक्ता
(देता का साथ आता पळता भुई थोडी करु)
आधी इकडच्यांची करू, मग वेळ मिळाल्यास तिकडच्यांची....
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 9:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मिभोकाका, तुम्ही कैच्याकै नावं एका लायनीत टाकलीत आहेत हा ... किंवा "आम्ही सर्व प्रकारच्या टवाळ आणि बिनटवाळ लोकांना कंपूत घेतो" अशी सहीतरी टाकत जा!
अदिती
13 Oct 2009 - 9:32 am | सहज
मिभो बहुतेक मसं नवनिर्माण सेना बांधतायत ;-)
13 Oct 2009 - 9:34 am | मिसळभोक्ता
तुम्ही कैच्याकै नावं एका लायनीत टाकलीत आहेत हा
ह्यालाच "सर्वसमावेशक" म्हणतात ना ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 9:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हालाही विधानसभा निवडणूकांचं वारं लागलं का काय?
13 Oct 2009 - 9:47 am | मिसळभोक्ता
तुम्हालाही विधानसभा निवडणूकांचं वारं लागलं का काय?
आम्हाला "रिलाडोस" चा एक नवीन फुलफॉर्म सुचला आहे. पण पोरीबाळी असलेल्या स्थळावर तो लिहायला आम्ही स्थळाचे मालक नाही.
तुम्ही पोरीबाळि नसल्यास तुम्हाला व्यनितून कळवीन वाटल्यास...
(आपापसात गप्पा करण्याचे हे स्थळ नव्हे.... खिशाला खार लावून तुम्हाला खरडवही उपलब्ध केली... वगैरे ऐकण्याच्या आधी कटतो.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 10:40 am | अवलिया
तुम्ही नव्या रक्ताचे लोक (म्हणजे टारूबाळ, तू, रंग्या, यशो, नाना, परा, मास्तर, मोडक, पेशवे, शरदिनीतै, क्रांति, गुजुभाऊ, सामंत, प्रभो, पाचलग, आणखी माझ्या कंपूतले कुणी विसरले असतील तर स्वारी बरं का!) आहात. तुम्हा सर्वांकडे आम्ही मोठ्या आशेने पाहतो आहोत.
क्षमस्व. आता उरलो गंभीर लेखनापुरता !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Oct 2009 - 10:45 am | श्रावण मोडक
मी या यादीत? नाही.
आपण भेटतोय ना... तेव्हा 'बोलू' नक्की!!! :)
13 Oct 2009 - 1:20 pm | विसोबा खेचर
हा मोडकशेठ पक्का मनोगती होता. त्याला मी आणला खेचून मिपाकडे. आता तो पक्का मिपाकर झाला आहे. मिपावर त्याच्या कवितांचं चीज झालं, भरभरून दाद मिळाली याचा आनंद होतो!
तात्या.
13 Oct 2009 - 2:52 pm | श्रावण मोडक
माझ्या कवितांना भरभरून दाद मिळाल्याने तात्यांना झालेला आनंद दुधासारखाच. पण 'मिसळपाव'वर दूध? छ्या. तिथं ताकच पाहिजे. ताकासाठी आधी दही हवं. म्हणून हे थोडं, अगदी नाममात्र विरजण...
13 Oct 2009 - 11:59 am | विजुभाऊ
गान्जोप काका....टलन्त्री हे पूर्ण विझलेत बहुतेक
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
13 Oct 2009 - 10:03 am | निखिल देशपांडे
विरजण भारी आहे...
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
13 Oct 2009 - 10:13 am | श्रावण मोडक
शिकरण, प्रकरण, विरजण, सुगरण... अबाबाबा... काय पण हा स्केल आहे? :)
13 Oct 2009 - 11:38 am | मनीषा
लिहिताना थोडी भिती वाटतेय .. (इतिहास माहिती नाहीये म्हणून )
पण म्हणलं शंका निरसन करुन घ्यावं ........
व्याकरणाचे शिकरण झाल्यावर जे प्रकरण झाले त्याला विरजण लावून ते आवरण्याचा सुगरणीने प्रयत्न केला असे काहीसे कळले .
बरोबर आहे का?
13 Oct 2009 - 11:43 am | श्रावण मोडक
काय मार्मीक निरिक्षण आहे? एक भावी इतिहासकार घडताना... :)
13 Oct 2009 - 2:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मनीषाताई, आवडला तुमचा प्रतिसाद!
अदिती
13 Oct 2009 - 7:53 pm | स्वाती२
लै भारी!