मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(विरजण)

मिसळभोक्ता · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा: सांगायलाच हवी काय?) तू बोलावलंस म्हणून प्रतिसादांच्या दूधदुभत्याने प्रसन्न जाऊन लेखांमागून लेख पाडू लागलो तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’क्या बात है, +१, असेच म्हणतो या खेळात पडतोसच कशाला? दूधदुभतं स्वतःसाठी असतं, अन् विरजण मिसळ्भोक्त्यांसाठी. तात्याची जात एकच - (म्हातार्‍याचा) नातू हीच" ताक पिण्याची वेळ आली तेव्हा हेच विरजण तुझा आधार ठरले कारण त्या मडक्यात दही तयारच होतं लेखनाचा उत्साहच काढून घेणारं! *** गेल्या त्या काळी मनोगतावर आपण वावरलो होतो आता ह्या काळी मिपा झालंय... आता आवरून घ्यायचं आहे रद्द केलेले सदस्यत्त्व विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण मालकाला शिव्या देण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू दिल्या असशीलच! मनसोक्त, नेहमीसारख्याच मीही हात धुवून घेतले!! वाहत्या गंगेत, मनसोक्त माजी-सदस्यांची हुरहूर छातीत साठवून घेत! या मिपाची जखम मात्र आता मला शोधायची आहे मीठ चोळण्याच्या तुझ्या सवयीला मदत करायलाच हवी ना ? रचनाकाल: केव्हातरी, २००७-२००९

वाचन 5802 प्रतिक्रिया 0