मुंडण-१.५
कार्यालय सुरु केल्यानंतरचा दुसरा दिवस.
आय्.सी.एस्.सी च्या पालकसभेचे आमंत्रण आले.
५,६ ७ ऑक्टोबर संध्याकाळी ५ ते ९ मधे रोज ३ सभा.
ब्लेझर, टाय ची विनंती पुढे आली.
गाडी पण येणार होती घ्यायला.
खरे तर शंका तेंव्हाच यायला हवी होती.
सेंसर्स चा 'ऑफ डे' होता.
मी नेहमी असतो तसाच येइन.
ब्लेझर वगैरे काही नाही.
दहावी चे सर्व पालक सारखेच.
मी कळवले.
कफ परेड, मलबार हील, लोखंडवाला मंडळी होती.
मी माझ्या भाषेत काहीही फरक केला नाही.
समोर कोण आहे त्याचा मला काहीही फरक पडत नाही.
कार्यक्रम संपल्या वर एक ताई भेटायला आल्या.
आयोजकांच्या केबिन मधे.
आयोजक पण बरोबर होते.
कार्यक्रम जरा लांबला होता.
पुढची मंडळी खोळंबली होती.
" मी अस्मिता ........
कार्यक्रम खरोखर छान झाला सर.
डोळ्यात झणझणीत अंजन पडले.
उगाच ट़क्क्याच्या मागे लागुन मुलीशी नाते संबंध बिघडवत होते.(माझी वाक्ये मलाच)
धन्यवाद"
ठीक आहे.- मी
"जरा आणखी एक सल्ला हवा होता"
आयोजकाच्या भुवया वाकड्या झाल्या.
त्याला पुढे जाउन प्रस्तावना करायला सांगितली.
तो जड पावलाने उठला.
"बोला काय सल्ला हवा "मी ताई ना विचारले.
"मुलीच्या शाळेत आय. बी चा कार्यक्रम सुरु होत आहे. हे पहीलेच वर्ष. तुमचे काय मत आहे. ४८ तासात कळवायचे आहे."
नको.
"तुम्ही आय्.बी विरोधक का"
नाही. चौकट माहीत नाही म्हणुन नको म्ह्टले.
"कसली चौकट"?
१. तुमच्या मुलीला आपल्याला दहावी नंतर नेमके काय करायचे आहे ते माहीत आहे का? तुम्हाला काय वाटते ते द्या सोडुन. साधारण दहावीच्या परिक्षेनंतर ही प्रगल्भता येते. तेंव्हा हा निर्णय तेंव्हा घेतलेला बरा. हत्ती घोडे शाळा पाठवते आहे. त्यामुळे ते ४८ तास वगैरे बोगस आहे.
२.आय. बी ची फी तुम्हाला परवडणार आहे का? त्यांनी आठ लाख सांगितली असेल. पण ती साधारण ११ पर्यंत जाते.
३. समजा ती तुम्हाला परवडते असे गृहीत धरु. पण परदेशात ग्रॅज्युएशन चा खर्च परवडेल का?
४. तो पण परवडतो असे गृहीत धरु. पण वयाच्या १६ व्या वर्षी एकटी परदेशी राहील, कल्चरल शॉक सहन करेल एवढी मानसिक रित्या सशक्त आहे का?
५. हे पण आहे असे गृहीत धरु. तुम्हाला मुलगी परदेशी गेलेली चालेल का?
६. आणि सर्वात शेवटी डीग्री घेउन बेकार असलेले 'भुमीपुत्र" परदेशात काही कमी आहेत का? त्यात आणखी एका भारतीयाची भर घालयची.
" अहो पण शाळेच्या काउंसेलिंग मधे हे सर्व काही चर्चेत आलेच नाही.
ते काउंसेलिंग नव्हते. ते 'कॉन सेलींग' होते. सामुदायिक मुंडण. तिरुपतीला करतात तसे.
" धन्यवाद सर. एवरी पेनी आय हॅव स्पेंड ऑन युअर प्रोग्राम इज वर्थ"
आता थक्क व्हायची पाळी माझी होती. मी काही बोललो नाही.
पुढच्या सभेत मधेच एक दहा मिनिटाचा ब्रेक घेतला.
कार्यक्रम संपल्यावर आयोजकाच्या गाडीतुन घरी येताना साकी नाक्याला गाडी थांबवली. एका ३ स्टार हॉटेल मधे जाउन पोटातली कळ शमवली.
"काय सर, काही प्रॉब्लेम"? आयोजक काळजीत.
चहात बहुतेक दुध कच्चे होते. मला अॅलर्जी आहे. आज कठीण दिसते आहे. कांजुर मार्ग ला गाडी थांबवा. डॉक्टर कडे जाउन औषध घेतलेले बरे. उद्या पण कार्यक्रम आहे. रद्द करायला नको.
मुंडण-०.५
रात्री घरी पोचल्यावर बायकोला सांगितले. सकाळी बरोबर ७.३० ला आयोजकाचा फोन येईल. काल आय व्ही घ्यायला लागली. झोपले आहेत म्हणुन सांग.
दुसर्या दिवशी ९.३० वाजताचा आयोजकाचा ४ था फोन मी घेतला.
" काय सर, तब्बेत कशी काय"?
एकदम खराब. आता पर्यंत ३० धावा झाल्या. आजचा कार्यक्रम रद्द करा.
"अहो सर, बसुन करा. रद्द करता येणार नाही. लोक जोडे मारतील"
जमणार नाही.
"अस करु नका सर. काहीतरी उपाय काढा"
बघु. दुपारी २ ला फोन करा.
बरोब्बर २ वाजता फोन आला.
" येताय ना"
एक उपाय आहे. आताच डॉक्टर कडे जाउन आलो. त्यांनी एक इंजेक्शन सुचवले आहे. फॉरीन चे आहे. २४००० रुपये लागतील म्हणाला. तुम्ही म्हणत असाल तर लगेच घेतो. नाहीतरी तुम्ही मला न कळवता माझ्या तत्वाविरुद्ध पालकांकडुन ७०० रुपये घेतले आहेत ना. ३०० पालकांचे २,१०,००० होतात. खर्चात मांडा. ड्रायवर बरोबर रोख पाठवा. आणि बरोबर उकळलेल्या दुधाचा चहा द्या आज.
"सर चोवीस जास्त होतात"
आणखी काही बोलाल तर तीस होतील. पाटावर बसवताना ज्याला बसवता त्याची हिश्ट्री जाणुन घ्यायची असते मिश्टर.
त्याने एक मोठा सुस्कारा सोडला.
ड्रायवर बरोबर रोख २४००० आले.
पाटावर बसवणारा पाटावर बसला.
बर्याच दिवसानी कपाटात ठेवलेला 'परबु भाई' बाहेर आला.
मास्तर ची दिवाळी यंदा जोरात जाणार.
प्रतिक्रिया
8 Oct 2009 - 10:16 am | ज्ञानेश...
=))
मास्तरला दिवाळीच्या शुभेच्छा!
"Great Power Comes With Great Responsibilities"
8 Oct 2009 - 1:15 pm | विशाल कुलकर्णी
ये हुई ना बात !
परबुभाय, दंडवत ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
8 Oct 2009 - 10:17 am | नंदन
अ क रा ला ख??? अगायायाया.
-- उत्तम!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Oct 2009 - 10:19 am | विनायक प्रभू
जी १२ वी भारतात १ लाखात होते त्यासाठी पालक लाईन लाउन पाटावर बसतात. ११ लाख मोजतात.
फॉरेन ची १२ वी आणि भारतीय १२ चा फरक हाय भौ.
8 Oct 2009 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला हॅप्पी दिवाळी, आणि त्याला हॅप्पी दिवाळं!
अदिती
8 Oct 2009 - 10:20 am | सहज
हे हुई ना बात!!!
8 Oct 2009 - 10:40 am | महेश हतोळकर
भले तरी देऊ कासेची लंगोटी. नाठाळाचे माथी हाणू काठी.
------------------------------------------
महेश हतोळकर
8 Oct 2009 - 10:28 am | नंदू
धोरण आवडलं :)
आणि हो,
ते काउंसेलिंग नव्हते. ते 'कॉन सेलींग' होते.
कोटी आवडली.
नंदू
8 Oct 2009 - 10:39 am | अवलिया
हाणतिच्यायला... तरी सांगतो फुकाट काही करु नका.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
8 Oct 2009 - 10:50 am | बिपिन कार्यकर्ते
चांगले केलेत. जरूर तिथे फुकट... पण नको तिथे उगाच समाजसेवा नको. चार पैसे वाजवून घेतलेत ते चांगलेच झाले. बाकी मास्तरला रोजच दिवाळी असते असे ऐकून आहे ब्वॉ!!! ;)
बिपिन कार्यकर्ते
8 Oct 2009 - 10:51 am | निखिल देशपांडे
मास्तर लै भारी..
दिवाळी जोरात आता...
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
8 Oct 2009 - 10:52 am | सखाराम_गटणे™
आता जोरात फटाके फोडा.
8 Oct 2009 - 11:10 am | हर्षद आनंदी
असेच पाहीजे, शेरास सव्वाशेर!
हे भडवे, भाबड्या पालकांना फसवुन पैसे काढतात आणि दुसर्याच्या नावावर? मी तर म्हणतो तुम्ही ५०,००० तरी किमान मागायला हवे होते, झक्कत दिले असते, शिंच्याने!!
आता जोरात होऊदे दीवाळी... आमच्या शुभेच्छा !!!
बाकी मास्तर, तुमच्या थेट प्रश्नांनी बाईंना भोवळच आली असेल, तरी किती साधे प्रश्न होते, पण मोठेपणाच्या नादात बारीक बारीक गोष्टी विसरून नंतर पश्चातापाची पाळी येते..हे बाकी खरेच..
8 Oct 2009 - 11:20 am | वेताळ
येणारी दिवाळी व येणारे नवीन वर्ष असेच भरभराटीचे जावो.
जय प्रभुभाय
वेताळ
8 Oct 2009 - 11:35 am | झकासराव
हॅ हॅ हॅ.....
मास्तर गरीबान्साठी करा हो फुकटात.
बड्या लोकाना कशाला सोडता?
चला तुम्हाला एक नवीन धडा शिकायला मिळाला म्हणायचा. :)
8 Oct 2009 - 11:44 am | समंजस
शुभेच्छा!! या वर्षी परबु भाईंच्या धडाक्यात होण्यार्या दिवाळी बद्दल!! <:P
मास्तर, या परबुभाई ला कपाटात ठेवू नका.
8 Oct 2009 - 12:21 pm | श्रीयुत संतोष जोशी
लय म्हंजे लयच भारी मास्तर.
खटाशी असावे खट
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
8 Oct 2009 - 12:40 pm | नीधप
हा लेख आवडला.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
8 Oct 2009 - 1:52 pm | श्रावण मोडक
वा...!!!
8 Oct 2009 - 1:53 pm | गणपा
हा हा हा जबरा 'परबु भाई'
दिवाळी आधीच दिवाळी होउन जाउदे दणक्यात.
8 Oct 2009 - 3:48 pm | भाग्यश्री कुलकर्णी
लेख चांगला आहे.आवडला.
8 Oct 2009 - 3:57 pm | स्वाती२
दणक्यात दिवाळी होऊ दे. सर, ह्या हरामखोरांना 'परबु भाई' ची च भाषा समजते. अजून धुवायला हवं होतं.
8 Oct 2009 - 4:04 pm | भडकमकर मास्तर
झ का स ..
आय्बी हे काय अस्ते?
परदेशातली बारावी काय?
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
8 Oct 2009 - 4:05 pm | भडकमकर मास्तर
झ का स ..
आय्बी हे काय अस्ते?
परदेशातली बारावी काय?
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
10 Oct 2009 - 8:27 pm | पिवळा डांबिस
आय्बी हे काय अस्ते?
आम्हालाही हा प्रश्न पडला आहे....
पण परभूभाईला विचारायचा धीर होत नव्हता...
आता एका डॉक्टरलाही हाच प्रश्न पडल्याचे पाहून धीर आला....
ओ परभूभाई, जरा तुमचं मास्तराचं पागोटं चढवा डुईवर आणि सांगा की आम्हाला!!!
:)
8 Oct 2009 - 4:05 pm | प्रमोद देव
की नुसतीच हजामत?
तरीही लेख आवडला. :)
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
8 Oct 2009 - 8:32 pm | चतुरंग
नाहीतर आयजीच्या जिवावर बायजी मोकाट सुटला असता! ;)
नवीन कार्यालयातल्या गणपतीबाप्पाने मोदकच दिला की दिवाळीला! B)
हे आय.बी प्रकरण जरा विस्ताराने सांगता येईल का?
मला काहीच माहिती नाहीये.
चतुरंग
8 Oct 2009 - 9:03 pm | स्वाती२
आय. बी. म्हणजे International Baccalaureate.
माहिती साठी दुवा http://www.ibo.org/
8 Oct 2009 - 9:10 pm | चतुरंग
चतुरंग
8 Oct 2009 - 11:12 pm | डॉ.प्रसाद दाढे
मास्तर आमचे 'तीस टक्के' इसरू नका हो!
10 Oct 2009 - 10:40 pm | टुकुल
मान गये परबुभाइ....
11 Oct 2009 - 7:27 am | लवंगी
पण गरीबांसाठी फुकटातच करा कार्यक्रम ..