फारा दिवसानी थोडा निवांतपणा मिळाला आणि समोर क्रांतीताईंची सुरेख 'भैरवी' दिसली, मग काय विचारावे?!..;)
एक एक बोट जाड, चाखण्याची वेळ नाही
'भरती'चा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही
आली पहा भजी गोल, घाल पुरणास पोटी,
'कट' कसा चुकला हे सांगण्याची वेळ नाही
मनी असलेले सारे बेत इथे सिद्ध झाले,
वेड्या मना, तुझी काजू 'सांडण्याची' वेळ नाही
वारुणीचे टेबलाशी उभे ग्लास मांडलेले,
रात्र चाखण्याची आहे, झिंगण्याची वेळ नाही
'बेड'पेच दिसे आता, आवरून घे सुरेला,
घोरण्यावाचून काही 'रंग'ण्याची वेळ नाही!
चतुरंग
प्रतिक्रिया
7 Oct 2009 - 9:58 am | विशाल कुलकर्णी
कल्ला ! जबरा विडंबन .......
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
7 Oct 2009 - 10:03 am | वेताळ
ह्याचीच वाट पहात होतो. छान कविता आहे. =))
वेताळ
7 Oct 2009 - 10:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हीहीहीही ...
अदिती
7 Oct 2009 - 11:26 am | श्रावण मोडक
हाहाहाहा...
7 Oct 2009 - 12:12 pm | अवलिया
होहोहोहो
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
7 Oct 2009 - 12:17 pm | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ हॅ
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
7 Oct 2009 - 12:27 pm | निखिल देशपांडे
हे हे हे हे
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
7 Oct 2009 - 1:54 pm | गणपा
हु हु हु हु
( क्रम चालु ठेवणे क्रमपात्र आहे ;) )
7 Oct 2009 - 4:34 pm | धमाल मुलगा
भारीच की :)
पण कवितेतून वास्तवात उतरुन पाहतो तेव्हा पुरणपोळी, कटाची आमटी आणि सोबत कितीही भारी असलेली सुरा.....ये समिकरण कुछ पचा नही राव.
पण वाचायला मजा आली ना....फिनिश! आपुन लोड नाय घेतला :)
7 Oct 2009 - 4:57 pm | प्रभो
हः हः हः
जबरा !!!
>>पण कवितेतून वास्तवात उतरुन पाहतो तेव्हा पुरणपोळी, कटाची आमटी आणि सोबत कितीही भारी असलेली सुरा.....ये समिकरण कुछ पचा नही राव.
एकावेळेस एकच घ्यावं या मताचा आहे मी....
--प्रभो
7 Oct 2009 - 11:37 am | अमोल केळकर
मस्त , मजा आली
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Oct 2009 - 1:37 pm | सहज
पण पुरणपोळीचे तुडुंब जेवण झाल्यावर दारु वगैरे?? अंमळ जायफळ वगैरे घालून केलेल्या गरम गरम पुरणपोळीत जी नशा आहे ती काही औरच!
देन अगेन प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता. :-)
7 Oct 2009 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या जहाल आणि मादक संपतात तिथे पुरणपोळी सुरू होते, समजलात का?
(फ्लोटर्स कुठे गेले माझे?)
अदिती
8 Oct 2009 - 8:44 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत.
सप्र्यांकडची पुरणपोळी आणि मुसाभाईकडचं हलीम हे एकदमच सुरू होतात आणि एकमेकांशी १८० अंशाचा कोन साधतात जणू एका बिंदूतून निघणारे २ किरण.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
7 Oct 2009 - 1:57 pm | गणपा
वाह रंगाशेठ लै दिसांनी ईडंबन.
मझा आ गया..
7 Oct 2009 - 2:07 pm | गणपा
प्रकाटाआ.
7 Oct 2009 - 4:29 pm | केशवसुमार
रंगाशेठ,
मागिल पानावरून पुढे..उत्तम..
चालू दे..
(टोळभैरव)केशवसुमार
7 Oct 2009 - 4:52 pm | सुधीर काळे
मला वाटलं 'ह'ची बाराखडी संपतेय कीं नाहीं!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
7 Oct 2009 - 6:49 pm | संदीप चित्रे
बर्याच दिवसांनी तू लिहिलेलं विडंबन वाचायला मजा आली रे
7 Oct 2009 - 8:04 pm | क्रान्ति
आली पहा भजी गोल, घाल पुरणास पोटी,
'कट' कसा चुकला हे सांगण्याची वेळ नाही
वा! मस्त विडंबन!:)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
8 Oct 2009 - 4:07 am | सुबक ठेंगणी
:)) हा शेर आणि शेवटची ओळ सही जमली आहे. :))
(ब्रम्हानंदी टाळ्या वाजवणारी) सुबक
8 Oct 2009 - 1:07 am | चतुरंग
पुरणपोळी आणी दारु असे कसे? असा प्रश्न ज्यांना पडलाय त्यांच्यासाठी - जो हवा तो मेन्यू निवडू शकता, इथे आम्ही दोन्ही दिलेत, एकामागे एक घेतलेच पाहिजेत असे नाही! चॉईस इज युवर्स!! ;)
(उच्चभ्रू)चतुरंग