भैरवी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
6 Oct 2009 - 7:50 am

एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही
परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही

विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी,
कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही

तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले,
वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही

संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले,
रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही

पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना,
भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही

करुणशांतरसकवितागझल

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

6 Oct 2009 - 9:24 am | श्रावण मोडक

वाचनीय रचना.

अवलिया's picture

6 Oct 2009 - 9:28 am | अवलिया

सुरेख ! रचना आवडली ! !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सायली पानसे's picture

6 Oct 2009 - 3:44 pm | सायली पानसे

सुरेख!!!

प्रमोद देव's picture

6 Oct 2009 - 9:50 am | प्रमोद देव

सगळेच शेर मस्त आहेत.

पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना,
भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही

हा शेर 'हासिले गजल' (की असंच काहीसं) म्हणतात तसा शेर आहे.

...ह्या गजलेला चाल लावलीच पाहिजे......

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

मनिष's picture

7 Oct 2009 - 9:58 am | मनिष

सगळेच शेर मस्त आहेत. प्रमोद्काकांनी म्हटल्याप्रमाणे, हे तर शिखरच!

पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना,
भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही

गोगट्यांचा समीर's picture

6 Oct 2009 - 9:53 am | गोगट्यांचा समीर

कविता आवडली..

संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले,
रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही

हे तर मस्तच!!

युयुत्सु's picture

6 Oct 2009 - 10:25 am | युयुत्सु

छान कविता

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

दिपक's picture

6 Oct 2009 - 10:50 am | दिपक

सुरे़ख ! :)

फ्रॅक्चर बंड्या's picture

6 Oct 2009 - 11:15 am | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच ...

राघव's picture

6 Oct 2009 - 1:04 pm | राघव

खूपच छान गझल. सगळीच रचना मनापासून आवडली. :)

राघव

विशाल कुलकर्णी's picture

6 Oct 2009 - 3:00 pm | विशाल कुलकर्णी

सुरेख ! आवडली !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पार्टनर's picture

6 Oct 2009 - 8:14 pm | पार्टनर

प्रत्येक शेर दुसर्‍यापेक्षा भन्नाट ..

खास !!

(अवांतर : शेवटचा महत्त्वाचा 'भैरवी' चा शेर, संगीतातलं फार काही ज्ञान नसल्याने नीटसा समजला नाही.)

सुबक ठेंगणी's picture

7 Oct 2009 - 3:54 am | सुबक ठेंगणी

खूपच छान गझल. मलाही शेवटचाच शेर आवडला.

पार्टनर,
ही कविता म्हणजे मृत्यूचे वेध लागलेल्या माणसाचे मनोगत आहे. भैरवी हा राग मैफिलीचा समारोप करताना गातात...त्यामुळे जीवनाच्या मैफिलीच्या शेवटी आता भैरवीशिवाय काहीच रंगणार नाही असं इथे सुचवायचं आहे असं मला वाटतं. क्रांतीतै बरोबर नां?

क्रान्ति's picture

7 Oct 2009 - 7:44 am | क्रान्ति

हाच अर्थ आहे या कवितेचा.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

दशानन's picture

7 Oct 2009 - 9:17 am | दशानन

किती हुषार आहेस सु.ठें.

;)

*

कविता नेहमी प्रमाणेच सुंदर :)

नंदू's picture

6 Oct 2009 - 8:51 pm | नंदू

सुंदर.
कविता / गझल आवडली.

नंदू

प्राजु's picture

7 Oct 2009 - 4:19 am | प्राजु

केवळ सुरेख!!
शेवटचा शेर वाचून शहारा आला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आमचा भैरवीतला टप्पा इथे ऐकता येईल! ;)

(भैरव)चतुरंग

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Oct 2009 - 1:19 pm | भाग्यश्री कुलकर्णी

चांगली रचना.भिडली मनाला.

सहज's picture

7 Oct 2009 - 1:28 pm | सहज

पण कशाला उगाच आयुष्याच्या शेवटच्या गोष्टी?

:-)

टुकुल's picture

7 Oct 2009 - 8:58 pm | टुकुल

मस्त... सुरेख रचना...

अनिल हटेला's picture

7 Oct 2009 - 9:22 pm | अनिल हटेला

आवडली !!

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)